Breking News

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त....,
🙏🚩विनम्र अभिवादन 🚩🙏

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर..

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर... जिल्ह्यातील नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील तरुणांना आवाहनात्मक असणारी अश्वस्थामा यात्रा अनेकांची दमछाक करते. मात्र तलोद्यातील एका ८ वर्षीय बालकाने आपली चौथी यात्रा पूर्ण केली आहे. उदय पवार हा वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून यात्रा करीत असून त्याचे वडील अजित पवार यांच प्रोत्साहन मिळत आहे. अजित पवार हे येथील खरेदी विक्री संघात शिपाई म्हणून कार्यरत असुन ते स्वतः मागील २५ वर्षापासून यात्रा करीत आहेत. अश्वस्थामा यात्रा म्हणजे परिसरातील तरुणांना आव्हान असते. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील देरानी- जेठानी, गोऱ्यामाळ, नकटयादेव, भीमकुंड, अश्वस्थामा टेकड़ी, मामा भाँचे, माकड़ टेकड़ी, कोठार असा खडतर प्रवास पायी करावा लागतो. यात धष्ठ पुष्ट तरुणांचा कस लागतो . मात्र वर्षातून एकदा येणारी ही यात्रा सर्वासाठी मौज मस्ती, शौर्य, साहस व शारीरिक क्षमता ची कसोटी असते. आपल्या गावातील व् सातपुड्यातील संस्कृतीची जोपासना करने या मागील उद्देश् असल्याच पवार सांगतात . आता सर्वत्र रस्ते झाले असून जूना अस्तंबा पावेतो प्रमुख टेकड़ीचा पायथ्याशी गाडी जाते. त्यामुळे आता काही तरुण दुचाकी व् चार चाकी वाहने घेवून फक्त प्रमुख शिखर चढ़तात. मात्र हि यात्रा पायी करण्याची खरी जी मजा आहे. ती वाहनातून नाही. असे पायी यात्रा करणारे म्हणतात यंदा देखील हजारो भाविक तळ ठोकुन आहेत उद्या येथील मारुती मंदिराचे दर्शन घेवून भाविक घरी जातील...


पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

 तलोदा येथील राजकोरबाई वानखेडे हे पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
 वानखेडे ह्यांच्या पाव वडा खाण्याकरीता लांब लांबून खव्य्ये येत असुन पाववडा खरेदीकरीता तासंतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.. पाववडा खाण्याकरीता येत आहेत. सिंधखेड़ा तालुक्यातील बेटावद मूळ गाव असलेली राजकोरबाई वानखेड़े यांच्या तलोदा येथील वानखेडे परिवारात विवाह झाला, एक मुलगा व एक मुलगी गुना गोविंदाने संसाराचे गाडे हाकत होते. मुलीच्या लग्नानंतर पाच महिन्यात सन 2001 साली पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलता एक मुलाच्या सांभाळ कसा करायचा याची काळजी उरासी बाळगत स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. तलोदा शहरात मुख्य चौकात हातगाडीवर पाववडे विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायावर जीवनाचा चरितार्थ चालेल की नाही अशी भीती असताना कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतोच ह्या विचाराने हातगाडीवर पाववडा विकन्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक समस्याचा सामना करत पहाटे लवकर उठून घरची कामे आवरून दुपारी 3 वाजता वडापावची गाडी लावत आहे. ह्या कामात त्यांचा मुलगा ललित वानखेड़ा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. गावात आलेला पाहुना असो अथवा नौकरी वर्ग दररोज सायंकाळी ह्या पाववड्याच्या गाडीवर रांगा लावतात, वानखेडे ताईच्या पाववडा हे तलोद्यातील ओळख झाली आहे. सुरुवातीला 2 रु किमतीच्या पाववडा वाढत्या माहागाईमुळे जरी 7 रु येवून ठेपला असला तरी ग्राहकांची व खवैयाची संखेत कमी झाली नाही. गरम गरम पाववडा खाण्याकरीता लांब लांबुन खव्य्ये येत आहेत. दिवसभरातुन साधारणत 700 पेक्षा अधिक वड़े विकले जात असुन 200 पेक्षा अधिक पाववडे पार्सल जात आहेत. ह्यातून चांगला रोजगार प्राप्त होत असल्याचे राजकोर वानखेडे सांगतात. पाववडा विकुन मुलाचे लग्न केले. स्वतः काभाळ कष्ट करुण समाजात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झांली आहे. पाववड्याला ठीक ठिकानाहुन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी गरीब पासुन ते श्रीमंत नागरीक पाववडाची चव चाखल्या शिवाय राहत नाही...
बाहेर गावाहुन आलेला पाहुना असो अथवा माहेरी आलेली लेख वानखेडे ताईचा पाववडा खाल्याशिवाय राहत नाहीं, गरम गरम पाववडा मिळावा ह्याकरीता रांगा लावाव्या लागतात.
वडापावच्या गाडीमुळे समाजात मान उंचावली आहे. मनावर धरले की स्त्री शक्ती काहीही करू शकते याचे एक उदाहरण कष्टातूनही आनंद मिळतो.काभाळ कष्ट स्वत:सह कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. हयात माझा मुलगा ललित ह्याचे मोठे सहकार्य लाभत आहे... राजकोर वानखेडे..


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

अरविंद आप्पा मगरे एक दिलखुलास व्यक्तीमत्व

आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्व आनंदी चेहरा, गोर गरीब जनतेला मदत करण्याची प्रवृत्ती आदिं गोष्टींमुळे अरविंद (आप्पा) मगरे ह्यांनी समाजात व आपल्या मित्र परिवारात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आप्पाच्या वाढदिवस आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या शुभकामना... 
अरविंद रामदास मगरे हे भरतभाई माळी यांचे एकनिष्ठ म्हणुन ओळखले जातात. गरीब कुटुंबात जन्मलेले अरविंद मगरे आपल्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. घ्यासंबंधांच्या जोरावर अरविंद मगरे आप्पा यांनी तलोदा तालुक्यात विविध पदे भुषवले आहेत. सध्याही ते  संचालक  पीपल्स एज्यूकेशन सोसायटी  तलोदा संचालक  खरेदी  विक्री  संघ ता तलोदा, संचालक  तलोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, संचालक माळी समाज पंच तलोदा आदि पदांवर आहेत. आप्पा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी असुन आपल्या
 सुसंवाद साधन्याच्या कलेमुळे आप्पानी  तालुक्यातील शेतकऱ्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधाच्या जोरावर भा.ज.पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत वाणी यांना वि.वि.का.सो धुर चारली.. तसेच 192-1993 ह्याकाळी तलोदा नगरपालिकेच्या....  नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांच्या काळात त्याच्या वार्डतील खान्देशी गल्लीतील समस्या सोडवल्या त्यात रस्ते काम, गटारी बांधकाम, महिलांकरिता शौचालय बांधणे आदिनसह विविध कामे केलेत.  खान्देशात माळी समाज हां तलोद्यात मोठ्या प्रमाणात आहे. आप्पाच्या मनमिळावु स्वभाव समाजातील भांडण  तंटा मिटवने, गोर गरीबाना मदत करणे, आदींच्या जोरावर आप्पानी 2006 काळी समाज उपाध्यक्षांचे पद सांभाळले. ह्यावेळी ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणले.. सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, प्रोत्साहन देत राहणे, यावर आप्पाचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा अप्पाचा स्वभाव आहे.... आप्पाआज 61 व्या वर्षात पदार्पण करीत असुन आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा..
चि.सुधाकर मराठे

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

सिद्धेश्वर महादेव मंदीर

तलोदा शहरातील वांणी गल्ली परिसरातील वृंदावन वाडी शेजारी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाईच्या काळातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे.. सिध्देश्वर महादेव मंदिरातील महादेवतेच्या दर्शनाला आलेल्या भविकांच्या मनोकामना पूर्ण होवून कार्यसिद्धि पाप्त होते. म्हणून या मंदिराला सिध्देश्वर महादेव मंदिर असे नावलोकीक झाल्याचे जानकार सांगतात. महादेवाच्या दर्शनाने लोकांची संकट दूर होवून मनोकामना पूर्ण होत असल्याने  बाराही महीने सिध्देश्वर महादेव मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भक्तगणांचा रांगा लागत असुन परिसरातील नागरिक भंडारा सह भजन किर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्याकाळात मंदिर परिसर भाविकानी फुलुन निघतो. सिध्देश्वर महादेव मंदिर हे तळोदे शहरात व आसपासच्या परिसरात  खोल (ऊँडा)महादेव म्हणून प्रसिध्द आहे.  मंदिर हे जमीन लेवल पासुन 5 फुट खाली आहे, त्यामुळे मंदिरातील सर्व मुर्त्या ही जमीनी पासुन 5 फुट खाली आहेत आणि स्थानिक भाषेत त्याला उंड म्हणतात. म्हणून शहरात व परिसरात या मंदिराचे प्रचलीत नाव उंडा किंवा खोल महादेव झाले आहे. मंदिरात पूर्वी दगडी मुर्त्या कोरलेल्या होत्या परंतु त्यांची झिज झाल्याने त्यांना तापी नदीत विसर्जित करण्यात आल्यात. सन 1999 मधे बासवाड़ा येथून गणपती, दत्त व लक्ष्मीच्या मुर्त्या आणून त्यांची प्राणप्रतीस्थापना करण्यात आली.
{ सिध्देश्वर महादेव मंदिरात दत्तमुर्ती, गणपती मुर्ती, लक्ष्मी मातेची मुर्ती व नंदीची मुर्ती आहे. मंदिरातील मुर्त्या संगमेंश्वर  पाषणात कोरलेल्या आहेत.  मंदिरात नंदी  पच्छिमेस तोड़ करुण एका चौरसावर वसलेला आहे. नंदी हा दगडयात कोरलेला आहे. मुख्य मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी शिवलिंग आहे व शिवलिंगचा प्रवाह हा उत्तरेस आहे.}


सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा.. तळोदा शहरात कोजागरी पौर्णिमेला पार पडणार्‍या संत खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणार्‍या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविकांची गर्दी होते. १२0वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवामुळे तळोदा शहराची सांस्कृतिक ओळख आजही कायम आहे. गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे संत खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम संस्थानतर्फे होतात. येथील विठ्ठल मंदिराचे संस्थापक संत विठ्ठलस्वामी महाराज यांनी संत खंडोजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रथ तयार केला. या रथाचे कोरीव काम व कलाकुसर म्हणजे गतकालीन लाकडी शिल्पकला आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. १00 वर्षांपूर्वी तळोदा शहरात उत्कृष्ट गवंडी, मिस्तरी व लाकडी काम करणारे कुशल कारागीर होते. हा रथ तयार करण्यासाठी या कारागिरांसोबतच परराज्यातील शिल्पकार बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून लाकडी रथ तयार करण्यात आला आहे. रथ तयार करणारे संत विठ्ठलस्वामी महाराज हे मूळचे कर्नाटकचे तेथून ते पंढरपूरला आले, तेथे ते संत खंडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तळोद्याला आले. विठ्ठल महाराज खंडोजी महाराजांना ते गुरू मानत असल्याने गुरुंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तळोदा शहरात रथोत्सव मिरवणुकीची संकल्पना त्यांनी सुरू केली. १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू आहे. या रथाची दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येणार्‍या संत खंडोजी महाराज पुण्यतिथीला तळोदा शहरातून मिरवणूक काढण्याची १२0 वर्षांची पंरपरा आहे. पूर्वी रथाच्या मिरवणुकीत लेझीम, तालीम, ढोल, ताशांच्या गजरात वाद्य व लेझीम पथक प्रमुख यांचे आकर्षण होते. स्मारक चौक, मेन रोडवर रथ मिरवणुकीत शहरातील विविध व्यायामशाळेतील मल्ल मल्लखांब, दांडपट्टा व इतर र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक करत. भाविकांचा या कसरतींना भरभरून प्रतिसादही मिळे. कालांतराने रथाच्या मिरवणुकीतील या कसरती बंद करण्यात आल्या. या रथोत्सवात तळोदा शहरातील आबालवृद्ध सहभागी होतात. या रथोत्सवाच्या परंपरेचे हे यंदा १२१ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदा भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. रथोत्सवाचे संयोजन रथोत्सव समितीतर्फे दरवर्षी केले जाते. या समितीत तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हे धार्मिक कार्य पार पाडतात. शहरातील ओंकारदास वाणी यांनी त्यांचे घर रथ ठेवण्यासाठी दान म्हणून दिले होते. १00 वर्षांपूर्वी दिलेले हे घर कालांतराने जीर्ण झाल्यानंतर ह.भ.प. उद्धव महाराज व दात्यांच्या अर्थसाहाय्याने घराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

नवरात्रोत्सवाला झेंडूच्या फुलाना

झेंडूच्या फुलाना वाढली मागणी तळोदयात पहिल्याच दिवशी दीड लाखांची उलाढाल नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात पहिल्या माळेपासून फुलांची मागणी वाढली आहे. फुलांच्या दरात तेजी आली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीड लाखांची उलाढाल झाली आहे. नवरात्रोत्सवाला मंगळवार पासून प्रारंब झाला देवीला हार आणि पूजेसाठी फुलांची भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. झेंडूचा फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाजारात झेंडूचे फूल मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून 60 ते
70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. यंदा पावसाअभावी झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने फुलांचा तुटवडा भासत आहे. साधारणतः पाच किंवटल पेक्षा अधिक फुलांची आयात करावी लागत आहे. सुरत, इंदौर, अहमदनगर, बंगलौर सह नंदुरबार जिल्ह्यातील निजामपुर छडवेल आदि परिसारातून फूले मागवली जात आहे. फुलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 40 रु कीलो दराने वीकली जाणारी फुले सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. मात्र भाविक मोठ्या प्रमाणात फुले खरीदी करीत आहे. दरवर्षी नवरात्री उत्सवात 12 ते 15 लाखांची उलाढाल होते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाखापेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याने फूल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तलोदा शहरात महाकाली फूल भंडार सदगुरु फूल भंडार जयगुरुदेव फूल भंडार आदी फूल विक्रेत्यांच्या दुकाना आहेत. शहरात ठीक ठिकाणी किरकोळ विक्रेते फुले निर्यात करुण विकत आहेत. झेंडूची कलकत्ते झेंडू फुले, एक्वाऑरेन्ज पिवळी गिरी अश्या विविध प्रकारची झेंडू बाजारात उपलब्ध असुन शेवंती 150 रु किलो अहमदनगर गजरे 400 रु किलो बैंगलोर कुंडाकळी 200 रु किलो इंदौर गेलेंडर 40 रु कोलो तलोदा गुलाब 1रुपया पासुन ते 5 रु पर्यन्त एक नग जरबेरा 10 रु एक नग सूरत आदि विविध प्रकाराची फुले ठीक ठिकानाहुन मागवली जात आहे... झेंडूच्या २ फूटाच्या हारासाठी सुमारे पन्नास रूपये तर ४ फूटाच्या हारासाठी शंभर ते सव्वाशे रूपये मोजावे लागत आहेत.

स्वतः 3 एकरात झेंडू व गुलाबाची लागवन केली आहे. मात्र पावसाच्या अभाव व करपा रोगामुळे फुलाच्या उत्पादनात घट झाली. याकरिता गुजरात मद्यप्रदेश आदि राज्यातून फुले विक्री साठी मागवावि लागत आहे. पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली होती. यामुळे फुलांचे दर कमी झाले होते. मात्र नवरात्रोत्सवात फुलांची मागणी वाढून दरही वाढले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधित दररोज नऊ दिवस फुलांचे हार व फुले मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांनी शहरातील फुले विक्रेत्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात फुलांचे भाव आणखीनच वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे... बब्बु माळी फूल विक्रेता महाकाली फूल भंडार



शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रा.पी.पी.भोगे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व क्रिडा क्षेत्रातील एक अष्टपैलू परिचीत व्यक्तिमत्व म्हणजे माजी क्रिडा संचालक
प्रा.पी.पी.भोगे सर. प्रा.पी.पी.भोगे मुळचे धुळे जिल्ह्यातील त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे सामाजिक दृष्टया मागासलेल्या समाजात जन्माला येवून देखील घरातील वातावरण उच्च विचारांचे, उच्च श्रेणीचे यामुळेच सराना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी आपले उच्च शिक्षण धुळे, औरंगाबाद व मुंबई येथे पूर्ण केले अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्था मा.प्राचार्य. गो.हु. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १९७४ पासुन आपल्या सेवा कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थी हेरण्याचा गुण अंगी असलेले प्रा.भोगे यांनी आपल्या सेवा कार्याला सुरुवात केलेल्या वर्षापासूनच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले विद्यार्थी चमकवले. भोगे सरांच्या काळात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली यशस्वी कारकीर्द नोंदवून आलेले आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयात ज्यु. कॉलेज व सीनियर कॉलेज, पोलीस व विविध क्रिडा प्रकारांमधे महाविद्यालयाची विशेष छाप उमटवली आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेचे जेतेपद सतत 18 वर्ष आपल्याकडे कायम ठेवले. मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडास्पर्धामधे भाग घेण्यास प्रेरित करुण त्यांच्यामधे खेडाळुवृत्ती निर्माण केली व विविध खेळाच्या माध्यमातून त्यांच्यावर मेहनत घेत त्यांना राज्य स्तरापर्यन्त पोहचवले. प्रा. भोगे सरांची सेवा कारकीर्द सदैव उच्च राहिली. महाविद्यालयात रुजु झाल्यानंतर ज्या महाविद्यालयाचे ते क्रिडा संचालक राहिले. त्याच महाविद्यालयाच्या सुसज्य व सर्व सोयीयुक्त जिमखाना आहे. त्यांच्या उभारणीमधे सरांचा महत्वाचा वाटा आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बोर्ड़ ऑफ़ स्टडी,स्टूडन्ट कॉंन्सिल इत्यादि महत्वाच्या समीतीवर त्यांनी आपली विशेष मोहर उमटवली आहे.२००३ ते २००८ पर्यन्त ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले. नंदुरबार जिल्हा स्पोर्ट कमेटीचे सेक्रेटरी म्हणुन त्यांनी कार्य पाहिले. याच कालावधीत त्यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य पद व संस्थेचे सेक्रेतारि पद आले. त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे प्राचार्य पदाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला व महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली कडून महाविद्यालयासाठी 44 लाखाँचा निधी प्राप्त मिळवला. आयुष्यभर महाविद्यालयात सायकलीने प्रवास करुण विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. एक प्रेमळ व निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणुन प्रा. भोगे क्रिडा क्षेत्रात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर प्रसिद्द आहेत. कुठल्याही व्यक्तीशी व विद्यार्थ्यांशी संबंध आल्यानंतर त्यांची आपुलकीने चौकशी करणे त्याना निस्वार्थ हेतुने मदत व मार्गदशन करणे यामुळे त्यांना असंख्य मित्रपरिवाराचा गोतावळा आहे. शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपल्या कुटुंबियांकडेही विशेष लक्ष दिले. म्हणूनच त्यांचे दोन्ही लहान बंधू पुणे येथे एम्.एस. व एम्.डी. म्हणुन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या मुलाबाळावरही चांगले संस्कार करुण त्यांनी आपल्या कुटुंबियांमधे चरित्र संपन्न, पिढी घडवली. अश्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या 10 ऑक्टोंबर रोजी जन्म दिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा............

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य सरकारी वकील पदी अँड.गिरासे अमरजीतसिंग तसेच चार अतिरिक्त सरकारी वकील व 31 साहाय्यक सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुकत्या निधि व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत दि 8 ऑक्टोंबर रोजी 2 वर्षाकरिता जाहिर करण्यात आल्या आहेत. या नविन नियुक्तया नुसार तलोदा येथील रहवासी अँड. अजयकुमार मगरे ह्याची सरकारी वकील व अभियोक्ता पदी नीवड़ झाली आहे. मगरे यांना 17 वर्षाच्या वकीलीचा अनुभव असुन त्यांनी आतापर्यन्त वन अतिक्रमण जमीनी दावे नगरपालिका निवडणुकी संदर्भात व इतर महत्वाचे नौकरी विषयक खटले प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. 3 हजारापेक्षा अधिक खटले चालवल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. अँड. मगरे यांनी त्यांची ही निवड वडील कै. गोवरलाल उखा मगरे ह्यांच्या स्मृतिस अर्पण केली आहे. अँड. अजय मगरे यांचे वडील कै. गोवरलाल मगरे हे अक्कलकुवा येथील कृषी उतपन्न बाजार समितिवर कार्यरथ होते. अजय मगरे यांच्या निवडीनंतर त्यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

काका गणेश मंडळ

तलोदा येथील काका गणेश मंडळाने तलोद्यातील स्वातंत्र्यपुर्व काळापासुन चालत आलेल्या परंपराचा आरास साकारुण एकोप्याचे व शांततेचे प्रतीक तलोद्यातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन दिले आहे. समाजातील स्तरातील लोकांचे एकत्रीकरण व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, नाट्य कथानकातुन समाज प्रबोधन व ज्ञानदान व्हावे, धर्म व संस्कृतीची जाण समाजात जागृत रहावी अशा अनेक उद्दिष्टानी गेल्या दिडशे वर्षांपासून तळोदा येथील गांवाच्या मध्यवर्ती असलेल्या बालाजी वाडयातील श्री विठ्ठल मंदिरात महिषासुर मर्दीनी श्री भवानी मातेचा दशावतारी ललित षटरात्री उत्सव प्रतिवर्षी कार्तिकी एकादशी पासून सहा दिवस केला जातो, सदर सहा दिवसाच्या देखावा एकच दिवशी कठोर परिश्रम घेवुन काकाशेठ गल्लीतील काका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी सादर केला आहे. सतत 3 दिवस सुरु असलेली पावसाची संततधारमुळे काही प्रमाणात गणेशभक्तांच्या उत्साहात विरजन आले होते. मात्र चौथ्या दिवशी थांबलेल्या पावसात भाविकाना उत्साह भरून काढला. भवानी मातेची टक्कर पाहण्याकरीता भाविकानी प्रचंड गर्दी केली होती.,....











क्षत्रिय नवयुवक मंडळ


तलोदा येथील क्षत्रिय नवयुवक मंडळ तलोदा शहरात 1974 साली क्षत्रिय
माळी नवयुवक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी विविध आरास व शांततेच्या प्रतिक असलेल्या क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ ह्यावर्षी 41 वे वर्ष साजरी करत आहे. ह्यावर्षी अंधश्रद्धेवर देखावा सादर करुण नरेंद्र दाभोळकराना श्रदांजली अर्पली आहे. देखावा पाहण्याकरीता भाविकानी प्रचंड गर्दी केली होती. तलोदा शहरात शांततेच्या व एकतेचे प्रतिक असलेल्या क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ असुन, या मंडळाची स्थापना सुकलाल माळी, श्रीराम मगरे, विनोद मगरे, कै.गोवर्धन मगरे आदिनी सन 1974 साली केली. स्थापनेनंतर राम मंदिर, बालाजी मंदिर, कुबेर भंडार, कश्मीरचा बाग़, बंगोळीवरील झुलावणारा गणपती, मच्छीन्द्रनाथ गुफा, चायना टाऊन मंदीर, मीनाक्षी मंदीर, शिर्डी साईबाबा, अश्या विविध आरास तयार कले आहेत. तर विविध विषयांवर जनजागृती व प्रभोदनात्मक देखावे सादर करण्यात क्षत्रिय माळी समाज नवयुवक मंडळ अग्रेसर आहे, मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील दरी कोसळलेल्या माळीन गावाची व्यथा मांडली होती. ह्या वर्षी अंधश्रद्धेच्या साहाय्याने गोर गरीब जनतेची व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ह्यावर आरास साधारली आहे. याकरीता- वैभव माळी, (बाबा) चंदर मगरे व सूरज
सुर्यवंशी- (शेतकरी) रोहित मगरे- (मवाली) हेमंत मगरे-  (भक्त) प्रसाद मगरे व कुशल मगरे यांनी महिलांची भुमिका  साकारली असुन हिमांशु सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांची भूमिका साकारली आहे,,, समाजात अंधश्रद्धेचा पगडा कमी न होता  वाढतच आहे. अंधश्रद्धा थांबवने गरजेचे आहे.
समाजात द्वेष पसरविणारी विचारसरणी बंद पडली पाहिजे.  ही शरीराची हत्या असून विचाराची हत्या नाही. स्वत:साठी काही न करणारा दुस-यांसाठी उभे आयुष्य वेचणा-या डॉ.  नरेंद्र दाभोळकर यांचे विचार पुढे नेण्याची गरज आहे  असाबी संदेश ह्या देखाव्यातून दिला आहे..मंडळाचे अध्यक्ष- श्रीराम मगरे, उपाध्यक्ष, सुनील सुर्यवंशी, सचिव- अविनाश  टवाळे व रत्नाकर शेंडे, कोष्याध्यक्ष- हेमचंद्र टवाळे, मधुकर  मगरे, सुधीर माळी, संकेत माळी,अरुण मगरे, अरविंद   टवाळे, भिका मगरे, हेमलाल मगरे, अनिल माळी, भगवान मगरे, रविंद मगरे, गिरधर  सुर्यवंशी, राकेश मगरे, गजानान मगरे, उमेश मगरे, मनोज मगरे, आदीनी कठोर  परिश्रम घेतले आहेत,