Breking News

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

परमेश्वर तुझे सर्व इच्छा पूर्ण करो ह्याच सदिच्छा... 
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

गुरुवार, १ जुलै, २०२१

कै.डॉ.राजेंद्र मराठे यांच्या स्मृती पित्यर्थ नागरिकांना सुरक्षा विमा -

लिंक वर जा
http://yatharthvarta.blogspot.com/2021/07/blog-post_8.html?m=1

तळोदा : तळोदा येथील कै.डॉ. राजेंद्र शंकरराव मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा विमा मोफत काढून देण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या मोफत विमाचा लाभ घेतला. 

            स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्था व भोई समाज नवयुवक मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमनाने हा कार्यक्रम भोई गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

         कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर विशाल जाधव यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, विमा हा आपल्या पश्चात आपल्या परिवाराला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उपयुक्त आहे, विमा असल्यास कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा   कवच मिळते. असे सांगून त्यांनी विमाचे महत्व उपस्थिताना पटवून दिले.  

         संदीप पवार यांनी डिजिटल साक्षरता व सोशल सिक्युरिटी संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित बांधवाणांचा मोफत विमा या प्रसंगी उतरविण्यात आला. यावेळी स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आनंद जगदीश मराठे यांनी स्व डॉ.राजेंद्र मराठे यांच्या किर्तीचा आढावा स्मरण करून दिला. यावेळी भूषण पवार बँक ऑफ  बडोदा तसेच सचिन तावडे भोई समाज उपाध्यक्ष गणेश शिंदे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष जगदीश वानखडे उपाध्यक्ष युवा प्रकाश वानखेडे सर चंद्रकांत साठे  भोई तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोई सर निखिल साठे अण्णा भोई पिंटू भोई सुनील शिंदे आदी उपस्थित होते...


सोमवार, १४ जून, २०२१

अवैध वीज कनेक्शनांना वीज वितरण कंपनीकडून अभय तळोदा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांची मागणी

तळोदा : शहरात मोठ्या अवैध वीज कनेक्शन कार्यरत आहे.विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता व कर्मचाऱ्यांकडून अवैध वीज कनेक्शनना अभय दिले जात असून नियमित वीज बील भरणाऱ्या ग्राहकांकडून अवैध वीज कनेक्शनचे बील वसूल केले जात असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
            तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.शिवाय अनेक ठिकाणी गृह उद्योग औद्योगिक कामांचे सुद्धा  सुरू आहेत.यातील अनेक ठिकाणी अवैध वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे.नागरिकांकडून याबाबत ओरड सुरू झाली की वीज वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून दिखाव्यासाठी थातूर मातूर कारवाई करून दोन-चार अवैध वीज कनेक्शनधारकांवर कारवाई केली जाते.मात्र इतर अवैध कनेक्शनज मात्र अभय दिले जात असल्याचे चित्र आहे.संबंधित घरबांधकाम करणारे  ठेकेदार व वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांचे या प्रकारात साटेलोटे असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे.
            तळोदा शहरात मागील अनेक काळापासून जादाची वाढीव वीज बिल,बिना रीडिंग वीजबिल,रिंडिंगनुसार वीज बील येणे,अव्वाच्या सव्वा वीज बिले येणे अशाप्रकारे वीज बिलांबाबत मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढली आहे.ज्यादा येणाऱ्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. अवैध वीज कनेक्शन धारकांचे वीजबिल देखील नियमित वीजबिल भरणार्‍या ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
         दरम्यान, शहरातील घरगुती वीज व ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल येण्याच्या सत्र सुरूच असून वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना याबाबत हात वर केले आहेत आम्हाला याचे काही देणेघेणे नाही ज्याप्रमाणे रीडिंग असेल त्याप्रमाणे विज बिल येईल,अशा पद्धतीची उत्तरे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अभियंत्यांकडून ग्राहकांना देण्यात येतात. त्यामुळे तुम्हीच ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एका महिन्याची घरघुती वापराची बिले तब्बल आठ ते नऊ हजाराची बिल आकारली जात आहे.असे असताना ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सक्ती करण्यात येत आहे. तळोदा शहरात वाढीव वीज बीलासंदर्भात अनेक वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारी असताना संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या समस्यांचे कोणते प्रकारचे समाधान वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेले नाही.वीज बिलांच्या अनागोंदी बाबत ग्राहकांचे समाधान करण्यास वीजवितरण कंपनीने असमर्थ ठरले असल्याचे सांगितले जात आहे.वाढीव वीज बिलाचे सत्र सुरूच असल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहरात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.या रोषाचे रूपांतर जनआंदोलनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दक्षता घेऊन नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
   

चौकट          
अभियंत्यांची तक्रारदारांसोबत मुजोरी
         वाढीव बिलासंदर्भात तक्रारी असणाऱ्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क करून अभियंत्याची याबाबत विचारणा केली असता अभियंत्याच्या मुजोरी पणाला ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी शहरातील ग्राहकांना यांचा पुन्हा एकदा अनुभव आला.शहरातील काही नागरिक वीज वितरण कंपनीचे उपअभियंता इमरान पिंजारी यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रार घेऊन होते. यावर ग्राहकांचे समाधान न करता इम्रान पिंजारी यांनी ग्राहकांना अरेरावीची उत्तरे दिली. तुम्हाला जेथे तक्रार करायचे असेल तेथे तुम्ही तक्रार करू शकतात याबाबत वाढीव वीज बिले कोणत्या प्रकारे कमी केली जाणार नाहीत अशा पद्धतीने या शब्दात त्यांनी ग्राहकांना उत्तरे दिली यामुळे वीज वितरण कंपनीच्या बाबत ग्राहकांमध्ये प्रचंड रोषाची भावना आहे तळोदा येथे कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली जाणार असल्याचे समजते.

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील सुर्यवंशी सचिवपदी उल्हास मगरे यांची सर्वानुमते निवड

तळोदा : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

           तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष विकासदीप राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्सचे पालन करीत रविवारी वनविभागाचा विश्रामगृहात वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीस नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.ए.टी. वाघ, भरत भामरे, मंगेश पाटील, ईश्वर मराठे, किरण पाटील, विकासदीप राणे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, हंसराज महाले, दिपक मराठे,  सुशील सूर्यवंशी, राकेश गुरव, मानसिंग राजपूत, अक्षय जोहरी, राहुल शिवदे, आदी उपस्थित होते. 
     
 सुरुवातीला मावळत्या  पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. बैठकीत मागील हुशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
         संघाच्या पुढील कार्याचे नियोजन करून अधिक जोमाने काम करण्याचे ठरले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, गरजूना उबदार कपडे वाटप, इफ्तार पार्टी, महिला दिना निमित्त महिलाचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा सन्मान, तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजपयोगी कार्यात तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे. पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
  

तळोदा तालुक्यातील पोलीस पाटील ही दिसणार गणवेशात : मासिक सभेत संघटनेचा निर्णय

तळोदा:- तळोदा येथे पोलीस पाटील संघाची मासिक सभा रविवारी तळोदा पोलीस ठाण्याचा आवारात पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. 

             तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक रविवारी प्रशासकीय इमारतीचा आवारात घेण्यात आली. या बैठकीत पो.नी सोनवणे यांनी सर्व पोलीस पाटील यांना लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन आपापल्या गावातील लसीकरण 100% कसे करता येईल या संदर्भात सूचना दिल्या. यासोबतच पोलीस पाटील यांनी एक नोंद वही ठेवून त्यात आपआपल्या गावातील गुन्हे किती व कोणत्या स्वरूपाचे अथवा कश्या प्रकारचे आहेत या संदर्भात नोंद ठेवण्याचे आवाहन केले. 
              पोलीस पाटील हा प्रशासनाच्या दुवा असून गावात वादविवाद होणार नाहीत यासंदर्भात लक्ष द्यावे किरकोळ वादविवाद झालेच तरी ते गावातच आपापसात मिटवावे पक्षपाती पणा करू नये, गावात शांतता टिकून राहील यासाठी सर्व पोलीस पाटीलानी यत्नशील राहून शांतता कशी निर्माण होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
               भांडण-तंटेमुळे गावाच्या विकास खुंटतो, तंटामुक्त गावांला शासनाकडून विविध प्रकारच्या निधी मिळतो. त्या निधीचा साह्याने गावाच्या विकास करता येऊ शकतो. माळखुर्द येथील पोलीस पाटील आकाश वळवी यांनी आपली नोंदवही दप्तर अतिशय योग्य प्रकारे असल्यामुळे पंडित सोनवणे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
              पोलीस किंवा होमगार्ड यांनी परिधान केलेल्या गणवेशावरून सहज त्यांची ओळख पटते. पोलीस पाटील यांचे ड्रेस कोड नेमल्यास सहज पोलीस पाटील असल्याचे ओळखता येईल. अशी संकल्पना पो.नी पंडित सोनवणे यांनी मांडली. यांच्या या प्रस्तावाला पोलीस पाटील संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील बैठकीला एकाच ड्रेस कोडवर उपस्थित राहण्याचे आश्वासन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापू पाटील व तालुका अध्यक्ष अशोक पाडवी यांनी दिले. या बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील, पो अजय कोळी, मगन पाडवी, रवींद्र वळवी, गुलाबसिग पाडवी, दीपक ठाकरे, रवींद्र नाईक, हूरजी गावित, भरतसिग पावरा तसेच महिला वर्ग व इतर 50 ते 55 पोलीस पाटील उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर आ. राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांच्या सुटतील समस्या

तळोदा:  शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांमधील शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या पाणंद ( शेतशिवार ) रस्त्यांच्या कामासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून 60 लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून यातून 20 रस्ते घेण्यात आले आहेत. साहजिकच शेतकर्‍याच्या शेत रस्त्यांच्या प्रश्नी मार्गी लागणार आहे.आमदार निधीतून पाणंद रस्त्यांसाठी निधी खर्च करणारे जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

           शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांच्या प्रश्नासाठी प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हा अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी शेत शिवराला जोडणार्‍या रस्त्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्याअभावी शेतातील मालाची ने, आन करताना अत्यंत कसरत करावी लागत असते.शिवाय मशागतीस देखील अडचण येत असते.त्यामुळे हे रस्ते होणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
           पाणंद योजना ही राज्याचा महसूल विभागाकडून राबवली जात असते.शिवाय तीस पुरेसा निधीही नसतो.साहजिकच स्थानिक महसूल प्रशासन मागणी आलेल्या कामांपैकी ठराविक कामांनाच प्राधान्य देत असते.त्यामुळे पुरेशा निधी अभावी ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे प्रचंड असताना मार्गी लागलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तथापि आ. राजेश पाडवी यांनी शेतकर्‍यांच्या हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले.यासाठी त्यांनी साधारण 60 लाखांच्या निधी मंजूर केला आहे.यातून 20 गावांमधील शेतकर्‍यांचे शेत शिवारातील 20 रस्ते घेतली आहेत. यातून 60 किमीचे रस्ते तयार होणार आहेत. प्रत्येक तीन किमीच्या रस्त्यासाठी तीन लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.
               सदर कामांचे नियोजन देखील करण्यात आले असून लवकरच कामे सुरू करण्यात येणार आहेत. शहादा तळोदा तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे परंतू पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे युद्ग पातळीवर पूर्ण करावीत अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

या गावांना घेण्यात आली पानंडची कामे
    शहादा,-तळोदा तालुक्यातील ज्यावीस गावांना आमदार निधीतून पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे त्यात तळोदा तालुक्यात प्रकाशा,धानोरा,तळवे,मोड, दसवड, चिनोदा,रांजणी.तर शहादा तालुक्यात मंदाना, जावदा, असलोद,भोरतेक, वाघारदे,लोहारे, जाम, बहिरम्पुर, लक्कडकोट,मुबारकपूर,कुसुमवाडे ही गावे घेण्यात आली आहेत.यातील बहुतेक रस्ते थेट गावाना जोडणार आहेत.त्यामुळे भविष्यात ती मोठी रस्ते होवून डांबरीकरणाचे देखील होवू शकतील.शिवाय ते बारमाही जोडली जाणार आहेत.केवळ तीन किमी च्या रस्त्यामुळेच रखडली होती.आता पाणंद रस्त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शनिवार, १२ जून, २०२१

मोटार सायकलने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी : उपचारादरम्यान मृत्यू

तळोदा:- समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने  झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना मोड गावाजवळ दिं. 1जून रोजी घडली होती जखमी पैकी एकाचा उपचारा दरम्यान मयत झाला आहे या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरदुली ता. निझर येथील प्रवीण मगन ठाकरे व त्याची पत्नी सुनीता प्रवीण ठाकरे हे मोटरसायकलाने सासरवाडीला जात असताना मोड गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकल ने धडक दिल्याची घटना दिं. 1 जून रोजी घडली होती अपघातात दोघेजण  जखमी झाले होते प्रवीण हा उपचार घेत असतांना मरण पावला  म्हणून मयताच्या भाऊ चमाऱ्या मगन ठाकरे यांच्यातळोदा पोलिसात फिर्यादिवरून    एकाचा मरणास व महिलेच्या दुखापतीस व मोटरसायकल नुकसानिस कारणीभूत ठरला म्हणून दिं.10 जून रोजी अज्ञात मोटर सायकल स्वरा विरोधात गु.र.नं. 363/2021 भादवी कलम 304(A), 279,  337, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

शैक्षणिक क्षेत्राचा दीपस्तंभ शेठ के.डी. हायस्कूल

तळोदा शहराच्या पिढ्यान् पिढ्या येथे शिकून मोठ्या झाल्या. शहरातील कदाचित एकही घर नसावे ज्या घरात शेठ के.डी . हायस्कूलमध्ये शिकलेला माजी विद्यार्थी नसेल . शाळेचे माजी विद्यार्थी देश - विदेशात आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अशा शेठ के . डी. हायस्कूलमध्ये आजपावेतो २४ हजार ६०२ विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. जे आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवीत आहेत. मात्र शाळेप्रति कृतज्ञता बाळगून आहेत. त्यामुळे आजही अनेक माजी विद्यार्थी मेळावे भरविले जातात. त्यातून इतिहासाला उजाळा दिला जातो. तर भविष्याची वाटचाल अजून भक्कमपणे करण्याची हिंमत त्यातून मिळते. हातोडा रस्त्यावर शेठ के.डी. हायस्कूलची भव्य इमारत आहे. या इमारतीत व तेथील मैदानाने अनेक सोहळे व कार्यक्रम पाहिले आहेत. त्यात शाळेने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच उपक्रम मोठ्या हिरिरीने पार करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. तोच वारसा अमृतमहोत्सवी वर्षानंतरही सुरू असल्याचा अभिमान आजही शाळेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे.

           शाळेचे व्यवस्थापन पालिकेकडे असताना पालिका संचलित शाळाप्रमुख म्हणून एस .के.काळकर, एस. जी. भावे, व्ही.एम. घुले, एस. एस. फाळके, व्ही . एच . खर्शीकर , डी. एम . वाणी अशा दिग्गज प्रशासकांनी शाळेचे कामकाज सांभाळले होते, तर १९४४ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून गोरख हुलाजी महाजन, त्यानंतर एस . के. घाटे, नागेश रंगनाथ लिमये, तुकाराम सोनजी पटेल, शंकर बापू शिंपी , कृ.वि. कानुगो, कांतिलाल बुलाखी वाणी, गजानन विनायक जोशी, विष्णुदत्त नथू तिवारी, काशीनाथ नारायण गुजराथी, वासुदेव जगन्नाथ साळी, दादाभाई हांडुजी धोदरे, धना ओंकार भोई, अमृतलाल विठ्ठलदास वाणी, उखा गणपत पिपरे, लाला हरिभाऊ पाटील, सदाशिव गिरधरसा चित्ते, अशोक मयाराम चव्हाण , विजयकुमार जंगलू राणे, विजयकुमार धुडकू ठाकरे, पुंडलिक राघो खुनेपिंप्रे, दिलीप भानुदास गिरणार अशा दिग्गज शिक्षकांनी येथील मुख्याध्यापकपद सांभाळले होते.आता सध्या जितेंद्र लक्ष्मणराव सूर्यवंशी समर्थपणे मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळत आहेत. 
             येथील शिक्षकदेखील नवरत्नांची खाण शोभावी अशा परंपरेतील असतात. अनेक क्षेत्रांतील गाढे अभ्यासक असलेले शिक्षक शाळेला लाभले होते. तोच वारसा आजही शिक्षक चालवत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा आदर्श वारसा लाभलेल्या या शाळेत आज ३७ शिक्षक व १४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ , ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती यानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील वंचित व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे शिक्षण दिले जात आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तालुक्यात केवळ येथेच राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसीचे युनिट आहे . संस्कृत विषयाचे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. त्यामुळे मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळेची शैक्षणिक घोडदौड  आजही आश्वासकपणे सुरू आहे. त्यामुळे तळोदा परिसरात शेठ के .डी. हायस्कूल म्हटले की दीपस्तंभ दिसावा अशी अवस्था होते. परिसरात आजही शेठ के.डी. हायस्कूल खराखुरा शिक्षणाचा ब्रॅन्ड शोभून दिसते एवढे मात्र निश्चित...

            स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शेठ के . डी हायस्कूलची वाटचाल ८१ वर्षांची झाली आहे . परिसरातील शिक्षणाची गरज लक्षात घेता शेठ खुशालभाई दुल्लभदास वाणी कुटुंबाने आपली शेतजमीन शाळेसाठी दिल्याने त्यांचे नाव शाळेला देण्यात आले होते . त्यामुळे १९४० मध्ये शेठ खुशालभाई दुल्लभदास हायस्कूल नावाने सुरू झालेल्या शाळेचे व्यवस्थापन सुरवातीला पालिकेकडे होते. त्यानंतर २१ ऑगस्ट १९४४ ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे व्यवस्थापन संस्थेकडे आले. शाळेचे तळोदा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदान भव्य आहे. शेठ के.डी . हायस्कूलची वाटचाल आजही परिसरात दीपस्तंभासारखी सुरू आहे.
 जितेंद्र सूर्यवंशी, मुख्याध्यापक, तळोदा 

रविवार, ५ जुलै, २०२०

हेच तर खरं प्रेम असतं.


डोळयातून वाहणारं पाणी कोणी तरी पाहणारं असाव..
 ह्रदयातून येणार दु:खकोणी तरी जाणणारं असाव.
'मनातून येणा-या आठवणी कोणी तरी समजणारं असाव..'
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं...
आठवण येताचं जे मनाला रडवतं..
रडताना जे ओठांनवर हसू आणतं,
हसताना जे डोळ्या तून ह्रदयात उतरतं..
ह्रदयातून जे श्वासात
दरवळतं हेच तर खरं प्रेम असतं...