तळोदा येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या भाग्यश्री योगेश चौधरी या विजयी झाल्या. तर स्विकृत नगरसेवक पदी भाजपाचे हेमलाल पुरुषोत्तम मगरे व काँग्रेसचे जितेंद्र लक्ष्मण माळी यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी नवनिर्वाचितांचा सत्कार केला..
तळोदा नगरपालिकेत भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासह ११ नगरसेवक असे बलाबल आहे. तर काँग्रेसचे सहा तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. काल सोमवारी उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य पदासाठी निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. उपनगराध्य पदासाठी भाजपातर्फे भाग्यश्री योगेश चौधरी व काँग्रेसतर्फे अनिता संदीप परदेशी यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपाच्या भाग्यश्री चौधरी यांना ११ तर काँग्रेसच्या अनिता परदेशी यांना सहा मते मिळाली. शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी मतदानात भाग न घेता त्या तटस्थ राहिल्या. स्विकृत सदस्य पदाच्या दोन जागांसाठी भाजपातर्फे हेमलाल मगरे व योगेश चौधरी यांचे अर्ज दाखल केले होते. यात हेमलाल यांची निवड करण्यात आली. काँग्रेसतर्फे जितेंद्र लक्ष्मण सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकपदी जितेंद्र माळी यांची निवड करण्यात आली. भाजपाचे हेमलाल मगरे व काँग्रेसचे जितेंद्र सूर्यवंशी यांची निवड झाल्यानंतर दोन्ही गटातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. सभेला भाजपाचे गटनेते भास्कर मराठे, रामानंद ठाकरे, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, अमणोद्दीन शेख, अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी, सुनयना उदासी, शोभाबाई भोई, सविता पाडवी तर काँग्रेसचे नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, कल्पना पाडवी, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय व शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर उपस्थित होते. .
यावेळी भाजपाचे कुकरमुंडाचे माजी उपसरपंच भास्कर बांडे, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, प्रदीप शेंडे, योगेश चौधरी, जालिंदर भोई, माजी नगरसेवक हिरालाल पाडवी, गोकुळ पवार, जगदीश परदेशी, माजी नगरसेवक प्रल्हाद पाडवी, कैलास चौधरी, नितीन पाडवी व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीवान पाडवी, संदीप परदेशी, योगेश मराठे, रोहन माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व स्विकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांनी आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकास कामे करण्यात येवून सुंदर व विकसित शहर निर्माण करण्याचे सांगितले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा