Breking News

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

कुंडलेश्वर शबरीधाम

गरम पाण्याचे झरे अन थुई थुई 
नाचणारा मोर कुंडलेश्वर परिसर देतो मनाला शांती

सातपुडयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या वनराईत उंच टेकडयांवर वाहणारे गरम पाण्याचे झरे आणि त्याच परिसरात थुई थुई नाचणारा मोर पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेड़ते. तळोदा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील कुंडलेश्वर शबरीधाम महादेव मंदीर हे पाचशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर असुन याठीकानी नेहमी भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारा व मनाला शांती देणारा महादेव असल्याची ख्व्याती येथे प्राप्त झाली आहे. त्यामुळे आदिवासी उपायोजनेंतर्गत वनपर्यटक विकास निधीतुन निसर्गरम्य पर्यटन स्थळाची विकास कामे याठिकाणी करण्यात आली आहेत. तळोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर शबरीधाम महादेव पाचशे वर्षापुर्वीचे पुरातन मंदिर आहे. मंदिर उंच। टेकडीवर असुन सातपुडयाच्या रांगेतुन एक नदी बारमाही वाहते. या नदीजवळ दोन गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या। झ-यांच्या पाण्यात अंघोळ केल्याने त्वाचारोग बरा होत असल्याची भावना आहे. या तीर्थक्षेत्रावर मकरसंक्रांतीला मोठी
यात्रा भरते. १५ वर्षापुर्वी याठिकाणी संत तारादास बापुंनी मौनवरद घेतले. यावेळी भाविकांनी या मंदिराच्या पायथ्याशी टेकडी खोदुन भव्य असे पटागन तयार केले आहे. मंदिराच्या पटागंनावर कौलारु आश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. याठीकानी भाविकांना मुक्काम करण्याची सोय झाली आहे. महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात सातपुडयाच्या पर्वत रांगांमधुन पाणी वाहते. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. त्याला भाविक गुप्तगंगा असे देखील म्हणतात. मंदिराच्या पायथ्यालगत नदीच्या किनारी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या पाण्यात गंधकाचे स्त्रोत असल्याने त्वचारोग दुरुस्ती होत असल्याची भावना भाविकांची आहे. मकरसंक्रातीच्या यात्रेला भाविक रात्रीच्या प्रवास करुण या झ-याखाली अंघोळ करतात.
त्यानंतर जागरूत महादेवाचे दर्शन घेवुन निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद लुट्तात. कुंडलेश्वर परिसराला पर्यटनाचा दर्जा लाभल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी ओसाडु लागली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसह निसर्गप्रेमी येथे भेट देतात. त्यामुळे याठिकाणी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे। आहे. भाविकांसाठी भक्त निवास, महिलांसाठी स्वतंत्र प्रासधनगृह बांधन्याची गरज आहे. श्रीक्षेत्राकड़े जाण्यासाठी अर्धा km अंतराच्या कच्चा रस्त्याने प्रवास करावा लागतो. पारंपारीक कौलारू घरे मनमोहित करतात. कुंडलेश्वरला पोह्चताच त्याठिकाणी असलेले मोर आपल्या नृत्यात दंग असल्याचे दिसून येते. याठिकाणी वनविभागाने विश्रामगृह उभारली आहे.
तर अद्यावत निसर्ग पर्यटन कुटीची निर्मिती करण्यात आली आहे. निसर्गाच्या आनंद लुट्ण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक नेहमीच याठीकाणी गर्दी करतात. त्यामुळे परिस्रालाक यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. बदलत्या काळानुसार श्रीक्षेत्र कुंडलेश्वराचे पारंपारिक रूप बदलत। आहे. या धार्मिक स्थळाचे जतन करणे गरजेचे आहे.














शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

स्वातंत्र दिन


भारतीय स्वातंत्र दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. बोरद- भारतीय स्वातंत्र् दिनाचा 67 वा वर्धापन दिन विविध कार्यालयामध्ये तथा शाळामधे विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र् दिना 67 व्या वर्धापन दिना निमित्त तलोद्यातील नामांकित पी.ई.सोसायटीच्या। शेठ के.डी.हाईस्कूल येथे संस्थेचे सचिव बच्छुसिंग परदेशी ह्यांचा हस्ते ठीक सकाळी 7:20 ला ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्याना चॉकलेट वाटप करण्यात आले. विद्यार्थीनींनी स्वातंत्र गीत सादर केले. व NCC पथकाने विविध कवायत करुण उपस्थित मान्यवरांचे मन जिंकली. अनेक मान्यवरांच्या उपस्थित
ध्वजारोहनाचा देखना सोहळा पार पडला. त्यावेळी प़ी.ई.सोसायटीचे अध्यक्ष (चेरमन) लक्ष्मणआप्पा माळी, न.पा.प्रतोद भरतभाई माळी, नगरसेवक संजय माळी, सतीवान पाडवी, प़ी.ई सोसायटी सदस्य अरविंद मगरे, भगवान् चौधरी, विश्वनाथ कलाल, लालासा कलाल, भगवान माळी, यू.जी.पिंपरे, गरबळ छगन माळी, रविंद्र मगरे, मुरलीधर सागर, हेमंत भामरे, प़ी.आर.खुनिपिंपरे, ईश्वर चव्हाण, एम्.इन.पाटिल.एस.के.सागर. के.एस.पाटील , सुधाकर मराठे, पवन मगरे, आर के पाठक,
भगवांन सूर्यवंशी, गणेश सोशल ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, पंकज माळी, जितेंद्र सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थीत होते. ह्या प्रसंगी भरतभाई माळी ह्यानी जुन्या स्मृती जागवत अमर जवानाणा श्रदांजली वाहिली व भारत माता की जयचा नारा लगावत स्वातंत्र दिनाचा शुभेच्छा दिल्या.









भारतीय स्वातंत्र दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज अक्कलकुवा येथे स्वातंत्र दिन साजरी करण्यात आला. न्यु.इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.एस.साळवे, ह्याचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी पी.ई.सोसायटीचे सदस्य काशीनाथ पवार, जगदिश पवार, वी.बी.पटेल.के.डी.पाठक, एच.के.चव्हाण, एम्.एम्.जगताप, ऐ. एच.टवाळे,एम्.एन.इंगळे, एम्.जी.मगरे, ऎ.पी.भारती, एस.वी.चौधरी, के.आर.वळवी, आर.डी.माळी, वी.एस. साळवे, एन.गोसावी, पी.ठाकरे, आर.एच.माहिरराव. आर.ई.चव्हान, श्रीमती. एन.एच.वसावे,बी.यु.गोसावी, सी.टी.गायकवाड, आदी उपस्थीत होते.


शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

मृत्युला चुना लावणारे, राजुभाई पानवाल

मृत्युला चुना लावणारे, राजुभाई पानवाल जिवंत परत येणार नाही असे असतांना सुद्धा सतत 33 दिवस मृत्युशी झुंज देत.. साक्षात यमाला चुना लावत  तळोदा शहरातील एक पानवाला सुखरूप जिवंत घरी
परतल्याची घटना घडली आहे. राजेशभाई एकनाथ बारोट असे त्याचे नांव् असुन राजुभाई पानवाला म्हणुन ते तळोदा शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहेत. देव तारी त्याला कोण मारी ? ही म्हण त्यांच्या बाबतीत अक्षरश: खरी ठरली आहे. एकेदिवशी अचानक त्यांना घरी चक्कर आल्यामुळे ते आजारी पडले. त्यानंतर त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर डॉ.राजेश वसावे ह्यानी औषधोपचार केले. तरी सुद्धा त्यांच्या तब्येतीत फरक दिसु न लागल्याने. नंदुरबार येथील डॉ.रोशन भंडारी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. करण्यात आले. नंदुरबार येथे आल्यानंतर राजेशभाई बारोट हे अचानक कोम्यात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची रवानगी धुळे येथे करण्यात आली. तेथेही डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीपुढे हात टाकले. त्यामुळे आता त्यांचे काही खरे नाही असे वाटत असतांना नातेवाईक व त्यांच्या
 मित्रांच्या आग्रहाखातर राजुभाईना बडोदा येथे नेण्यात आले. तेथील रुग्णालयात ते 33 दिवस कोम्यात होते. त्यावेळी डॉक्टरांनी निदान केले. की त्याना ब्रेन हेम्रेज झालेला आहे. त्यामुळे ते आता वाचतील याची गँरंटी नाही. असा ईशारा वैद्कीय सुत्रानी दिल्यामुळे त्यांचा आता देवच मालीक राहिला होता. त्यांच्या ताबेतीसाठी कुटुंबीय, नातलाग, मित्र, हितचिंतक यानी सर्व देवाना आपापल्या परीने साकळे घातले होते. या दवा अन दुवाचा असर राजुभाई यांच्यावर अखेर झाला. ते हळुहळु बरे होवु लागले. आणि अक्षरश: मृत्युच्या दारातुन ते परत आले. या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसेना. परंतु राजुभाई मृत्युशी दोन हात करत बरे झाले आहेत. हे सत्य आहे. त्यांच्यावर बडोदा येथील डॉ.मेघा, डॉ.देवांशी, डॉ. जिग्नेशा यानी मोठ्या परीश्रमाने स्वत:चे वैद्कीय ज्ञान अनुभवाचा कसोटीवर घासुन उपचार केले. डॉक्टर देव असतो हे म्हणणे या वैद्कांनी खरे ठरविले. राजुभाईच्या या संकट काळात त्यांचे मोठे बंधु राजु बारोट, किशोर बारोट, व मित्र परिवार सुरज माळी, पृथ्वीराज राजपुत, अजय सोनवणे, सादिक शेख़, ह्या मित्रांची साथ लाभली. राजुभाई हे मनसेचे पदाधिकारी असुन त्यांनी सन २०१२ च्या तळोदा न.पा. निवडणुकीत उमेदवारी केली होती. सध्या ते मनसे तालुका सचिव या पदावर आहेत. राजुभाईच्या या आजाराची कहानी लोकांना कळताच लोक त्याना भेटायला मोठ्या संखेने येवु लागली. तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाने देखील त्यांची सदिच्छा भेट दिली....


सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

गणेशोत्सव





























तळोदेकरांचे टिळकांवरील प्रेम

`स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो मी मीळवनारचं ' अशी सिंहगर्जना करुणलोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिश सरकारविरुद्ध एल्गार पुकारला या घोषणेने स्वातंत्र सेनानींमधे स्फुलींग चेतवण्याचे काम केले. जनतेला एकत्र करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात त्याकाळी केली. त्यामुळे स्वातंतत्र्यकाळातील प्रेरणादाई इतिहासाची आठवण करुन देणारे तळोदा येथील स्मारक राज्यातील एकमेव कायमस्वरूपी स्मारक म्हणुन ओळखले जाते. तळोद्यातील गणपती मंदिर व लोकमान्य टिळकांचा पहिला पुतळा 94 वर्षात पदार्पण करीत आहे. ब्रिटीशाना खड़साविणारे आणि प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र लढ्यात सहभागी होऊन इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारणा-या लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र लढ्याची तळोदा शहराशी नाळ जुडली आहे. तळोद्यातील गणपती मंदिराचा स्वातंत्र्य संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तळोद्यातील गणपती मंदिराचा कमाणीवर लोकमान्य टिळकांचा एकमेव पुतळा आहे. तळोद्यातील संस्थानिक श्रीमंत कृष्णराव आनंदराव बारगळ जहागीरदार यांची मुंबई येथील सरदारगृह हॉटेलात लोकमान्य टिळकांशी भेट झाली. त्यावेळी त्यांच्या भारत स्वातंत्र करण्याच्या मुद्यावर दोघांमधे विचारांचे आदान-प्रदान व्हायचे. बारगळ जहागिरदारांच्या आग्रहास्तव टिळकांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन तळोद्याला येण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे खान्देश दौ-यादरम्यान तळोद्यात बारगळ गढीत सभेचे आयोजन करण्यात आले होते
तालोद्याकडे येत असताना धुळयाजवळ टिळक आजारी पडले. त्यामुळे टिळकांचे ख़ास सहकारी विचारवंत न.चि.केळकर याना पाठविले व सभा पार पडली. स्वातंत्र संग्रामात टिळकांशी संबंध आल्याने ब्रिटिश सरकारला राग आला. त्यावेळी खान्देश कलेक्टर नाईट यानी बारगळाचे शस्त्र जप्त करण्याचे आदेश देवुन त्या कारवाईत पाच बैलगाड्या, बंदुका, तलवार, दानपट्टे, भाले, धनुष्यबान, छोट्या तोफा जप्त करण्यात आले. मात्र तळोदेकरांचे टिळकांवरील प्रेम, त्यांचे विचार मनात रुजत गेले. टिळकांच्या स्वातंत्र लढ्यात सहभाग वाढतच गेला.
१ ऑगस्त १९२० रोजी टिळकांचे निधन झाले. तेव्हा बारगळानी शाही पालखीत टिळकांचा फोटो ठेवुन तळोद्यातुन प्रतीकात्मक शव यात्रा काढुन हातोड़ा नदीवर जावुन विधी केला. शोभायात्रेत संपूर्ण तालुका परिसरातुन जनसागर लोटला होता. श्रदांजली वाहताना कृष्णराव बारगळ यांनी टिळकांचे स्वातंत्रासाठी दिलेले योगदान, समाज जागृती, ऐक्य, संस्कृती जतनासाठी टिळकानी शिवजयंती व गणेश्तोत्स्व सुरु केले आहे. या लोकमान्यचे स्मरण रहावे, पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, इतिहासाची आठवण रहावी म्हणुन बारगळानी इच्छा व्यक्त केली. त्यात लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर सवंत १९२१ ला एक
वर्षाच्या आत गणपती मंदिर बांधुन त्या मंदिराच्या प्रवेश कमाणीवर लोकमान्य टिळकांच्या संगमरवरी दगडाच्या पुतळा बसविण्यात आला. जिल्ह्यासह राज्यात एकमेव टीळकांचे स्मारक म्हणुन ओळखले जाते. टिळकांच्या स्मृती जोपासत तळोद्यातील स्मारक मंदिर आहे. गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमाणीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा सण २०१४ साली ९४ वर्षात पदार्पण करत आहे.