Breking News

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

फुलांची उधळण करत पत्रकार संघाचा दीड दिवशीय गणरायाचे थाटात निरोप

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवशीय गणरायाचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.. पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे दीड दिवशीय गणरायाची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री.ची स्थापना पत्रकार संघाने केली होती. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सकाळी १० वाजता स्मारक चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. स्मारक चौक मार्गे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गो.हू. महाजन शाळेतील संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या लेझीम पथकाने आकर्षक नृत्य सादर केले. तर नेमसुशील विद्यामंदिर मधील प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नंदुरबार वाजंत्रीवर शिस्तबद्ध पद्धतीने लेघीम नृत्य सादर केले. मारुती मंदिराजवळ आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी . मुख्याध्यापक अजित टवाळे, अतुल सूर्यवंशी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, भास्कर मराठे, योगेश पाडवी, सुभाष चौधरी, सतिवान पाडवी, नितीन पाडवी, निखिल तुरखिया, भाजपा तालुका अध्यक्ष शाम राजपूत, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, पृथ्वीराज राजपूत, प्रा.विलास डामरे, विपुल कुलकर्णी, अनुप उदासी, हेमलाल मगरे, माजी उपसभापती आकाश वळवी, शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, बबलू माळी, आनंद सोनार, नंदु जोहरी, कल्पेश सूर्यवंशी, संतोष वानखेडे, जयेश सूर्यवंशी, भिका ठाकरे, रसिक वाणी आदींसह सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, जेष्ठ नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते. विसर्जन मिरवणुक यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक वाघ, उपाध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव सुधाकर मराठे, कोषाध्यक्ष सम्राट महाजन आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..















   
 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा