राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मागील तीन वर्षांत तळोदा नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही ११ कोटीचे अनुदान दिले आहे. या अनुदानाचा हिशोब येणाऱ्या काळात काँग्रेसडून घेण्यात येईल. तसेच तळोदा पालिकेत भाजपाची सत्ता आल्यावरही पारदर्शी कारभार केला जाईल. जर असे झाले नाही व जनतेच्या तक्रारी आल्या तर पालिकेत भाजपाची सत्ता असली तरी पालिका बरखास्त करु, असा इशारा वजा आश्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले..
तळोदा येथील नगरपालिका निवडणूकीतील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल दि.८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित, आ.उदेसिंग पाडवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी, माजी नगराध्यक्षा वंदना मगरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना.फडणवीस म्हणाले की, आज ५० टक्के लोकसंख्या ही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व रोजगारासाठी शहरात राहते. मात्र काँग्रेसने शहरांचा विकास केला नाही. शहरात मुलभूत सुविधा निर्माण केल्या नाही. झोपडपट्ट्या, प्रदुषण, सांडपाणी कचरा घाणीचे साम्राज्य वाढले असून पर्यायाने रोगराई वाढली. भाजपाची सत्ता आल्याने केंद्राच्या वतीने स्मार्ट सिटी योजना व अटल अमृत योजना, १४ व्या वित्त आयोग यातून मागील १५ वर्षाच्या काळात काँग्रेसने दिला तितकाच निधी भाजपा सरकारने केवळ तीन वर्षात दिला आहे. तळोदा शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्ग शौचालये, कचऱ्यातून खत निर्मिती, भूमिगत गटारी, शुध्द पिण्याचे पाणी व विकास कामांसाठी लागेल तितका निधी देण्यात येईल. म्हणून तळोदा पालिकेत भाजपाला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार रावल म्हणाले की, तळोदा पालिका भाजपाच्या ताब्यात दिल्यास मुख्यमंर्त्यांमार्फत नगरविकास खात्यातून ५० कोटी खर्चून तळोद्याला आधुनिक आदिवासी शहर बनविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. .
भाजपाच्या नाराज गटाने .
केला मुख्यमंर्त्यांचा सत्कार!.
भाजपच्या निष्ठवंतांना उमेदवारी दिली नाही, म्हणून नाराज असलेले गटातील भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, जिल्हा सरचिटणीस प्रा.विलास डामरे, तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, उपजिल्हाध्यक्ष रुपसिंग पाडवी हे मुख्यमंर्त्यांच्या सभेत अनुपस्थित होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्री सभास्थळी येत असतांना रस्त्यात मुख्यमंर्त्यांची गाडी थांबवली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतून खाली उतरुन डॉ.शशिकांत वाणी व पदाधिकारी या नाराज गटाकडून सत्कार स्विकारला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा