Breking News

सोमवार, ३१ जुलै, २०१७

महावितरणने केला पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत!

तळोदा तालुक्यातील नऊ ग्रा.पं.कडे ३५ लाखांची वीज बिले थकीत .

 तळोदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची सुमारे ३५ लाख ८६ हजाराची वीजबील थकबाकी असल्याने सदर विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. सुमारे २० टक्के वीज बिले भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असा कठोर पवित्रा विद्युत वितरण कंपनीने घेतला आहे. म्हणून लोकप्रतिनिधींची पैश्यांसाठी जुळवाजुळव सुरु आहे.. तळोदा तालुक्यात ३१ कोटींपेक्षा अधिक वीजबिले थकीत आहेत. यात पाणीपुरवठा योजनेचे एकूण ७१ ग्राहक असून त्यापैकी ४९ ग्राहकांवर १ कोटी ५० लाख इतकी वीजबिले थकली आहेत. त्यात तालुक्यातील नळगव्हाण ग्रामपंचायतीकडे ३ लाख २५ हजार, राजविहीर ४ लाख ४७ हजार, भवर ४ लाख ९९ हजार, धवळीविहीर ४ लाख ६२ हजार, दलेलपूर ४ लाख ६८ हजार, रापापूर ४ लाख ५५ हजार, नर्मदानगर, ३ लाख २७ हजार, लहान सोमावल ३ लाख दोन हजार, भागलपूर ३ लाख एक हजार रुपये अशा एकूण नऊ ग्रामपंचायतीच्या ३५ लाख ८६ हजार रुपयांची वीज बिले थकली आहेत. म्हणून या नऊ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. विद्युत वितरण कंपनीने वीज बंद करण्याची पूर्व सूचना ग्रामपंचायतींना दिल्यानंतरही सरपंचांनी वीजबिले भरली नाहीत. म्हणून पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. याबाबत ग्रामस्थांना काही माहिती नसल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच पाण्यासाठी नागरीकांसह गुरांचेही हाल होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक महावितरणकडे जावून वीज बिलात तडजोड करण्यास विनंती करुन बिले भरण्यासाठी पैश्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र पाणी पुरवठा योजनांची थकीत वीज बिले भरल्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे..
 महावितरणने केला पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत! तळोदा तालुक्यातील विज बिले भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कळविले होते. तगादा लावूनही थकीत वीज बिले भरली जात नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. थकबाकीदार ग्रामपंचायतींनी २० टक्के प्रमाणे वीजबिले भरणे आवश्यक आहे. अन्यथा थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींचा देखील पाणी पुरवठाचा विज पुरवठा खंडीत करण्यात येईल.. -सचिन काळे . (उपमुख्य कार्यकारी अधिकारी तळोदा).



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा