Breking News
मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७
तळोद्यात मतदानाची तारीख बदलल्याने मतदार राजा संभ्रमात उमेदवारांच्या प्रचार ऑडीओत जुन्याच तारखेचा उल्लेख
तळोदा येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतदान तारीख पुढे ढकलण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम झाला आहे. यात उमेदवारांच्या प्रचाराच्या वाहनांवरून अजूनही १३ डिसेंबरलाच मतदान असल्याचे सांगितले जात असल्याने आणखीनच गोंधळात भर पडली आहे..
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार तळोदा पालिकेच्या निवडणूकीसाठी दि.१३ डिसेंबर रोजी मतदान व १४ रोजी मतमोजणीची तारीख निश्चित झाली होती. मात्र नगराध्यक्ष व तीन प्रभागातील नगरसेवक पदांच्या काँग्रेस उमेदवारांच्या नामनिर्देशनावर भाजप उमेदवारांनी हरकत घेतली. ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली. म्हणून भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात जिल्हा न्यायालयात अपिलात गेले होते. त्याचा निर्णय दि.४ डिसेंबर झाला. या न्यायालयीन प्रक्रियेत ठरलेल्या निवडणूक कार्यक्रमात चार दिवस वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पूढे ढकलून दि.१७ डिसेंबर रोजी मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे, उमेदवार आधीच रोजच्या खर्चामुळे बेजार झाले होते. त्यात आणखीन चार दिवसाची वाढ झाल्याने पुन्हा खर्च वाढणार आहे. अनेकांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासासाठी लुक्झरी गाड्यांची बुकींग केली होती. ते बुकींग रद्द होवून नवीन बुकींग करावी लागेल. अनेकांनी जेवणावळी दिल्या होत्या, मात्र पुन्हा जेवणावळी ठेवाव्या लागतील. उमेदवारांनी प्रचारासाठी आणलेल्या डिजिटल डिस्प्लेच्या गाड्या, रिक्षा यावरुन प्रचारावर खर्च केला जात आहे. मात्र मतदानाची तारीख बदललेली असतांनाही १३ डिसेंबर रोजी मतदान असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रचार करणाऱ्यांनी उमेदवारांनी आपल्या प्रचार क्लिप्समधून मतदानाच्या नवीन तारखेचा उल्लेख करण्याची गरज आहे. कारण मतदार हे एकमेकांना विचारून मतदानाच्या तारखेबाबत खात्री करीत आहेत. यापूर्वी असे कधीच घडले नसल्याने मतदान तारखेत बदलण्यावर नागरीकांचा विश्वास बसत नाही. मतदान तारीख पूढे ढकलली असून याचा कोणाला फायदा तर कोणाला नुकसान होईल, याची चर्चा रंगू लागली आहे..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा