भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळोदा भेटीलादि.३० जुलै २०१७ रोजी ८० वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून डॉ.बाबसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तळोदा येथील समाज परिवर्तनवादी संघर्ष समितीतर्फे रविवारी (दि.३०) विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तळोदा शहराला अनेक महापुरुषांनी भेटी दिल्या आहेत. यात दि.३० जुलै १९३७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोद्यास भेट दिली असल्याचे जाणकार मंडळी सांगतात. धुळे शहरात कोर्टाच्या कामकाजासाठी सन १९३७ मध्ये शहरातील प्रेमसिंग तवंग नावाच्या वकीलांकडे खटला चालविण्यासाठी डॉ.बाबासाहेबांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि.३१ जुलै १९३७ रोजी शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम करीत शहराची माहिती घेतल्याची नोंद आहे. त्याचदरम्यान त्यांनी तळोदा शहरालाही भेट दिली असल्याचे जुने जाणकारांकडून सांगण्यात येते. दि.३० जुलै १९३७ रोजी होळीच्या सहाय्याने गुजरातकडून सज्जापुर हातोडा मागे बाबासाहेबांनी भेट दिली. जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या, पाऊसामुळे चिखलाचा अंदाजा न आल्याने त्यांचा पाय चिखलात गेल्याने त्याकाळी १४ रुपये किंमतीचे महागडे बुट चिखलात खराब झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते. तळोदा शहराचे जहागीरदार
![]() |
| स्व:रणछोड गुरुजी |
राजवाडे संशोधन मंडळ, जहागीरदार अमरजित बारगड यांच्याकडे माहिती काढली होती. याबाबत ठोस असे पुरावे हाती लागले नसले तरी तत्कालीन पोलीस ठाणे, नगरपालिका, महसुल विभागातील नोंदी यावरून दि.३० जुलै रोजी डॉ.आंबेडकरांनी भेट दिली असल्याचे कळते. याबाबत सतत मागील काळापासून तळोदा भेटीच ऐतिहासिक पुरावे व जुने दस्तवेज शोधून पुरावे गोळा करण्यासाठी परिवर्तन वादी संघर्ष समिती अध्यक्ष राजेंद्र बिरारे, उपाध्यक्ष नथ्थु साळवे, सचिव प्रदीप मोरे, सिद्धार्थ महिरे, प्रा.अशोक वाघ, शशिकांत सोनवणे हे प्रयत्न आहेत. दि.३० जुलै रोजी डॉ.बाबासाहेबांच्या तळोदा भेटीला ८० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथील वामनराव बापू मंगल कार्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती हे मेळाव्यात मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा