Breking News

मंगळवार, २८ मार्च, २०१७

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकली येथील अभ्यास दौरा....

तळोदा मेवासी वनविभागामार्फत पत्रकार करिता अभ्यास दौऱ्याचे आयोजन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलता टाकली या छोट्याश्या गावाच्या एका नर्सरीत करण्यात आले होते. निसर्गाच्या विविध छटाचे सुंदर नयनरम्य
देखावे याठिकाणी दृष्टीस पडले, नर्सरीच्या मागच्या बाजूला सुंदरशी नदी वाहत होती. उन्हाचा पारा चढत असला तरी परिसर अतिशय थंड वाटत होता. नदीच्या किनारी येथील लहान बालके आपल्याच जगात रमली होती. सातपुडा परिसरात रस्ता कोंक्रेटीकरणांचे कामे होताना पाहून आपणही अभियंता व्हावे, सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्या पावेतो पोहचण्यासाठी कोंक्रेटीचा रस्ता व्हावे हाच विचार या निरागस बालकांच्या मनात असावा, याच हेतूने खेळाच्या रुपात का असेना नदीच्या काठेला बसुन बालकांचा रस्ते बनविण्याचा खेळ तेथे पाहावयास मिळाला, बालकांच्या खेळण्यातच त्यांची जिज्ञासा दिसत होती. पुढे जाऊन सार्वजनिक बांधकामाला चांगले अभियंता सातपुड्याच्या पायथ्यातून प्राप्त होऊ शकतात यात काही शँका नाही. मात्र सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात रस्ते निर्माण व्हावे ही या बालकांसह अनेकांची इच्छा आजही अतृप्तच आहे. वनविभागाचे वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांनी वनक्षेत्राबद्दल व विविध वन्यप्राण्याबाबत पत्रकाराना माहिती दिली.
 झाडांचे महत्व, फुलांचे महत्व आदी विविध बाबींचे पृथकरन यावेळी त्यांनी केले. त्यातच महूचे झाड, फुल व त्याचा उपयोग जाणून घेतले. पत्रकार संघातील जेष्ठ पत्रकार, तरुण पत्रकार, आदींनी आपले विविध अनुभवांची देवाण घेवाण येथे केली. पत्रकार मंडळी जुन्या आठवणीत चांगली रमली होती. उन्हाळाचे दिवस असले, पाण्याची पातळी खालावत जरी असली तरी, पाण्याचे प्रमाण या परिसरात बऱ्यापैकी दिसत होते. ठिकठिकाणी वनविभागाकडुन या परिसरात कुत्रीम वन बंधारे बांधण्यात आले आहेत. नक्कीच परिसरात वनप्राण्यांची संख्या चांगली असणार यावरून ते लक्षात येते. वनविभागाकडून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातुन वनप्राण्यांसह आसपासच्या अनेक शेतकऱ्याना त्याचा फायदा होतो. टाकली येथे सुंदर असा धबदबा आहे. सध्या तेथे पाणी नसले तरी त्यांची खोली वरून त्याच्या प्रभाव हा लक्षात येतो. आसपासच्या परिसर फिरून झाल्यानंतर तेथील मजूर व वनरक्षक यांनी पारंपारिक पद्धतीमध्ये आणि अगदी चुलीवर बनविलेल्या जेवणाची चव अशी दुय्यम उत्तम सुविधा येथे करण्यात आली होती. बदलत्या काळा नुसार प्रत्येकाची जीवन शैली बदलली आहे, शहराच्या विकासातून चूल जणू लुप्तच झाली आहे. चुलीवरचे जेवण सोबत पारंपारिक चव अशी आगळी वेगळी मांसाहाराची मेजवानी याठिकाणी करायला मिळाली. झणझणीत कोंबडी आणि रस्सा भाकरी बरोबर हुर्पायची मज्जाच या निसर्गरम्य वातावरणात काही वेगळीच आहे.


















































शनिवार, २५ मार्च, २०१७

मोकाट पशुपालकांवर कारवाईची गरज
बेवारस गोमातेवर झाला विधीवत अंत्यसंस्कार!

तळोदा शहरातील ख्वाजा नाईक परिसरात मयत अवस्थेत बेवारस पडलेल्या गोमातेवर
श्रीराम सोशल ग्रुपच्या पदाधिकार्‍यांनी विधीवत अुत्यसंस्कार केला. श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांच्या या सामाजिक कामाचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे. तळोदा शहरातील ख्वाजा नाईक चौकात सकाळच्या वेळी एक गाय मयत अवस्थेत बेवारस स्थितीत पडली होती. याची माहिती शहरातील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांना मिळाली. ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक डॉक्टरांना पाचारण केले. तपासणी केली असता गाय मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तरुणांनी गाईवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मयत गोमातेला ग्रुपच्या सदस्यांनी अँपेरिक्षेच्या सहाय्याने शहादा रस्तावरील मोकाट ग्राऊंडमध्ये आणले. याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्यात आला. गाईला पंचामृताने स्नान घालून फुलहार व पुष्पगुच्छ अर्पण करून विधिवत पध्दतीने अंतसंस्कार करण्यात आले. गोमातेच्या अंत्यसंकारावेळी परिसरातील अनेक गाई याठिकाणी उपस्थित झाल्याने हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.हिंदु धर्मियांत गाईला आईचे रूप मानले गेले आहे. या मृत गाईवर अंत्यसंस्कार करण्याचे आम्हाला भाग्य लाभले. गाईसह मोकाट प्राण्यांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत, असे मत यावेळी श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी चिंटू जोहरी, युवराज चौधरी, कार्तिक शिंदे, अमन जोहरी, रणजित पाडवी, अजय ठाकरे, दिनेश मराठे, आकाश भोई, पारस परदेशी, शुभम दिगवा, महारु भोई, हिरालाल भोई, धिरज भोई, भोला भरवाड आदीसह ग्रुपच्या सदस्यांनी गोमातेला सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. तळोदा शहरात दिवसभर अनेक गाई मोकाट फिरत असतात. भाजीपाला मार्केट व इतर परिसरात पडलेला पालापाचोळा खात असतात. अनेकदा खाण्यास काही मिळत नसल्याने गाई प्लास्टिकच्या कॅरीबॅग व विषारी पदार्थ खातात. यामुळे अनेकदा त्यांना जीवही गमवावा लागतो. पालिकेने बेवारस गाई मालकांवर कारवाई करण्याची मागणी श्रीराम सोशल ग्रुपने केली आहे.













शुक्रवार, २४ मार्च, २०१७

तळोद्यात डॉक्टरवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू असून या अंतर्गत तळोदा येथे पथकाने केलेल्या कारवाईत एका डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू आहे. यासाठी तालुहानिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामोहीमेतंर्गत तळोदा येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी शहरातील लक्ष्मीनारायण जनरल हॉस्टिपल व मल्हार मेडिकल येथे तपासणी केली. तत्पूर्वी पथकाने हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे बनावट पेशंट पाठविण्यात आला. येथील डॉ.प्रशांत मिरघे यांनी त्या रूग्णाकडून २00 रूपये फी घेवुन औषधोपचारासाठी प्रिस्क्रीप्शन दिले. तसेच त्यांच्याजवळील प्रतिजैविकाची छोटी सलाईन व औषधी दिली. सदर डॉक्टरांकडे त्या पॅथीचे प्रमाणपत्रची मागणी केली असता उपलब्ध झाले नाही. तसेच दवाखान्यातही दर्शनी भागात लावलेले आढळून आले नाही. सदर हॉस्पिटलची तपासणी केली असता ते हॅलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी आढळून आली नाही. डॉ.मिरघे यांनी मान्यता प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध न करून दिल्यामुळे आणि अपात्र असतांनासुध्दा जनतेच्या आरोग्या व जिवीतास धोका निर्माण होईल, असे करीत असल्याचे निर्दशनास आले. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर अँक्ट १९६१ प्रमाणे सदर डॉक्टरांकडे कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे डॉ.रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरून इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५ (२) व महाराष्ट्र मेडि प्रॅक्टीसनर अँक्ट १९६१ चे कलम ३३ (२) भादंवि कलम ४१९, ४२0, १७५, १७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.

रविवार, १९ मार्च, २०१७

राजकीय धुळवड

तळोदा पालिकेत सत्ताधारी व विरोधकांची राजकीय धुळवड -
 तळोदा पालिकेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात सर्व ऑल इज वेल सुरु आहेच हे सर्वश्रुत आहे. मात्र त्याचा प्रत्यय आज सकाळी सभागृहात सभा आटोपल्या नंतर आला काँग्रेसचे तरुण नगरसेवक गौरव वाणी व पंकज राणे यांनी यावेळी उपस्थित विरोधी नगरसेवक अजय परदेशी व विवेक चोधरी यांना पंचमीचा योग साधत रंग लावला या नंतर उपस्थित सर्व नगरसेवक व काँग्रेसचे सुभाष चोधरी, अनिल माळी, प्रकाश ठाकरे,गणेश पाडवी यांनी एकमेकांना रंग लावून होळी साजरी केली एकंदरीत आज राजकीय पक्ष बाजूला सारून मैत्रीपूर्ण रंग उधळताना दिसून आले यावेळी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आला...




