Breking News

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

बडादादा गणेश मंडळातर्फे प्रतिज्ञेतून देशभक्तीचा जागर!

तळोदा येथील बडादादा गणपती नवयुवक मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात 'भारत माझा देश आहे' या प्रतिज्ञेवर आधारित सजीव आरास सादर करुन लोप पावलेल्या लोकनृत्य व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे. तसेच आई-वडीलांना वृद्धाश्रमात न पाठविता त्यांना चांगली वागणूक द्या, विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे प्रबोधन देखाव्यातून केले जात आहे..

 तळोदा येथील शनिगल्लीतील बदादादा नवयुवक गणेश मंडळ मागील 57 वर्षा पासून विविध सामाजिक, धार्मिक, आदी विविध विषयांवर प्रबोदनात्मक आरास सादर करून जनजागृती करीत आहे. त्यात भक्त पुडलीक, श्रवणबाळ, मदारी खेळ , गाढवाचे लग्न, फिरते मंदिर, अधांतरीत गणराय, असे विविध सामाजिक प्रबोधनात्मक देखावे या मंडळाने सादर केले आहेत.. यावर्षी भारत माझा देश आहे. या प्रतिज्ञेवरून आताचा भारत व पूर्वीचा भारत यांच्यातले काही पैलू सजीव देखाव्यातुन समाजापुढे मांडण्याच्या प्रयत्न बाल कलाकारांनी केला आहे.. भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात महान संस्कृती आहे. देशाची संस्कृती जपन्यासाठी भारत सरकार विविध प्रकारचे अभियान राबवते, सच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लहान बालके देखील आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर तरुण पिढीला आशास्थानी मानत असताना गुटखा सिगारेट दारू आदींच्या आहारी जाऊन देशाचे सुंदर वातावरण कसे दूषित करत आहे. भारत देशात वेगवेळ्या कारणांनी व व्यसनामुळे तरुण मरण पावत आहे. अनेकवेळा अतिगंभीर
रुग्णाना वाचवण्यासाठी डॉक्टर आटोकाट प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्टा करूनही रुग्ण दगावला तर मयताचे कुटुंबीय व जमाव डॉक्टरांवर प्राण घातक हल्ले करत आहेत, डॉ. परमेश्वर नसून माणूसच आहे, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यात वाढ झाली आहे. हे करणे अतिशय वाईट आहे. आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो*माझा देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन*, मात्र आताची तरुण पिढी लोककला, लोकसंगीत हे सर्व बाजूला सारत झिंगाट गाण्यावर वस्त्राचे भान न ठेवता बेभान होऊन नाचताना दिसत आहे. आपली खरी खुरी परंपरा ही लोककला, लोकसंस्कृती, लोकनृत्य गरबा, भांगडा, आदिवासी नृत्य, भरत नाट्यम, कथक, कुचिपुडी, या सारखे लोकप्रकार येतात.
बाल कलाकारांनी विविध लोकनृत्य सादर करून संस्कृतीचे जतन करावे असा सल्ला दिला आहे. तर *मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेल* मात्र आपण म्हणत असलेल्या प्रतिज्ञाच्या पंक्ती प्रमाणे आपण कधीच वागत नाही, आज भारतात वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमानात वाढली आहे. या वृद्धाश्रमात बहुतेक वृद्धांची मुले हे उचशिक्षित आहे. त्याउलट शेतकरी, कामगार, मजूर व सामान्य परिस्थितीत असणारऱ्या व्यक्तीचे आई वडील कधीही वृद्धाश्रमात जात नाही. ते आपल्या आई वडिलांसोबतच राहतात, *गुरुरब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात पर ब्रह्म तसमय श्री गुरुवेंन महा* असा जप करत असताना त्याचवेळेला गुरूजणांना मारहानीच्या दुर्दैवी घटनेत वाढ झाली आहे. वडील धाऱ्या मांणसाचे मान ठेवण्या ऐवजी रस्त्यावर त्यांच्याशी वादविवाद करण्याचे त्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण म्हणतो की *माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.* मात्र याच्या विरोधी वागून आपण आपण स्वदेशी वस्तू टाळून विदेशी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून परराष्ट्राला आर्थिक मजबूत करीत आहात याच जोरावर अनेक देश भारतावर आंतकवादी व दहशतवादी हल्ले करीत आहे. यावर नम्र आव्हान करीत स्वदेशीचा वापरा करा विदेशी वस्तू खरेदी करणे टाळा, देशाचे सैनिकांचे व पोलिसांचे
संरक्षण करन्यासाठी मदत करा. असे आव्हान या सजीव देखाव्यातून करण्यात आले आहे. आरास यशस्वी करण्यासाठी किसनदादा कलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष महेंद्र गुरव, उपध्यक्ष सन्नी पाटील , सचिव हरिष मराठे, खजिनदार सूरज शिंपी, सदस्य अजय पाटील, भटू बूनकर, नितीन दातीर, सोनू धेडगे, जयेश देडगे, सचिन पाटील, सन्नी वंजारी, भूषण लोहार, नंदू पाटील, विपुल कुलकर्णी, सुयोग पाटील, गौरव गुरव आदीनी परिश्रम घेतले आहेत...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा