Breking News

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

तुझ्या देहाकडे बघून



तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण,

"ओढणी सांभाळ" सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण,

तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,

"जपून चाल" सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,

तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण,

तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन...

प्रेम आणि वेडेपणा...


प्रेम आणि वेडेपणा...
खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडेतिकडे फिरत होते. काय करावे हे नकळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते'ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली,"आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्यामागे लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला.......एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी'नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ'एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता......७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र कुठे लपावयाचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्यालायाचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच...९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा'ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला."मी येतोय! मी येतोय!"
'वेडेपणा'न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्याएवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा'ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एका पाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा'ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा'ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा'ने एक लाकडाचा धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्याफटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वार केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?
प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."
तेव्हापासूनप्रेम आंधळ झालं आणि वेडेपणात्याचा नेहमीचा सोबती झाला.

भेटण्यासाठी मज

भेटण्यासाठी मज आर्जवे करीशी काही करता आढेवेढे घेशी ,
जातो मी रागाने म्हणता हात धरून घट्ट पकडसी ..!!
अजब तुझी हि रीत प्रेमाची तहान लाऊन पाणी लपविण्याची ,
मनीचे सर्व गुपित ठेवण्याची अन " प्रेम आहे का तुझे ? "
मज विचारण्याची ..?
प्रेम करतो मी मनापासून तुज जपीन मी जीवापासून ,
वचन देता मी डोळे पाणावून बोलू न देसी ओठ चुंबून ..

वेड मन माझ वेड्यासारखा धावत.

वेड मन माझ वेड्यासारखा धावत...
वेडावून काहीतरी वेड्यासारखं बोलत....
म्हणायचं असत काही तरी...भलताच काही म्हणत.....
नाही व्हायचं काही...काहीतरीच होऊन बसत....
अस वेड मन माझ..वेड्या परी वागत....
कधी कळणार त्याला कस वागायचं...
कोण आहे परके अन कोणाला आपल मानायचं...
अस वेड मन माझ...वेड्यासारखा पाहत.....
जवळ आपल्या कोण...अन कसे त्यांचे स्वभाव...
कुणाच्या मनात काय ....काय त्यांच्या डोक्यात...
अस वेड मन माझ...पाखरासारख उडत...
दूर गगनात उच्च भरारी मारायला बघत...
लांब त्या आकाशाला भेदायचं बघतो....
अस वेड मन माझ...कधी समजणार....
कुणाची इच्छा नसताना....का त्याच्याशी बोलणार...
का त्याला हसवणार...का म्हणून त्याला आपल मानणार....
अस हे वेड मन माझ...माझ्याच सारखा वेडा आहे....
मी हि डोक्यान कमी...हे हि तेवढाच खर आहे....

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

क्षण काही कटत नाही...


क्षण काही कटत नाही.......
वेळ काही निघत नाही........
आठवण तुझी येताना .........
अश्रू मात्र थांबत नाही........
दूर का जातेस तू.....
जवळ माझ्या रहात नाही.......
गेलीस तरी तू ....
आठवण मात्र माझी करत नाही......
किती त्रास देते ग तू.......
किती वाट बघायची तुझी......
वाट बघून थकतात डोळे.....
पण तू काही येत नाही......
होईल कधी असे....
मीच दूर जाईल जेव्हा.....
मग शोधशील मला तू.......
जेव्हा मी या दुनियेतच
रहाणार नाही.....

अजूनही आठवतंय मला

अजूनही आठवतंय मला
तुझं माझ्यासाठी व्याकुळ होणं
मी भेटताच मला असं
डोळे भरून पाहणं.
अजूनही आठवतंय मला
तुला पाहता पाहता माझे डोळे भरून येणे.
अन् मग न कळत तुझा हात
माझ्या डोळ्यांपर्यंत जाणे.
का बसेना तुला
माझ्या प्रेमावर विश्वास
तुझ्या प्रेमापाठी
नाही मजला कसलाही ध्यास.
न जानवले कधी मला
तुझ्या मनात काय ते?
या जन्मी नाही तर,
पुढच्या सर्व जन्मी तुझाच होऊन राहीन. .....

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
<">
कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल

देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

चेहरा

चेहरा

मानसाची ओळख सान्गतो चेहरा,
चेहर्याच्या शोधात ही असतो चेहरा,
चेहरा सान्गतो भाव मानसाचे,
हाव भावाची ओळख चेहरा ।

एक चेहरा, एक माणुस,
एक कहानी प्रत्येक चेहर्याची,
कधी चेहरा काही तरी सान्गतो,
कधी चेहरा वाचता ही येतो ।

चेहरा हसतो , रडतो ही चेहरा,
प्रत्येकाच्या भावना सान्गतो चेहरा,
चेहरा असतो व्यक्तीमत्वाचा नमुना,
प्रत्येक चेहर्यामागे अस्तित्वाच्या खुणा.....

video

This  is  dedicate to my love .....

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

आठवण

                                                                     आठवण





आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन सैरभैर होते,
काहीच कळत नाही त्याला असे का त्याला होते.

आठवण कोणाची जेव्हा येते मन त्याच्या आठवणीत गुरफटून जाते,
आणखीन मग त्याच जाळ्यातून कधी निघता येतच नाही.

आठवण कोणाची जेव्हा येते मन पाखरू बनून भुरकन उडून जाते,
आणखीन वेडी पीसी होऊन त्यालाच सगळीकडे शोधू लागते.

आठवण कोणाची जेव्हा येते सगळा राग रंग बदलून जातो,
ओसाड वाळवंटात ही मग फुलोरा उमलून जातो.

अशी ही आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन आठवणींच्या दुनियेत रंगून जाते...............

आयुष्यात प्रेम केलं होतं

आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं...
म्हणतात,प्रेम करणं सोप असतं ते व्यक्त करणं कठीण असतं,प्रेम पहाणं सोप असतं,ते समजून घेणं कठीण असतं..

आणि हेच समजून घ्यायचं होतं,

म्हणून,आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U" म्हणायच असतं?

विरहात तिच्या बुडून मरायच असतं की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?

हेच बघायच होतं म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

म्हणुनच तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवल

आणि व्यक्तही केल होतं पण..............

.तिला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" असं म्हणायला काहीच वाटल नव्हतं ,

असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होतो तिच्याकडून ते 'I Love You" हे तीन शब्द ऐकण्यासाठीकधी

तिच्या आठवणीतं मरत होतो,तर कधी मरुनच जगत होतो....

आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवयाच होतं .....

म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं!!!!!!

प्रेमाच्या वेलीवर

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा
तेवढे सर्व लावतात असे नाही
प्रेमासारखे बंधन ज्याला सीमा नसतात हे जाणतो
पण प्रेमासारख्या बंधनाला सर्वच जाणतात असे नाही
... कुणीतरी म्हंटलयं
प्रेमामध्ये हातावरील रेशांनाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात
पण त्या वाटा बदलेपर्यंत सर्वच थांबतात असे नाही.

तुझ्या-माझ्या मधे हे किती योजने अंतर.

तुझ्या-माझ्या मधे हे किती योजने अंतर..
तू मला अन मी तुला असे समांतर !
जन्मांतरीची साथ ही आपुली…
तरी नाते अधीर - अधांतर !

दाटलेले शब्द ओठी, पोचवू कसे तुला?
आसुसली माझी मिठी, पाठवू कशी तुला?
हुंकार तुझे ऐकुनी होतसे जिवाची लाही....
लाचार मी असा, बस इथून तुजला पाही !

ऋतू आला, गेला ऋतू... आतूर तू
क्षितिजा पार मीलन हे जाण तू
सखे-लाडके जरा प्रतिक्षा, धीर जरा...
मेघदूता सवे ओली माया भिजवेल धरा............

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

कधी मेसेज मधून तर कधी इमेल मधून...

एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,

समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..

आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,

जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत..

आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..

मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात..

कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात...

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

दिवसा स्वप्ने बघतो



दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेते एकटी
माझ्याशीच मी हसुन घेते एकटी
तरी येकटीलाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तुझं न येणं ठरलेलंच आहे…

तुझं न येणं ठरलेलंच आहे…
त्या दगडावरच्या खोल घळीसारखं…
अनं माझं वाट पाहाणंही…
त्याच दगडातून उगवलेल्या इवल्य़ाश्या रोपासारखं…
किलकिल्या दारातून येणारी झुळूक…माझं असं डोळे लावून बसणं…..होवून अगतिक…
आणि तुझं न येणं….अपरिहार्य…व्यवहार्यही कदाचित …
तुझ्या स्पर्शाला पारखे झालेले…अश्रूही…
अक्षरश: टपून बसलेले असतात….गनिमासारखे…
डोळ्यातल्या हसरेपणातही घेवून फिरते एक भिजला तीळ..
अन्‌ दुखा:त आहे तुझं इंद्रधनुष्य …रंगीत..
काय करू सांग आता तूच…
खिडकीतून येणारा प्रकाशाच कवडसा…
मंद्रसप्तकातलं एखादं गाणं…

तुझ्याच आठवांची बेहोशी घेवून घेते….

बेहिशोबीपणे…..!!!
घेवून येते तुझाच गंध…
घेवून येते मनाच्या गर्ता..अनामिक लाटांच्या भरत्या….