Breking News

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमी नंतर गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी

गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी
दै. पुण्यनगरी च्या वृताने प्रशासन कामाला: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत तऱ्हावद गंगानगर येथील पाणी समस्या व इतर कामासाठी जिल्हापरिषदेच्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतुन गावात पाण्याची सोय केली जाणार आहे. सदर निधीमुळे विस्थापितांच्या पाण्याच्या प्रश्न कायमच्या मार्गी लागणार आहे. याबाबत नुकतेच दै. पुण्यनगरीने येथील समस्याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विस्थापितांनी समाधान व्यक्त केले आहे.
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद (गंगानगर) गावातील पाण्याची समस्यांने उग्ररूप धारण केले आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. आश्वासन देऊन हि समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरीने गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी या शिर्षका खाली सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती... सन 2002 मध्ये तऱ्हावद पुनर्वसन येथे तेरा गावठानाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावाची लोकसंख्या दोन हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः आठशे 86 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासना कडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन गाव विस्तथापित करण्यात आले..मात्र विस्थापितानंतर येथील रहवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन 2002 मध्ये गावाला आमदार निधी व नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75 हजार लिटरची एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून
गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे गंगानागरकरानी आपल्या विविध मागण्याबाबत 27 जानेवारी 2016 रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 8 महिने उलटूनही समस्या न सुटल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र या समस्यांबाबत दि 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरी मधून सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आदिवासी उपाययोजने अंतर्गत विस्थापित झालेल्या तऱ्हावद पुनर्वसन गंगानगर गावातील पाणी समस्या व उपाययोजनेसाठी 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीमुळे पाण्याची समस्यां सुटण्यास मदत होणार आहे. या निधीतून 22 लाखाची रु खर्चून साडे सात कि.मी. पाण्याची पाईप लाईन केली जाणार आहे. दीड लाख रु रकमेचा स्विच रूम उभारला जाणार आहे. तसेच सोयीनुसार 5×2 प्रमाणे 3 लाख खर्चून 2 सार्वजनिक हौद, 80 हजार रकमेचे यंत्र सामुग्री बसविण्यात येणार आहे...

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी ?

तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेले तऱ्हावद गंगानगर गावातील पाण्याची पाण्याची उग्ररूप धारण करीत आहे. 9 हातपंपापैकी 7 हातपंप नादुरुस्त असून मागील दोन वर्षापासून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आश्वासन देऊनही समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पुनर्वसन करून आमची फसवणूक केल्याचा आरोप पुनर्वसितानी केला आहे...
 तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.

 नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे. 
 शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर







सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

दानिश घडवतोय तळोदयात सामाजिक एकात्मतेचे दर्शन

तळोदा शहरातील येथील 11 वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी या बालकाने श्री ची स्थापना करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. शहरात शांतता नांदावी, हिंदू मुस्लिम मध्ये बंधूभाव निर्माण व्हावा ह्या हेतूने गणेश स्थापना केल्याचे दानिश सांगतो. या उपक्रमानंतर दानिशचे सर्वत्र कौतुक होत आहे....
मजहब नहीं सिखाता आपसमें वैर रखना..! या प्रमाणे तळोदा येथील 5 वीत शिक्षण घेणारा अकरा वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी यानें हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी, हा हेतू मनात ठेवून जाती धर्माचा तिढात न पडता एकतेचा प्रतीक असलेल्या गणपतीची स्थापना करुण एक आदर्श निर्माण केला आहे. दानिशला गणेश मूर्तीचे विशेष आकर्षण असल्याने. दानिश मूर्ती विक्रेत्यांकडे जाऊन मुर्त्या पाहत असे. दिवसभर विविध गणेश मुर्त्या पाहून दानिश कुतूहलाने मूर्ती विकर्त्याला हि मूर्तीबाबत माहिती विचारत असे. लालबागच्या राजा व दगडू शेठ हलवाई या मूर्त्यांचे दानीशला मोठे आकर्षण निर्माण झाले. श्रीच्या कथा ऐकून व विविध रंगीबेरंगी गणेश मूर्त्यांनी दानिशला चांगलाच आकर्षित केले. गणेश स्थापनेबाबत दानिशने त्यांच्या काही मित्राना विचारणा केली. त्यांच्या योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दानिश खचला नाही. त्याने कल्पना टॉकीज गल्लीतील बाळ गणेश मित्रमंडळातील अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या मंडपात आपला गणपती स्थापना करण्याची विनंती केली.. मंडपात मूर्ती बसविण्याच्या होकार मिळताच दानिशने खाऊच्या पैश्याने गणपतीची छोटीशी मूर्ती विकत घेऊन तीची विधिवत स्थापना केली. दररोज नित्यनियमाने मदजीतमध्ये नमाज अदा करून आल्यावर सकाळ, संध्याकाळी स्वतः श्रीची आरती करतो, नैवेद्य देतो व दररोज प्रसाद वाटप करतो. सत्यनाराणाची पूजा सह मंडपात होत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात दानिश मोठ्या भक्तीभावाने रमतो. दानिशने स्थापन केलेल्या श्री च्या मूर्तीकडे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सामाजिक एकात्मता जोपासली जावी यासाठी दानिश दरवर्षी श्रीची स्थापना करणार असल्याचे तो म्हणतो. याबाबत त्याच्याशी संवाद साधला असता. हिन्दू मुस्लिम में लढाई न हो. एकसाथ में सब मिलकर रहे कोई लढाई ना करे, भगवान तो भगवान होता है! हर भगवान की पूजा करे हर भगवान को नमस्ते करे, हर भगवान को सलाम करे।* असे त्याने सांगितले. दानिशच्या या उपक्रमाचे व त्याने निर्माण केलेल्या सामाजिक एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे......










रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.

आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली हातोडा पुलाची पाहणी...
 माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस....

तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भराव खचला असून पुलाचे काम निकृष्ठ झाल्याचे सविस्तर वृत्त दै पुण्यनगरीने प्रसिद्ध करून प्रशासनाच्या बोगस काम चव्हाट्यावर आणले. या वृत्ताने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यासोबत पुलाची पाहणी केली. पुलावर ठिकठिकाणी पडलेले तडे, खचलेला भराव पाहून आमदार पाडवी चांगलेच संतापले. यावेळी त्यांना उपस्थित अधिकाऱ्याना धारेवर धरत कानउघाडणी केली. पुलाच्या बांधाकामात अपहार झाला असल्याचा आरोप करून कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सदर बाब गँभीर असल्याचे सांगुन संबंधीत विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले.
 महाराष्ट्र व गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला. तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन व शहादा तळोदा विधानसभाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी 6 वर्षांपासून रखडलेला हतोडा पूल जून महिनापूर्वी सुरु करणार असल्याचे असश्वासन दिले होते. मात्र तापीनदीला पाणी सोडल्याने पुलाचे काम बंद आहे. 90 टक्के काम पूर्णत्वाकडे असताना पुलाचे झालेल्या कामाच्या ठिकठिकाणी तडे गेल्याने संबंधीत विभागाचे कामाचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहे याबाबत दै.पुण्यनगरीने शुक्रवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्याने प्रशासनाची झोप उडाली. या वृताची दखल घेत आमदार उदेसिंग पाडवी यांनी तात्काळ संबंधीत विभागाला दूरध्वनी करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पिंगळे व सहकारी यांच्यासह आ. उदेसिंग पाडवी विश्वनाथ कलाल, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहर अध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, युवा मोर्चाचे शिरीष माळी, माजी नगरसेवक भगवान मगरे, महेंद्र वाणी, माजी नगरसेवक भास्कर मराठे, आदींनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूलाचे निकृष्ट काम पाहून आमदार पाडवी यांनी सा.बा.विभागाचे अभियंता पिंगळे यांना चांगलेच धारेवर धरले. पुलावर आवश्यक तो भराव व रोलरींग न केल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. पुलाच्या दोघा बाजूच्या संरक्षण कठडयाच्या भराव पूर्णपणे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवशक्य तो भराव व रोलरींग न करता डांबरीकरणं का केले? हा संशोधनाचा विषय आहे. अधिकाऱ्यांनी बेजाबदार केलेल्या कामामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामाचा निधी वाया गेला असून सदर काम पुन्हा करावे लागणार आहे. हातोडा पूल हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा सेतू असल्याचे सांगत, पुलाचे काम निकृष्ठ दर्जेचे झाले असून यात अपहार झाला असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी यावेळी केला. याबाबत अभियंता सुनील पिंगळे यांनी वरिष्ठ याबाबत माहिती देतील म्हणत जबाबदारी झटकली. या पुलाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारकडे आहे. वेळोवेळी पाहणी करून योग्य त्या सूचना देऊन काम करवून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता वर्षा आहिरे, धुळे अधिक्षक वाघ यांची आहे. मात्र या अधिकाऱ्यानी पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशट्टी यांनी सदर बाब गँभिर असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दै. पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे यांना दिली......
हातोडा पूल विकासाचा सेतू आहे. याबाबत वेळोवेळी निधी साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध केला आहे. मात्र पुलाचा भराव खचला असून पुलाला मोठाली तळे गेली आहेत. पुलावर योग्य तो भराव व रोलरींग केली नसताना देखील त्यावर डांबरी करणं करून निधी वाया करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांनी अद्याप पावेतो एकदाही पुलाची पाहणी केलेली नाही. सदर अधिकारी कुणाचे फोन उचलत नसून कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. बेजबाबदार अधिकारी वर योग्य ती कारवाइ व्हावी याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे...
 *आमदार उदेसिंग पाडवी* *शहादा - तळोदा विधानसभा क्षेत्र -*
हातोडा पुलाच्या बातमीनंतर खान्देशात गाजला हातोडा पुलावर केलेला खान्देशी चिमटा
तात्काळ  बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी घेतली व मला  WHATSAPP  वर कळवले...


दै.पुण्यनगरीची दखल बातमी 





शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

उद्घाटनापूर्वीच हातोडा पुलास तडे

तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा तापी नदीवर बांधला जाणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भर खचला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. हातोडा पुलामुळे तळोदा नंदुरबारचे अंतर कमी होईल, या अपेक्षेने काम पूर्ण होण्याची आतुरतेने नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. असे असताना पुलाचा भराव खचू लागल्याने निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याकडे संबंधीत विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.....
नंदुरबार तलोदाकडे येजा करण्यासाठी प्रवासी व प्रवासी व वाहनधारकांना प्रकाशा किंवा कुकरमुंडा मार्गे जावे लागत असल्याने फेरा पडत आहे. तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा, यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचा प्रमुख पुढाकाराने सन २००७-०८ मध्य हातोडा पूलाचे भूमिपूजन झाले. या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी सहावर्षा पासून पुलाचे रखडलेले काम जून महिनापूर्वी सुरु करण्याचे असश्वासन दिले होते. या पुलाचे निम्मे काम होत असताना नागरिकाना पुलाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा लागली. पुलाची एकूण लांबी ६७५ मिटर, रुंदी १२ मीटर, २ फूट पाथ एकूण १२ उंची नदीचे पात्र, एकूण दगडापासून ५४ मीटर बांधकाम २८ मिटर असे आहे. सध्या तापीनदीला पाणी सोडण्यात आल्याने काम बंद आहे. काम झालेले असताना उद्घाटनापूर्वीच सदर पुलाचा भराव खचला आहे. पुलावर मोठमोठी तडे पडली आहेत. त्यामुळे सदर कामात सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर निकृष्ट कामामुळे अनेकवर्षांपासून वाट पाहत असलेल्या जिल्हावासीयांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. संबंधीत पूल उभारत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने या कडे लक्ष दिले असते तर हे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसते असा आरोप नागरिक करत आहेत. संबंधीत कामाची चौकशी कारवाई करण्याची मागणी होत आहे.....