तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चारा व पाणी टंचाई बाबत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून
उपाययोजना बाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. मात्र यास १० दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाचे नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात प्रशासन जाब विचारण्यासाठी काल तळोदा गाठले. दरम्यान, संबधित अधिकाऱ्याला धारेवर धरत उपाययोजना केवळ कागदावर न नाचवता प्रत्यक्ष कृती करा अशी मागणी केली. तातडीने उपपयोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.. तळोदा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रापापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने याभागात पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. . याबाबतची कैफियत येथील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देऊन
पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्या अनुशंगाने दि.११ रोजी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तव पाहिले. त्यानंतर उपाय योजनांचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आठ दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. . यावर तातडीने मार्ग निघावा यासाठी कुयलीडाबरी, पालाबारी आदी गावांतील ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी १२ वाजेचा सुमारास तळोदा तहसील कार्यालय गाठले. दरम्यान, तहसीलदार पंकज लोखंडे उपस्थित नसल्याने गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्याशी चर्चा करत ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. .
गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी... ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा
कोयलीडाबर येथे दोन विहिरींचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. तर माळखुर्द येथे चार बोअरवेल मंजूर केल्या आहेत. तसेच चिडीमाळ येथे नवीन पाईपलाईन ही प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही कामे पूर्ण होईपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा यावर कुठलेही ठोस उत्तर मिळू शकले नाही. याबाबतीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बडगुजर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या बाबतीत ग्रामस्थांना केवलापाणी पर्यंत पाणी टँकरने पोहचवणे, त्यापुढे चिडीमाळ व कोयलीडाबर पर्यंत गाढवाने पाणी पोहचविण्या बाबत मार्ग सुचवला होता. मात्र ही बाब शासकीय नियमात बसत नसल्याने इतर पर्यायाबाबत विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. .
जनावरांसाठी हवी चारा छावणी!
संतप्त गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व गुरांसाठी चारा छावणी तात्काळ सुरू करा अन्यथा, सोमवारपासून तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी खेमजी गवल्या वसावे, विनायक कुर्ता वसावे, रेवा सोत्या वसावे, पालाबार येथील नरपत राजा पाडवी, इला पेचरा पाडवी, मैथून मोजा पाडवी, बोर्डीबाई खेमजी वसावे, अनिता कालुसिंग वळवी, लासुबाई काल्या वसावे, वळवी रमेश, गुलाबसिंग वळवी, दिलीप वळवी, कालूसिंग नाईक, आमशा वसावे, राकेश पाडवी, सायसिंग वसावे, ठाकूरसिंग वसावे, बोखां वसावे, दिलर्व वसावे, दिलीप नाईक, बाबुसिंग वसावे, राजा पाडवी, देविसिग वसावे महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके आदी उपस्थित होते..
घोटभर पाण्यासाठी तरसले आंदोलक .
दुपारी १२ वाजेदरम्यान भरउन्हात पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या कुयरीडाबरी, पालाबारा येथील ग्रामस्थांना कार्यालयाचा आवारात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. कार्यालयात पाण्यासाठी शोध घेऊनही घोटभरी पाणी मिळाले नाही. प्रशासना मार्फत ठेवण्यात आलेले माठ देखील कोरडेच असल्याने संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा