तळोदा तालुक्यातील गुंजाळी शिवारात ऊसतोडणी करीत असतांना मजुरांला बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून या बछड्यांवर नजर ठेवून आहेत.
तळोदा शहरापासून १० किमी. अंतरावरील गुंजाळी गावात योगेश सुभाष शर्मा यांच्या शेतात ऊसतोड सुरु असतांना मजुरांना बिबट्याचे बछडे दिसून आल्याने त्यांनी शेतातूप पळ काढला. यावेळी काही मजुरांनी धाडस दाखवित शेतातून जावून पाहणी केली असता एक महिना वयाचे तीन बिबट्याचे बछडे दिसून आले. सदर घटना मजुरांनी शेत मालकाला कळविली. त्यानंतर शेतमालकाने वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल आर.बी.वायकर, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक शरद मोरे, सचिन वाघ आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऊसतोड थांबवून परिसर मोकळा करण्यात आला. यापूर्वी
असाच शेतात आढळलेल्या बछड्याला वातावरण संतुलन व पोषण आहार यामुळे वाचविण्यात वनविभागाला अपयश आले आहे. त्यामुळे बछड्यांना ताब्यात न घेता मादी येऊन त्यांना घेऊन जाईल, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.. यापूर्वी बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात दि. २४ डिसेंबर रोजी ऊसाची पाचट जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीत १५ दिवसाचे तीन बिबटचे पिल्लू होरपळले होते. त्यापैकी एक बछडे घेऊन जाण्यास मादीला यश आले होते. तर दोनपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक बछडे वनविभागाने ताब्यात घेतले होते. अथक प्रयत्न करूनही त्या पिल्लास वाचवण्यास अपयश आले होते. यावर्षी वनविभागाने केलेल्या प्राणी गणना दरम्यान बिबटचा उल्लेख नाही. मात्र दोन महिन्यात पुन्हा बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने या भागात एकूण बिबट्यांची संख्या किती असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुंजाळी शिवारात आढळले बिबट्याचे तीन बछडे तळोदा तालुक्यातील उमराई येथे ऊस तोडणी दरम्यान एक महिना वयाचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आली. शेतातील ऊस तोड थांबविण्यात आली आहे. त्या बछड्यांवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. . - सचिन रोडे . वनक्षेत्रपाल तळोदा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा