Breking News

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तुला वेळ मिळाला तर.

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं,
मी समोरुन जाताना
तु दारात उभं रहायचं
आईला संशय नको म्हणुन
झाडानां पाणी घालायचं,
फुलानां फुलवायचं,
आईला भुलवायचं
तुला वेळ मिळाला तर...
को~या कागदावर्,
किवा रुमालावर
मन मोकळ करायचं
अस् एकमेकांनी
काळजात जपायचं
तुला वेळ मिळाला तर...
कळेल एक दिवस तुझ्या घरी
कळेल एक दिवस माझ्या घरी
तेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाची
दोघांत एक विषाची बाटली
तु आधी कि, मी आधी
असं नाही भांडायचं
दोघांनी एक-एक घोट घ्यायचं
हातात हात घेउन झोपी जायायचं
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.

मी तिला विचारले

मी तिला विचारले .......

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

हवं असतं कुणीतरी

हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
... तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं

नातं आपलं

‎"नातं आपलं कप आणि बशीचं..
कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..
रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप
आठवायचं..
आठवता आठवता हळूच गालात हसायचं..
नातं आपलं चहा अन् दुधाचं..
दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..
कधी रुसायचं, कधी हसायचं,
पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच
विसावायचं..
नातं आपलं हळव्या प्रेमाचं..
एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..
एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं
नावाजायचं..
एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं
स्वतःला हरवायचं..
नातं आपलं साता जन्माचं,
सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..
कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..
पण आपण सदैव बरोबरच रहायचं.."

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल..

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....
इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल.....
हळूच एखादा MISS CALL करून
मला ती सतावेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
स्वप्नामध्ये माझ्या हळूच
कोणीतरी शिरेल.....
बोलायला "काहीच नाही" म्हणून फोनवर
तासभर
बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन
ठेवण्याची घाई
करेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत रात्रभर
कोणीतरी जागेल.....
तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे
अंतर
दाखवेल.....
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धा क्षणभर
वाटेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचा प्रेमाचा स्पर्श
लाभेल......
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....

MY SCRAP













                          


























बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

काल ती मला म्हणाली

काल ती मला म्हणाली,
"तुला कधी स्वप्न
तुटायची भीती नाही वाटत....
...?
उंच मनोरे तू स्वप्नांचे
बांधतोस........ .., ते
कधी कोसळायची भीती नाही
वाटत ...........?

मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे
जग आहे..     
                                                                                                                        
 हे आयुष्यच
स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि त्यांच्यातच विलीन होणे
आहे....."
"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत
जगायचा आहे
मग नंतर....
तो स्वप्नांचा मनोरा माझ्या सकट
कोसळला तरी चालेल..........!!!"
"इतका कसा रे स्वप्नाळू
तू ?........ इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत
कोणाची.......
किती रमशील
स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन
तुला सोडून..... मग काय करशील हं?....."
"आता अजिबात स्वप्ने पाहू
नकोस माझी......"
असं कालच माझ्यावर चिडून
मला म्हटली होतीस
आणि..
"काल देखील रोज
रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने.....
माझ्याकडेच
पाठवली होतीस
अगदी न चुकता....

चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही


एका ठिकाणी चिमणी व चिमण्याचे एक जोडपे होते. चिमन्याचे नाव सुधास तरी चिमणीचे नाव परी होते. दोघांचे एक मेकांवरती जीवापार प्रेम होते. चिमणा हां चिमणी वरती जिव ओतायचा तर चिमणीही त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. कधी एक मेकांकडे पाहुन हसत होती तर कधी रडत होती. गतकाळ ते नेहमी आठवत होते. जीवन त्याच आनंदाने जगत होते. कधीतरी एखादे वादळ उठत होते. एकमेकाना त्यांचे भेटने काही काळ बंद होत होते. तरी संकटातुन मार्ग काढत त्यांचे एकमेकांचे भेटने सुरूच होते.
असे करता करता वर्षो उलटली. अचानक प्रेमात वादळ आले परी चिमणीचे लग्न ठरले. त्यामुळे ते जोडपे विभक्त झाले. उरलं आयुष्य जगण्यास राहुन गेले. तरीही धेर्याने ते संकटाना तोंड देत गेले. त्यातच पुन्हा विरहाचा पावसाळयाला सुरुवात झाली. ज्या झुडपांवर त्यानी घरटे बांधन्याची स्वप्न पाहिली होती. दुर्देवाने ते झुडपेच वाहुन गेले. पुन्हा भेटण्याची आस मनातच राहुन गेली. सुधास व परी आता विभक्त झाली. सुधास आजही तिची त्याच जोमाने वाट पाहत आहे. मात्र परी चिमणी आता दुस-याचे घर ठाटते आहे. काय मग ह्यालाच जीवन म्हणावे ? असा प्रश्न मनात घेवुन आस लावुन आजही तो तिची वाट पाहत आहे. तर परी त्याला कधी विसरु ह्याचा ध्यास धरत आहे.मात्र तीला त्याला विसरण येवढ सोप नाही कारण चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही. चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही.

प्रेम हे असेच असते..



एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन
चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून
टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... एके दिवशी जोराचे वादळ
सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत
नव्हता.. चिमणी मात्र..
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मरून
पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये..
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते...
प्रेम हे असेच असते.....♥

फक्त तू

फक्त तू
 जिच्या नावाचं जप करतो ती आहेसं तू.
जिच्या येण्याची वाट बघतो ती आहेसं तू
जिच्या नजरेत हरवून जावसं वाटत ती आहेसं तू
जी माझ्या स्वप्नात येते ती आहेसं तू
फक्त तू आणि तूच

माझ्या मनांतली राणी आहेसं तू
माझें मन जिच्यामुळे चलबिचल होत ती आहेसं तू
अप्सरान मधील अप्सरा आहेसं तू
जीवनातील प्रेमाचं किरण आहेसं तू
फक्त तू आणि तूच

देवा कडे जिचा हांत मागतो ती आहेसं तू
माझ्या घरांमध्ये जिच स्थान बघतो ती आहेसं तू
मित्रांमध्ये जिचा नाव सारखं घ्यावसं वाटत ती आहेसं तू
जिला बघून जगावस वाटत ती आहेसं तू
फक्त तू आणि तूच

कल्पनेतली परीच ती

कल्पनेतली परीच ती
ठाउक नाही कशी ती दिसते
अशी ती असते,
कल्पनेतुनी वास्तवात येई
तशी ती कधीच नसते...

वेळी-अवेळी पाउस पडता
आनंदाने सदैव भिजते
अशी ती असते,
भिजता-भिजता
वाहून जाई
तशी ती कधीच नसते...

मदतीस तयार परांच्या
मेणापरी जळुनी थिजते
अशी ती असते,
थिजता-थिजता
उरुन जाई
तशी ती कधीच नसते...

रात्रीस फुलांच्या कुशीत
चिरनिद्रेस ती निजते
अशी ती असते,
निजता-निजता
स्वप्नात विरून जाई
तशी ती कधीच नसते...

उंच अवकाशी उड़ता
क्षणात काळ्या मातीत रूजते
अशी ती असते,
रुजता-रुजता
उमलणे विसरुनी जाई
तशी ती कधीच नसते...

कल्पनेतली परीच ती
वास्तवात कधीच नसते...
वास्तवात कधीच नसते...

असंच राहू दे ना आपलं नातं

                           असंच राहू दे ना आपलं नातं....
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

                        असंच राहू दे ना आपलं नातं
                   त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

                    आहोत ना एकमेकांसाठी खास
                        मग एकमेकांना घाव नको देऊया!

                   द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
                   कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

             हृदयामध्ये थोडी अशी जागा -
              जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,                                                                                              
              तुझ्या सोबतीने    बसता येईल
                 पण ज्या छळतील आपल्याला
                अशा आठवणींचा गाव नको देऊया,

            असंच राहू दे ना आपलं नातं ,
          त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

                 प्रेमात नेहमी दुःखच असते .
          मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

                         प्रेम आहे न दोघात हे
                       आपल्या नजरेला कळू दे ना

                      असंच राहू दे ना आपलं नातं
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

प़ेम साठवुन ठेवल होत..

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत..

"सचिन-क्रिकेटचा राजा...

२४ एप्रिल ला झाला एकाचा जन्म..
वातावरणही जणू सारे झाले होते दंग...

मुलाच्या त्या आगमनाने
घर सारे खिलले होते...
जणू सारे देवही त्याच्याच आगमनाची
वाट ते पाहत होते...

होता त्याचा जन्म फक्त
एका गोष्टीसाठी...
क्रिकेटला आपण सर्वस्व द्यायचे..
ठरवुनी मनी ते ध्येय आपले तो गाठी...


"सचिन" असे म्हणतो आपण..
आहे तो क्रिकेटचा राजा...
धारधार खेळाने आपुल्या...
वाजवतो तो सर्वांचा बेण्ड बाजा...

नाही भीती त्याला ...
समोर असलेल्या बॉलरची...
करुनी चौकाराची आतषबाजी..
पाहतो पकड आपण त्याच्या खेळाची...

नवोदितानाही खेळात प्रेरणा तो देई..
पाहताना खेळ त्या राजाचा..
मन हि आपले हरपुनी जाई...

आहेत सारे विक्रम खेळातले..
या राजाच्या नावावरती...
धावांचा हि डोंगर पाहता..
भल्या भल्यांचे डोळे फिरती...

क्रिकेटचा बादशहा तू
असाच धावांचा पाउस पडत राहा..
नाही फिकीर वयाची आपल्याला..
राजा तू असाच बहारत राहा...असाच तू बहारत राहा...

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला..........
जेव्हा तू झोपली असशील .........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला.........

जेव्हा तू एकट असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला.........
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला.......

तुला खूप मिस करतो

तुला काय वाटल,तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,तसा काय मी रागावू शकत नाही!!
तुझ्या आठवणीतडोळे माझे नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस, तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!
तू नेहमीच बरोबर होतीस,माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,
कारण.. देव माझ्याशी नेहमीच चांगला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!
लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त
पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही  तुला खूप मिस करतो ..♥♥♥

व्हायचंय मला

आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला ...!!!


तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला ...


बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,
त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला ...


पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला ...


बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला ...


सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला ...


कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला .

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय असतं ते
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली रस्त्यावरच्या प्रेमीयुगुलांना पाहताना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही.

मोबाईलचे विश्व

मोबाईलचे विश्व

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त सळसळायच. क्रांती म्हणजे एखादे युध्द डोळ्यासमोर उभ राहायचं. जसे १८५७ ची क्रांती. मध्यंतरीच्या काळात क्रांतीचा अर्थ थोडा सौम्य झाला. जसे एखाद्या सरकारी धोरणाला विरोध करायचा मोर्चा काढायचा म्हणजे क्रांती झाली असे वाटायला लागायचे. आणि आता त्याचा अर्थ पुर्णच बदलून गेलाय. प्रथम टी.व्ही. च्या क्षेत्रात क्रांती झाली. मग संगणक क्रांती झाली. मग मोबाईल आले. हळू हळू मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. असो. विषय जरा भरकटलाय. क्षमा असावी.

तर आपण मोबाईलच्या क्रांती बद्दल बोलत होतो. तो पूर्वीचा ट्रिंगग ग ग ग ग ग…….चा आवाज झपाट्याने मागे पडला आणि ट्यून सुरु झाल्या आणि मग नवी क्रांती झाली आणि फिल्मी गाणे वाजायला लागले. जो पर्यंत ट्रिंगग ग ग ग ग ग……. होत तो पर्यंत काही वाटत नव्हत. पण जेव्हा ट्यून व गाणे वाजायला लागले तेव्हा मात्र गम्मत व्हायला सुरुवात झाली.

ती कशी असे विचारताय? ऐका तर मग.

एकदा एक मनुष्य एका मयतीत गेला होता. स्मशानात अंतिम क्रिया कर्म सुरु होते. तितक्यात ‘ व्हाय दिस कोलावरी दी’ ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. एका मोबाईलची रिंग टोन होती ती. सर्वी मंडळी त्या आवाजाकडे बघू लागली. दु:खाचे वातावरण अचानक बदलले. पण ती जागा आनंदाची नव्हती म्हणून सर्व गप्प राहिले. कोणी तरी म्हणाल ‘अरे आपण कोठे आलो आहोत याचे तरी भान ठेवत चला जरा.’

झाल आता दुसऱ्याने विषय पुढे रेटून न्यायचे ठरवले आणि म्हणाला,’अहो बिचारा इतक्या दुखात होता की मोबाईल स्वीच ऑफ करायचा विसरला.’

तिसरा कोठे थांबणार होता. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे हो, पण कमीत कमीत साईलेंट मोड वर तरी ठेवावा मोबाईल.’

चौथा इसम मोबाईल वरील रिंग वाजली होती तो होता. तो मनात म्हणाला , अरे बाप रे. ही चर्चा आपण कोठे आहोत याचे भान न ठेवता पुढे सुरुच आहे. शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि म्हणाला, ‘ मी सर्वांची माफी मागतो आणि या पुढे माझ्या मोबाईलवर फक्त ट्रिंगग ग ग ग ग ग……. हीच रिंग टोन राहील याची काळजी घेईल. कृपा करून चर्चा थांबवा.’ तेव्हा सर्व गप्पा बसले. तर मंडळी असे आहे हे आधुनिक मोबाईलचे जग.....



मला आवडायला लागलास.

प्रिय

कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. कारण शेवट कदाचित मला माहीत आहे. आपली फारशी ओळखही नाही अजून. परंतु, तू मला आवडतोस. धक्का बसला ना?यापेक्षा जास्त धक्का मला स्वतः: ला बसला होता, जेव्हा मला हे जाणवलं, की तू मला आवडायला लागलास.

हे कसं झालं, त्याचा शोध मी स्वतः:च घेत आहे. बॉटनीच्या त्या पेपरमध्ये तू केलेली मदत... त्यानंतर वारंवार आपलं भेटणं.. याचा कधी असा परिणाम होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं...

हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण
आता त्याच स्वप्नात तू मला रात्रभर छळतोस.. परवा तर आई म्हणत होती, का गं आज काल जरा जास्त अभ्यास करतेस का? मी म्हटलं का? ती म्हणे आज काल रात्री झोपेत बडबडतेस ती? मला एकदम धस्स झालं. काय बडबडत असेन मी? बापरे तुझं नाव घेत असेल का? आईने ऐकले तर बोंबलंच सारं!

मला तुझ्या बद्दल हे जे काही वाटतं, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला एकवेळ वाटलं, ज्या प्रमाणे मला अमीर खानही आवडतो, तसंच काही हे असेल.. पण नाही मी अमीर खानचा फोटो न पाहता आठवडा काढू शकते, पण मग तू, तू जर कॉलेजमध्ये दिसला नाहीस तर मग मला काय होतं, लेक्चरमध्ये तर लक्षच लागत नाही प्रॅक्टिकलमध्येही गडबड होते. परवा सरांच्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या मी, या कारणांवरून. मी काय करतेय तेच मला कळत नव्हतं. मग मी विचार केला, आणि मला जाणवलं, तू नाही आलास ना आज? म्हणून कदाचित असं होत असेल.

आज तिसरा दिवस आहे, तू भेटला नाहीस.. म्हणून मी चक्क तुला हे पत्र लिहितेय.. (प्लीज अक्षरांना पाहून हसू नकोस) आणि मराठीच्या चुका तर मुळीच काढू नकोस. माझं हे अक्षर असंच आहे, आणि मराठीही.

पण मला असं का होतेय? लक्ष लागत नाही, झोप येत नाही, तुझी नुसती आठवण जरी आली, तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण तू भेटतोसच कुठे आज- काल? आणि कॉलेजला आल्यावरही चटकन निघून जातोस हल्ली. ए काय झालंय तुला? प्लीज कदाचित माझ्याशी हे सारं शेअर केल्यावर तुला बरं वाटेल?