बुधवार, १५ मार्च, २०१७

दारूबंदीचा ठराव.

बोरदच्या भट्टीहट्टी परिसरातील रहिवाशांचा दारूबंदीचा ठराव..... 🔴

बोरद ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी बोरद येथे जाऊन बैठक घेतली. बैठकीत महिला मोठय़ा संख्यने उपस्थित होत्या. दारुबंदीमुळे होणारे नुकसान व दुष्पपरिणामाबाबत भामरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांनी आपले गार्‍हाणे मांडले. दारुमुळे आमचे संसार उध्वस्त होत असून गावातील दारु भट्ट्या तात्काळ बंद करा, अशी विनंती महिलांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी संबंधित दारु विक्रेत्यांना बोलावून त्यांची कानउघडणी करीत तात्काळ दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. कोणीही परिसरात दारुविक्री करतांना आढळला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भामरे यांनी दिला...⭕🔺 तळोदा तालुक्यातील बोरद हे सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. गावात ठिकठिकाणी दारूचे अवैध भट्टया व अवैध दारू विक्री मोठा प्रमाणात होत आहे. गावातील भट्टी गल्लीत मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारूच्या भट्ट्या व दारू विक्रीची दुकाने सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जात असल्याचे गावकर्‍यांचे र्म्हणने आहे. कमी वयातील तरुण दारूच्या व्यसनाकडे वळत असल्याने त्यांच्या भविष्यासह आरोग्याचा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे. दारुमुळे गावात भांडण-तंटे होत आहेत. दारु पिण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असुन अनेक तरुणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या अवैध दारु विक्रीमुळे परिसरातील वातावरण दुषित होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या सर्व समस्यांमुळे गावातील पुरुषांनी दारूबंदीची मागणी वारंवार केली आहे. अनेकदा पोलिसांकडे तोंडी स्वरुपात दारुबंदीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप दखल न घेतल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. यामुळे गल्लीतील पंच मंडळीसह ग्रामपंचायत सदस्यांनी दारुबंदीचा ठराव केला आहे.या ठरावाबाबत दारु विक्रेत्यांना आठ दिवसापूर्वीच माहिती देण्यात आली. दारुविक्रेत्यांनी सण असल्याने आठ दिवसाची मुदत मागितल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.मात्र त्यानंतरही अवैद्य हातभट्टीची दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. दुकाने बंद करण्याबाबत सांगितले असता दुकाने बंद होणार नाहीत, असे दारु विक्रेते सांगत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणने आहे. दारुबंदीसह संबंधित दारु विक्रेत्यांना समज द्यावी या मागणीसह संतप्त ७0 ते ८0 ग्रामस्थांनी मागणीचे निवेदन तळोदा पोलीस निरीक्षक संजय भामरे यांची भेट काल मंगळवारी दिले. दारुबंदी न केल्यास घडलेल्या अनुचित प्रकारास पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पवार, अशोक पाडवी, विजय मगरे, कांतीलाल मोरे, रवींद्र वसावे, संजय माळी, किसन नवरत, चुनीलाल तेले, आंबालाल मोरे, प्रकाश पवार, दादा पवार, राजू पवार, लखन पाडवी, हरीचंद्र पवार, अनिल भिलाव, सुभाष पवार, संतोष पवार, सुरेश ठाकरे, संजय पाडवी, रतीलाल मगरे, पुन्या माळी, दत्तू रोहिदास पाटील, किशोर पाटील, कांतीलाल मोरे, अनिल भिलाव यांच्यासह ७0 पेक्षा अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

रविवार, ५ मार्च, २०१७

तळोदा तालुक्यात ३१ कोटीचे विजबिले थकीत...

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले असून हि रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच विज कंपनी सरसावणार आहे. शिवाय भारनियमातही लवकरच वाढ करण्याचे संकेत कंपनीने दिले आहे... तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विज पोहचावी याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विज मिटर मिळण्याबाबत असंख्य ग्राहकांचे अर्ज दररोज कार्यालयात येत आहेत. ग्रामीण भागासह शहरात देखील विज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच कोट्यवधीने थकीत असलेल्या विजबिलामुळे विजमंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उपाय करून हि थकीत जमा होत नसल्याने.. विज मंडळ विविध उपाय योजना राबवत आहे. तळोदा तालुक्यात सर्वप्रकारची 13 हजार दोनशे 21 एवढी ग्राहक संख्या आहे. यात बहुतांश ग्राहकांकडे साधारणतः 32 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक, व्यावसायिक घरगुती, आदींच्या समावेश आहे. तर सर्वाधिक वीज बिल शेतक-यांकडे थकीत असून त्याच्या आकडा 26 कोटी वर गेला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे युती।सरकार आल्यानंतर शेतकरऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र युतीच्या सरकार कडून आश्वासन पूर्तता झाली नाही. आश्वासनाच्या भरोस्यावर अनेक शेतकरी अद्याप हि प्रतीक्षेत आहेत. आस्मानी सुलतानी संकटाना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. याविविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शेतक-यांनी कृषीपंपाची वीजबिले आदी बिले थकली आहेत. शेतकरी हवालदील झाले असताना बिल भरण्यास विविध संकटे येत आहेत. यांच्या फटका मात्र विजवितरण विभागाला होत आहे. विज कंपनीकडून घरगुती विज ग्राहकांवर कारवाई सुरू करण्यात आली असुन विजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केला जात आहे. विज गळती व विज चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी भर दुपारी देखील पथदिवे सुरु असतात. अनेक शासकीय कार्यालय, बँका, आदी ठिकठिकाणी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित नसताना हि ac पंखे, कुलर आदींच्या गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यातून नाहक विज वाया होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अश्या विविध कारणामुळे विज कंपनिला प्रचंड आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागत आहे.


घरगुती ग्राहक 6522 असून 86 लाख 40 हजार थकबाकी व्यावसायिक ग्राहक 566 असून 13 लाख 23 हजार थकबाकी औद्यीगिक ग्राहक संख्या 187 असून 2 लाख 7 हजार थकबाकी तालुक्यात पाणीपुरवठा ग्राहकांची संख्या 70 असून 1 कोटी 2 लाख 23 हजार थकबाकी आहे. शेतीपंप 5784 ग्राहक संख्या असून 26 कोटी 63 लाख 33 हजार एवढी थकबाकी आहे. पथदिवे 92 ग्राहक संख्या असून 2 कोटी 47 लाख 92 हजार एवढी थकबाकी बाकी आहे. तालुक्यात एकूण 13221 ग्राहक संख्या असून 31 कोटी 15 लाख 23 हजार एवढी थकबाकी आहे...

विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम बनवण्यात आली असून विजबिल थकीत असलेल्या ग्राहकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावूनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे तात्पुरता स्वरूपात विज खंडीत करण्याचे कामे सुरु आहेत. दिर्घकाळा पासून विजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांचे कायमस्वरूपी विज खंडीत करण्याचे कामे सुरू आहेत. तालुक्यात रिक्षा फिरवून बिल भरण्याचे आव्हान करने सुरु आहे. ग्राहकांना विज बिले भंरण्याचे आव्हान सहाय्यक अभियंता सचिन काळे यांनी केले आहे.




शुक्रवार, ३ मार्च, २०१७

वन्यप्राणी जीवित हानीतून मयताच्या वारसास धनादेश


तळोदा तालुक्यातील मोठीबारी येथील अस्वलाच्या हल्यात मयत झालेल्या टीमका
नाईक व अलवान येथील अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या मोग्या पवार या दोघांच्या वारसास वन्य प्राणी जीवित हानीतून आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील अलवान परिसरात ३0 डिसेंबर रोजी अस्वलाने धुमाकूळ घातला होता. तर तालुक्यातील मोठीबारी येथील रहीवासी सायंकाळच्या सुमारास शेतातून पायवाटेने जात असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला होता. या हल्यात ५५ वर्षीय टिमकी खाअल्या नाईक या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता. तर अलवान परिसरात मोग्या रामा पवार हे शेतातील कामे आटोपून घरी परतत असताना अस्वलाने त्यंच्यावर हल्ला चढविल्याने ते गंभिररित्या जखमी झाले होते. याबाबत वनविभागातर्फे पंचनामा केला होता. याबाबत वनक्षेत्रपाल अशोक वाघ यांनी शासन दफ्तरी पाठपुरावा करुन शासानाच्या वन प्राणी जीवित हानी योजनेतून मयत टिमकी नाईक व जखमी मोग्या पवार या दोघांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. मयत टिमका नाईक यांच्या वारसास ८ लाख तर जखमी झालेल्या मोग्या पवार यास एक लाखाची आर्थिक मदत वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यातील अलवान येथे आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते मोग्या पवार व मयत टिमका नाईक यांच्या वारसास धनादेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक अजय परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, प्रांतिक सदस्य डॉ.स्वप्नील बैसाने, युवा तालुकाध्यक्ष शिरीष माळी, संजय चौधरी, उपवनसंरक्षक पी.एन.पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक एस.ए.अहिरे, तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल एस.बी.चव्हाण, खर्डी वनरक्षक एस.एल.वाघ, वनपाल ए.जी.वाडीले, वनरक्षक बी.एस.जाधव, जे.आर.खोपे आदी उपस्थित होते.