Breking News

शनिवार, ५ मे, २०१८

अथक प्रयत्न, कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर रतीलाल पावराने डोंगराळ जमिनीवर फुलवली आमराई...

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पहिल्या रांगेतील डोंगर कपारीत असलेल्या रावलापाणी या ऐतिहासिक भूमीवर पाणी विज व रस्ताची समस्यां, असताना त्यावर मात करत केवळ आपल्या जिद्द व चिकाटीने रतिलाल कामा पावरा या तरुणाने वनहक्क दाव्यानुसार मिळालेल्या डोंगराळ जमिनीवर 200 आंब्याची रोप लावत आमराई फुलवली आहे.
                               तळोदा तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुल तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रावलापाणी हे छोटेशे गाव सातपुड्याच्या डोंगराच्या शेवटच्या टोकावर व डोंगर - दऱ्यांवर वसलेले आहे, पाणी व विजेची समस्या असलेल्या या गावात फक्त 31 घरं व 180 सदस्य राहतात, या गावातील शेतकरी पारंपरिक शेती करीत उदरनिर्वाह करतात. मात्र पारंपरिक शेती ऐवजी कायंस्वरूपी उत्पन्न मिळावे हा हेतू डोळा समोर ठेवून रतिलाल कामा पावरा व त्यांचा कुटूंबाने धाडस दाखवित आपल्या शेतात एक नवीन प्रयोग केला आहे.. आपल्या डोंगर वजा शेतात चक्क "आंब्याची फळबागेची" लागवड करीत ती चांगलीच फुलवलेली आहे. रतिलाल पावरा यांचे वडील कामा पावरा यांचे 2013 मध्ये निधन झाले, त्यामुळे कुटुंबांची सर्व जबाबदारी घरातील मोठा सदस्य असल्यामुळे रतिलाल पावरा यांचावर आपसूकच आली. सुरुवातीला
पारंपरिक पिकं घेत, त्यांनी संसाराचा गाडा हाकलण्यास सुरुवात केली. परंतु त्यात जास्त उत्पन्न मिळत नव्हते व कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. मग रतिलाल पावरा यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करीत काही तरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व शेतात आंब्याची फलबाग लावण्याचे ठरविले. परंतु त्यांचा समोर सर्वात मोठी अडचण होती ती पैश्यांची. त्यामुळे रतिलाल पावरा यांनी धडपड करीत शासनाकडून काही तरी मदत मिळते का? या दृष्टिकोनातून माहिती मिळवित तळोदा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला. तालुका कृषी
अधिकारी पी. व्ही. भोर यांचे मार्गदर्शनाने कृषी पर्यवेक्षक एस. डी. पवार, कृषी सहाय्यक पी. के. देशमुख व मंडळ कृषी अधिकारी ए. एफ. गावीत आदींनी वेळोवेळी भरीव अशी मदत करत फळबागासाठी अनुदान मंजूर करीत त्यांना 2016 साली एकूण 200 आंब्याची रोप दिलीत. रस्ते नसल्याने वाहन जाणे या भागात कठीण होते. याकरिता कुटुंबीयांनी 4 की.मी.पायपीट करत आपल्या शेतापर्यंत डोक्यावर घेऊन 200 रोपे शेतात पोहच करत डोंगराळ, खाच खडगे असलेल्या आपल्या शेतात स्वतः 200 खड्डे खणत, जून 2016 मध्ये आंब्यांची रोप लावलीत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी जीवापाड मेहनत घेतली, आता सर्व रोप जवळपास 4 ते 5 फुटांची झाली आहेत. रतिलाल पावरा यांना आतापर्यंत सव्वा ते दीड लाख पर्यंतचा खर्च आला आहे. या आम्रईला नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व अनेक अधिकाऱ्यांनी रावलापाणी येथे प्रत्यक्ष जावून रतिलाल पावरा व त्यांचा कुटुंबाने फुलवलेली फळबाग बघितली असून सर्वांनी कुटुंबियांचे कौतुक केले आहे....

                  प्रतिक्रिया----- 
 12 वी पर्यत शिक्षण झाल्यानंतर अर्ध्यातच वडील सोडून गेले, कमी वयात कुटुंबाची जबाबदारी आली. केवळ पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतात काहीतरी नवीन करण्याचा धाडस करीत आंब्याची फळबाग लावण्याचे ठरविले. भविष्यात कायमस्वरुपी उत्पन्न मिळावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून फलबागेची लागवड केली आहे. :- रतिलाल पावरा शेतकरी, रावलापाणी....

 ➤ 600 फूट लांब असलेल्या शेतात, नदीतून पाणी पोहचविले :- 
 रावलापाणी गावात वीज, पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी निझरा नदीतुन पाणी ओढण्यात आले. त्यासाठी एक डिझेल इंजिन मशीन नदी वर बसविण्यात आले व नदी पासून 300 फूट लांबी वर एक छोटसं शेततळ तयार करुन त्यात पाणी साठविण्यात आले. मग शेत तळ्याजवळ दुसरे डिझेल इंजिन मशीन बसवून तेथून पुढे 300 फूट लांब असलेल्या शेतात पाणी पोहचविण्यात यश मिळवले आहे. अश्या रीतीने नदी पासून एकूण 600 फुट लांब असलेल्या शेतात वेळेचे नियोजन साधत आठवड्यातुन दोन दिवस पाणी दिले जाते....

➤ शेतात नैसर्गिक खतांचा वापर :- 

 रतिलाल पावरा यांचा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महागडी रासायनिक खते विकत घेणे त्यांना परवडणारे नव्हते, याकरिता आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पाला, पाचोळा पासून तयार केलेले कंपोस्ट खत, शेण खत आदींचा वापर करीत फलबागेतील आंब्याचे रोप वाढविले आहेत....

➤ ➤ लहान बंधारा बांधत पाण्याचा समस्यांवर केली मात 

रावलापाणी सारख्या दुर्गम भागात पाण्याची सोय नसल्यामुळे रतिलाल पावरा, त्यांचे लहान भाऊ रविंद्र पावरा व भीष्मा पावरा, बहीण काजोल पावरा व अरुणा पावरा तसेच आई लावीबाई पावरा आणि पत्नी आशा पावरा यांनी स्वतः कठोर मेहनत घेत, शेतीपासून 600 फूट लांब असलेल्या निझरा नदीवर लहान बंधारा बांधत नदीचे पाणी अडविले आणि या अडविलेल्या पाण्याचा शेतात काटकसरीने वापर करीत पाण्याचा समस्यांवर मात करीत फुलबाग फुलविली आहे....

➤ शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा :- 
 रतिलाल पावरा यांचा शेतातील आंब्याची फळबाग आता चांगलीच बहरलेली आहे. परंतु शेताला कुठल्याच प्रकारचे कुंपण नसल्यामुळे, त्यांना गुरांचा त्रासला नेहमीच सामोरे जावे लागते. त्यामुळे रतिलाल पावरा यांचा कुटुंबातील एक सदस्य रात्र दिवस शेतात थांबून बागेची राखण करीत असतो. त्यामुळे रतिलाल पावराचा कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे जेणेकरुन शेताला कुंपण घालता येईल.....
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा