गणरायावर विशेष श्रद्धा असणारे तळोदा येथील ओंकार शंकर गाढे हे मागील 50 वर्षापासून सार्वजनिक दादा गणपती मंडळात सक्रिय आहेत. दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता देखरेखेची जबाबदारी त्याच्याकडे असते. त्याकरिता 11 दिवस मंडपातच त्याचा पडावा असतो. शेवटल्या दिवशी कागद व बांबू पासून साकारलेले प्राणी व पशुचे प्रतिकात्मक अवतार धारण करून ते मिरवणूकित सहभागी होतात. मागील 50 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू असलेल्या हा अवतारी उपक्रम आजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. ओंकार गाढे यावर्षी कुठला अवतार बनवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यंदाचा मिरवणुकीत गाढे यांनी अश्व तयार केले होते. अश्वनृत्य पाहण्यासाठी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ओंकार गाढे हे हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. ओंकार गाढेचे सार्वजनिक दादा गणपती मंडळाला लाभलेले कार्य उल्लेखनीय आहे. यावरूनच त्यांची गणराया बद्दल असलेली श्रद्धा लक्षात येते. वयाच्या आकडेवारीत म्हातारपण आलेला पण तरुणाला ही लाजवणारे 67 वर्षीय ओंकार गाढेचा या कार्याला सर्वाच दाद मिळत आहे... ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे गंणेशोत्सवापूर्वी सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. त्यानंतर ओंकार गाढेनी ही परंपरा कायम ठेवली आहे....
Breking News
केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" पुरस्कार प्रदान
sudhaspari - Mar 08 2025साधेपणात लपलेला मोठा अर्थ: प्रशांत पाटील
sudhaspari - Mar 08 2025*डॉ. महेंद्र चव्हाण – एक दिलदार माणूस*
sudhaspari - Mar 05 2025सागर पाटील: परिस्थितीशी दोन हात करणारा एक कर्तव्यदक्ष योद्धा
sudhaspari - Feb 21 2025पंकज राणे: एक साधा पण प्रभावी समाजसेवक
sudhaspari - Jan 18 2025दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका
sudhaspari - Jan 06 2025- sudhaspari - Dec 31 2024
दिपक परदेशी: चप्पल हरवलेला कार्यकर्ता
sudhaspari - Dec 08 2024नात्यांचा उत्सव: के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांसाठी आगळावेगळा कार्यक्रम
sudhaspari - Dec 02 2024"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"
sudhaspari - Dec 01 2024कर्तबगार, दिलखुलास, दिलदार अन् सदाबहार मित्र ; मनोज ढोले
sudhaspari - Nov 29 2024- sudhaspari - Nov 21 2024
महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या; भाजप की काँग्रेसला फायदा?
sudhaspari - Nov 21 2024हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय
sudhaspari - Nov 17 2024दै.पुण्यनगरीचे निष्ठावंत सेवक: सुरज पाटील यांचे अल्पायुष्य जीवन ; भावपूर्ण श्रध्दांजली
sudhaspari - Nov 17 2024"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"
sudhaspari - Nov 16 2024दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*
sudhaspari - Nov 15 2024'हिमाचलची जादू, पंजाबचा रंग आणि दिल्लीचा वैभव: एक अविस्मरणीय सफर"
sudhaspari - Nov 15 2024शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे अथक प्रयत्न आणि खेळाडू दिपिका छापोला हिचे यश
sudhaspari - Nov 15 2024अमित गाभा: शांत, संयमी आणि दिलदार ढाबा मालकाचा अविस्मरणीय पाहुणचार
sudhaspari - Nov 15 2024पुरोगामी विचाराचा धैर्यवान वारसदार : विशाल सुर्यवंशी
sudhaspari - Nov 15 2024हिमाचलच्या रस्त्यांवर एक निष्ठावंत सहकारी: रोहित शर्मा
sudhaspari - Nov 14 2024जगदीश शर्मा: एक उत्कृष्ट ड्राइवर और एक विश्वसनीय मार्गदर्शक
sudhaspari - Nov 14 2024सुवर्ण मंदिर दर्शन आणि अमृतसरचा संस्मरणीय प्रवास
sudhaspari - Nov 14 2024धर्मशाला: निसर्ग सौंदर्य आणि भाऊसाहेब यांचा कर्तव्याचा अभिमान
sudhaspari - Nov 11 2024
गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८
शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८
संत गोरा कुभार देखावा ठरला आकर्षण


त्यावेळी भानेवर आलेल्या कुंभार सर्व प्रकार पाहून अचंबित होतो. हे कसे घडले त्यावर त्याला विश्वास बसत नाही. तो हमरडा फोडून रडतो. विठला कुठल्या पापाची शिक्षा दिली असा प्रश्न करतो. हे ऐकून त्याची पत्नी विठलाचा अंध भक्त्तीत तुला तुझा स्वतःचा मुलगा दिसला नाही. तू त्याला पाया खाली रोंदले, हत्यारा आहेस तू, पापी आहे. एवढे होऊनही त्या काळ्या विठलाचे नाव काढतोय. ज्याचे तुझ्या पूजा अर्चनाने पोट भरले नाही. तुझा एकुलता एक मुलाचा बळी तुझ्याकडून मागितला. अश्या कठोर हृदयाचा काळ्या देवासाठी माझ्या घरात जागा नाही. या दगडाला बाहेर काढ जर मी हे पहिले केले असते तर आज हा दिवस आला नसता. अश्यावनिक शब्दात राग व्यक्त करून विठलाची मूर्ती घरा बाहेर नेते. तेवढ्यात गोरा कुंभार तिच्या हातातून मूर्ती घेतो. व असा अनर्थ करू नकोस म्हणतो. यानंतर विठलाचे दर्शन होते. अश्या परिस्थितीत सुद्धा तू माझी साथ सोडली नाहीस,
माते तुझ्या मुलांसाठी देवासोबत सुद्धा भाडण्यास तू तयार झाली. जसा आईसाठी तिचा पुत्र तसाच माझ्यासाठी माझा भक्त असे म्हणत विठ्ठल त्या बाळाला जीवदान देतो. या देखाव्यात गोरा कुंभाराची भूमिका पवन गुरव यांनी साकारली तर त्याची पत्नीची भूमिका गौरव गुरव याने साकारली आहे. अत्यंत सात्त्विक असा चेहरा आणि भावना ओतून साकारलेल्या ही भूमिका पाहण्यासाठी आलेल्या भक्ताचा अंगावर शहारे उभे करत आहे. सदर देखावा पाहताना अनेकांचे डोळे पाणावत आहे. देखावा सादरीकरनासाठी निंबा गुरव , भिला गुरव, तुषार गुरव, दिनेश लोहार,नितीन दातीर, रितेश देडगे, महेंद्र गुरव, सनी पाटील, हरीश साळुंखे, सुयोग पाटील, गोकुळ मिस्तरी, राकेश गुरव,सूरज शिंपी, नंदू पाटील, शिरीष भावसार आदींसह सदस्यांनी संयोजन केले...
बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८
फुलांची उधळण करत पत्रकार संघाचा दीड दिवशीय गणरायाचे थाटात निरोप

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८
सार्वजनिक दादा गणपती मंडळाचा देखावा घेतोय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव 'कचरों के खिलाडी' आरास मधून नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २3 वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्य संग्रामातील यशोगाथा, बेटी बचावाचा संदेशसह, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, देखावे सादर केले आहेत.. या वर्षी *स्थलांतराची व्यथा* या ज्वलंत विषयावर आरास तयार केली आहे. गावाकडे रोजगाराचे साधन नाहीत, शासनाचे सतत बदलणारे धोरण, आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीत होणारे आर्थिक नुकसान आदींवर मार्ग काढणे कठीण होते. शासनाच्या भरवश्यावर न राहता स्वत:च रोजगार कसा मिळेल यासाठी अनेक कुटुंबे गावोगावी भटकतात. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारखे मिळेल ते काम करून जगण्यापुरतीच मजूरी पदरात पडली तरी ते समाधानी राहतात. परंतु रोजगाराच्या या भटकंंती मुळेच आरोग्याचे गंभीर प्रश्न, तसेच वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माताचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमानात वाढ झालेली पहावयास मिळते. या ज्वलंत विषयावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे आरास स साकारण्यात आली आहे. यात एक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असल्याचे दाखवले आहे. कुटुंब प्रमुख असलेला श्यामने
कामासाठी अटीतटीचे प्रयत्न करून ही त्याच्या नशिबी निराशाच येते. कुटुंबाच्या दै. गरजा पूर्ण होत नाहीत. मुला बाळाच्या शिक्षणापेक्षा त्यांचे पोट भरणे अवघड होते. या करिता रोजगाराच्या शोधात श्याम कुटुंब घेऊन शहराकडे उदरनिर्वाहासाठी जातो. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. मात्र शहरात आल्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाल्याने मुलगा अपयशी झाल्यावर नैराश्यातून आजारी पडतो. मात्र श्यामकडे पैसे नसल्याने तो मुलाचे उपचार करु न शकल्याने मुलगा दगावतो. तर यातून श्याम पूर्णपणे खचून दारुच्या आहारी जाऊन त्याचाही व्यसनामुळे मृत्यू होतो, असे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे स्थलांतरीय कुटुंबाची व्यथा सजीव देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सर्वोदय गणेश मित्र मंडळाने केला आहे. यात पप्पू साळवे, कल्पेश चौधरी, जितेंद्र चित्ते, कुशल चौधरी, गुंजन चौधरी, शुभम ठाकरे, हर्ष किनगावकर, संदेश देवरे, जयेश चित्ते, उमेश पाटील, रोहित कलाल, समीर ठाकरे आदींनी अभिनय केला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष किरण ठाकरे, सचिव राकेश साळवे, खजिनदार दीपक पवार सदस्य दीपक चौधरी, उमेश ठाकरे, नरेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, कुणाल ठाकरे आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..
तळोद्यात भाजपाला खिंडार
पदाधिकाऱ्यांनी नाशिक मेळाव्यात केला कॉँगेसमध्ये प्रवेश
मागील काही महिन्यांपासून भाजपात नाराज असलेले जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. विलास डामरे यांनी नुकताच नाशिक येथे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला..
संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विभागीय मेळावा नाशिक येथे घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे , माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवृत्त वनक्षेत्रपाल लक्ष्मण पाडवी, लक्ष्मण माळी, माधव मराठे, भिमसिंग ठाकरे, शाहीद पठाण, इस्माईल शेख, प्रविण पाडवी, माजी नगरसेवक भरतसिंग राहसे, शिक्षक आघाडीचे एस.डी.पाटील, भाजप युवा मोर्च्यांचे उपाध्यक्ष अमृत पावरा, राहुल पाडवी, जत्र्या पावरा,
अस्लम पिंजारी,सेवा निवृत्त प्राचार्य अशोक वाघ, शिक्षक आघाडीचे एस.एम. महिरे आदींनी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, बापू कलाल, तळोदा-शहादा समन्वयक योगेश मराठे, लक्ष्मण पाडवी,कुणाल चौधरी उपस्थित होते.प्रा.विलास डामरेंसह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे..
अस्लम पिंजारी,सेवा निवृत्त प्राचार्य अशोक वाघ, शिक्षक आघाडीचे एस.एम. महिरे आदींनी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, बापू कलाल, तळोदा-शहादा समन्वयक योगेश मराठे, लक्ष्मण पाडवी,कुणाल चौधरी उपस्थित होते.प्रा.विलास डामरेंसह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे..
शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८
कचरा संकलनासाठी स्वखर्चातून दारोदारी फिरणार घंटागाडी

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)