Breking News

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

सार्वजनिक दादा गणपती मंडळाचा देखावा घेतोय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव 'कचरों के खिलाडी' आरास मधून नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

तळोद्यात ७२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक दादा गणपती मंडळ नाटीकेच्या स्वरूपात सादर करीत असलेल्या 'कचरों के खिलाडी' ही आरास लक्षवेधी ठरत असून या ठिकाणी नाटीका बघण्यासासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. या देखाव्यात अस्वच्छता रूपी कचरासुरला मारण्यासाठी विविध सिने अभिनेते येतात व आपल्या शक्तीचा, बॉम्ब व बंदुकीने कचरासुरला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कचरासुर अशा नायकांच्या शक्तीने नष्ट होत नाही. तर हातात झाड़ू, नैतिक जबाबदारी व योग्य समजदारीनेच अस्वच्छता रूपी कचरासुर नष्ट होईल. हे स्वच्छतेचे व्रत जो स्विकारेल तोच खरा नायक व तोच खरा बाहुबली होय, असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे.. सार्वजनिक दादा गणपती हा तळोदा शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री दादा गणपतीवर असलेली श्रद्धा व प्रेम अवर्णनीय आहे. श्रद्धा व समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मंडळाची ओळख आहे. ७२ वर्षापासुन दरवर्षी विविध आकर्षक व समाजप्रबोधनावर आधारित देखावा सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी प्रबोधनात्मक व राष्ट्रीय मोहिम स्वच्छ भारत अभियानावर आधारातीत जीवंत देखावा 'कचरों के खिलाडी' या देखाव्याने तळोदा शहरातील व तालुक्यातील इतर खेड्यातील गणेशभक्तांची मने जिंकत आहे. यात सीनेअभिनेत्यांचा माध्यमातून स्वछतेचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान व या महानायक अमिताभ बच्चन यांना जनजागृती करण्याची वेळ येते, ही शोकांतिका आहे.या देखाव्यात अस्वच्छतारूपी कचरासुरला मारण्यासाठी केलेले विविध प्रयत्न फोल ठरत असल्याने शेवटी नागरिकांनी हातात झाड़ू घेऊन स्वत:ची नैतिक जबाबदारीची योग्यता समजूनच अस्वच्छतारूपी कचरासुर नष्ट होईल असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे. या नाटीकेची संकल्पना शिक्षक अरुण गुरव यांची असून सादरीकरण मराठा चौकातील बालक व तरुण करीत आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल धनगर, उपाध्यक्ष मयूर पाटील, खजिनदार विक्की गुरव, सचिव चेतन मराठे, सदस्य सुभाष शिंदे, रविंद्र गाढे, चंद्रकांत पाटील, चेतन गुरव, प्रशांत गवळे, योगेश पाटील, योगेश परदेशी, संदीप गुरव, गणेश कलाल, राजेंद्र जाधव व सहकारी परिश्रम घेत आहेत. त्यांना नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, न.पा. बांधकाम सभापती भास्कर मराठे, शिवसैनिक संजय पटेल, माजी नगरसेवक प्रल्हाद फोके, नवनीत शिंदे, वसंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा