भुसावळ स्थानकावर सर्व दहा मित्र सहकुटुंब सोबत जमा झाले. स्टेशनवर हसतमुखाने भेटीगाठी होताच प्रवासाची एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. लहानग्यांचे तर खेळण्यात आणि गप्पा गोष्टीत रंगलेले पाहून सर्वांनाच बालपणाची आठवण झाली. सुधाकर मराठे आणि त्याचे मित्र, त्यांच्या पत्नी, आणि मुलं सगळेजण अत्यंत आनंदात होते.
मराठवाडा एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात सायंकाळी 5 वाजता ह्या सफरला सुरुवात झाली. एक सदस्य दादाभाऊ पाटील यांचा वाढदिवस याच ठिकाणी केके कापून साजरी करण्यात आला. मुलांची केक खाण्याची मज्जा पाहण्यासारखी होती. रेल्वे येताच बाळ गोपलांसह सगळ्यांनी आपली जागा घेतली. ट्रेन सुरू होताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आनंद आणि उत्साह झळकला. सहकुटुंब प्रवास असल्यामुळे गप्पांचा एकच माहोल रंगला होता. मुलं खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहण्यात मग्न झाली, तर महिला विविध विषयांवर चर्चा करत होत्या - शॉपिंग, प्रवासातील नियोजन, आणि भविष्यातील योजना.
माझे मित्र प्रवासात विविध गमती-जमती करत होते, कोणी गाणी म्हणत होते तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देत होते. सुधाकर मराठे यांचे नियोजन, राकेशचे सर्वांना हसवण्याचे प्रयत्न, आणि प्रशांत, ज्ञानु, दादू, चेतन सागर, राहुल, मनोज,लखन यांच्या काही खोडकर गंमती सगळ्यांनाच आनंद देत होत्या. एका वेगळ्याच भावनांच्या लाटेत प्रवास रंगला होता.
सकाळी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच लहानग्यांनी परत उधळण सुरू केली. दिल्ली जवळ येताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह झळकत होता, कारण हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सुंदर व मनमोहक दृश्यांचा साक्षात्कार देणारा प्रवास समोर होता....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा