Breking News

गुरुवार, २१ मे, २०१५

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार
 सातपुड्याच्या सौंदर्यात उंच-उंच टेकड्यासह विविध जाती प्रजातींचे वृक्षांचे वेगळेच महत्व आहे. काळानुपुर वृक्ष संपदा कमी होवुन, सातपुडा बोड़खा होवु लागला असला तरी आजही विविध प्राणी पक्षी ह्यांचे अस्तित्व टिकून आहे. सातपुड्यातील रानमेव्यास तेवढेच महत्व असुन राज्यासह परराज्यातून आलेले पर्यटक याची चव चाखल्याशिवाय येथून परत नाही. शुद्ध वातावरण, सेंद्रिय खतांच्या वापरातून उत्पादीत केलेले बोर, आवळा, सिताफळ ह्यासह स्ट्रॉबेरीला सिझननुसार मागणी वाढते. याच सातपुड्याचा कुशीतील गोपाळपुर येथील ` केसर' आंबाने सातासमुद्र ओलांडून तो विदेशातील लोकांचा पसंतीचा बनला आहे. ६० एकरच्या आमराईतील केसरसह विविध जातीचा आंबा राज्यचा कानाकोपऱ्यासह दुबई, इंग्लैंडसारख्या देशात पोहचला आहे. तर येथील आमराई सातपुड्याच्या सहलीवर आलेल्या पर्यटकानां आकर्षित करीत आहे. नंदुरबार जिल्हा हां सातपुड्याच्या पायथ्याशी बसला आहे. विशेषतः तळोदा, अक्कलकुवा, व धड़गाव हे तालुके सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आहेत. या तालुक्यांमधे भौतिक सुविधा
नसल्या तरी सातपुड्यातील वनसंपदा आजही टिकून आहे. काळानुरूप वृक्षतोड़ झाल्याने आज सातपुड्याच्या डोंगर बोड़खा दिसून येतो. मात्र याच दऱ्याखोऱ्यामधे आदिवासी बांधव बोर, आवळा, सिताफळ, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. शुद्ध वातावरण सेंद्रिय खतामुळे आरोग्याला चांगले असलेल्या या फळाना, सर्वत्र खुपच मागणी असते. तळोदा,तालुक्यातील गोपाळपुर येथील किर्तीकुमार राणा ह्या प्रगतशील शेतकाऱ्याने ६० एकर क्षेत्रात वनराई उभारली आहे. ह्या वनराईतील केसर आंबा हां राज्यातील कानाकोपऱ्यासह दुबई व इंग्लॅण्डसारख्या देशात निर्यात होवु लागला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ह्या आंब्याला विदेशातून मागणी वाढली आहे. ह्या आमराईतील श्री राणा ह्यांनी केसर सह हापुस, तोतापुरी, राजापुरी, गावठी, लंगड़ा अश्या विविध जातीच्या आंब्याचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याने ४० लाखाला आंबे काढण्याचा ठेका घेतला आहे. श्री राणा हे आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात त्यांना २००४ ह्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते उद्यानपंडीत पुरस्काराने गौरवन्यात आले आहे. १७ वर्षापुर्वी कीर्तिकुमार राणा ह्यांचे आजोबा स्व. रघुवीरसिंग राणा यांच्या आजोबाच्या संकल्पनेतून उभी राहिलेली गोपाळपुरची आमराई पाहन्याचा मोह अनेकांना होतो. हे विशेष, तर ह्या आमराईतील आंबा हां राज्यातील नंवे तर विदेशातील लोकांचा आवडीचा होत असल्याने साहजिकच त्याची मागणी वाढली आहे.....
                                         *आमराईत भटकंती करताना, 
                                            *आमराईची पाहणी करताना,
                                              *केसर आंब्याची चव घेताना,
                                      *आंब्याचा सावलीचा गारवा अनुभवताना,
                        *चटकदार, चवदार, दर्जेदार सातपुड्यातील केसर आंबा,



                                                             *बहरलेली आंब्याची बाग़

सोमवार, १८ मे, २०१५

अंसारी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे,
मात्र काही उदाहरणातून आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना तळोदयात घडली आहे. टैक्सीत पाँच ग्राम सोने व दोन हजाराची हरवलेली रोकड़ चालकाने महिलेच्या स्वाधीन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा येथील एक विवाहिता आपल्या दोन मुलांसह शहादा येथून तळोदा प्रवासादरम्यान मुलांच्या खेळणी काढण्यामुळे पाँच ग्राम सोने व सुमारे दोन हजाराची रोकड़ असलेली पर्स टॅक्सी (क्र एम्.एच.39-7488) मधे हरवली. सदर बाब दुसऱ्या दिवाशी महिलेच्या लक्षात आली. त्यामुळे पर्सचा शोध सुरु झाला. सदर महिलेने शहादा येथील माहेरी आई व भावाला फोन करुण विचारणा केली. मात्र त्यानीही घरी शोध घेतला. मात्र पर्स न सापडल्याने कदाचित पर्स टैक्सीत राहिले असावे. अशी शक्यता धरून चालकाच्या शोध घेतला. टॅक्सी चालाक अनीस अंसारी यांची भेट घेवुन त्यांना विचारणा केली असता श्री अंसारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पर्स असल्याचे सांगीतले. व सदर पर्स नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पर्स उघडुन पाहीले असता त्यात सर्व ऐवज सुरक्षीत होते. चालकाच्या प्रामाणिकपणा म्हणुन श्री. अनिस अंसारी यांना बक्षिस रूपाने काही पैसे देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नम्रपने नाकारले. मागील १२ वर्षापासुन टॅक्सी चालवित असुन अनेक प्रवाशांचा वस्तु वाहनात राहतात. मी दिवसभरातुन पाच वेळा नमाज पठण करतो. या वस्तु ग्राहकांना परत देताना मला समाधान लाभत असल्याचे अन्सारी यांनी दै. पुण्यनगरीशी बोलताना सांगितले दरम्यान अंसारी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे...

रविवार, १० मे, २०१५

लाकडी बैलगाडे संपुष्टात


तळोदा तालुक्यात सध्या मशागतींच्या कामांना शेतकर्‍यांनी वेग दिला असून खरिप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरीवर्ग सज्ज झाला असून मशागतींसाठी लागणार्‍या लाकडी औजारे व लाकडी बैलगाडे संपुष्टात आले आहेत. ग्रामिण भागात लाकडी साधनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मशागतीसाठी लागणार्‍या नांगर, पांभर, वखर, टिकाव, फावडी, कोळपे आदी प्रकारच्या लाकडी औजारांची ग्रामिण भागात कमतरता जाणवत असून त्याजागी लोखंडी औजारांचा प्रामुख्याने शेतकरी वर्गाकडून वापर करण्यात येत आहे. ग्रामिण भागात सुरुवातीच्या काळात लाकडी औजारांची दुरुस्ती गावातील सुताराकडून धान्याचा मोबदला देवून करण्यात येत होती. परंतु आता चांगल्या प्रकारच्या लाकडांची उणीव जाणवत असल्याने त्याचप्रमाणे ते बनविण्यासाठी खर्च व वारंवार दुरुस्ती करावी लागत असत.काम चालु असताना बिघाड झाल्यास काम सोडून घरी येणे भाग पडत असत. यासाठी लाकडी
औजारांच्या जागी लोखंडाची औजारे शेतकरी वर्गाकडे दिसत आहेत. या औजारांना वारंवार दुरुस्तीची आवश्यकता भासत नाही. भासते तर तत्काळ दुरुस्ती करणारा कारागिर तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावात उपलब्ध होतो. मात्र लाकडी औजारे दुरुस्ती करणार्‍या कारागिरांचा ग्रामिण भागांमध्ये तुटवडा जाणवत असतो. तालुक्यातील ग्रामिण भागांमध्ये लाकडी बैलगाडे संपुष्टात आली असून त्याजागी लोखंडी बैलगाड्यांचा सर्वत्र वापर दिसून येत आहे. लोखंडी बैलगाडे जास्त कालावधीपर्यंत टिकत असते. त्याचप्रमाणे वारंवार दुरुस्तीची गरज पडत नसल्याचे मत शेतकरी सांगतात. सध्या तालुक्यात मशागतींच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर प्रामुख्याने करताना दिसून येत आहे.
बहुतेक शेतकर्‍यांनी आपली बैलजोडीची बाजारपेठेत विक्री केली असल्याचे मत अनुभवी शेतकरी सांगतात. अल्पभूधारक शेतकर्‍यांना बैलजोडी सध्या परवडण्यायोग्य नसल्याचे समजते. यांत्रिक साधनांच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. नवनविन   प्रयोग शेतकर्‍यांकडून  करण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक उत्पादनात वाढ होताना दिसून येत आहे....

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

वर्ग 2 ते 4 ची 586 पदे रिक्त तळोदा प्रकल्प विभाग, 
रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत


शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

शस्त्रक्रियेद्वारे महिलेच्या पोटातून काढला साडेचार किलोचा गोळा

अबब... महिलेच्या पोटात साडे चार किलोच्या गोळा

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया



गेल्या 6 महिन्या पासून पोट दुखीमुळे त्रस्त असलेल्या मोलगी येथील रहवासी मालुबाई पाडवी (वय 30) या महिलेच्या पोटातील चार किलोची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात डॉ.राजेश वसावे व ह्यांच्या टीमला यश आले आहे.. गेल्या 6 महिन्यापासून काठी मु.पो.मोलगी येथिल रहवासी मालुबाई जगनसिंग पाडवी ह्या
महिलेच्या पोटात सतत दुखत होते. कालातरांने पोटाचा आकर ही वाढला. पोटात असलेल्या गाठीचा आकार वाढत गेल्याने तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने उपचार घेणे कठीन होऊन बसले होते. अशा अवस्थेतच ही महिला शेतातील अंगमेहनतीची कामे करीत होती. सदर गाठ ही अंडाशयच्या व गर्भाशयाच्या जवळ असल्याने पोटभर पसरली होती. ही गाठ आंतड्याला व गर्भाशयाच्या पिशवीला चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया करणे ही कठीण होते. अश्या स्थितीत, 2 तासांच्या कठीन शास्त्रक्रियाच्या प्रयत्ननाने डॉ.राजेश वसावे व त्यांचा सहकार्यानी आंतड्याला इजा न होऊ देताही शस्त्रक्रिया यशस्वी केली.त्यांना स्त्री रोग तज्ञ डॉ.सातपुते, सर्जन प्रशांत ठाकरे, भूलतज्ञ डॉ.मनीषा पाटील, सर्जन डॉ.रोहीत वसावे, आदिची मेहनत लाभली. वर्षभरात अक्कलकुवा, धडगाव,मोलगी,तलोदा, परिसरातील रुग्णना लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून खासदार डॉ. हिना गावित,तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार उदेसिंग पाडवी, के.सी.पाडवी, ह्यांच्या सहकार्यातून वर्षातून 2 वेळा सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येवून रुग्णांची तपासणी केली जाते. व आवश्यकते नुसार शस्त्रक्रिया करन्यात येते. मागील काही वर्षापासून तलोदा उपजिल्हा रुग्णालय सुसज्जपने मोठ्या रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया तलोद्यासारख्या भागात गोर गरीब जनतेसाठी तलोदा उपजिल्हा रुग्णालय वरदान ठरत आहे..

रविवार, २९ मार्च, २०१५

स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांच्या BDO ला घेराव

थकीत मानधनासाठी स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांच्या 
तळोदा गटविकास अधिकाऱ्याला घेराव

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

तळोदा प्रशासकीय इमारतीचे विजबिल थकले

तळोदा प्रशासकीय इमारतीचे चार लाख विजबिल थकले 
 विज वितरणने केला पाणी व स्ट्रीट लाईटच्या विज पुरवठा खंडीत


गुरुवार, २६ मार्च, २०१५

तळोद्यात क्षयरोगाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय ह्यांच्या सयुंक्त विद्यमानाने क्षयरोगदिनाच्या पुर्व संध्याकाळी क्षयरोगाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले..

गुरुवार, १९ मार्च, २०१५

तळोदा नगरपालीका अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली

तळोदा नगरपालीका हद्दीतील अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली असून येत्या काळात टप्पाटप्पाने ही मोहिम राबविण्यात येईल, तसेच नागरपालीकेचा मालकीचा जागेवर बस स्थानक भागातील व्यवसायिकाना
लवकरच पुनर्वसन करून त्यांचा रोजगारचा प्रश्न मिटवुन पालिका आर्थिक उत्पन्न वाढविन्यासाठी नियोजनही करणार असल्याचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांची भेट घेतली असता प्रस्तुत प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले. तळोदा नगर पालीकेने गेल्या तिन दिवस सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील कॉलेज रोड. हुतात्मा चौक .तहसील कचेरी रोड.स्मारक चौक. नगरपालीका परिसर.सोनारवाडा. हातोड़ा रोड.ख्वाजा नाईक चौक . देशपांडे फोटो स्टूडियो ते बस स्थानक परिसर. शहादा रोड चीनोदा रोड बदरी कॉलनी रोड अश्या शहरातील महत्वाचा भागातील रस्त्यावर मोहीम जोरदार राबविण्यात आली तिनदिवस केलेल्या कार्यवाहित
एकूण ५७९ किरकोळ व् पक्के अतिक्रमण धारकावर पालिकेकडून कार्यवाही करण्यात आली दरम्यान पालीकेचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांनी घेतलेल्या ठोस भूमिका ही सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तळोदा पालीकेच्या इतिहासात प्रथमच एवढी ठोस कार्यवाही पवार यांनी केल्यान त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही ही फार मोठी जबाबदारी मुक्याधिकारी आणि पालिकेची राहणार आहे.
कारण या मोहिमेनंतर पुन्हा शहरात जैसे थे परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . मुख्याधिकारी .प्रांतअधिकारी व् तहसीलदार आदींची अतिक्रमण धारकानी घेतली भेट तलोदा बस स्थानक भागातील छोटे व्यसायीक बस स्थानकचा असलेल्या भिंतीलगत होते. मात्र शेवटचा टप्प्यात हे सुद्धा अतिक्रमण हटविन्यात आले याबाबत श्री जालंधर भोई यांनी इतर हाथगाड़ी धारकासह प्रांत अधिकारी श्री देवदत्त केकाण व तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांची भेट घेवून व्यथा मांडली व् पुनर्वसन करताना आम्हाला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली याबाबत मुख्याधिकारी व् प्रांतअधिकारी व तहसीलदार यानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याच् अतिक्रमण धरकाकडून सांगण्यात आले.
 * जनार्दन पवार यांची भूमिका अतिशय महत्ववाची = तलोदा नगरपालीकेच्या इतिहासात अनेक अनुभवी व नावजलेले मुक्याधिकारी येवून गेले मात्र येथे रुजू होण्यागोदार इरिगेशन खात्यात कामाचा अनुभव असलेले श्री जनार्धन पवार हे मुख्याधिकारी या पदावर प्रथमच सुरुवातीला तलोदा नागरपालीकेत रुजू झाले मात्र रुजू झाल्यानंतर तलोदा शहरातील अत्यंत महत्वाची असणारी अतिक्रमण मोहीम हाती नुसती घेतली नाही तर नगरपालिकेच्या जागा मोकळी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न आपल्या ठोस कृतीतून दाखवुन दिले त्यामूळे ते आता तळोदेकर जनतेचा कायम लक्षात राहतील गेल्या तिन दिवस चाललेल्या या मोहीम अंतर्गत अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवले मात्र
मुख्याधिकारी यांनी अतिशय शांतपने व् प्रसंगी कठोर भूमिका घेवून अतिक्रमण मोहीम यशस्वी केली. त्यांची पर्त्यक्षभेट घेतली असता सर्वसामन्य नागरीकाला माझ प्रथम प्राधान्य राहणार असल्याच् सुतोवाच त्यानी केले. तसेच छोटे व्यापरी संकुल तयार करण्याचे आव्हान ह्याप्रसंगी दिले. यामुळे पालीकेच्या आर्थिक सोर्स वाढणार व अतिक्रमण मोहिमेत ज्यांचा व्यवसाईक रोजगाराचा प्रश्न लवकरच सकारात्मक पने सोडवू असा विश्चास व्यक्त केला. अतिक्रमण मोहिमेंनंतर पुन्हा ते होणार नाही ही फार मोठी जबाबदारी पालीका प्रशासनची असेल तसेच लवकरच नागरिकांची तक्रार दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक नागरपालिकाचा माध्यमातून सुरु करीत असून पालीकेत कोणताही कर अथवा आर्थिक भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्दत लवकरच सुरु करणार असल्याच त्यांनी सांगितले.

 * अतिक्रमण बधित अन्याय निवारण समिती शहरातील या मोहिमेत अन्याय झाल्याची भावना काही नागरिकामधे असून या बाबत अतिक्रमण बाधित अन्याय निवारण समितिची मीटिंग घेण्यात आली.
















सोमवार, १६ मार्च, २०१५

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली  ■ एकीकडे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना
दुसरीकडे अनेक व्यावसायिक स्वत:हून आपली अतिक्रमणे हटवित असल्याचे दृश्य सकाळनंतर दिसून आले. तसेच ज्यांनी आपल्या घरापुढे अतिक्रमणे केली होती असेही नागरिक नुकसानीच्या भीतीपोटी स्वत:हून अतिक्रमित भाग काढत असल्याचे दिसत होते. तळोदा :शहरात पालिकेमार्फत सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून कॉलेज रोड येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १२ जानेवारी २०१५ रोजी ५७९ अतिक्रमण धारकाना नोटिसा बजावल्यानंतर आज १६ मार्च रोजी अतिक्रमणाला उत्साही सुरुवात
करण्यात आली. पहिल्या दिवशी शहरातील एकूण १२० अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढताना व्यापारी व मुख्याधिकार्‍यांमध्ये छोटे मोठे वाद देखील झाले. अतिक्रमणात असलेली घरे, दुकाने, इमारती, टपरी, ओटे, पायर्‍या इत्यादी बुलडोझर व जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्यात आले. शहरातील कॉलेज रस्त्यावर येणाऱ्या किरण गॅस
ऐजंसीचे मालक ह्यांच्या ३ फुट अतिक्रमण ओटा काढण्यात आला. तर त्याच परिसरात घरचा वरच्या मजल्यावर मोती बँकेचे कार्यालय तर खाली वीज वितरण कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीचा १० ते १२ फुट पुढील भाग येत असल्याने तो पालिकेने तोडला. या मोहिमेचा फौजफाटा,
अधिकारी-कर्मचार्‍यांचा लवाजमा पाहून अनेक दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानांचे शेड काढून घेतले. काहींनी स्वत: अतिक्रमणे काढून घेतली. हुतात्मा चौकातील हॉटेल समाधानचे अतिक्रमण काढताना हॉटेल मालक मोहन कलाल, व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात वाद झाला. या वेळी दुकानदाराचे म्हणणे होते की, आम्हाला पालिकेने नोटीस दिलेली नाही. आमचे अतिक्रमण नाही, यावर मुख्याधिकार्‍यांनी सांगितले की, हे अतिक्रमण आहे. ह्याविषयावरुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर मुख्याधिकार्‍यांनी नगर भूमापन अधिकार्‍यांकडून दुकानाची रीतसर मोजणी करून घेऊ, अतिक्रमण नसल्यास पालिकेकडून त्यांना नुकसान
 झाले असल्यास भरपाई मिळणार असल्याचा दावा केला. स्मारक चौकात जंगशहीद बाबांचा दर्गा आहे. या दग्र्याचा काही भाग अतिक्रमणात येतो, असे पालिकेचे म्हणणे आहे. येथे मुस्लीम समाज पंचाने समजूतदारपणा दाखवून जो भाग अतिक्रमणात येतो, तेवढा भाग स्वत:हून काढून घेतला. यामुळे येथील वाद टळला. या मोहिमेत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक सतीश भामरे, फौजदार डी.बी. लोंढे, दिलीप चौधरी, युवराज साळुंखे यांच्यासह स्थानिक तसेच बाहेरील पुरुष व महिला कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.
ही मोहीम सुरू होताच शहरातील बघ्यांची प्रचंड गर्दीजमा झाली. या गर्दीला आवरणे पोलिसांनाही अवघड झाले होते. पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, नगर भूमापन यांच्यासह इतरांचा प्रचंड ताफा हजर होता. शहरातील अनेक घरांवरून विजेच्या तारा गेल्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीनेही वीजपुरवठा बंद केलेला होता. ही मोहीम तीन दिवस चालणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात कॉलेज रस्ता, हुतात्मा चौक, स्मारक चौक, मेन रोड या भागातील १२० अतिक्रमणे काढण्यात आली. नगर भूमापन अधिकारी उपस्थित नसल्यामुळे याबाबत तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या.
शहरात आज सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यात एकुण २५० अतिक्रमण धारकांवर हतोडा फिरवण्यात आला. हयात अनेक प्रतिष्ठीत, व्यापार्‍यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. शहरात कालपासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. अतिक्रमण काढतांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता मोहिम राबविण्यात येत आहे. अनेक उच्चभ्रू, प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर मोहिमेत
शहरातील ५७९ अतिक्रमण धारकांना पालिका प्रशासनातर्फे यापुर्वीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आज मारोती मंदिरापासून मेनरोड, गणपती गल्ली, तेथून पुढे थेट हातोडा रस्त्यावरील शेठ के.डी. हायस्कूलपर्यंत, स्मारक चौकापासून पुढे देशपांडे फोटो स्टुडिओपर्यंत बसस्थानकाकडे जाणारा मार्ग, त्यापुढे जुनी सुभाष टॉकीज मार्गावरील पोलीस ठाण्यापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना अनेक ठिकाणी  दुकानदार व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात दुसर्‍या दिवशीही वाद  झाले. पण
 मुख्याधिकार्‍यांनी कोणत्याही वादात न पडता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काम सुरू ठेवले. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसर्‍या दिवशीही बंदोबस्तासाठी प्रचंड फौजफाटा होता.  तळोदा पालिका हद्दीत तिस-या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत आज 209 अतिक्रमण काढण्यात आले बस स्थानका पासून अंतरावर असलेल्या शिवराम नगर जवळ अतिक्रमण काढण्यात येत असतांना अचनक काही अतिक्रमण धारक व शहरात प्रतिष्ठित असलेल्या लेखी निवेदन घेऊन मुख्याधिकारी पवार यांना न्यायालयात याबाबत दावा सुरु आहे व स्थगिती आली असल्याचे सांगत अतिक्रमण हटाव बंद करा मात्र मुख्याधिकारी यांनी तसा आदेश द्या सांगिल्यावर वाद घातला यामुळे काही काळ तनाव निर्माण झाला होता तळोदा पालिकामार्फत गेल्या तीन
 दिवसा पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली पहिल्या दिवशी 120 दुस-या दिवसी 250 तर आज तिस-या दिवशी209अतिक्रमण काढण्यात आले तीन दिवस सुरु असलेल्या मोहिमेत एकूण 579 अतिक्रमण हतविन्यात आले. आज देशपांडे फोटो ते बस स्थानका पर्यन्त शहादा रोड शिवराम नगर हरकलाल नगर मेनरोड नंतर चिनोदा रोड, बडरी कॉलनी, मुख्य रोड, अदि पर्यन्त अतिक्रमण हट्विन्यात आले प्रांतधिकारी देवद्त्त केकांत तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांनी लक्ष्य ठेवून होते. हयात पालिका प्रशासन मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्रीमती. उषारानी देवगुणे तथा पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.....