Breking News

शनिवार, १५ मार्च, २०१४

काठी येथील राजवाडी होळी

                            ! नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथील राजवाडी होळी!

काठीच्या होळीला आदिवासी समाजात मोठे स्थान आहे.या होळीला राजवाडी होळी असे संबोधले जाते.सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी संस्थान आजही राजवडी होळीसाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील आदिवासींचे कुलदैवत राजाफांटा,गांडा ठाकूर यांनी होलिकोत्सवास प्रारंभ केला. त्यानंतर काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून 1246 पासूनची
ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जलोश्यात साजरी केला जातो. या काळात ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोप- यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करण्यात येते.तसेच शस्त्रपूजन करुण आपले शक्ती प्रदर्शन देखील करता येते
होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह यांच्या सरकारची राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून गादीची माती कपाळाला लावतात. नर्मदा परिसरातील गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून अबालवृद्ध एकत्र येतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली होळी मातेचे भक्त सतीराम महाराज,गोमऱ्या पुजारा यांच्या हस्ते होऊन सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरात भोंगऱ्या मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून येथील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून
येथील हनुमान मंदिर,राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात. मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात काठी संस्थानचे वारस, गावातील पोलिसपाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आदींना मान दिला जातो. तसेच जिल्ह्यातील नामांकित लोकानची देखील प्रामुख्याने उपस्थिती असते. त्यात केंद्रीय मंत्री माणिकरावदादा गावीत,
माजी मंत्री सुरूपसिंगदादा नाईक, पलाक मंत्री नंदुरबार जिल्हा तथा क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री
महा.राज्य पद्माकरजी वळवी, स्थानिक आमदार के.सी.पाडवी, विधान परिषद् आमदार चंद्रकांत रघुवंशी, तलोदा नगरपालीका प्रतोद भरतभाई माळी, फलोत्पादन मंत्री विजयकुमार गावीत,अक्कलकुवा माजी आमदार नरेंद्र पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उदेसिंगदादा पाडवी, सह स्थानिक विविध पक्ष्यांचे अधिकारी व पदाधिकारी काठीची होळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहातात. तसेच मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव हातात तलवार, कुऱ्हाड, भाला, धनुष्यबाण यासह विविध परंपरागत शस्त्रांसह मिरवणुकीत सहभागी होतात. काठीच्या होळीला दांड्याची उंचीचे देखील महत्व लाभले आहे. काठी येथील राजवडी होळीसाठी 70 फूट
चीचा बांबूचा दांडा आणला जातो. तो गाडण्यासाठी  टिकाव किंवा
 पावडीचा वापर न करता नवस फेडणारे म्होरके जागा हाताने कोरतात. त्याच ठिकाणी दांडा
गाडून रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवितात. होळीचा दांडा पूर्वेला झुकल्यास व खाली पडल्यास ते वर्ष सुख-समृद्धीचे जाते, अशी आख्यायिका आहे. होळीच्या दांड्याला जांभूळ, आंब्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हार-कंगन, खजूर, डाळ्यांचा नैवेद्य चढविला जातो. होळी पेटताच क्षणी सर्व मोरबी बाबा ढाण का डोडे हे सर्वजण होळीच्या आजूबाजूला फेर धरून रामढोलच्या तालावर गोल- गोल फिरून नाचतात काठीच्या होळी उत्सवाला लाख ते
दीड लाख आदिवासी बांधव उपस्थित असतात. हा उत्सव पाहण्यासाठी थेट मुंबई, दिल्लीचे नागरिक येतात. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही या ठिकाणी हजेरी लावली होती.ढोलाच्या तालावर रात्रभर साजरी होते होळी हा उत्सव सायंकाळी सुरू होऊन सूर्योदयापर्यंत चालतो. जंगलातून आणलेली लाकडे, गोव- या बांबूभोवती रचतात. सूर्योदयापूर्वी होळी पेटवतात. होळीच्या आधी येणारा हा विशेष बाजार. 10 ते 12 पाड्यांपैकी एका मध्यवर्ती गावात हा बाजार सर्वानुमते भरवतात. प्रत्येक पाड्याचे मुखिया एकत्र येऊन बाजाराचा दिवस ठरवतात. व अश्या आंनद व गुण गौरवाने काठी येथील राजवाडी होळी साजरी करतात


 
 









                                                                                                                                                                                                शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे 
                                                                                                           उपशिक्षक
 न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा


रविवार, २ मार्च, २०१४

माझे अविस्मरणीय क्षण

                                                         माझे अविस्मरणीय क्षण
                               
                                       आमच्या परिसरातील मनाला मोहक करणारी काही क्षण


                                               वाल्हेरी धबधब्याचा निसर्गरम्य वातावरणात

                           
                                          मित्रांशी मोज करताना टिपलेल काही अविस्मरनीय क्षण


निसर्गासारखा नाही रे सोयरा 
गुरू सखा बंधू मायबाप 
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप 
मिटती क्षणात आपोआप


                                                 निसर्गरम्य वातावरणात प्रेमळ मित्रांची साथ

   श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
 क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे


                                                   मित्रांसोभत पोहन्याचा आनंद घेताना



                                     वाल्हेरी येथील नदी ओलांडून शेतकरी निघाला आपल्या घराकडे


                                                   कोसळनारा धबधब्याचा आनंद घेताना


                                              निसर्गरम्य वातावरणात मित्रांसोभत घालवलेले
                                                         कधीही न विसरणारे क्षण

                            मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

                                               
                            मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट...
                    

                                                   मनाला मोहक घालणारे काही दृश्य!!!!!!!

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

शिक्षण महर्षी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांना मानाचा मुजरा

 शिक्षण महर्षी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांना मानाचा मुजरा !
महाभारताचे युद्ध सर्वाना परिचित आहे. या युद्धात पांडवांचा विजय झाला, युद्धानंतर विजयी पांडव अमर राहू शकले नाही. हे अनेकाना कदाचीत माहितही नसावे, स्वर्ग वाटेवर जाणारे पांडव एक एक करुण जमीनीवर कोसळले अनं त्यांचा स्वर्गवास थांबला ठेच लागुन पांचाली द्रोपदी कोसळली, धर्मराज पुढे चालत राहिले भिमाला राहवले गेले नाही, त्याचे प्रेम पाहून उच्चारलेले दोन शब्द ``थोरलाहो'' हिच महाभारत महारचनेची खरी गाथा आहे. द्रोपदीला थोर भाऊ अपेक्षित होता, कारण तो स्वर्गात घेऊन जाऊ शकत होता. मानवी
जीवनातल्या महाभारतात थोरल्याची हजारो वर्षापूर्वी धर्मराज युधिष्ठिरच्या असाच कर्तव्य कठोर वागणूकीने सिद्ध केले घरातली थोरली व्यक्ती कशी असावी, याचे दर्शन त्या व्यक्तीच्या कार्य कुशलता, धीर गंभीर धिरगंभीरता निर्णयक्षमता, प्रेम, स्नेहभाव यावर आधारलेली असते. मागुन मान मीळत नसतो, इतरानी तो स्वतःहुन द्यायचा असतो. स्वर्गवासी बबनराव छगनराव माळी यांच्या घरात थोरल्यारूपी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांची समाज कुटुंब अन सर्वदुर अशीच ख्व्याती आहे. न मागता न बोलता मान असणारा देव
माणुस म्हणून आप्पासाहेबाना मीळवलेली किर्ती, अन जोडलेली माणसे, शब्दात न मोजनारी आहेत. अत्यंत साध्या सरळ स्वभावाच्या आप्पासाहेबांचा वाढदिवस प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा साक्षात् धर्मराज युधिष्टिराचा वाढदिवस म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सबका मालीक एक या तत्वाला मानणारे, सर्व धर्मियांचा आदर करणारे शिक्षण महर्षी माननीय आप्पासाहेब लक्ष्मण बबनराव माळी यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था पी. ई. सोसायटीचे ते गेल्या १३ ते १४ वर्षापासुन अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात ही संस्था मोठ्या वैभवास प्राप्त झाली. आदिवासी भागात शाळा, कॉलेजेसच्या माध्यमातून तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची द्वारे मुक्त केली. पी. ई. सोसायटींच्या शाळेत शिकून असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. याचे श्रेय आप्पासाहेब
लक्ष्मण माळी यांना जाते. मागास भागातील शैक्षणिक संस्थांची अवस्था काय असते ? हे सर्वांना माहित आहे. परंतु आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले. या संस्थेतून ज्ञानाची दिक्षा घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत असा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे संस्थेतील शिक्षक, कर्मचारी वर्ग मोठ्या परीश्रमाने संस्थेच्या नांव लौकीकात भर घालत आहे. कमी बोला व जास्त ऐका या संतांच्या शिकवणी प्रमाणे आप्पासाहेबांचे बोलणे कमी असते परंतु आपल्या बोलण्यातून योग्य तो संदेश देण्याची कला त्यांच्यात आहे. त्यामुळे पी. ई. सोसायटी सारख्या मोठ्या संस्थेचा कारभार ते समर्थपणे चालवत आहेत. तळोदा, अक्कलकुवा, खापर, प्रतापपुर, बोरद या परीसरातील जनतेसाठी आप्पासाहेबांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत. जेणेकरून या परीसरातील मुले शिकून सवरून मोठे होतील. आणि आपला विकास करतील. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आप्पासाहेबांचे कार्य सुरू आहे. पिताश्री स्व. बबनराव माळी (पहेलवान) व आई विमलताई माळी यांच्या आशिर्वादाने आप्पासाहेबांनी हे यश मिळविले आहे. लहान बंधू भरतभाई माळी व संजय माळी यांची त्यांना साथ मिळाल्याने आप्पासाहेबांनी कधी
मागे वळून पाहिले नाही. आप्पासाहेबांचे लहान बंधू भरतभाई माळी हे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते तळोदा पालीकेचे गट नेते व माजी नगराध्यक्ष आहेत. दुसरे बंधू संजय माळी हे नगरसेवक असून गणेश सोशल गु्रपच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य चालते. स्व. बबनराव पहेलवान यांच्या निधनानंतर सार्या कुटूंबाला आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांनी आधार दिला. वटवृक्षासारखी मायेची सावली दिली. सतत कार्य मग्न राहणे हा आप्पा साहेबांचा स्वभाव आहे. कामात असले तरी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे लक्ष असते. शैक्षणिक संस्थेचा व्याप त्यांच्या मागे असला तरी ते घरच्या शेतीत चांगलेच रमतात. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून चांगले उत्पन्न काढल्यामुळे त्यांचा प्रगतीशील शेतकरी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आप्पा साहेबांना त्यांच्या पत्नी सौ. शारदाबाई यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांच्या स्नुषा सौ. योजनाताई भरत माळी ह्या तळोदा नगरपालीकेच्या नगराध्यक्षा आहेत. आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांचे तीनही चिरंजीव शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. आप्पासाहेबांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दिपस्तंभा सारखे आहे. अशा मार्गदर्शक नेतृत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो !
हीच सदिच्छा !
                                                                                                   
                                                                                    
                                                                                                  शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                                      उपशिक्षक
                                                                                 न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा                                                                                                                                                                    

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

तलोदा झाले जलमय


तलोदा झाले जलमय 38 तासापासुन संतत धारा सुरु तलोदा तालुक्यातील खरडी नदी तुम्ब भरुन वाहते आहे. नदीचे पाणी शेजारी अशलेला मातंग चौक,मराठा चौक, कालिका देवी गल्ली,पाडवी हट्टी इत्यादी ठीकानातील रहवासियाना मोठ्या प्रमाणात नुक्सनिला सामोरे जावे लागले आहे.घरा घरात पाणी शिरले आहे. मोठ्या प्रमाणात लोक उघड्यावर आले आहेत. तशेच तलोदयात ठीक ठीकाणी अशी परस्तिथि ऊदभवली आहे.
कॉलेज रोड वरील सर्वच घरात व् दुकनित पाणी शिरले आहे. त्यात जैन लोकांचे कपड्यांचे दुकान तशेच चंदुलाल ठाकुरसिंह जैन यांचे दुकानाणी स्विमिंग पुलचे रुप घेतले आहे. त्यात जीवन कलाल ह्यांचा धान्याचा गोदामत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तशेच जनतेची सरक्षक भिंत मानले जाणारे पोलिस ह्यांची कॉलोनी देखिल पाण्यात बुडाली असून आसपासचे रहदारीचे मार्ग बंद झाले आहे. गौतम जैनचा घरा पासून तर कॉलेज पावेतो पुर स्तिथी निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध अशलेली होटल मराठाचा तळ मजला पाण्यात बुडाला आहे. बोम्बे झेरोक्स मधे देखील पाणी पोहचले आहे. तशेच बस स्टैंड वरुण 1 ही बस ये जा करू शकत नाही अशी परस्थिथि निर्माण झाली आहे. खरडी नदीचे पाणी गोरया मारूती मंदिरा पासून थेट विध्यानगरीत पोहचले आहे. व् त्यामुले तेथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालोदयातिल उपजिल्हा रुग्णालयाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले त्यात सिस्टर डॉक्टर्स व रुग्ण ह्याना बसन्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्याने त्याना सिटिंग चैर तशेच बाकावर्ती उभे राहून रुग्णाची तपासणी करावी लागली त्यात खुश्गवन येथील सरस्वती पाडवी हीची डबल बेड म्हणजेच एका पलंगा वरती एक पलंग ठेउन त्याची ऊँची वाढवून प्रसुती करण्यात आली त्या स्त्रीने मुलाला जन्म दीला असून डॉ संतोष परमार नामदेव महाले फुलारी सिस्टर आर कलाल l.b.वसावे तुकाराम बहिरम ह्यांचा मदतीने ही प्रसुती करण्यात आली.                 http://www.youtube.com/watch?v=OiR9Pcn7ntI
अश्याच प्रकारे ठीक ठिकाणी लोकांचे हाल झाले मा.प्रान्ताधिकारी अनिल भंडारी ह्यांचा घरात देखील पाणी शिरले व तालोद्यातिल आप्पती व्यवस्थापनेचे प्रमुख न्यायब तहसीलदार श्री मराठे साहेब त्वरित प्रान्ताधिकरिचा घरी पोहचले व् आपल्या व्यवस्थापनेचे कार्य पार पाडू लागले. पावसामुले सकाळ पासून लाइट नसल्याने सर्वच वायर्मन व् अभियंता आपापल्या कामत व्यस्त होते त्यात श्री. जयंतीलाल शिरसाठ हे विध्यानगरीतील विजेचा खामावरती काम करत असताना पाउसामुले त्यांचा पाय निसरला व् ते जमीनीवर पडले त्याना जबर मार बसला तसेच त्याना त्वरीत उपजिल्हा रुग्णालय तलोदा येथे एडमिट करण्यात आले मात्र काही कालावधीतयात त्यांचा मृत्यु झाला....... 23-9-2013तलोदयात संततधारा सुरुच काल व् आज मिळून 15 इंच पाण्याची नोंद तब्बल आज पावेतो 57 इंच पाण्याची नोंद झाली आहे. तलोदेकर पावसाने हैरान लाखोचे नुकसान शेकडो एकर शेती पाण्यात अनेक कुटुंब आले रस्त्यावर मातंग चौकातील लुका आहिरे ह्यांचा शेजारील घर अतिवृष्टी मुले कोसडले. तसेच गावात देखील zerox दुकानातील zerox मशीन टाइपिंग मशीन संगणक आदी इलेक्ट्रोनिक वस्तु मधे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुक्सनिचा आकड़ा बाहेर येण्याचे कडते. भवर नदीने घेतले रूद्र रूप 2 तासापेक्षा अधिक वेळ ट्रफिक जाम पोलिसांचा मदतीने ट्रफिक सुव्यवस्थित ...

भवर नदीचा पुला ख़ाली झाडे झुड्पे अडकल्याने नदीने रूद्र रूप घेतले तेच पाणी शेतात व् बायपास पावेतो आल्याने रहदारी थांबली व् मोठ्या प्रमाणात ट्राफिक जमा झाली..... खरडी नदीने आज ही पुलाचा वरून वाहून आपले रूद्र रूप कायम ठेवले त्यात सकाळी किराणा दुकानावर खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रिया लोहार व् तीची लहान बहीन गायत्री लोहार वय 8 व 9 वर्ष ह्या दोघे ही घरी जात असताना अचानक प्रियाचा पाय घसरला व ती खरडी नदी जवळ असलेल्या अवधूत सोनार ह्यांचा घरा समोरील गटारित पाय निसटल्याने त्या गटारित जाऊन पडले त्याना स्थानीक लोकानी त्वरित बाहेर काढले व् त्यांचा जीव वाचवला.... शहादा रस्त्या वरील राजु गुरव ह्यांचा घरा समोरील असलेल्या पुलात प्रभाकर हशरथ माली हा तरुण पाण्यात वाहून गेला त्याला स्थानीक लोकानी 200 मी. पवेतो पोहुन त्याला गाठले व् त्याला बाहेर काढले त्यात भरत वलव़ी सुरेश पाडवी हंसराज राजकुले निलेश सूर्यवंशी सोन्या वलवी ह्यानी त्याचा जीव वाचवला व त्वरित त्याला उप जिल्हा रुग्णालय तलोदा येथे हलवण्यात आले त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवन्यात आले. 24-9-2013 तलोदा
तालुक्यात सोजरबार व गोर्यामाड ह्यांचा मध्यभागी
असलेली देवअंबा नदी जवळील राहणारे अतीदुर्गम भागातील वस्तीतील ऐका घरा वरती सतत होणार्या पाउसमुळे दरी कोसडली त्यात ऐकाचा मृत्यु झाला असून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत तर 8 लोकांचा अद्यापही शोध लागलेला नाही हे. ह्या वरून सविस्तर वृत असे की दामा कागड़ा पाडवी हा पत्नी सुगराबाई 30 मुलगा विक्रम व मुलगी शर्मीला वळव़ी ह्यां त्याचा कुंटूबा सोबत सोजरबार ह्या गावी राहत होता. व त्याचा कड़े काही पाहुने मंडळी आली होती. त्यानी रात्री 11 वाजेचा सुमारास जेवण केले व गप्पा गोष्टी करून झोपी गेले मात्र मध्य रात्री 3 वजेचा सुमारास अचानक वरुण दरी कोसळल्याने विक्रम दामा वळव़ी (2) हा जागीच मृत्यु पावला त्या नंतर सकाळी सदर घटना शेजारी राहणारया इसमाने पाहीली व् त्या दरी ख़ाली अळकलेल्या लोकाना स्थानीक लोकांचा मदतीने काढन्याचा प्रयत्न केला. त्यात त्याना सुगराबाई दामा वळवी वय 30 ही स्त्री जख्मी अवस्थेत आढडली तसेच निमजी मादया वळव़ी हा देखील जख्मी अवस्थेत सापडला ह्यानी घडलेल्या घटनेचे वर्णन थोडक्यात केले त्यात अनेक लोक बेपता असल्याचे समजले त्यात दामा कागड़ा वळव़ी वय 35 शर्मीला दामा वळव़ी वय 5 आलेले पाहुने निमजी मादया वळव़ी वय 25 रमिला निमजी वळव़ी वय 22 इंदुबाई सोगदा वसावे वय 40 व इतर 4 बेपता असल्याची माहिती दामा वळवी ह्यांचा लहान भाऊ सार्या वळव़ी ह्यांचा कडून प्राप्त झाली...... सदर घटना ही अती दुर्गम भागात घडली असून तेथे दळण वळणाच्या सोयी नसल्याने ही उशीरा तलोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्वरीत पोलिसानी घटना स्थळी धाव घेतली...............

रोकड़मान हनुमान

तळोदयातील जागृत देवस्थान रोकड़मान हनुमान  एकेकाळी घनदाट वृक्षानी व वनराईने नटलेल्या सातपुडयाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या तळोदे शहरापासून एक (1) कि.मी. अंतरावर जवळच उत्तर दिशेला बर्‍हाणपूर अंकलेश्वर अंतरराष्टीय महामार्गावर मोठमोठ्या
वटवृक्षाच्या छायेत पुरातन काळापासून दक्षिण मुखी असलेल्या नवसाला पावणारा जागृत देवस्थान म्हणून शहरात व तालुक्यात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या रोकडमन हनुमान मंदिराचे आगळे वेगळे महत्त्व आहे. तळोदे शहरातील जुनी जानकार मंडळी यांच्या सांगन्यावरून पूर्वी त्या भागात गवळण गवांची वस्ती त्या परिसरात होती. त्या वेळेपासूनच तेथे रोकड़मन हनुमानजीचे एक छोटेसे पुरातन मंदिर उभे आहे. मंदिराच्या शेजारी चौथेर्यावर पुरातन काळापासून काल भैरवाचे मंदिर आहे. अनेक दिवसापासून मंदिर जिर्ण अवस्थेत होते. तळोदे शहरातील व परिसरातील सर्व लहान थोर हनुमान भक्त व भाविकानी भावनेने मदत करुन निधी उभारून वस्तु स्वरूपात पत्रे, लाकूड ,सीमेंट,कलर, स्टाइल बागडे देऊन जीर्णोधार केला मंदिर उभारून पत्र्याचे शेड तारेचे कुंपण घातले गेले. सालाबादा प्रमानेआहे दर वर्षी तळोदयातील दानशूर व्यक्ती कडून भंडार्याचा कार्यक्रम होतो रामनवमीला दिवसभर रामधुन हनुमान जयंतीला भजनी मंडळीचा कार्यक्रम रात्र भर चालू राहतो व मोठ्या प्रमाणावर भंडाराचा कार्यक्रम होतो. तसेच विजया दशमीला सिमा उल्लंघनासाठी मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात. त्यावेळी त्याठिकाणी यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. आपल्या मनातील इच्छा आकांशा पूर्ण करण्यासाठी गुजरात व महाराष्ट्र येथून दुरदूरचे भाविक येतात. नवसाला पावणारा व मनोकामना पूर्ण करणारा म्हणून दक्षिण मुखी हनुमान रायाची ख्व्याती आहे.

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

मा.श्री भरत भाई माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लोकमान्य लोकनेता भरतभाई!
‘पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती.

कुस्ती हा येथील शहरवासियांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे तळोद्याचा लोकांना ‘पकड’पासून ‘धोबीपछाड’पर्यंत सर्व डाव माहित होते. परंतु आता ती कुस्ती राहिली नाही. अन् तिचे ते वैभवही राहिले नाही. पहेलवान गेले अन् त्यांचे लंगोट रोहिले, अशी परिस्थिती आहे. शंभर जोर मारु शकत नाही ते आता तालिमींचे अध्यक्ष आहेत. असू द्या आपल्याला काय त्याचे. कुस्तीचक फड तळोद्यात होत नसले तरी त्याची जागा आता राजकीय आखाडे रंगु लागले आहेत. काटेदार मुकाबला ऐवजी रंगतदार निवडणुका होत आहेत. तळोद्याच्या राजकीय आखाड्यात उतरण्याचा मोह खुद्द माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना सुध्दा आवरता आला नाही. तळोद्याच्या मातीचीच किमया अशी आहे. तळोद्याच्या राजकीय रिंगणात असंख्य रथीमहारथी आले अनं गेले. परंतु तळोदा शहर वासियांचे इमान एकाच व्यक्तीशी कायमचे बांधले गेले. ते म्हणजे लोकमान्य युवा नेतृत्व भरतभाई बबनराव माळी यांच्याशी. जनतेने नगरपालिकेच्या माध्यमातून तळोद्याच्या विकासाची ढाल व गदा भरतभाईंना मोठ्या विश्‍वासाने सोपविली. लोकांच्या विश्‍वासाला तडा न देता भरतभाई माळींनी तळोदा शहराचा जो विकास केला आहे त्याला तोड नाही. विकास अनं प्रगतीचा ध्यास असलेला असा नेता आमच्या पाहण्यात नाही. आज तळोदा शहराचे भाग्यविधाते, विकासपुरुष मा.श्री.भरतभाई माळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. भरतभाईंचे अभीष्टचिंतन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तळोद्यात त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होईल.
यानिश्‍चित या शब्द शुभेच्छा! वयाच्या २४ व्या वर्षी ते तळोदापालिकेचे नगराध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षाचा मान भरतभाईंना मिळाला. सन १९९० सालापासून त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही. सार्वजनिक जिवनात असंख्य पदे भुषविली. लोकांची कामे केली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तळोदा पिपल्स एज्युकेशन संस्थेचे संचालक, माळी समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष, तळोदा न.पा.चे प्रतोद आदी पदांच्या माध्यमातून भरतभाईंनी जनसेवा केली आहे. भरतभाईंचा राजकीय प्रवास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे. तळोदा पालिकेत वर्षानुवर्षे असलेली त्यांची सत्ता विरोधकांच्या नजरेत खुपत होती. भरतभाईंचे यश अनेकांना सलत होते. राजकीय पोटदुखी सुरु झाली. अशातच तळोदा पालिकेत सत्तांतराचा प्रयत्न झाला. सर्व विरोधकांची अभ्रद युती झाली. परंतु भरतभाई सर्वांना पुरुन उरले. पुन्हा गमावलेले स्वराज्य त्यांनी प्रयत्नाने मिळविले. या प्रयोगानंतर स्वराज्यावर घाला घालण्यासाठी आलेल्या शाहिस्तेखानची पुरती बोटे छाटली गेली.  भरतभाईंच्या या प्रसंगात शांत, संयमी,धिरोदत्त, लढावूवृत्तीचे दर्शन झाले. भरतभाई हे चाणाक्ष नेते असून त्यांच्यात राजकीय संधी ओळखण्याची मोठी खुबी आहे. तळोदा शहराच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करायची नाही, अशी त्यांची वृत्ती आहे. वेळप्रसंगी स्व.पक्षीयांशी झगडावे लागले तरी ते मागे हटणार नाहीत, असा त्यांचा स्वभाव आहे. भरतभाईंकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ.योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पसाहेब लक्ष्मण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे.

बंधू संजय माळी हे नगरसेवक असून त्यांची साथ भरतभाईंना नेहमी असते. तळोदा शहराच्या विकासासाठी भरतभाई नेहमीच झिजले. पालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभिकरण केले. रस्त्यांवर भव्य हायमस्ट लावले. वार्डा-वार्डात रस्ते केले. ड्रेनेज लाईन, गटारी बांधल्या. शहराला विकास निधी मिळावा. यासाठी मंत्रालयातून निधी मंजूर करुन आणला. जलशुध्दीकरण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेस पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, केंद्रिय राज्यामंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने भरतभाईंनी मंजुरी मिळवून घेतली. या योजनेमुळे शहराला २४ तास शुध्द पाणी मिळू शकेल. भरतभाई माळी हे अजब रसायन आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये रमणारा हा सर्वप्रिय नेता आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांचा सारा दिवस जातो. भरतभाईंचे नेतृत्व आता तळोदा शहर, तालुका ते व्हाया नंदुरबार जिल्हा असे सर्वदूर झाले आहे. जिल्ह्यातील नामांकीत नेत्यांमध्ये त्यांचा समावेश मोठ्या गौरवाने होतो आहे. भरतभाई माळीयांचे नेतृत्व स्वःकर्तृत्वावर पुढे आले आहे. कोणीही गॉडफादर शिवाय ते राजकारणात यशस्वी झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. लोकांच्या आशिर्वादाने स्वतःचा शिक्का निर्माण करणार्‍या लोकमान्य लोकनेते भरतभाई माळी यांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!                     
                                                                                                                                    
                                                                                           
                                                                               शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                                  उपशिक्षक
                                                                               न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा             

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

वैभवशाली तळोदे

          
                * वैभवशाली, समृध्द तळोदे शहर! *


 उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. 


         
श्री कालिका मातेचा प्रसिध्द यात्रोत्सव 
 तळोदे शहराच्या पश्‍चिमेस खर्डी नदिच्या किनार्‍यावर  कालिका मातेचे मंदिर आहे. मनोकामना व नवस पुर्ण करणारी मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. अक्षय तृतियेला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत हजारो भाविक येतात. 
यात्रेत बैल गाडी, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात. 

                                                     दशावताराची समृध्द परंपरा

सुमारे दिडशे वर्षांपासून भवानी मातेच्या दशावताराची समृध्द परंपरा शहराला लाभली आहे. या उत्सवाची सुरुवात कार्तिकी एकादशी पासून सुरु होते. यात राम, हनुमान, श्रीगणेश, देवी, देवतांचे मुखवटे घालून उत्सव केला जातो. या उत्सवाला पाहण्यासाठी दुरदुरहून भाविक येतात. 


अस्तंबा ऋषिची प्रसिध्द यात्रा
  सातपुड्याचा निसर्गरम्य दर्‍याखोर्‍यातून अस्तंबा ऋषिच्या यात्रेला प्रारंभ होतो. ही यात्रा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या यात्रेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. महाभारतकालीन अश्‍वस्थामा याचे संदर्भ या यात्रेशी असल्याने मोठी पवित्र यात्रा मानली जाते. दिपावलीच्या अगोदर यात्रेला सुरुवात होते. मोठा रोमांचक अनुभव लोकांचा आहे. तळोद्याहून सलग चार दिवसाचा प्रवास आहे. अस्तंबा शिखर हे मोठे पवित्रस्थान मानले जाते. आदिवासी बांधव या यात्रेनिमित्त उपवास ठेवतात.





खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका 

खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका तळोदा न.पा.ला मानले जाते.
या पालिकेची स्थापना सन १८६७ साली झाली. त्यावेळी पालिकेचा कारभार एकाच खोलित चालत होता. आता मोठा विस्तार झाला आहे. तळोदा पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष गोविंद दिनूराम राठोड हे होते. आतापर्यंत २३ नगराध्यक्ष झालेले आहेत. भरत बबनराव माळी ५ वेळा, धजा चुनिलाल माळी व गुलाल बुलाखी माळी यांनी २ वेळा नगराध्यक्ष पद भुषविले आहे. विद्यमान नगराध्यक्षा सौ. योजनाताई भरत माळी या आहेत.

रावलापाणीचा प्रेरणादायी स्वातंत्र्य संग्राम 

 संतश्री गुलाम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सातपुड्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपुर्व काळात मोठ्याप्रमाणात जागृत झाला होता. १९४२ चा चलेजाव आंदोलनापुर्वी संत गुलाम महाराजांनी या परिसरात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती. त्यातुनच आदिवासी बांधव स्वातंत्र्यासाठी संघटीत होवू लागला. २ मार्च १९४३ रोजी तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरातील निझरा नाल्यात इंग्रजानी आदिवासी बांधवांवर बेछूट गोळीबार केला. त्यात १५ आदिवासी बांधव शहिद झाले. यात ५ बालकांचा समावेश होता. तर २८ जण जखमी झाले होते. इंग्रजानी केलेल्या गोळीबाराच्या खुणा आजही त्या जंगलात आढळतात. आदिवासी स्वातंत्र्यविरांनी केलेले हे बलिदान प्रेरणादायी आहे. 


आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव 

 आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव विशेष प्रसिध्द आहे. या उत्सवात आदिवासी बांधवांकडून केले जाणारे दिंडल नृत्य सर्वांना परिचीत आहे. होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा आहे. यानिमित्त विविध वेषभुशा करणे, उपवास, पुजा-अर्चा केले जातात.
                                                                               
                                                                                                शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                           उपशिक्षक
                                                                               न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा