Breking News

सोमवार, २० मे, २०१९

अखेर गाढवाच्या मदतीने पोहचले पाणी

तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चारा व पाणी टंचाई बाबतचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. प्रशासन प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी कागदी घोडे नाचवत असल्याचा ग्रामस्थ आरोप करीत असून लोकसंघर्ष मोरच्यांच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात काल तळोदा कार्यालय गाठून सम्बधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.0 दरम्यान तातडीने उपपयोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. पाण्याची गँभिर समस्यां बघता जिल्हाधिकारी यांनी गाढवांचा सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंत गाढवांचा सहाय्याने कुयलीडांबरी येथे पाणीपुरवठा केला जात आहे. स्वातंत्र्याचा सत्तरी नंतर अतिदुर्गम भागातील तळोदा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रापापुर व चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने याभागात पाण्याची भीषण समस्यां भेडसावत आहे. याबाबतची कैफियत येथील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देऊन पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 11 रोजी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तव पाहिले. त्यानंतर उपाय योजनांचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी
 यांच्याकडे सादर केला होता..मात्र आठ दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थाना घोटभर पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. यावर तातडीने मार्ग निघावा यासाठी कुयलीडाबरी, पालाबारी आदी गावांतील ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी 12 वाजेचा सुमारास तळोदा तहसील कार्यालय गाठून संबधित गटविकास अधीकारी सावित्री खर्डे यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला होता. तातडीने उपपयोजना न संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्यानंतर नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजना बाबत जिल्हाधिकरी बालाजी मंजुळे, लोकसंघर्ष मोर्च्याचा नेत्या प्रतिभा शिंदे,
तहसीलदार पंकज लोखंडे, आदींसह विविध विभागाचे अधिकारी यांची सयुक्तिक बैठक घेण्यात आली. गाढवाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ही बाब शासकीय निष्कात बसत नसल्याने टाळाटाळ केली जात होती. यावर फेर चर्चा करण्यात आली. दरम्यान पाण्याची भीषण समस्यां व तेथील भौगिलीक परिस्थिती बघता गाढवांचा सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जि
ल्हाधिकारी यांनी दिले. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी जाऊन पाहणी केली. दरम्यान रापापुर येथून सहाय्यक गटविकास अधिकारी सोनवणे, रापापुर सरपंच भिकलाल वळवी, ग्रामसेवक वळवी ग्रा.सदस्य व ग्रामस्थाच्या प्रमुख उपस्थितीत रापापुर येथून कुयलीडाबरी येथे एका गाढवावर 16 लिटचे 2 प्लास्टिकचे ड्रम बांधून 17 गाढव रवाना करण्यात आले आहेत. कुयली डाबरी येथे 51 कुटुंब राहत असून 315 एवढी लोकसंख्या आहे. दररोज 2 वेळा गाढव फेऱ्या मारणार असून यामाध्यमातून अकराशे लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

*चौकट*
 तळोदा तालुका हा पाण्यासाठी सदन तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात झालेली वृक्ष तोड, कमी पर्जन्यमान व पाण्याची योग्य नियोजन नसल्याने यंदा प्रथमच गाढवाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात यापेक्षा बिकट समस्यां उदभवणार असे सांगणे वावगे ठरणार ना

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 मा.जिल्हाधिकारी यांचा आदेशांव्ये गाढवाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेरीमाळ येथे नाल्यात विहिर खोदण्यात आली असून पाईप लाईनच्या सहाय्याने जेंदाफडीमार्गे वरील गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे... *सावित्री खर्डे* *गटविकास अधिकारी*

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 पाणीटँचाई व चारा टँचाई बाबत ग्रामपंचायत मार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता. चारा टँचाई बाबत ठराव व संमती पत्र दिले होते. मात्र भौगोलिक परिस्थिती अभावी कायमस्वरूपी उपयोजना करण्यास प्रशासन हतबल असल्याचे सांगत होते. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला उपाययोजना करण्यास भाग पाडण्यात आम्ही यशस्वी झालो... *भिकलाल वळवी* *सरपंच रापापुर*

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाणी टँचाईबाबतची भीषण परिस्थिती व भौगोलिक परिस्थिती बघता त्या ठिकाणी केवळ गाढवांचा सहाय्याने पाणीपुरवठा करणे शक्य असल्याने स्थानिक निधीतुन गाढवाच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचे आदेश सम्बधित विभागाला दिलेले आहेत. तसेच इतर समस्यां देखील तातडीने मार्गी लावल्या जाणार आहेत.. *बालाजी मंजुळे* *जिल्हाधिकारी नंदुरबार*

 *प्रतिक्रिया*🔸🔸🔸 
गाढवाच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची समस्यां मिटणार आहे. प्रशासनाने मूलभूत सुविधाकडे देखील जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक वसावे कुयली डाबरी ग्रामस्थ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा