Breking News

मंगळवार, २१ जुलै, २०२६

पर्जन्यवृष्टीसाठी दंडपाणेश्वर गणपती मंदिरात २४ तास अखंड अभिषेक व रामधुन

नंदुरबार, दि. २१ : श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिर संस्थान, नंदुरबार यांच्या वतीने पर्जन्यवृष्टीसाठी रविवारी (दि. १९) सकाळी ८ वाजल्यापासून २४ तास अखंड लघुरुद्र, पर्जन्यसूक्त पठण, श्री गणेश मूर्तीवर अभिषेक तसेच रामधुनचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली. मध्यप्रदेशातील प्रकाश चैतन्य महाराज, आनंद महाराज, संजुदास महाराज, अनिल महाराज, वसंत महाराज व भान्या महाराज यांची उपस्थिती लाभली. भागवत कथाकार अविनाश महाराज तसेच शहरातील आचार्यांनी दिवसभर धार्मिक विधी पार पाडले. सोमवारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर संस्थानचे सर्व विश्वस्त व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.