तळोद्यातील प्रभाग क्र.२ च्या नगरसेवकांचा मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईनचा उपक्रम 02
निवडणूक झाली की मतदार आणि उमेदवारांचे नाते संपते असे बऱ्याचदा बोलले जाते. एकदा निवडून आल्यानंतर पुढची निवडणूक येईपर्यंत निवडून आलेला उमेदवार मतदारांपर्यंत कधी पोहचत नाही. मतदारांच्या अडीअडचणी, समस्यांची त्यास काहीही देणे-घेणे अथवा सोयरसुतक नसते अशी चर्चा कायम ऐकण्यास मिळते. मात्र यास अपवाद ठरले आहेत ते तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी. प्रभागातील मतदारांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी स्वत: चा भ्रमणध्वनी क्रमांक हेल्पलाईन म्हणुन जाहीर करून ठिकठिकाणी फलक लावले आहेत. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करून खऱ्या अर्थाने जनसेवक असल्याची प्रचिती दिली आहे.. तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व त्यांचे मित्र संदीप परदेशी व पत्नी नगरसेविका अनिता परदेशी याला अपवाद ठरले आहेत. जनतेने आपणास निवडून दिले आहे. आपण जनतेची सेवा करावी हा जणू चंगच त्यांनी बांधला आहे. निवडणूक सुरू होण्यापूर्वी त्यांनी उमेदवारी करीत असलेल्या प्रभागात स्व खर्चाने मूलभूत सुविधा पुरविल्याने ते चर्चेत आले होते. ठिकठिकाणी भूमिगत गटारी, विजेची सोय, पाण्याची सोय, लहान व वयोवृध्दांना करमणूकीचे साधन म्हणून उद्यान साकारले. निवडणूकीपूर्वी विकासकामे करणारे ते नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव नगरसेवक ठरले. प्रभागातील समस्यांसाठी वेळोवेळी पालिकेत ते आवाज उठवत समस्या मार्गी लावण्यास प्रयत्नशील राहतात. वेळोवेळी प्रभागात फिरून नागरिकांच्या सुख: दुख:त सहभागी होत संवाद साधणे, अडीअडचणीसाठी धावून जात प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रभागातील नागरिकांच्या पालिकेशी संबधित असलेल्या समस्यां जाणून त्यावर उपाययोजना करता यावी याकरिता त्यांनी ठिकठिकाणी वर्दळ असलेल्या १४ ठिकाणी, संपर्क फलक लावून हेल्प लाईन नंबर जाहीर केले आहेत. यामुळे आता मतदारांना हेल्पलाईनवर संपर्क साधून समस्येची मांडणी करणे सोयीचे झाले आहे..
*प्रतिक्रिया*
युवा नगरसेवकांनी राबविलेल्या उपक्रम हा पथदर्शी असून खान्देशात अश्या प्रकारे फलकांवर हेल्पलाईन नं. लावलेले पाहण्यात आले नाहीत. नगरसेवकांचे कर्तव्य बऱ्याचवेळा नगरसेवक विसरतात, निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकत नाहीत, प्रभाग क्र.२ मधील युवा नगरसेवकाची समाजकारणासाठी असलेली धडपड उल्लेखनीय आहे. . -
अमित कलाल.
रहिवासी.
*प्रतिक्रिया*
जनतेने आमच्यावर विश्वास दर्शवत सेवा करण्याची संधी दिली आहे. मागील अनेकवर्षापासून या प्रभागात आवश्यक त्या सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. प्रभागात निवडून आल्यापासून स्व खर्चाने अनेक कामे मार्गी लावले आहेत. अनेकवेळा प्रभागातील नागरिक घरी कार्यालयात व ठिकठिकाणी आमचा शोध घेतात त्याची फिरफिर होऊ नये समस्यां तातडीने मार्गी लागावी याकरिता साधारणतः 15 सार्वजनिक ठिकाणी फलक लावून हेल्पलाईन नो जारी केले आहेत. जनतेने सेवेचा लाभ घ्यावा.
हितेंद्र क्षत्रिय
नगरसेवक न.पा.तळोदा
*प्रतिक्रिया*
सर्वसामान्य जनतेला विज, पाणी व स्वछता या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. सदर समस्यां घर बसल्या तातडीने सुटाव्यात, याकरिता कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडण्याचे प्रयत्न करीत आहोत नागरिकांनी प्राथमिक सुविधा, समस्या, प्रश्न या हेल्प लाईन नंबरवर कळवावे त्वरित सोडविण्यात येतील असे आवाहन केले आहे.
सौ अनिता संदीप परदेशी
नगरसेविका न पा तळोदा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा