Breking News

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

तळोदा पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे थाटात विसर्जन...

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या श्रीची स्थापन करून उत्साहात विसर्जन केले या प्रसंगी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होतो येथील प्रा गो हु महाजन हायस्कुलचे विद्यार्थीचे लेझीम पथक सहभागी झाले होते तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यावर्षा पासून प्रथमच दीड दिवसाच्या श्रीं ची स्थापना केली होती दुसऱ्या दिवशी श्रीं ची विसर्जन मिरवणूक येथील स्मारक चौकातुन प्रारंभ झाला होता विसर्जन मिरवणुकीत भाजप प्रदेश कार्य कारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी, गणेश सोशल ग्रुपचे संजय माळी, नगरसेवक अजय परदेशी, पंकज राणे, गौरव वाणी, भाजपा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, माजी नगरसेवक अनिल माळी, भगवान मगरे, भाजप दलित आघाडी प्रदेश सदस्य डॉ स्वप्नील बैसाने, भाजयुमो तालुकाध्यक्ष शिरीष माळी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, गौतम जैन, हितु क्षत्रिय, योगेश मराठे, रसिकलाल वाणी, प्राचार्य अजित टवाळे, नंदू जोहरी, भीमा महाले, ईश्वर पोटे, बापू कलाल, अँड संजय पुराणिक, अँड सचिन राणे, किशोर चव्हाण पत्रकार अक्रम पिंजारी, गणेश गुरव, वसंत मराठे, अविनाश मराठे, प्रसाद बैकर, तुंबा सूर्यवंशी, श्याम सोनगडवला,मानसिंग राजपुत, गोकुळ पवार, विनोद कलाल, निलेश न्हावी, आदी उपस्थित होते तर लेझीम नृत्य नियोजन संकेत माळी, पदमेश माळी, योगेश पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी संघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, उपाध्यक्ष चेतन इंगळे, सचिव विकास राणे कोषाध्यक्ष किरण पाटील, प्रा ए टी वाघ, ईश्वर मराठे, नरेश चौधरी, सुधाकर मराठे,राकेश पवार महेंद्र लोहार, फुंदीलाल माळी, तुषार नाईक मंगेश पाटील, मिलिंद धोदरे, प्रवीण भरती, दीपक मराठे आदींनी परिश्रम घेतले...























































मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

दै.पुण्यनगरीच्या माध्यमातून हातोडा पुलाचे केलेले वृत्ताकन,

                                  दै.पुण्यनगरीच्या माध्यमातून हातोडा पुलाचे केलेले वृत्ताकन,






















न्यूबनला स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही पोहचली नाही बस!

कायमस्वरुपी रस्ता नाही : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान;
पाच किमी.ची करावी लागते पायपीट
तळोदा तालुक्यातील बोरद ते न्युबन दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड झाली आहे. यामुळे बोरद येथे कामानिमित्त येणाऱ्या न्युबनकरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावाला कायमस्वरुपी चांगला रस्ता नसल्याने ७० वर्षानंतर देखील बस पोहचू शेकली नाही हे गावकऱ्यांचे दुर्देव आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे देखील हाल होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबधित विभागाने लक्ष देवून त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. . तळोदा तालुक्यातील न्युबन ते बोरद या चार की.मी अंतराच्या रस्त्याची प्रचंड दयनिय अवस्था झाली आहे. दि.५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यावर मोठ- मोठी खड्डे पडली आहेत. त्यामुळे वाहनधारक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा बोरद येथे बाजार व शिक्षणासाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी या रस्त्याशिवाय पर्याय नाही. रस्त्याच्या दुरावस्थमुळे वाहने वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सुमारे ५ वर्षापुर्वी बोरद ते न्युबन हा चार की.मी. रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर होऊन त्याचे कामही करण्यात आले. मात्र याची
वेळोवेळी देखभाल न झाल्याने हा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. . सुमारे पाच वर्षापुर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली असून याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या रस्त्याचे पुर्णता तीनतेरा वाजले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने सापुड्यातून उगम असलेल्या नदी नाल्यांचे पाणी पुलावरुन वाहत असते. त्यामुळे हा रस्ता अधिकच खराब होतो. रस्त्यावर मोठ-मोठी खड्डे पडले असून त्या खड्यांमध्ये पाणी साचत आहे. ठिकठिकाणी रस्ताच्या भरावही खचलेला आहे. त्यामुळे गावापर्यंत वाहने घेऊन जाणे मोठे कसरतीचे ठरत आहे. रस्त्याअभावी स्वातंत्र्य मिळून ७० वर्षानंतर देखील या गावाला बस पोहचू शकलेली नाही. न्यूबन येथून शिक्षणासाठी बोरद व तळोद सुमारे ५० ते ६० विद्यार्थी जात असतात. मात्र बस नसल्याने त्यांना पायपिट करावी लागते किंवा अधिक भाडे खर्चून दररोजचा प्रवास करावा लागतो. यामुळे सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मुलांचे शिक्षण करावे की त्यांना प्रवासासाठी पैसे द्यावेत, या विवंचनेत पालक सापडले आहेत. पैसे नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येवू शकत नाहीत, यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केली आहे. रस्ता त्वरीत दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे..

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

भाग्यश्री मगरेला एम.टेक परीक्षेत गोल्ड मेडल

तळोदा येथील भाग्यश्री उल्हास मगरे या विद्यार्थीनीने जळगाव विद्यापिठातून एम.टेक परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. भाग्यश्रीने विविध विषयांवर संशोधन केल्याने तीला यश मिळाले असून तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. . दै.'पुण्यनगरी'चे तळोदा येथील पत्रकार उल्हास मगरे यांची सुकन्या भाग्यश्री हिला जळगांव विद्यापीठात एम.टेक (मास्टर ऑफ टेकनोलॉजी इन एनवोर्नमेंट सायन्स & टेक्नॉलॉजी) परीक्षेत गोल्ड मेडल मिळाले. कु.भाग्यश्री सलग चारही सेमिस्टरमध्ये प्रथम येऊन युनिव्हर्सिटी टॉपर झाली आहे. तीला ८.६ सीजीपीए गुण प्राप्त झाल्याने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.टेक करीत असतांना तीला विद्यापिठाकडून नॅशनल इन्स्ट्यूटीट ऑफ रिसर्च नागपूर येथे रिसर्च प्रोजेक्टसाठी पाठविण्यात आले होते. त्याठिकाणी संशोधन करुन तीन प्रकारचे विषाणू फक्त पाणी आणि मातीतच नाही तर त्यांचे अस्तित्व हवेत सुद्धा असते हा शोध तीने लावला.
भाग्यश्रीचा हा शोध प्रबंध स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी जर्नल ऑफ अप्लाईड मायक्रो बॉयोलॉजी या प्रतिष्ठीत युके अमेरिकन इंटरनॅशनल सायन्स मॅगेझिनने स्विकृत केला. याआधी अभियांत्रिकीला असतांना तीने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या भाजीपाल्यातून बहुउपयोगी रसायन शोधून काढले होते. भाग्यश्रीचा यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यशाचे श्रेय तिने आपले वडील उल्हास मगरे, आई नीलिमा मगरे यांना दिले आहे. . गणेश सोशल ग्रुपच्या वतीने भाग्यश्रीचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी, पंकज राणे, हितेंद्र खाटीक, योगेश मराठे, संदीप परदेशी, कमलेश पाडवी आदी उपस्थित होते. तसेच तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने भाग्यश्रीचा सत्कार करुन तीचे कौतूक केले. यावेळी संघाचे प्रा.ए,टी.वाघ, अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष चेतन इंगळे, किरण पाटील, ईश्वर मराठे,सुधाकर मराठे,सम्राट महाजन, नरेंद्र चौधरी आदींसह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते..

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

हातोडा पुलावर 'सेल्फी' काढण्याचा नाद!

जीव धोक्यात घालून कठड्यांवर उभे राहून तरुण काढताय फोटो
 देशात ठिकठिकाणी सेल्फीच्या नादात दरीत व नदीत पडून अनेकांचा जीव जात असल्याची घटना घडत आहे. सध्या सर्वांनाच सेल्फीचा मोह असल्याने विशेष करुन जीवघेण्या ठिकाणी सेल्फीफोटो काढण्यात येत आहेत. यातच तळोदा तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हातोडा पुलावर देखील अनेक सेल्फीप्रेमी पूलाच्या संरक्षण कठड्यांवर उभे राहून सेल्फीफोटो काढीत आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा रक्षकाअभावी सेल्फीचा नाद जीवावर बेतून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सेल्फी पाईंट बनलेल्या हातोडा पुलावर लक्ष देणे गरजेचे झाले आहे.. नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा तापी नदीवरील हातोडा पुलाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. येत्या काही महिन्यात हातोडा पुलाचे लवकरच उद्घाटन होवून सुरु होणार आहे. सध्या सोशल मीडियाचा वाढता ट्रेंड, विविध दुर्मिळ व नैसर्गिक नैसर्गिक सानिध्याच्या सेल्फीफोटो काढण्याचे आकर्षक सर्वांनाच लागले आहे. अशा फोटो सोशल मिडीयांवर लाईक्स व कमेंट्स मिळत असल्याने सेल्फीची क्रेझ वाढत आहे. विशेष करुन तरुणाईत सेल्फीचे आकर्षण असल्याने निसर्गरम्य, नदी व दऱ्याखोऱ्याच्या ठिकाणी विलोभनीय सेल्फीफोटो काढले जात आहे. सध्या देशासह राज्यात आतापर्यंत धबधबे, नदी, धरण, दरी अशा निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी काढण्याचा नादात काहींचा खाली पडून किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडत असल्याचे दररोज समोर येत आहेत. असे असतांनाही सेल्फीचा नाद अनेक ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. तळोदा व नंदुरबारला जोडणाऱ्या तापीनदीवर हातोडा पूल बांधण्यात आला आहे. तापी नदीचे असलेले मोठे पात्र, नदीतून वाहणारे पाणी आणि सूर्याची किरणे अशा अनेक आकर्षणामुळे या हातोडा पुलावर सध्या सेल्फी काढण्याची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या हातोडा पुलास भेट देवून अनेक तरुणी जीवघेण्या पध्दतीने पुलाच्या संरक्षण कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढत आहेत. सदर पुल अद्याप सुरु झाले नसल्याने याठिकाणी जाण्यास बांधकाम विभागाने मनाई केली आहे. यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पत्र्याचे शेड तयार करुन मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षारक्षक पुल परिसरात देखरेख करीत आहेत. मात्र सुरक्षा रक्षकांना दाद न देता काही सेल्फीप्रेमी हातोडा पुलांवर जावून जीवघेण्या पध्दतीने फोटो काढत असल्याने एखादी घटना घडण्याचे नाकारत येत नाही. म्हणून संबंधित विभागाने सेल्फी पाईंट बनलेल्या हातोडा पुलाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सूज्ञ नागरीकांकडून होत आहे..




मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

आदिवासी क्रांतीकारांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या जागर यात्रेला प्रारंभ रावलापाणी येथून सुरुवात :

राज्यभरात शेतकरी व सामान्य जनतेशी साधणार संवाद 
ऑगष्ट १९४२ च्या चलेजाव आंदोलन क्रांतीपर्वाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राष्ट्र सेवा दल व समविचारी पक्षाच्यातीने राज्यभर जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ या यात्रेला काल दि़३१ रोजी तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथील स्मारकास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. मोड, मोरवड, बोरद मार्गे यात्रा तलोद्यात दाखल झाली. सदर जागर यात्रा नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर, कोकण व राज्यभरात जाणार असून समारोप मुबंई येथे होणार आहे. या यात्रेत गडचिरोली, कोकण, पुणे तसेच परराज्यातून देखील राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत़ तळोद्यात स्मारक चौकात गणेश सोशल ग्रुपच्या वतीने फटाक्यांची अतिषबाजी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. सामाजिक समता परिषद, राष्ट्र सेवा दल, व सहयोगी संस्था, संघटना यांचा सर्व राष्ट्रीय पधाधिकाऱ्यांचे ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी व हितेंद्र क्षत्रिय, भरत चौधरी, योगेश मराठे, यांनी सत्कार केला़ दुपारी २ वाजे दरम्यान तळोदा येथील वामनराव बापू मंगल कार्यालयात सामाजिक समता परिषद झाली़ यावेळी महत्वपूर्ण विषयांवर ठराव करण्यात आले़ यावेळी सामाजिक समता परिषदेला राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते जे़यु़ठाकरे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुरेश खैरनार,
माजी अध्यक्ष प्रा़कंपोळे, जेष्ठ सेवा दल साथी ढोडरे, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष उल्लाउद्दीन शेख, धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भोसले, सहमंत्री विलास किरोते, नंदूरबार जिल्हाध्यक्ष प्रा़आय़बी़चौधरी, जेष्ठ कार्यकर्ते सदानंद राणे सुनीता गांधी, मोहन चौधरी, प्रतिभा शिंदे, रमाकांत चौधरी, धर्मराज पवार, जयेंद्र मगरे, विनोद सूर्यवंशी, योगेश पाडवी, प्रकाश पाडवी आदी उपस्थित होते. प्रतिभा शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला़ तळोदा तालुक्यात स्वातंत्र्यसैनिक भगवान शेंडे, रामचंद्र पुंजु माळी, चौधरी बुलाखी कत्थु, भिक्कन पाटील, तुकाराम संपत सूर्यवंशी आदींची माहिती दिली़ डॉ़सुरेश खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले़ देशात आदिवासी बेरोजगार, शिक्षण, शेतकरी समस्यांसह असंख्य प्रश्न असल्याचे सांगून सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली़ जागर यात्रा ठिकठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांचा सन्मान करणार असून शेतकऱ्यांशी व सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न शासनासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन जे.एन.शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा शिंदे, डॉ़देविदास शेंडे, अजित टवाळे, प्रा़जे़एऩशिंदे, प्रा़ए़टी़वाघ, एस़एम़महिरे, एऩके़माळी, निमेश सूर्यवंशी, एस़एस़सोनवणे आदींनी परिश्रम घेतले़.