Breking News
केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" पुरस्कार प्रदान
sudhaspari - Mar 08 2025साधेपणात लपलेला मोठा अर्थ: प्रशांत पाटील
sudhaspari - Mar 08 2025*डॉ. महेंद्र चव्हाण – एक दिलदार माणूस*
sudhaspari - Mar 05 2025सागर पाटील: परिस्थितीशी दोन हात करणारा एक कर्तव्यदक्ष योद्धा
sudhaspari - Feb 21 2025पंकज राणे: एक साधा पण प्रभावी समाजसेवक
sudhaspari - Jan 18 2025दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका
sudhaspari - Jan 06 2025- sudhaspari - Dec 31 2024
दिपक परदेशी: चप्पल हरवलेला कार्यकर्ता
sudhaspari - Dec 08 2024नात्यांचा उत्सव: के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांसाठी आगळावेगळा कार्यक्रम
sudhaspari - Dec 02 2024"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"
sudhaspari - Dec 01 2024कर्तबगार, दिलखुलास, दिलदार अन् सदाबहार मित्र ; मनोज ढोले
sudhaspari - Nov 29 2024- sudhaspari - Nov 21 2024
महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या; भाजप की काँग्रेसला फायदा?
sudhaspari - Nov 21 2024हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय
sudhaspari - Nov 17 2024दै.पुण्यनगरीचे निष्ठावंत सेवक: सुरज पाटील यांचे अल्पायुष्य जीवन ; भावपूर्ण श्रध्दांजली
sudhaspari - Nov 17 2024"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"
sudhaspari - Nov 16 2024दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*
sudhaspari - Nov 15 2024'हिमाचलची जादू, पंजाबचा रंग आणि दिल्लीचा वैभव: एक अविस्मरणीय सफर"
sudhaspari - Nov 15 2024शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे अथक प्रयत्न आणि खेळाडू दिपिका छापोला हिचे यश
sudhaspari - Nov 15 2024अमित गाभा: शांत, संयमी आणि दिलदार ढाबा मालकाचा अविस्मरणीय पाहुणचार
sudhaspari - Nov 15 2024पुरोगामी विचाराचा धैर्यवान वारसदार : विशाल सुर्यवंशी
sudhaspari - Nov 15 2024हिमाचलच्या रस्त्यांवर एक निष्ठावंत सहकारी: रोहित शर्मा
sudhaspari - Nov 14 2024जगदीश शर्मा: एक उत्कृष्ट ड्राइवर और एक विश्वसनीय मार्गदर्शक
sudhaspari - Nov 14 2024सुवर्ण मंदिर दर्शन आणि अमृतसरचा संस्मरणीय प्रवास
sudhaspari - Nov 14 2024धर्मशाला: निसर्ग सौंदर्य आणि भाऊसाहेब यांचा कर्तव्याचा अभिमान
sudhaspari - Nov 11 2024
शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६
एकतेचे दर्शन घडविणारा दानिश याचा नागरी सत्कार
![]() |
दानिशला स्कुल बँग देताना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी साहेबव अधिकारी |
दै.पुण्यनगरीत प्रसारित झालेली बातमीची प्रतिमा देताना |
![]() |
दै.खान्देश गौरव वृत |
![]() |
प्रथम मूर्तिकार शिवा बोरळे यांची दै.पुण्यनगरीत चापून आलेल्या बातमीची प्रतिमा देतांना |
![]() |
जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना |
प्रांताधिकारी अभिजित राऊत दानिश याला ड्रेस देताना
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे यांचा प्रांताधिकारी कडून सत्कार
दै.पुण्यनगरीचे पत्रकार उल्हास मगरे यांचा लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने सत्कार करताना प्रा.जे.एन.शिंदे |
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे यांचा तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करताना पो.नि.संजय भामरे |
*दै. पुण्यनगरी प्रतिनिधिंचा विशेष गौरव*
दै पुण्यनगरी तळोदा प्रतिनिधि उल्हास मगरे यांनी दिलेल्या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील हलालपुर गावातील रहिवास शासन दरबारी नोंद होऊन प्रशासनाने नमूना नं ८ वाटप केले त्याबद्दल त्यांचे लोक संघर्ष मोर्चा तर्फे गौरव केला त्यांचा सत्कार प्रा जे एन शिंदे यांच्या हस्ते झाला व दै पुण्यनगरी बोरद प्रतिनिधि सुधाकर मराठे यांनी सामाजिक सलोखा एकात्मता दर्शन व हिन्दू मुस्लिम एकता संदेश देणाऱ्या दानिश पिंजारी या बालकाचे वृत प्रकाशित केले त्यामुळे पोलिस ठाण्या तर्फे पोलिस निरीक्षक संजय भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दोन्ही पत्रकारांचा गौरव तलोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गणेश आरास स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात करण्यात आलामंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६
बडे दिलवाला भरत भामरे
![]() |
भरत भामरे मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
माणूस अनुभवातून, संस्कारातून घडत जातो हे खरे! परंतु माणसांची प्रचंड विविधता सातत्याने अनुभवास येत असते. कधी नैराश्य तर कधी उत्साह! हा आशा-निराशेचा खेळ माणसाच्या जीवनात निरंतर चालू असतो. अशाच अनुभवांवर आधारित तळोदा येथील जेष्ठ पत्रकार भरत भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सदर लेख प्रसिद्ध करीत आहोत. प्रभू रामचंद्रांनी लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला त्यावेळी त्यांना अनेकांनी मदत केली. वानरसेना तर त्यांच्याबरोबर कायमच होती. त्याचप्रमाणे एका छोट्याशा खारीनेसुद्धा आपला वाटा उचलला होता. आजही आपण कित्येक वेळा "खारीचा वाटा' हा शब्दप्रयोग वापरतो. प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे चांगल्या कामात हातभार लावला तरच हा यशाचा रथ पुढे जाणार आहे. तळोदा येथील गरीब कुटुंबात जन्मलेले भरत भामरे, आई वडील भाऊ भावंडे असा मोठा परिवार, वडील स्वातंत्र सेनानी असल्याने घरातले वातावरण शिस्त प्रिय, वयाच्या 10 व्या वर्षी वडील पारंगत झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी भरत भामरे यांच्या खांद्यावर आली. आयुष्याचे कळू गोड घोट घेत आयुष्य जगण्यास सुरुवात केली. मलक वाडा परिसरात वडीलाने सुरु केलेले विश्वकर्मा इंजिनिअरिंग वर्कशॉप यावर भरत भामरे यांनी आपला उदरनिर्वाह सुरु केला. मात्र आधुनिकतेकडे वळत असलेल्या
तळोदेकरानी ऑइल इंजिनकडे पाठ फिरवत इलेक्ट्रिक वस्तूचा मागे धाव घेतली. यांच्या परिणामी भामरेचा व्यवसायात निराशा येऊ लागली, पुढे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला, स्वतः वर असलेला विश्वास कुटुंबाची जबाबदारी मनात काहीतरी करण्याचे धाडस या सर्वाचा विचार करत भरत भामरे यांनी तेथेच गजानन प्रिंटिंग प्रेस नावाचा छोटासा छापखाना सुरु केला. अफाट अध्यातमिक वाचन, समाज कारण करण्याची मनात असलेली तीव्र इच्छा, वारसा हक्काने मिळालेले अनुभवच्या जोरावर भरत भामरे यांनी तळोदा समाचार नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्याकाळी साप्ताहिक काढणे तारेवरची कसरत होती. एकेकक अक्षराचे खिडे जोडून बातम्या लेख तयार केले जात होते. तसेच बातमीत फोटो लावण्याकरिता धुळे येथून लाकडी ठोकडयावर फोटोची प्लेट आणून पेपरात फोटो छापला जात असे, सातपुडा परिसरात त्याकाळी वाचन संस्कृती एवढी रुजलेली नव्हती, म्हणून गाव परिसरात पेपर मोफत वाटावे लागत होते. त्या परिस्थितीत गावाचा चेहरा मोहरा बदलणाच्या काम साप्ताहिक तळोदा समाचारने केले आहे. पेपराच्या माध्यमातून अनेक बरे वाईट प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. पत्रकार क्षेत्रात मनात कुठलाच तिढा न ठेवता साप्ताहिक तळोदा समाचारच्या माध्यमातून अनेक नवीन पत्रकार त्यांनी घडवले आहेत. त्यातच अनेक सहकार्य करणाऱ्या मित्रांची जोड त्यांना लाभत गेली. मित्र जोडण्याच्या केलेने त्यांनी राजकीय, सामाजिक आर्थिक क्षेत्रातील अनेक मित्र त्यांनी जोडले. या मैत्रीच्या जोरावर त्यांनी कमिशन तत्वावर प्लॉट, घरे, खरेदी विक्रीचा व्यवसायाला सुरुवात केली.सत्य परेशान होंगा मगर पराजित नही या तत्वावर चालणारे भरत भामरे यांनी या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. व्यवहारात पारदर्शकता व आपली फसगत होणार नाही असा प्रचंड विश्वास परिसराच्या जनतेत असल्याने प्लॉटिंग व्यवसायात भामरे यांनी आपले पाय मजबूत रित्या रोवले. या व्यवसायात उंची गाठत आजही मनातला पत्रकार संपुष्टात न आणता, आजही ते दै.तापिकाठ व साप्ताहिक तळोदा समाचार मधून पत्रकारिता करीत आहेत. तसेच या पूर्वी त्यांनी शांतता कमिटीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य, काँग्रेस सेवा दलाचे संघटक, युवा काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख, जेष्ठ काँग्रेस कमिटीचे क्रियाशीस सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदावर त्यांनी कामे पाहिले. आहे सध्या ते तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक असून त्यांच्या संघात आजही मोलाचे स्थान आहे. त्यांचे वेळोवेळी संघाला उपयोगी असे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. मनात कपट नसलेला, अतिशय नि:स्वार्थी, निर्लोभी आणि सदैव दुसऱ्यांना मदत करन्याची प्रवृत्ती असलेल्या, पैस्याचा मोह नसलेला धर्मनिरपेक्ष शब्दाला शोभेल असा निस्वारर्थी मनाचा भरत भामरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा........
गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६
आमलाड येथील भक्तांच्या नवसाला पावणारी मा सतिभवानी

तळोदा - पासून अवघ्या 2 कि.मी अंतरावर असलेल्या आमलाड येथील भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या मा सतिभवानी मंदिरात नवरात्री निमित्त भक्तांची मांदियाळी जमली आहे. शउ तकापूर्वी आमलाड येथील भागाबेन जाधव पटेल यांच्या स्वप्नात मा सतिभवानी देवी ने दर्शन देऊन आपणास जमिनीतून बाहेर काढ तुझा त्रास कमी होईल, असे सांगितले म्हणून स्वप्नातील जागेत आमलाडच्या शेत शिवारातून भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांनी देवी तांदळे स्वरूपात बाहेर काढून तेथेच प्रतिस्थापणा केली. कालांतराने देवीने पुन्हा स्वप्नात येऊन मला शेत शिवारातून गांव शिवारात आणून स्थापन करा. असा दृष्टांत दिला म्हणून 1972 मध्ये देवीची स्थापना मंदिर बांधून आमलाडच्या पूर्वेला भगवान जाधव पटेल यांच्या शेतात वेशीवर करण्यात आली. आजतागायत तेथेच देवी असून त्याच्या सोबत बहिरम देवाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. बाजूला तीन छोट्या मंदिरात ग्रामदैवत बसविण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की देवी काढल्यापासून आमलाड मधील ग्रामस्थाची भरभराट झाली. कालांतराने देवी नवसाला पावते म्हणून भक्तांची गर्दी वाढू लागली. अनेकजण पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी तर अनेक जण नवस बोलण्यासाठी येऊ लागले. भक्तांची गर्दी वाढू लागले म्हणून आमलाड येथील पटेल कुटुंबियांचे आजचे वारस नरेंद्र भाई भगवान पटेल, सुदामभाई रघुनाथ पटेल, अंबालाल भाई काशिनाथ पटेल यांनी पुन्हा मंदिर जीर्णोद्धार करून भक्तांच्या सोयीसाठी भव्य सभामंडप हवनकुंड बनविले. दरवर्षी येथे माघ शुद्ध अष्टमीला देवीचा भव्य स्थापना दिवस साजरा होतो.
नवरात्रित पंचक्रोशीतील अनेक भक्त मनोकामना पूर्ण झाली म्हणून देवीची तुला करून चांदीचा पाळणा चढवून विविध प्रकारे नवस फेडतात. मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अनेक जण नवस करतात. याच सोबत येथे पटेल कुटुंबीय त्यांचे वडील भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांच्या काळापासून म्हणजे सन 1974 पासून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविक भक्तांसाठी सदाव्रत चालवून त्यांच्या राहण्याची व जेवणाची रोज व्यवस्था केली जाते. एकावेळी 200 भाविक।निवास करू शकतात एवढी भव्य वास्तू त्यासाठी बांधण्यात आली आहे. या ठिकाणी रोज परिक्रमावासी थांबतात त्यांच्या साठी वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. याचा आज पर्यंत पटेल कुटुंबीयांनी कुठेच गाजावाजा केला नसून निस्वार्थ व अव्याहत पणे सेवा सुरू आहे......
भाविकांचे श्रद्धास्थान तळोदयातील आशापुरी माता..

तळोदा शहरापासून थोड्याच अंतरावर अंकलेश्वर ब-हाणपुर अंतरराज्यीय महामार्गावर शिरीष जगजाळ यांच्या शेतात वसलेल्या आशापुरी माता मंदिरांची स्थापना दि १/५/२०१४ मध्ये करण्यात आली आहे तळोद्यातिल कै शिवराम जगजाळ यांच्या कुटूबिंय गिरीश जगदाळ, शिरीष जगदाळ, दिलीप जगदाळ, कै नानाभाऊ जगदाळ, जयंत जगदाळ, शाम जगदाळ या परिवाराने आशापुरी माता देवीची स्थापना मोठ्या उत्साहाने झाली त्या देवीची आजपर्यंत मोठ्या समारंभाने पूजा अर्चा सुरु आहे भव्य मंदिर सभा मंडप असून संगमवर सुमारे तीन फुटाची आकर्षक विलोभनिय मातेची मूर्ति आहे मराठा, पाटील, लोहार या सह अनेक समाजातील चव्हाण कुळाची कुलदैवत असल्याने अनेक समाजातील चव्हाण कुळासह इतर समाजाचे कुलदैवत असलेल्या आशापुरी माता मूळ राजस्थान येथे भव्य दिव्य मंदिर आहे. मात्र परिस्थिति नुसार गरीब भाविकांना जाने शक्य
नसल्याने यापूर्वी शिंदखेड़ा पाटण येथील आशापुरी मंदिरात दर्शना साठी जात असत मात्र तळोद्यातिल जगजाळ परिवाराने काही वर्षापूर्वी आशा पूरी मातेची स्थापना केल्याने तळोदा तालुका परिसरा सह जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात नवरात्रि उत्सवानिमितांने सर्व समाजातील भाविकांची रेलचेल सुरु आहे नवरात्ति निमित्ताने भाविक नवस फेडत असतात सत्यनारायण पूजा, होम हवन कार्यक्रम होत आहेत...
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६
माझ्या बातमी नंतर गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी

दै. पुण्यनगरी च्या वृताने प्रशासन कामाला: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत तऱ्हावद गंगानगर येथील पाणी समस्या व इतर कामासाठी जिल्हापरिषदेच्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतुन गावात पाण्याची सोय केली जाणार आहे. सदर निधीमुळे विस्थापितांच्या पाण्याच्या प्रश्न कायमच्या मार्गी लागणार आहे. याबाबत नुकतेच दै. पुण्यनगरीने येथील समस्याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विस्थापितांनी समाधान व्यक्त केले आहे.
तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद (गंगानगर) गावातील पाण्याची समस्यांने उग्ररूप धारण केले आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. आश्वासन देऊन हि समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरीने गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी या शिर्षका खाली सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती... सन 2002 मध्ये तऱ्हावद पुनर्वसन येथे तेरा गावठानाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावाची लोकसंख्या दोन हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः आठशे 86 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासना कडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन गाव विस्तथापित करण्यात आले..मात्र विस्थापितानंतर येथील रहवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन 2002 मध्ये गावाला आमदार निधी व नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75 हजार लिटरची एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून
गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे गंगानागरकरानी आपल्या विविध मागण्याबाबत 27 जानेवारी 2016 रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 8 महिने उलटूनही समस्या न सुटल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र या समस्यांबाबत दि 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरी मधून सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आदिवासी उपाययोजने अंतर्गत विस्थापित झालेल्या तऱ्हावद पुनर्वसन गंगानगर गावातील पाणी समस्या व उपाययोजनेसाठी 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीमुळे पाण्याची समस्यां सुटण्यास मदत होणार आहे. या निधीतून 22 लाखाची रु खर्चून साडे सात कि.मी. पाण्याची पाईप लाईन केली जाणार आहे. दीड लाख रु रकमेचा स्विच रूम उभारला जाणार आहे. तसेच सोयीनुसार 5×2 प्रमाणे 3 लाख खर्चून 2 सार्वजनिक हौद, 80 हजार रकमेचे यंत्र सामुग्री बसविण्यात येणार आहे...
बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६
गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी ?
तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेले तऱ्हावद गंगानगर गावातील पाण्याची पाण्याची उग्ररूप धारण करीत आहे. 9 हातपंपापैकी 7 हातपंप नादुरुस्त असून मागील दोन वर्षापासून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आश्वासन देऊनही समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पुनर्वसन करून आमची फसवणूक केल्याचा आरोप पुनर्वसितानी केला आहे...
तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे.
शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर
तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे.
शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर
सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६
दानिश घडवतोय तळोदयात सामाजिक एकात्मतेचे दर्शन

मजहब नहीं सिखाता आपसमें वैर रखना..! या प्रमाणे तळोदा येथील 5 वीत शिक्षण घेणारा अकरा वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी यानें हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी, हा हेतू मनात ठेवून जाती धर्माचा तिढात न पडता एकतेचा प्रतीक असलेल्या गणपतीची स्थापना करुण एक आदर्श निर्माण केला आहे. दानिशला गणेश मूर्तीचे विशेष आकर्षण असल्याने. दानिश मूर्ती विक्रेत्यांकडे जाऊन मुर्त्या पाहत असे. दिवसभर विविध गणेश मुर्त्या पाहून दानिश कुतूहलाने मूर्ती विकर्त्याला हि मूर्तीबाबत माहिती विचारत असे. लालबागच्या राजा व दगडू शेठ हलवाई या मूर्त्यांचे दानीशला मोठे आकर्षण निर्माण झाले. श्रीच्या कथा ऐकून व विविध रंगीबेरंगी गणेश मूर्त्यांनी दानिशला चांगलाच आकर्षित केले. गणेश स्थापनेबाबत दानिशने त्यांच्या काही मित्राना विचारणा केली. त्यांच्या योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दानिश खचला नाही. त्याने कल्पना टॉकीज गल्लीतील बाळ गणेश मित्रमंडळातील अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या मंडपात आपला गणपती स्थापना करण्याची विनंती केली.. मंडपात मूर्ती बसविण्याच्या होकार मिळताच दानिशने खाऊच्या पैश्याने गणपतीची छोटीशी मूर्ती विकत घेऊन तीची विधिवत स्थापना केली. दररोज नित्यनियमाने मदजीतमध्ये नमाज अदा करून आल्यावर सकाळ, संध्याकाळी स्वतः श्रीची आरती करतो, नैवेद्य देतो व दररोज प्रसाद वाटप करतो. सत्यनाराणाची पूजा सह मंडपात होत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात दानिश मोठ्या भक्तीभावाने रमतो. दानिशने स्थापन केलेल्या श्री च्या मूर्तीकडे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सामाजिक एकात्मता जोपासली जावी यासाठी दानिश दरवर्षी श्रीची स्थापना करणार असल्याचे तो म्हणतो. याबाबत त्याच्याशी संवाद साधला असता. हिन्दू मुस्लिम में लढाई न हो. एकसाथ में सब मिलकर रहे कोई लढाई ना करे, भगवान तो भगवान होता है! हर भगवान की पूजा करे हर भगवान को नमस्ते करे, हर भगवान को सलाम करे।* असे त्याने सांगितले. दानिशच्या या उपक्रमाचे व त्याने निर्माण केलेल्या सामाजिक एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे......
रविवार, ११ सप्टेंबर, २०१६
माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.

माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस....
तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भराव खचला असून पुलाचे काम निकृष्ठ झाल्याचे सविस्तर वृत्त दै पुण्यनगरीने प्रसिद्ध करून प्रशासनाच्या बोगस काम चव्हाट्यावर आणले. या वृत्ताने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यासोबत पुलाची पाहणी केली. पुलावर ठिकठिकाणी पडलेले तडे, खचलेला भराव पाहून आमदार पाडवी चांगलेच संतापले. यावेळी त्यांना उपस्थित अधिकाऱ्याना धारेवर धरत कानउघाडणी केली. पुलाच्या बांधाकामात अपहार झाला असल्याचा आरोप करून कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सदर बाब गँभीर असल्याचे सांगुन संबंधीत विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले.
महाराष्ट्र व गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला. तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन व शहादा तळोदा विधानसभाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी 6 वर्षांपासून रखडलेला हतोडा पूल जून महिनापूर्वी सुरु करणार असल्याचे असश्वासन दिले होते. मात्र तापीनदीला पाणी सोडल्याने पुलाचे काम बंद आहे. 90 टक्के काम पूर्णत्वाकडे असताना पुलाचे झालेल्या कामाच्या ठिकठिकाणी तडे गेल्याने संबंधीत विभागाचे कामाचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहे याबाबत दै.पुण्यनगरीने शुक्रवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्याने प्रशासनाची झोप उडाली. या वृताची दखल घेत आमदार उदेसिंग पाडवी यांनी तात्काळ संबंधीत विभागाला दूरध्वनी करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पिंगळे व सहकारी यांच्यासह आ. उदेसिंग पाडवी विश्वनाथ कलाल, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहर अध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, युवा मोर्चाचे शिरीष माळी, माजी नगरसेवक भगवान मगरे, महेंद्र वाणी, माजी नगरसेवक भास्कर मराठे, आदींनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूलाचे निकृष्ट काम पाहून आमदार पाडवी यांनी सा.बा.विभागाचे अभियंता पिंगळे यांना चांगलेच धारेवर धरले. पुलावर आवश्यक तो भराव व रोलरींग न केल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. पुलाच्या दोघा बाजूच्या संरक्षण कठडयाच्या भराव पूर्णपणे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवशक्य तो भराव व रोलरींग न करता डांबरीकरणं का केले? हा संशोधनाचा विषय आहे. अधिकाऱ्यांनी बेजाबदार केलेल्या कामामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामाचा निधी वाया गेला असून सदर काम पुन्हा करावे लागणार आहे. हातोडा पूल हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा सेतू असल्याचे सांगत, पुलाचे काम निकृष्ठ दर्जेचे झाले असून यात अपहार झाला असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी यावेळी केला. याबाबत अभियंता सुनील पिंगळे यांनी वरिष्ठ याबाबत माहिती देतील म्हणत जबाबदारी झटकली. या पुलाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारकडे आहे. वेळोवेळी पाहणी करून योग्य त्या सूचना देऊन काम करवून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता वर्षा आहिरे, धुळे अधिक्षक वाघ यांची आहे. मात्र या अधिकाऱ्यानी पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशट्टी यांनी सदर बाब गँभिर असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दै. पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे यांना दिली......
हातोडा पूल विकासाचा सेतू आहे. याबाबत वेळोवेळी निधी साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध केला आहे. मात्र पुलाचा भराव खचला असून पुलाला मोठाली तळे गेली आहेत. पुलावर योग्य तो भराव व रोलरींग केली नसताना देखील त्यावर डांबरी करणं करून निधी वाया करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांनी अद्याप पावेतो एकदाही पुलाची पाहणी केलेली नाही. सदर अधिकारी कुणाचे फोन उचलत नसून कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. बेजबाबदार अधिकारी वर योग्य ती कारवाइ व्हावी याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे...
*आमदार उदेसिंग पाडवी* *शहादा - तळोदा विधानसभा क्षेत्र -*
![]() |
हातोडा पुलाच्या बातमीनंतर खान्देशात गाजला हातोडा पुलावर केलेला खान्देशी चिमटा |
![]() |
तात्काळ बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी घेतली व मला WHATSAPP वर कळवले... |
![]() |
दै.पुण्यनगरीची दखल बातमी |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)