Breking News

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

कानबाई

कानबाई
खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो. विखुरलेला परिवाराला
 एकत्र आणने हे या उत्सवाचे वैशिष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ, शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण, उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो. खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या कानबाई मातेच्या श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतरच्या पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो. पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले. त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला. खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात. म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले. असावे अशी समज आहे. कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो. मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात. कानबाईच्या आगमनापुर्वी घराला  रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ  केली जातात. पडदे, चादरी,
बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. परिसर घर। स्वच्छ करुण घरात गोमुत्र शिंपड्तात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य असते. कानबाईच्या सजावटीत साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते.
कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. 'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक .नदीवरुन पाणी
 आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता दोंडायचा जवळ असलेल्या खेड्यात नारळ परनले जाते. तर चाळीस गावा जवळ खेड गावात देखील कानबाई परनन्याचे कार्य केले जाते. कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. . आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची    
स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. मनोरंजन म्हणून मोठ्या प्रमाणात सट्टा व पत्त्याचा खेळ पुरुष मंडळी रात्रभर खेळत असते.तर स्त्रिया रात्री जागरण करुण फुगड्या, गरबे, व विविध पारंपारीक नृत्य
करतात तसेच कानबाई मातेचे गाणी म्हटली जातात. काही परिवारात फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात.
गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही. नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा
 वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसर्या दिवशी नि तिसर्या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं .रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणी
सुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. अहिराणी भाषिक कुटुंबीयांचा हा आवडता सण मानला जातो. या सणात रोजचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्ती खाऊ शकते. कानुबाईचे विसर्जन दुसर्या दिवशी वाजत- गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा
 लुगडि परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. ‘कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट’ अशा प्रकारे भान हरपत, गाणे गात-गात भरल्या अंत:करणाने कानुबाईचे विसर्जन नदीत केले जाते. खान्देशात सर्वत्र कानबाई हां सण जल्लोश्यात साजरी केला जातो. कानबाई हां सण कुटुंब एकत्रिकरणाचे प्रतिक मानला जातो. बाहेर गावी गेलेले कुटुंब या उत्सवाने एकत्रित येतात....
















शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

नागपंचमी

हिन्दु धर्मात देव देवतांची परंपरा चालत आली आहे.
हिंदु धर्मात महादेवाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
तर महादेवाच्या साथीदार नाग देवताला देखील सर्वत्र पुजली जाण्याची रक प्रथाच आहे. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवद्य दाखवला जातो. या सणाल विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे.. नागपंचमी साठी वेदकालापासून अनेक प्रथा आहे. त्यांपैकी एक कथा..सत्येश्वपरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्व र हा तिचा भाऊ होता. सत्येश्वीराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात
 सत्येश्ववरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्ववरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.. तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सन आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तुम्ही हि आनंदाने हा सण साजरा करा. http://sudhaspari.blogspot.in/ ह्या ऑनलाईन ब्लॉगवर वाचकांना आमच्या संपूर्ण टीम तर्फे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा....

ती


ती 
पहिल्यांदा कधी जवळ आलो कधी येवढी जवळीकता
वाढली नाहीच आठवत, कधी तिची ओढ़ मनाला लागली हे ही नाही आठवत, मोठे होता होता तिच्यासोबत माझी किती तरी स्वप्न मोठी झाली, किती इच्छा तरुण झाल्यात, आठवण येतात
तिच्या सोबत घालवलेले प्रेमाचे ते क्षण आज तीच
मला अर्धवट जीवन जगण्यास सोडुन गेली. मला नाकारून पुढे सरसावत गेली, मग तरी का येते आजही तिची आठवण का येतात डोळयात अश्रु ?  ज़रा मनात जावुन डोकावुन पाहिले तर तिच्या वरचे प्रेम आजही तेवढेच आहे. तिच्या वरचा विश्वास स्नेह आजही प्रफुलीत आहे. मन कितीही रडले, तीने कितीही धोका दिला तरी आजही मन का तिला माफ़ करते ? हां ही एक गंभीर प्रश्नच आहे. तिला विसरणे ह्या जन्मात तरी शक्य नाही. पुढचा जन्म घेण्याची उत्सुकता फक्त तिच्यासाठीच आहे. नाहीतर माझे जीवनच  बेकार आहे ...

मंगळवार, २९ जुलै, २०१४

मी तुझ्यावर प्रेम करतो

मी तुझ्यावर प्रेम करतो
ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस, कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते, तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते. नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून, तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन? हे असं होण शक्य तरी कसं आहे, नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे. मी म्हणालो,..... अगं वेडे... क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो. अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते, तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते. येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो, तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो. तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो, तुला लगते ठेच तिथे अन् पाय   माझा रक्ताळतो. तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो, मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:

चातकासारखी वाट पाहतेय मी

चातकासारखी वाट पाहतेय मी धुंद पावसाल्साळयासारखा एकदाच ये तू .
प्रेमाची धुंदी हवीय सारी, तो कैफ जुना पुन्हा एकदा चढवायला ये तू
सात जन्मच प्रेम माझ हक्काच, या एकाच जन्मात भरभरून द्यायला ये तू. 
प्राजक्त फुललाय फांदीवर ह्या सुगंधाच दान पदरात त्याच्या टाकायला ये तू .
बाग हि बह्र्लीय अशी थंडीतही दाणा हिच्या कणसाचा घ्यायला
ये  तू .
सुगंधाच काय घेऊन बसलास? बहर सारा तुझाच आहे,तो लुटायला ये तू
दोघांचा आहे प्रवास सगळा पावल माझ्या पावलांशी जुळवायला
ये तू .
माझा शब्दन शब्द तुझाच आहे, कविता आहे तुझ्याचसाठी,हि वाचायला ये तू .

तू ही पावसासारखीच...

हळूच येतेस,आणि तुला वाटेल तेव्हा निघून जातेस, कधीतरी तुझी वाट पाहायला लावतेस, आणि कधीतरी माझ्या आधीच तिथे पोहचतेस, खरच तू ही चक्क पावसा सारखीच.............. कधीतरी तुझ्या रेशमी केसात, फेसाळलेला धबधबा दिसतो, तर कधी तुझ्या डोळ्यात कडाडती वीज, कधीतरी तू खूप जवळ हवीशी वाटतेस, तर कधीतरी तुझी खूप येते कीव. खरच तू ही चक्क पावसासारखीच........ कशीही असलीस तरी तू अशीच बरसत रहावीस क्षणोक्षण, कधी ना तुटावे तुझे नि माझे रणानुबंध... आयुष्यभर आपण ज्याची वाट पाहतो, तो कधीतरी येतोच आपल्यापाशी....... हाच तर तो पाउस, आणि तू ही चक्क त्या पावसासारखीच.........

चिमना चिमणी

 चिमना चिमणी
एक होता चिमना आणि एक होती चिमणी चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार तरीही
एकमेकांचे जिवलग यार. वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे, एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे . चिमण्याच्या मनात एक खुलत होते गुपित, चिमणी बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत रोज रोज करे देवाकडे प्रार्थना , तीच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना एक दिवस धीर करून त्याने सगळे सांगितले पण तिने त्याला अगदी सहज नाकारलं तिला म्हणे असे काहीच वाटत नव्हते, तिच्या डोळ्यात प्रेम आहे हे ही अगदी झूठ होते का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली पण चिमण्याच्या मनाला ती अजिबात नाही भावलीचिमणा तिचा समोर खुप रडला , काय करावे कळेना,रडू त्याच्याने आवरेना. चिमण्याला एक उपाय सुचला , त्याने चीमणीशी अबोला धरला चिमणीला मात्र ह्याचा
 फरक पडला प्रेम नको पण मैत्री
चिमणीला मात्र ह्याचा फरक पडला प्रेम नको पण मैत्री हवी म्हणत चिमणी त्याचाकड़े आली.. चिमणा अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले . तिला त्याच्यावरचे प्रेम खुप उशिरा जाणवले. आता उशीर झाला होता चिमणीला पाहायला दुसरा एक चिमणा आला होता. चिमणाचे चिमणीवर अगदी खरे प्रेम होते पण कदाचित खरे प्रेम चिमणीच्या नशिबी नव्हते....










रविवार, २७ जुलै, २०१४

भटकंती

भ्रमंती 

सकाळी सकाळी मोबाईल बोंबलला नियमित रोजच्या वेळेवर आजही उठलो. आज तसा वार शनिवार, शाळेत जावुन ड्युटी बजावणे महत्वाचे होते.मात्र दिवस ढगानी भरगच्च भरलेला होता. व त्या ढगाचा परिणाम माझ्या वर ही झाला होता. माझा ही दिवस आकाशात भर गच्च भरलेल्या ढगा प्रमाणेच, माझा आजचा दिवस भरगच्च भरुनच उजाडला. मन कासावीस झाले होते. जुन्या आठवणी सतावत होत्या, मित्र, प्रेम, जुन्या आठवणी   ह्यातुन  मन बैचेन झाले होते, काही काम हाती घेवुन योग्य मार्गावर लागेल असे वाटत नव्हते. नेमके काय करावे ते सुचत नव्हते. त्यातुन मनात एक विचार आला. आज शाळेत न जाता मित्रा सोबत भटकंतीला जावे. व त्या विचाराने मी दिवसाची सुरवात केली. त्यातच एका मित्राने whatsapp वर
 (टाकली) येथील फोटो असतील तर पाठव असा
 message केला. टाकली हे नावाच प्रथमदा ऐकत होतो. मी टाकली बद्दल माहिती मिळवन्याचा प्रयत्न केला. तेथे सुंदर धबधबे असल्याची माहिती एका मित्राने दिली. तलोदा परिसरातील प्रतापपुर गावापासून 8 ते 10 km अंतरावर टाकली गाव आहे. जे सातपुड्याच्या पायथ्याशी असुन गावालगत सुंदरशी नदी वाहते उंचीवरून कोसळणारे धबधबे मनाला मोहित करतात अशी माहिती मित्राने दिली. मनात ह्या परिसराला भेट देण्याची उत्सुकता अजुन तीव्र झाली. एका बालमित्राला सारंग शेंडे ह्याला रिंग केली. व ह्या परिसराबातीत अधिक माहिती मिळवण्यास सांगितली. (सारंग शेंडे हां प्रतापपुर शाळेत शिक्षक आहे.) व तु घरी न येता आम्ही तुला बाईक वर पिकउप करतो अशी सुचना केली. तो ही तयार झाला. त्यानंतर इतर मित्रांच्या भेटी घेवुन त्यांना वेळेवर निसर्गरम्य परिसराच्या भटकंती साठी तयार केले. तलोदा महाविद्यालयात एकत्रित व्हायचे असे ठरवले. महाविद्यालयात येवुन जुन्या आठवणी पुन्हा स्मरण होवु लागल्या. आमच्या समोरच मित्र मैत्रिणीचा एक ग्रुप बसला होता. आम्हाला त्याच्यात मिसळावे खिद्खिद्त मौज मस्ती करावे. क्लासला जावुन बसुन मागे बसुन कुणाला तरी चीडवणे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणे. मात्र आता ह्या पासुन आम्ही वंचित आहोत अशी जागरूकता लगेचच आम्हला
आली. मी माझ्या सोबत माझा बेस्ट फ्रेंड राठोड, लक्ष्मण गुरव, मनोज गुरव, विक्की गुरव आदी मित्रांसोबत दुपारच्या वेळी राणीपुर गाठले. तेथे पोहचल्या नंतर निराशाच हाती आली. टाकली ह्या गावात नदी व तलावा शिवाय पाहण्या सारखे काहीच नसल्याची माहिती स्थानिक रहवाशीनी दिली. आम्ही निराश झालो वापस घराकड़े पलायन करावे की त्या परिसराकड़े, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली. मात्र मी ठाम निर्णय घेतला होता आजचा दिवस मित्रांसोबत घालवायचा म्हणुन, आम्ही सर्वानी आमच्या आवडत्या क्षेत्राला पुन्हा भेट द्यावी. सर्वच राज़ी झाले. राणीपुरहुन कुंडलेश्वर हे श्रधास्थान 17 km असल्याची माहिती स्थानिकानी दिली. त्यातच रस्त्यावरच वाल्हेरी हे गाव लागणार होते. आम्हाला ह्याची खुप उत्सुकता लागली. आम्ही जलोश्यात बाईक हाकत व मौज करत प्रवासाला निघालो. आजुबाजुला उंच उंच डोंगर, मधुन जाणारा लांब सडक नागमोडी रस्ता, परिसरात शेतात काम करणारे शेतकरी बांधव त्यातच गुरे चारणारा गुराखी, निसर्ग रम्य वातावरण पाहुन मन खुपच खुश झाले.
काही अंतरावर गेल्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसऴु लागल्या, सोबत ना तर छत्री नाही रेनकोट, मोटारसाईकलचा वेग वाढवत एखादया झाड़ा खाली थांबावे म्हणुन झाडाच्या शोध घेत बाईक जोराने हाकत होतो. त्यातच रस्त्याचा शेजारी एका शेतात एक छोटीशी पारंपारीक स्वरुपाची कौलारू झोपडी नजरेसमोर आली. सर्वानी मोटार साईकल लावुन त्या झोपडी कड़े धाव घेतली व झोपडीत शिरून स्वताला पावसापासुन वाचवले. त्या झोपडीत दोन लहान चिमुरडी जेवण करत होती. ते खुप ग़रीब व गरजाळु दिसत होती. त्यानी आम्हाला जेवणाचे आमत्रण दिले व आग्रह करू लागले. व कृतज्ञता दाखवत आम्हाला एक भाकर बांधुन दिली. एवढ्या लहान चिमुरड्याना ह्या गोष्टीची समज कशी त्याना आमची भुक कळली कसी ? हे आश्चर्यच होते. असो आमचा परिसरातील आदिवासी बांधव प्रेमळ व मदतीला हात देणारे असल्याचे नेहमी ऐकुन होतो मात्र ह्या उदाहरणातून त्याची प्रचीती आम्हाला आली. त्यानंतर राणीपुर, अमोनी मार्गे आम्ही वाल्हेरी गाठली. वाल्हेरी गावात शिरल्यावर विविध पक्षांची किलबिलाट कानी येवु लागली. पारंपारीक कौलारू घरे पाहुन मन प्रफुलित झाले. गावातुन धबधब्याकड़े जाताना नदीच्या किनारी असलेले वाल्हेरी मातेच्या मंदिराचे दर्शन घेतले.
मंदिराच्या परिसरात विविध रंगाची फुले व वनस्पती लावल्याने परीसर अतिशय शोभुन दिसत होता. सर्वत्र शांत वातावरण होते. आम्ही पुढे धबधब्याकड़े जाण्याकरीता निघालो रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या टेकडयानी जनु हिरवा शालुच परिधान केलेला होता. नागमोडी रस्त्याने जात असताना विविध पक्षांचा किलबिलाट त्यात कोकिळाचे मधुर सुर कानी येत होते. जवळच वाहणा-या नदीचा प्रवाहाचा आवाज व पक्षाची किलबिलाट जनु आमचे स्वागतच करत होते. नागमोळी वळण संपल्यानंतर काही अंतरावरुनच शुभ्र फेसाळनारे नयनसुख देणारे दोन शुभ्र दुधाळ धबधब्यानी आम्हाला आकर्षित केले. उंचीवरून वाहणारा धबधब्याकड़े लवकरात लवकर पोहचावे अशी आमच्या मित्र परिवारात शर्यतच लागली. विविध गाणी म्हणत धबधब्याचे तुषार आम्ही आनंदाने अंगावर घेत आनंद व्यक्त केला. व तेथुन पुढील मार्गावर निघालो. पोटात आता काहुर माजले होते. एक भाकर आणी सहा पोट समीकरण जुळत नव्हते. आम्हाला भुक लागली होती. वाल्हेरी गावातुंनच चिकन व लागणारा काही सामानाची खरेदी केली.
व मोटारसाईकलला किक मारत आम्ही कुंडलेश्वरच्या मार्गाला निघालो. आमच्याकड़े खाण्यासाठी अन्न होते. मात्र बनवण्यासाठी साधन सामग्री नसल्याने आमची फजीती होणार होती.हे ही तेवढेच निश्चित होते. मात्र राठोड ह्यांचे जीजाजी इच्छागव्हान येथे जि.प. शालेत मुख्याध्यापक असल्याने आमचा प्रश्न सुटला. आम्ही इच्छागव्हान येथुन स्वयंपाकासाठी लागणा-या आवश्यक त्या वस्तु एका आदिवासी महिला कडून मीळवल्या व त्यानंतर आम्ही कुंडलेश्वर मार्गावर निघालो. तेथे पोहचल्यावर आम्ही शासकीय विश्रामगृह गाठले. व बाहेरच चुल मांडली. व फ़िल्मी गाने म्हणत चिकन पुलाव तयार केला. विश्रामगृहाच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणात आम्ही तो चिकन पुलाव फस्त केला. व राठोडचे आभार मानले. कारण हां चवदार चिकन पुलाव त्यानीच बनवला होता. नंतर आम्ही खालच्या दिशेला असणारे श्री क्षेत्र कुंडलेश्वर महादेव मंदिर येथे गेलो हे मंदीर 500 वर्ष पुरातन मंदिर असल्याचे सांगीतले जाते. मंदिर उंच टेकडीवर आहे मंदिराच्या पायथ्याशी बारमाही नदी वाहत असून नदीजवळ दोन गरम पाण्याचे नैसर्गीक कुंड आहेत. या तिर्थक्षेत्रावर मकरसंक्रातीला यात्रा भरत असल्याची माहिती देखील आलेल्या काही पर्यटकानी दिली. दहा- बारा वर्षापूर्वी राम नाम प्रचारक प.पू.संत तारादासजी बापू यांनी या तीर्थक्षेत्री मौनव्रताचा कार्यक्रम केला होता त्यावेळी भाविकांनी या महादेव मंदिराजवळ व पायथ्याशी उंच टेकड़े खोदून भव्य असे पटांगण तयार केले.
मंदिराच्या पटांगणावर कौलारू आश्रम तयार करण्यात आले. जेणेकरुण रात्रभर येथे मुक्काम करता येइल, कालांतराने येथे विजेची सोयही करण्यात आली आहे. उंच टेकड्यावरील महादेव मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी पाय-याहि तयार केल्या आहेत. तसेच आता उपलब्ध झालेल्या निधीतुन तेथे मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली आहे. ह्या परिसरात गुप्त गंगा असल्याची माहिती देखील आमच्या कानी आली. आम्हाला ह्या बद्दल जानुन घ्यावयाची उत्सुकता वाटली. व ती आम्ही जानुन घेतली. गुप्त गंगा---- महादेव मंदिराजवळच निसर्गाच्या वनराईतुन पाणी येत असून त्याचा वापर भाविक पिण्याच्या पाण्यासाठी करीत असल्याने त्याला गुप्तगंगा असे म्हटले जाते. तर तेथुन वाहणा-या गरम पाण्याचा झ-यानी आम्हाला विचार करायला लावले. गरम पाण्याचा झरा-- मंदिर पायथ्याशी नदी वाहत असून ती बारमाही चलते या नदीजवळच गरम पाण्याचे दोन नैसर्गिक झरे आहेत या दोन्ही झरयांभोवती भाविकांनी आंघोळीसाठी कुंड बनविले असून असे म्हटले जाते की याठिकाणी गंधकाचा साठा असल्याने गरम पाणी बाहेर येते
या ठिकाणी मकर संक्रातीच्या दिवशी यात्रा भरत असल्याने भाविक रात्रीपासुन गरम पाण्याचा कुंडात अंघोलीसाठी गर्दी करतात भाविका आंघोळ करून उंच टेकड्यावरील महादेवाचे दर्शन घेतात याठिकाणी संत तारादासजी महाराज यांच्या सान्निध्यात मकरसंक्रांत महोत्सवाचे, गुरुपोर्णिमा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आसल्याने या क्षेत्रावर भाविकांची वर्दळ नेहमी पेक्षा वाढली आहे. तसेच शाळा महाविध्यालयांचा शैक्षणिक सहली या तीर्थक्षेत्रावर येऊन निसर्गाचा आनंद घेतात या पुरातन महादेव मंदिरात भाविक श्रद्धेपोटी नवस फेड्तात व काही भाविकातर्फे भंडाराचा कार्यक्रमाचे आयोजन करतात या तीर्थक्षेत्रावर श्रावण महिन्यात भाविक व् शालेय विद्यार्थी हजेरी लावतात या तिर्थक्षेत्र कुंडलेश्वर या धार्मिक क्षेत्राला प्राचीन वारसा लाभलेला आहे. अशी माहिती देखील स्थानीक देखरेख करणार्या राजु महाराजानी दिली
.... खुप दिवसानंतर मित्रान सोबत भटकंतीला आलो होतो. मात्र ही भटकंती आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. ...... व आम्ही साठवुन ठेवलेली एक आठवण आपणास ही आपल्या आठवणी साठवण्या करिता व आठवण्या करिता ब्लॉगवर सादर केली आहे......