Breking News

रविवार, २३ एप्रिल, २०१७

रस्तालुटीच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशत

तळोदा शहरानजीकच्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाला लागुन असलेल्या वळण रस्त ते खर्डी नदी पुलाजवळ रस्ता लुटीचा प्रयत्न फसला असुन चोरट्यानी सात ते आठ नागरिकांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळूनही ते वेळीच घटनास्थळी दाखल न झल्याने चोरटे प्रसार होण्यात यशस्वी झाल्याचा आरोप करण्यात येऊन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा रस्तावरील तळोदा शहरापासून दोन कि.म.अंतरावरील लक्ष्मण गंगाराम बत्तीसे यांच्या शेतापासून ते अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गालगतच्या वळण रस्तानजीकच्या गायत्री मिनरल वाटर नजीक दि.२१ रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास या रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांचे आठ ते दहा जणांनी वाहन अडवून लूट करण्याचा प्रय▪केला. रस्त्यावरून जाणारे प्रवासी, शेतकरी व शेतमजुर अशा आठ-दहा लोकांना चोरट्यांनी मारहाण करीत दहशत निर्माण केली. शहरातील गिरीश मधुकर मगरे हे शेतातून घरी परतत असतांना लक्ष्मण बत्तीसे यांच्या शेतानजीकच्या फरशी पुलाच्या जवळ काळे कपडे परिधान केलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणाने त्यांच्यावर वार केला. मात्र त्यांनी वार चुकवित पळ काढण्यात यश मिळविले. तसाच प्रकार येथून नजीकच असलेल्या गायत्री फिल्टर प्लॅन नजीक घडला. नातेवाईकांकडून जेवण करून घरी परतणार्‍या मंगेश वसावे व मनोज वसावे यांना चोरअ्यांनी मारहाण केली. मटावल, बुधावल, भंवर परिसरातून ये-जा करणार्‍या इतर आठ-दहा जणांच्या गाडीवर चोट्यांनी दगडफेक केल्याचे समजते. या घटनेबाबत तळोद्यातील डी.बी. हट्टी, मराठा चौक व मगरे चौक परिसरात माहिती मिळाल्याने संमारे दीडशे ते २00 तरुणांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला. मात्र तेवढय़ात चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात अनेकवेळा दुरध्वनी करूनही माहिती देण्याचा प्रय▪करण्यात आला मात्र पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. दरम्यान सदर घटनेनजीकच १५ दिवसापुर्वी एक खून झाला आहे. त्यामुळे या भागात चोरट्यांची टोळी सक्रीय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली असून तात्काळ या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा