Breking News

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

सूचना फलकाच्या वरती फलक लावून पालिकेला आव्हान !


तळोदयात विविध चौकात अवैध होर्डिंगस व फ्लेक्सचे साम्राज्य वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र सर्वांसमोर आले आहे. पालिकेचा कर चुकवून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पालिका मेहरभान का असा सवाल आमजनेतून उपस्थित होत आहे. शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना दुसऱ्या बाजूला अशा अवैध होर्डिंगसमूळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची समस्या शहराला भेडसावत आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसासह, विविध कार्यक्रमांचे, प्लॉट विक्री, क्लासेस, आदींसह विविध जाहिराती तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या प्रसिद्धीसाठी चौक चौकांमध्ये आणि रस्त्यावरील पथ दिव्याच्या खांबांना होर्डिंग लावले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे.. एकाचा फलक काढला, की लगेच दुसऱ्याचा फलक झळकन्याच्या प्रकार सुरू असून एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे फलक लावण्याऱ्यांसमोर पालिका कर्मचारी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनधिकृत फलक लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना फलक लावले जात आहेत. तळोदा येथील मुख्य स्मारक चौकांसह ठिकठिकाणी फलकबाजी सुरू आहे. निवड, वाढदिवस, स्वागत, पुण्यतिथी, जयंती अशा वेगवेगळय़ा कारणास्तव जाहिरातीचे फलक लावले जात आहेत. मुदत संपल्यानंतर ते काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने त्यामुळे जागोजागी फलकांचा सुळसुळाट झाला असून शहर विद्रूप होत आहे. फलकबाजी करणारे पालिकेच्या कारवाईला बिलकूल भीक घालीत नाहीत, उलट फलक काढल्यास दमबाजीची भाषा केली जाते. त्यामुळे वाद विवादाला कंटाळून डोळेझाक करण्याची सोयीस्कर भूमिका पालिकेने आतापर्यंत घेतली आहे. मात्र, लाजेखातर कागदपत्री कारवाई सुरू आहे असे दाखविले जात आहे. यापूर्वी, मुख्याधिकारी जनार्धन पवार यांनी कारवाईचे इशारे दिले आहेत, शहादा रस्त्याकडील पथदिव्याच्या ईलेक्ट्रिक खांबावर फलक लावल्यास म.अधिनियम 1995 म प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी 1995 चे कलम 5 अन्वये इलेक्ट्रिक पोलवर अथवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे,फलक बॅनर, अन्य कोणत्याही प्रकारच्या वस्तू लावूंन विद्रुपीकरण करू नये अन्यथा आपल्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल या आशयाची चेतावणी वजा सूचना करून, इशारा दिला असताना अगदी त्या चेतावनी वरच जाहिरातीचे होर्डिंग लावुन पालिकेला आव्हान केले असल्याने सदर प्लॉट जाहिरातीचे होर्डिंगस चर्चेचा विषय बनले आहे. याच रस्त्याने पालिकेचे मुख्याधिकारी दररोज वावरत असताना त्यांनी सदर जाहिरातीकडे कानाडोळा केला असल्याने सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे. पालिकेने लावलेल्या सूचना फलकांला केराची टोपली दाखवत फलक बहादरांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. कायदेशीर कारवाईचे सूचना फलक लावले असताना काही फलक बहाद्दर यांना न जुमानता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सरास फलक लावून पालिकेच्या नियमाना केराची टोपली दाखवन्याच्या प्रकार सुरू आहे. विनापरवानगी फलक पालिकेला डोकेदुखे ठरली असुन पालिकेचा कर बुडवत हे नियम धाब्यावर ठेवले जात आहेत.. फ्लेक्स आणि होर्डींग्स यामधून पालिकेला प्रचंड उत्पन्न मिळू शकते. मात्र पालिकेचे कर्मचारी कुठे तरी कमी पडत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 🔴 पर सेकवर फूट 10 रु प्रमाणे जाहिरातीचे दर आहेत. तसेच छोट्या मोठ्या जाहिरातीसाठी 100 रु दररोज प्रमाणे पालिकेची जाहिरात कर पावती घ्यावी लागते. पावतीन घेता संबंधित जाहिरात फलक जप्त करून कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. याबाबत मुख्याधिकारी यांनी निर्देश देखील दिले आहेत. मात्र तळोद्यात ठिकठिकाणी सरास नियमांचे उलन्घन होत असताना देखील एकही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा