पथकाची कारवाई : मालकास साडेपाच लाखाचा दंड ......
तळोदा शहरातील एका बर्फ कारखान्यास वीज वितरणच्या भरारी पथकाने अचानक दिलेल्या भेटीत वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बर्फ कारखाना मालकास तब्बल साडेपाच लाखाचा दंड वीज वितरणने ठोठावला आहे. यामुळे वीज चोरी करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. महावितरणकडून घरगुती, व्यावसायीक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणो अपेक्षित असते. परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणो किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणो आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक वीजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील औद्योगिक अथवा मोठे ग्राहकांना झिरो युनिट अथवा कमी बिल जात असल्याचे मुख्यालयाच्या निदर्शनास आल्याने जिल्हातून भरारी पथक तयार करून तालुक्यात होत असलेली वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित पथकाने तळोदा शहरात ठिकठिकाणी जाऊन वीजचोरी बाबत तपासणी केली. शहरातील खटाई माता परिसरात कमलेश भामरे यांचा बर्फ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली. यावेळी थ्रीफेज लाईन असून मिटरच्या सप्लाय बायपास करण्यात आल्याचे संबंधित पथकास आढळून आले. तसेच इतर काही गोष्टींची तपासणी केली असता ठीकठिकाणी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने भरारी पथकाने पंचनामा करून मिटरला सील लावले. पथकाने सर्व्हिस केबल व इतर साहित्य ताब्यात घेतले. या वीजचोरी प्रकरणी संबधित कारखाना मालकास पाच लाख ४९ हजार ५६0 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. बसस्थानक परिसरातील घरगुती ग्राहक गोरख गोविंद चव्हाण यांनी रिमोटच्या सहायाने वीजमिटर गोठून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ३३ हजार ६५0 एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता इंगळे, सहायक अभियंता कोष्टी व सहकार्यांनी केली. या कारवाईमुळे वीज चोरी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा