Breking News

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

सर्वोदय गणेश मंडळ देतय 'बेटी बचाव' चा संदेश!

आरास साकारुन जनजागृती : तळोद्यातील सामाजिक उपक्रमाचे कौतुक
स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव अशा ज्वलंत विषयावर मागील दोन वर्षापासून तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळ आरास तयार करुन समाजात जनजागृतीचे काम करीत आहे. सदर आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दर्ी हात आहे. . तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २२ वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, स्वंयमचलित देखावे सादरकेले आहेत.. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भूमीत भ्रूण हत्येचे महापाप केले जाते. त्यामुळे मंडळाने समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने यावर्षी स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक हा ज्वलंत विषय घेवून सजीव आरास सादर केली आहे. आरासची सुरुवात मुलीच्या बालपणापासून सुरु होवून तीच्या बालपणातील विविध क्षण टिपण्यात आले आहेत. बालपणात आपल्या भावंडासोबतचे आनंदी क्षण त्यानंतर तिचे लग्न होऊन सासरी जाते, संसारात रमते. दरम्यान संसाराच्या उत्तरार्धात मुलाची किडनी खराब होते. किडनीसाठी नातलगांनी विनवण्या करूनही कोणीच पुढे येत नाही, शेवटी पत्नीही नकार देते. अशावेळी हीच आई मुलाचा जीव वाचविण्यासाठी पुढे सरसावते आणि किडनी दान करते. मात्र म्हातारपणात किडनी दानानंतर तिची तबेत खालावते व ती मरण पावते. मुलगा ढसाढसा रडतो, शेवटच्या क्षणीही ती स्वत:चा विचार न करता आपल्या मुलाचाच विचार करते, स्वत:ची किडनी अर्पण करून आपल्या मुलाला जन्म देणारी आई ही देखील स्त्रीच आहे, असे या आरासीत दाखविण्यात आले आहे. मात्र, आज आईसारख्या पवित्र नात्याला गर्भपात करून संपविले जाते, असे एका दृश्यात चित्रीत करण्यात आले आहे. तर विवाहीता गर्भवती असतांना डॉक्टरकडे जातात. तीच्या कुटुंबियांना मुलगा हवा असतो, म्हणून लींग तपासणी केली जाते. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यावर गर्भातील मुलीची जन्मापूर्वीच हत्या केली जाते. यावेळी गर्भातील बालिकेची माँ, पिताजी... मुझे इस दुनियामे आने से पाहिले ही मेरी हत्या कर रहे हो, मै भी जिना चाहती हु, डॉ. अंकल आपको तो भगवान के रूप माना जाता है! आपका काम जीवनदान देेना है पर आप तो मेरी. जान ही ले रहे हो! ओ भी पैसो के लिये. मुझे भी जिना है, इस दुनिया को देखना है! इस दुनिया मे आना है! मा... मुझे मत मारो, मुझे मत मरो मा...अशी भावनिक आर्त हाक मारते, अशी आरास साकारण्यात आली असून ती पाहतांना नक्कीच डोळ्यातून पाणी आल्याशिचवाय राहत नाही. तर दुसरीकडे एक प्रतिकात्मक वृक्ष कापतांनाची आरास आहे. त्या वृक्षातून देखील भावनिक आवाजात विनवणी करत. माझे मूळ कापू नका, माझे मूळ कापली तर मी फळे फुले कसे देणार, तुम्ही स्वत:चीच मूळ कापत आहात, असे म्हणत मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीला जन्म घेऊ द्या, मुलगी भविष्य आहे. अशी भावनिक हाक घालत बेटी बचावचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे नरेश चौधरी, पप्पू साळवे, रोहित कलाल, उमेश पाटील, शुभम ठाकरे, शरद सावळे, छोटू चित्ते, ओम चौधरी, स्नेहल चौधरी, पप्पु ठाकरे, मयूर चौधरी आदींनी या जीवंत आराससाठी मेहनत घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष राज चौधरी, सचिव प्रवीण चौधरी, नितिन ठाकरे, दीपक माळी आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा