Breking News

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

लेख वाचविण्यासाठी धडपडणारे सर्वोदय मंडळ

लेख वाचविण्यासाठी धडपडणारे सर्वोदय मंडळ
 स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव, स्त्री भ्रूण ह्त्या थांबवा या ज्वलंत विषयावर स्वयंचलीत देखावा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाने साकारून वंशाचा दिवा म्हणजे मुलगीच आहे, पणती नसेल तर दिवा कसा लागणार, आता तरी विचार करा, चला सज्ज होऊ या स्त्री भ्रूण ह्त्या थांबवु या, अशा घोषवाक्यानी जनजागृती करण्याचे काम केले आहे. तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २० वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदाना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन गुफा, बाल कामगार रोखणे, भुत महल, शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौ राणिक, देशभक्तीपर स्वंयमचलित देखावे सादर करण्यात आले आहेत. हे मंडळ अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भुमीत नतभ्रष्ट भ्रूण हत्येचे महापाप करतात. त्यामुळे मंडळाने जनजागृती स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक हां ज्वलंत विषय घेवुन आरास सादर केली आहे. एक गृहस्थ आपल्या पत्नीला गर्भजल तपासणी करण्याकरिता डॉक्टरांच्या क्लिनीकमधे आणतो. डॉक्टर मला माझ्या पत्नीच्या गर्भजल तपासणी करायची आहे हो, मला मुलगी नको, मुलगा हवा, असे ते डॉक्टराना सांगतात तेव्हा डॉक्टर यास नकार देतात. तेवढ्यात आईला गर्भातील भ्रूणाची आर्त हाक ऐकू येते. माँ, अभी तो भगवानने मेरे हातो में किस्मत की लकीर भी नहीं बनाई और ईसके पहले ही आपणे तकदीर का फैसला सूना दिया, मुझे जीने दो माँ, अशी आर्त हाक त्या मातेच्या कानी पड़ते, अशी भावनात्मक आरास साकारण्यात आली आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक चौधरी, सचिव किरण ठाकरे, सह मंडळाचे पदाधिकारीनी परिश्रम घेतले.

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती बालगोपाला पासुन ते वयोवृद्द गणेश उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. सर्वत्र शहरी व ग्रामीण भागात गणेश मंडळ सज्ज होवून विविध मंडळांतर्फे 'श्रीं'ची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहाने करण्यात आली होती. त्यातच तलोदा शहरातील संजय वानखेड़े यांनी तयार केलेल्या भाजीपालाच्या गणेश मुर्तीला पाहण्यासाठी भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तलोदा येथील दत्त कॉलोनीतील गुरुकुल गणेश मित्र मंडळाचे सदस्य संतोष गोपीचंद वानखेड़े ह्यांचे गणरायावर विशेष श्रद्धा आहे. दर वर्षी विविध रुपात नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती स्वतः तयार करुण श्री ची स्थापना करत आहे. मागील 3 वर्षापासुन एक आगळा वेगळा उपक्रम ते राबवित आहेत. दिवसें दिवस वाढत चाललेली महागाई, सातत्याने पालेभाजीच्या वाढता दर पाहून चक्क भाजिपालाचा गणपती साकारण्याचा निर्धार संतोष वानखेड़े ह्यांनी घेतला, महागाई कमी करण्याची मागणी गणरायाकड़े करत विविध पालेभाज्यांचा वापर करुण आकर्षक गणपती मूर्ती तयार केली. यात दुधळी, वांगी, सुरन, काकड़ी, कोबी, कारले आदि पाले भाज्यांच्या वापर करुण सुंदर व देखणी गणेश मूर्ती साकारलीआहे. तर यापूर्वी ही विविध टाकाऊ वस्तुंपासुन आकर्षक गणरायाची मूर्ती साकारल्याचे संतोष वानखेड़े सांगतात. मागील वर्षात झाड़ू, टोपली, आदि कामट्यांच्या साहाय्याने विशेष मूर्ती बनविली होती. सदर मूर्ती पाहन्याकारिता भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती...

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

सातपुड्यातील रानमेवा

सातपुड्यातील रानमेवा बाजारपेठेत दाखल चवदार सिताफळाना मागणी, आदिवासी बांधवाना मिळतोय रोजगार तळोदा -
 सातपुडयातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सिताफळे तळोद्यातील बाजारात दाखल झाले आहेत. ऑक्टोंबर- नोव्हेंबर मध्ये सिताफळ विक्रीसाठी येत असतात मात्र यावर्षी लवकरच विक्रीसाठी येत आहेत.  कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धड़गांव तालुक्यात व तळोदा तालुक्याच्या हद्दीत सातपुड्याच्या पर्वत रांगा टेकड्या असून लांखो सिताफळांची झाडे आहेत. आदिवासी शेतक-यांनी घरांच्या वाङा शेतांच्या बांदावर गावरान सिताफळांची झाडे लागवड करून रासायनिक खतांचा वापर न करता संगोपन केलेले असल्याने नैसर्गिक रित्या पिकलेले सातपुड्यातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या गावरान सिताफळ
 गोडवा अधिक असल्याने राज्यसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात  मोठ्या प्रमाणावर मागणी असते
 सातपुड्यात झाडावर पिकलेली ताज़ी रसाळ फळे सातपुड्यातील द-याखो-यातील आदिवासी बांधव तळोद्यातील बाजार पेठ जवळ खवैय्ये व व्यापारी खरेदीदारांची अधिक गर्दी तसेच मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते म्हणून तळोद्यातिल चिनोदा कोठार रस्त्यावर आदिवासीबांधव सिताफळ टोपल्यात बांधून पहाटे विक्रीसाठी येत असतात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणारा सिताफळ यावर्षी ऑगस्ट पासून विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे एका टोपलिस तिनशे ते साडेतीनशे रुपया पर्यन्त विक्री होत आहे धडगांव तालुक्यातील काकरपाटी, चंदसैली, पिपरपाटी, पाडली, चिकतार चिचकाठी अदि सह गांव पाड्यातील आदिवासी बांधव सिताफळ विक्रीसाठी दाखल होत असतात यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे यावर्षी निसर्गाचा नियमित बदल, लहरिपना अत्यल्प पावसाचे प्रमाण यामुळे सिताफळ उत्पादनावर परीणाम झाल्याचे सिताफळ विक्रिसाठी आलेल्यांकडून सांगण्यात आले

तलोदा तालुक्याला शव वाहिनीची गरज..

ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयापर्यंत
आनण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था रुग्णालये,विविध सामाजिक संघटना व पक्षांनी केली आहे. मात्र एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला गावी परत नेण्यासाठी तालुक्यात कोणाकडेही शववाहिका नसल्याने मृत परिवाराना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. शववाहिका करीता उपजिल्हा रूग्णाल्याने पाठवलेला प्रस्ताव धूळ खात पडला आहे.  तलोद्यात शव वाहिका व्हावी ह्या करीता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना नगरपालीका आदिनी पुढे येण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तलोदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यात  सर्वोत्तम सेवा देण्या करीता प्रसिद्द आहे. उपजिल्हा रुग्णाल्याकडे 102 व 108 क्रमांक असलेले 2 रूग्ण वाहिका आहेत. मात्र आरोग्य विभागाकडे शववाहिका उपलब्ध नसल्याने अनेक वेळा मृतदेह नेताना त्याची हेळसांड होत आहे. शिवाय या अडचणीचा फायदा खासगी वाहतूकदार घेतात. मृताच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. तर बाहेर गावाचे कोणी व्यक्ती ऑक्सीडेत आदि अपघातात मयत झाले असल्यास त्यांची शव पोहचवन्याची जबाबदारी पोलीसांकडे असते मात्र पोलिसानाही वेळेवर वाहतुक उपलब्ध होत नाही.
 वाहतुक दार आपले वाहन शव नेण्याकरीता देत नसल्याने शव वाहतुक करणे जिक्रिचे ठरते. मागील काही महिन्या पुर्वी वाल्हेरी परिसरातील निसर्गरम्य धबधबे पाहण्याकरीता आलेल्या पर्यटकांच्या गाड़ीला अपघात होवून त्यात एक तरुणी मयत झाली होती. तरुणी बंगलौरची असल्या कारणाने तिच्या परिवारातील सदस्याना तलोदा गाठन्यास वेळ लागला. तलोद्यात शव ठेवण्या करीता बर्फ पेटी नसल्याने सदर शव नंदुरबार येथे रवाना करने आवश्यक होते. मात्र वेळेवर वाहन कोणीही देत नसल्याने पोलिसाना शहराच्या रस्त्यावर उघड्या अप्पे रिक्ष्यात शव न्यावे लागले. शववाहिकेचा अभाव पालिका अथवा अन्य सेवाभावी संस्थांनी शववाहिकेची व्यवस्था करावी, अशी सातत्याने मागणी होत असली तरी त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातून तसेच गुजरात सीमाभागातून उपचारासाठी रुग्ण मोठ्या संख्येने येथे येत असतात. रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक संघटना संस्था, रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींनीकडे रुग्णवाहिकेची सुविधा आहे. मात्र, शववाहिकेचा प्रश्‍न कोणत्याही संस्था अथवा संघटनेने हाती घेतलेला नाही. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे शव घेऊन जाण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका तयार होत नाही.
नाइलाजाने जादा पैसे खर्चून मृताच्या नातेवाइकांना मृतदेह घेऊन जावा लागतो. वाहतूकदार घेतात अडचणींचा फायदा शहरातील केवळ एक-दोन वाहन धारकच अशा तऱ्हेने मृतदेह नेण्याची जबाबदारी घेत असतात; परंतु त्यांचे भाडे नातेवाइकांना परवडत नाही. एखादा गरीब कुटुंबातील रुग्ण असेल तर त्याची मोठी विचित्र अवस्था होते. जिल्हा आरोग्य विभाग,  पालिका आणि अन्य सेवाभावी संस्था- संघटनांनी या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या केंद्रात शववाहिका उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. आवश्‍यक तर वैद्यकीय  क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतून निधी संकलन करून ही महत्त्वाची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. अपघातात  मृत्युमुखी पडलेल्या अनेक मृतदेहांना शववाहिकेअभावी अनेक तास रखडत ठेवावे लागत असल्याने शव घरा  पर्यन्त नेणे जिक्रिची काम बनले आहे. तालुक्यात विविध संघटना व चैरिटेबल ट्रस्ट आहेत.  मृतदेह नेण्याची जबाबदारी घेत असतात; परंतु त्यांचे भाडे नातेवाइकांना परवडत नाही. एखादा गरीब कुटुंबातील रुग्ण असेल तर त्याची मोठी विचित्र अवस्था होते. जिल्हा आरोग्य विभाग,  पालिका आणि अन्य सेवाभावी संस्था- संघटनांनी या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या केंद्रात शववाहिका उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
आवश्‍यक तर वैद्यकीय  क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतून निधी संकलन करून ही महत्त्वाची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. अपघातात  मृत्युमुखी पडलेल्या अनेक मृतदेहांना शववाहिकेअभावी अनेक तास रखडत ठेवावे लागत असल्याने शव घरा  पर्यन्त नेणे जिक्रिची काम बनले आहे. तालुक्यात विविध संघटना व चैरिटेबल ट्रस्ट आहेत. विविध संघटने मार्फत व पक्षा मार्फत वाजा गाजा करत रुग्ण वाहीका देण्यात आल्या आहेत. मात्र तालुक्यासाठी गणेश सोशल ग्रुप व सीताबाई वाणी यांच्या स्मरणार्थ डॉ. शशिकांत वाणी यांचा कडून देण्यात आलेली रुग्नवाहिका वगळता एकही रुग्ण वाहिका सुरु नसुन धूळ खात पडल्या आहेत. शहरात राष्ट्रवादी पक्षातर्फे पवार पब्लिक ट्रस्ट मार्फत आधुनिक मोबाईल वैनची रुग्नवाहिका देण्यात आली आहे. मात्र सदर रुग्ण वाहिका धूळ खात पडली आहे. तर माजी मंत्री यांच्या सौजन्याने तलोदा शहरा करीता दोन रुग्नवाहिका देण्यात आल्या होत्या. सदर रुग्ण वाहिकेच्या आदिवासी बांधवाना मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. मात्र कालांतराने सदर रुग्ण वाहिका नादिरुस्त झाल्याने त्यांच्या मेन्टेन्स राखने अवघड होत होते. याकारनाने सदर रुग्ण वाहिका शांती धन पतपेढ़ीला विकण्यात आल्या आहेत..तर शासनामार्फत उपजिल्हा रुग्णाल्याकडे 102 व 108 क्रमांक असलेली दोन रूग्णवाहीका सुरळीत आहेत. तर शासना मार्फत एक रूग्ण वाहीका मंजूर करण्यात आली होती. मात्र सदर रूग्ण वाहिकेला ग्रैंड नसल्याने मेन्टेन्स ठेवणे कठीण होत असल्याचे सांगुन विद्या नगरी परिसरात मागील काही वर्षा पासुन रूग्ण वाहीका धूळ खात पडली आहे.
शहरात उपजिल्हा रुग्नाल्याचा 2 व सामाजिक संघटनेचा 2 रूग्ण वाहिकासुरु असुन शहरात आरोग्य विभाग, खासगी रुग्णालये किंवा कोणत्याही सेवाभावी संस्थांकडे शववाहिका नाही. शव एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्याकरिता शववाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे शव वाहून नेण्याकरिता रुग्णांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागतो. नियमानुसार ऍम्ब्युलन्स शववाहिका म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे बर्‍याच रुग्णांना अनेकदा ऍम्ब्युलन्स उभी असूनही देण्यात येत नाही. असे गैरसमज निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवर शव वाहिके संदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार केले आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची दाद मिळत शव वाहून नेणे डोके दुःखी बनले आहे.... डॉ.संतोष परमार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय 
तलोदा नंदुरबार जिल्ह्यात फक्त 03 शववाहिनी आहेत. प्रत्येक तालुक्याला शव वाहून नेण्या करीता शव वाहिनीची गरज आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, दानशुर व्यक्ती, आमदार खासदार, लोक प्रतिनिधी नगरपालिकाआदिनी पुढे येवून शव वाहीका उपलब्ध करुण देने गरजेचे आहे. शव वाहीका नसल्याने मृत्यु नंतर ही शवाची हेडसांड होत आहे. या करीता दानशुर व पुढारीनी पुढे येणे गरजेचे आहे.. डॉ.राजेश वसावे नंदुरबार वैद्यकीय अधीक्षक
 तलोदा शहराला शव वाहिनीची आवश्यक़ता आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे शव त्यांच्या गावी पोहचवने गरजेचे असते. रूग्ण वाहीकेत शव नेता येत नाहीं. खाजगी वाहन चालक सर्व सामान्य जनतेप्रमाणे पोलीसाना देखील शव वाहतुकी करीता वाहन देण्यास नकार देतात. उपजिल्हा रुग्नाल्याकडून शव वाहून नेण्याकरीता वाहन उपलब्ध नाही. सदर शव घेवुन जाण्याकरीता मयत दाखला आवशक्य असतो मात्र मयत दाखला देत नसल्याने शव घेवुन जाने जिक्रिचे ठरते. शववहिनी नसल्याने अनेक समस्याना सामोरे जावे लागते.
  तलोदा पोलीस निरीक्षक सतीश भामरे

शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा....

आदरणीय,
श्री.पप्पा मम्मी, व आजी 
यांना आपल्या मुलीचा शिरसाष्टांग नमस्कार, 
दादा व वहिनींना माझ्या आशिर्वाद,
 गुंजन व देवला गोड गोड पापा.....

मी खूप प्रेमाने व स्नेहभावाने या चिठ्ठीसोबत राख्या पाठवत आहे. जरी मी येऊ शकत नसली तरी राखीतील प्रत्येक धागा तुमचे संरक्षण करेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. प्रत्येक रक्षाबांधनाला असे वाटते की मी प्रत्येक्ष माझ्या भावांचे औक्षण करायला हवे परंतु मला राख्यांचेच औक्षण करून पाठवावे लागते. मी खूप प्रेमाने व मायेने राख्यासोबत ओक्षणाचे साहित्य पाठवत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मम्मी कडून माझ्या राख्या आठवणीने बांधून या बहिनीच्या अल्पशा भेटीचा स्विकार करावा. तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो, माझे आशिर्वाद, स्नेह, प्रेम नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. वहिनींना सांगेन की आजीची मम्मीची खूप खूप काळजी घ्या. पप्पाना वेळेवर औषधे द्या अथवा घ्यायला लावा. सर्वांनी एकत्रित गुना गोविंदाने राहा, तुम्ही सर्व व्यवस्थित सांभाळालच यात शंकाच नाही. स्वतःही तबेतीची काळजी घ्या.

``चंद्र भाऊराया माझा तू ग चांदणी वाहिनी,
नांदा सुखाने रे सारे असे सांगते बहिनी, 
चंद्राच्या गालावरती देव लावी गालबोट, 
मीरविते गुंजन तुझ्या गाली माझे ओठ, 
पापणीत गोठवली मी नदी आसवांची, 
गेली विसरुनी माय लेकरांची,
मायेची माझ्या माय जोडली तू ग जोडी,
 समजावूनी माय लावीली तू ग गोडी, 
पुढे सुरु झालं संसाराचं गोड गीत,
मायेची माझ्या माय तू ग लावीली रीत, 
उचकी लागे माय काही केल्याने राहिना,
नको काढू आठवणी सुखी आहे तुझी मयना''....

 मम्मी व पप्पा दोघांनी तबेतीची काळजी घ्या, आजी तू पण तगतग करू नकोस. वाहिन्या सांभाळून घेतील सर्व. सुधाकर दादाला सांगेन गाडी हळू चालव, मोठ्या दादाला सांगेन रात्री घरी लवकर येत जा, मोठा वहिनीला सांगेन स्वतःसह गुंजन व देवाची काळजी घे. बाकी सर्व ठीक आहे. आत्याची (आईची) तेबेत चांगली आहे. जानु आता खूप किलबिल करते. तुम्हा सर्वांना खूप आठवण करते. आमची सर्वांची तबेत चांगली आहे. गुंजन व देवला आतुचा अनेक आशीर्वाद....
  तुमची लाडकी 
रुपाली

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

तलोद्यातील नयन चित्ते घेतोय संगीत क्षेत्रात भरारी


सातपुड्याच्या सांगिद्यात राहणारे अनेक रत्न दर वर्षी देशातच नव्हे तर परदेशात ही आपली चमक दाखवित आहेत. त्यात धड़गाव तालुक्यातील बर्डीतील किसन पवार असो किंवा नुकत्याच दगड फोडून न्यायाधिशाची ऊची गाठनारे गरीब कुटुंबातील ईश्वर ठाकरे असो, असे विविध रत्न दर वर्षी विविध क्षेत्रात काम बजावत आहेत. त्याच प्रमाणे तलोदा येथील नयन चित्ते या युवकाने संगीत क्षेत्रात ऊंची गाठन्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही क्षेत्रात जिद्द, मेहनत व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी आत्मविश्वास हवाच हे प्रत्यक्षात तळोद्यातील नयन चित्ते या युवकाने दाखवुन दिले. आपल्या गायन कलेचा जोरावर तो मुंबई येथे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे धड़े घेत आहे. यासोबतच हिंदी-मराठी गाण्याची निर्मिती नयन करीत आहे. तळोदा येथील जि.प.शिक्षक सुनील माधव चित्ते यांचा मुलगा नयन हां मुंबईसारख्या मायानगरीत जाऊन आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मुळात लहान पणापासूनच गायनाची आवड़ असणाऱ्या नयनचे शिक्षण बी.ए. डी.एड.पर्यन्त झाले आहे. डी.एड. पुर्ण झाल्यावर शिक्षकी पेशाकडे वळत असतानाच त्याला त्यांच्यातील कलावंत चैन पडु देईना. नयनने फेसबुकच्या माध्यमातून
मुंबई येथील प्रसिद्ध लेखक संदिप नगरकर यांच्याशी ओळख झाली. नगरकर यांनी 'मेरी बेकरारी' या थिंगसॉग साठी त्याची निवड केली. नयनने व्हाट्सअप्पच्या माध्यमातून आपल्या आवाजाची चाचणी दिली. 'व्हाईस टेस्ट' मधे निवड झाल्यानंतर नयनला अहमदनगर येथे गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बोलविण्यात आले. विशेष म्हणजे 'मेरी बेकरारी' या गाण्याला नयन याने स्वतःच लयबद्ध व सुरबद्ध करुण गायल्याने त्याचे विशेष कौतुक झाले, नयन हां मुंबई या मायानगरीत संगीत क्षेत्रात नावारुपाला येण्याच्या प्रयत्नात असुन त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरु आहे. लवकरच त्याने स्वतः लिहलेली व स्वतः संगीतबद्ध केलेल्या 'ओरे पिया' या हिंदी व 'मन हरवले' हे मराठी गाणी प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रसिद्द गायक सुरेश वाडकर यांच्या तालीमीतून भविष्यात आपण यशस्वी संगीतकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असुन यासाठी वडील सुनिल चित्ते, आई माधुरी चित्ते तसेच मित्रपरिवाराची मोलाची साथ लाभत असल्याचे नयन सांगतो...




रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

चैत्र गौर

चैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव ,
 चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो, पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते, शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते, खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासा साठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून . चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते, काही भागात अन्नपुर्णे ची पुजा केली जाते, गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते ,आरशीतही कलात्मकता प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे
गौरीसाठी खास मखर केलेलं असते ,पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते. गौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्याना चैत्रागण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे. या दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार, या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या
हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात. या दिवसान मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

HAPPY BIRTHDAY


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., 
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. 
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. 
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. 
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
 एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!











शनिवार, १८ जुलै, २०१५

आईच्या पार्थिवाला अग्निडाग

मातृ पितृत्वाचे हरपलेले छत्र...पतीचेही झालेले निधन...या संघर्षाचा सामना करीत स्वतः काबाडकष्ट करुण उदरनिर्वाह करणाऱ्या सुमनबाई हरी चौधरी यांचे वयाच्या ७५ व्यावर्षी निधन झाले. त्यांना मुलगा
नसुन केवळ दोन मुलीच असल्याने त्यांच्या पार्थिवेला(मृतदेहास) अग्निडाग कोण देईल ? असा प्रश्‍न सर्वापुढेच उभा ठाकला. यावर धाकटया मुलीने धीर धरत आईच्या पार्थिवाला अग्निडाग देवून अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. या क्षणाने अंतयात्रेसाठी स्मशानभूमीत जमलेल्या नातेवाईकासह उपस्थिताना गहिवरुन आले. मुलीच्या धेर्याने तिचे कौतुक करण्यात आले...... तळोदा येथील स्व.सुमनबाई हरी चौधरी यांनी आपल्या नावासमोर वडील हरी चौधरी यांचे नाव कायम राहु दिले. सुमनबाई या मागील काही वर्षापासुन आपल्या माहेरी येवून आई- वडीलांकडे राहत होत्या. काही वर्षापूर्वीच सुमनबाई यांच्या आईच्या निधानानंतर वडीलांचे ही निधन झाल्याने मातृ पितृ छत्र हरपले. तसेच मागील दोन वर्षापूर्वीच पतीचेही निधन झाले. सुमनबाई चौधरी यांना दोन मूली असुन त्यांचा विवाह झालेल्या आहे. सुमनबाई या स्वत काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत होत्या. मात्र वयाच्या ७५ व्या वर्ष झाल्याने मागील आठवडया भरापासून प्रकृती खालावली. म्हणून सुमनबाईंने आपली मोठी मुलगी हंसा ईश्वर चौधरी हिला बोलावुन घेतले. दि-13 जून रोजी सुमनबाई हिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे उपचारासाठी दखल केले असता अखेर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सुमनबाईची प्राणज्योत मालवली... अंत्यसंस्कार करण्यासाठी आज दि 14 रोजी नातेवाईक व समाजबांधव जमले. घरापासून ते अमरधाम पर्यन्त स्व.सुमनबाई चौधरी यांची अंतयात्रा काढण्यात आली.यावेळी अमरधाममधे सुमनबाईचे पार्थिव तयार करण्यात आले. मुलगा नसल्याणे त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग कोण देईल, असा प्रश्न ठाकला वडीलानंतर अचानक मातृत्वाचे छत्र हरपल्याने सुमनबाईची मोठी मुलगी हंसा ईश्वर चौधरी व धाकटी मुलगी सुरेखा सुरेश चौधरी या दोघांचे अश्रु थांबत नव्हते. यावेळी धाकटी मुलगी सुरेखा चौधरी हिने स्वतःला सावरत धीर धरत आपल्या आईच्या मृत्यदेहाला अग्निडाग देण्याचा निश्चय केला. त्यानुसार सुरेखाने आपल्या आईच्या पार्थिवला अग्निडाग देवून अंत्यसंस्कार पूर्ण केले. या क्षणाने जमलेल्या उपस्थितानी गहिवरुन आले. आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या सुरेखा व हंसा या दोघी मुलींच्या धैर्याने सासरची मंडळी व समाजाकडून कौतुक करण्यात आले.... वडील पूजा आदि केले. स्मशानभूमितील हे दृश्य पाहून उपस्थिताना गहिवरुन आले. वडीलानंतर अचानक आईपण हरवल्याने मुलगी सुरेखा व हंसा हयांचे अश्रु थांबत नव्हते.. आई वडिलांचे छत्र हरविलेल्या सुरेखा व हंसा ह्या दोघे मुलींचे सासर कडून व चौधरी समाजाकडून आत्मिकतेने व आपुलकिने कौतुक केले......

मंगळवार, २३ जून, २०१५

डिंपलच्या धाडसी वृतीला पोलिसांच्या सलाम !

तळोदयात दरोंडे खोराना सामोरे गेलेल्या डिंपलच्या धाडसी वृतीला पोलिसांच्या सलाम !
 तळोदा शहरात घरफोडे खोरानी दहशत पसरवित एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या केल्या ह्यावेळी दरोडेखोरानी घरातील व्यक्तींवरही हल्ला केला. मात्र एका घरात एका 20 वर्षीय तरुणीने त्यांचा दरोड़याचा प्रयत्न हानुन पाडला. दरोडे खोरांच्या तावडीत सापडलेल्या ह्या तरुणीने वेळीची समय सुचकता व धाडस दाखवत त्यांच्या कच्चाटयातुन स्वतःला सोडवत आरडा ओरड करीत दरोडे खोराना पळ काधन्यास भाग पाडले. शक्तीपेक्षा युक्ती मोठी ह्या म्हणी नुसार त्या तरुणीने दाखविलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.. तिच्या ह्या धाडसाची दखल पोलीस विभागाने देखील घेतली असुन पोलीस अधीक्षक महेश घुर्ये ह्यानी तिचा गौरव केला आहे... तलोद्या शहरात दि.19 जून रोजी दरोडे खोरानी हैदोस घातला शिवसेना शहर प्रमुख ह्यांचावर प्राण घातक हल्ला करुण 1 लाख 5 हजार 500 रु रकमेचा धाडसी दरोडा पडला. ह्याच रात्री 1:20 वाजेच्या सुमारास दामोदर नगर मधे राहणाऱ्या छोटुभाई नथु पाटील ह्यांच्या घरातही दरोडे खोरानी प्रवेश केला. घरात चार दरोडे खोर पाटील ह्यांची कन्या डिंपल हिच्या खोलीत जाऊंन कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी कपाटाचा आवाज आल्याने गाढ़ झोपेत असलेल्या डिंपलला जाग आली, मात्र आपले वडील असतील ह्या विचाराने तिने दुर्लक्ष केले. व डिंपल जागी झाली आहे हे लक्षात आल्याने दरोडे खोरानी तिला उठावत तिचे दोघे हाथ धरून ठेवत कपाटात काही मिळेल का, ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र दरोडे खोरांचा तावळीत सापडलेला डिंपलने साहस एकवटून मोठ्या दरोडे खोरांच्या तावडीतुन स्वतःची सुटका करीत पळ काढला. भयभीत अवस्थेत वडिलांच्या खोलीकड़े येत तिने छोटुभाई  ह्यांना घरात चोर शिरल्याची माहिती दिली.  मात्र तू स्वप्न पाहिले असेल असे
सांगून डिंपलची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपलने खरच घरात चोर शिरले असल्याचे सांगितले भयभीत डिंपलला घेवून छोटूभाई तिच्या खोलीकडे जाऊ लागले. मात्र डिंपलने वडिलांना खोलीत न जाऊ देता दरवाजा बंद केला. येवढ्यात दरोडे खोरानी फ़िल्मी स्टाइलमधे दरवाजा उघडण्याची धमकी दिली. दरोडे खोरांची धमकी ऐकूण छोटूभाई ह्यांच्या घरात चोर शिरल्यावर विश्वास बसला. त्यानी जोर जोरात आरोळया मारीत नातेवाइकाना भ्रमणध्वनीवरुण माहिती दिली.. डिंपल व छोटुभाई ह्यांनी दिलेल्या आरोळयांमुळे दरोडे खोरानी तेथून पळ काढला... दरम्यान दरोडे खोरानी डिंपलच्या पर्स मधून साडे तीन हजार रुपयांची रोकड़ चोरून नेली. डिंपल हिने दाखविलेल्या धाडसमुळे मोठी चोरी तळली. सदर बाब पोलीस अधीक्षक महेश घुर्ये ह्यांना कळाली त्यांनी तलोदा भेटित डिंपलला तिच्या पालकांसह पोलीस ठाण्यात बोलावून तिचा गौरव केला.. डिंपलने दाखविलेल्या धड़साचे संपूर्ण शहरात कौतुक करण्यात येत आहे..


बुधवार, १७ जून, २०१५

आदिवासी कुटूंबातील अँड़ ईश्‍वर ठाकरे बनले न्याय दंडाधिकारी


सुधाकर मराठे : घराची प्रतिकूल परिस्थिती असतांना ऊसतोड व दगड फोडून अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी वकीलकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर या खडतर  प्रवासाचा संघर्ष सुरू ठेवत अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी आदिवासी संवर्गातून न्याय दंडाधिकारी पदावर बसण्याचा बहुमान मिळविला आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अँड़ईश्‍वर ठाकरे यांचे आगमन झाल्याने पाडळपूर ते जांभाई रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. सातपुड्याशी पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील जांभाई येथील अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी जिद्द व चिकाटीतून यशाचे शिखर गाठले आहे. अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या समस्या असतात. मात्र अँड़ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीसह समस्यांवर मात करून उच्च शिक्षण मिळविले आहे. जांभाई येथील जामसिंग सिंगा ठाकरे व सिंगीबाई ठाकरे या दाम्पत्यांना चार मुले व तीन मुली आहे. कुडाच्या घरात राहून हे कुटूंबिय आपल्या
उदरनिर्वाहसाठी ऊसतोड व दगड फोडण्याचे काम करतात. अँड़ईश्‍वर ठाकरे यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी जांभाई, प्रकाशा व कोठार येथील आश्रमशाळेत शिक्षण घेतले. तसेच धुळे येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज भासू लागल्याने ईश्‍वर ठाकरे यांनी ऊसतोड व दगड फोडून विधी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. गेल्या काही वर्षांपासून ते तळोद्यात वकीलकीचा पेशा करीत आहेत. मात्र शिक्षणाची आवड व यशाची शिखर गाठण्याची जिद्द कायम असल्याने अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची लेखी परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याने मुंबई येथे घेण्यात आलेल्या मुलाखतीत ईश्‍वर ठाकरे यांची राज्यात आदिवासी संवर्गातुन निवड झाली आहे.यशाचे शिखर गाठल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. खांद्यावर घेऊन मिरवणूक प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्याने अँड़ईश्‍वर ठाकरे यांची पाडळपूर ते जांभाई या रस्त्यावरुन पारंपारीक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अँड़ठाकरे यांना खांद्यावर घेत ढोल-ताश्यांच्या गजरात नृत्य करुन त्यांचे कौतूक करण्यात आले. यावेळी चाहत्यांसह ग्रामस्थांनी ठाकरे यांच्या निवडीचा एकच जल्लोष केला.



गुरुवार, २१ मे, २०१५

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार
 सातपुड्याच्या सौंदर्यात उंच-उंच टेकड्यासह विविध जाती प्रजातींचे वृक्षांचे वेगळेच महत्व आहे. काळानुपुर वृक्ष संपदा कमी होवुन, सातपुडा बोड़खा होवु लागला असला तरी आजही विविध प्राणी पक्षी ह्यांचे अस्तित्व टिकून आहे. सातपुड्यातील रानमेव्यास तेवढेच महत्व असुन राज्यासह परराज्यातून आलेले पर्यटक याची चव चाखल्याशिवाय येथून परत नाही. शुद्ध वातावरण, सेंद्रिय खतांच्या वापरातून उत्पादीत केलेले बोर, आवळा, सिताफळ ह्यासह स्ट्रॉबेरीला सिझननुसार मागणी वाढते. याच सातपुड्याचा कुशीतील गोपाळपुर येथील ` केसर' आंबाने सातासमुद्र ओलांडून तो विदेशातील लोकांचा पसंतीचा बनला आहे. ६० एकरच्या आमराईतील केसरसह विविध जातीचा आंबा राज्यचा कानाकोपऱ्यासह दुबई, इंग्लैंडसारख्या देशात पोहचला आहे. तर येथील आमराई सातपुड्याच्या सहलीवर आलेल्या पर्यटकानां आकर्षित करीत आहे. नंदुरबार जिल्हा हां सातपुड्याच्या पायथ्याशी बसला आहे. विशेषतः तळोदा, अक्कलकुवा, व धड़गाव हे तालुके सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आहेत. या तालुक्यांमधे भौतिक सुविधा
नसल्या तरी सातपुड्यातील वनसंपदा आजही टिकून आहे. काळानुरूप वृक्षतोड़ झाल्याने आज सातपुड्याच्या डोंगर बोड़खा दिसून येतो. मात्र याच दऱ्याखोऱ्यामधे आदिवासी बांधव बोर, आवळा, सिताफळ, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. शुद्ध वातावरण सेंद्रिय खतामुळे आरोग्याला चांगले असलेल्या या फळाना, सर्वत्र खुपच मागणी असते. तळोदा,तालुक्यातील गोपाळपुर येथील किर्तीकुमार राणा ह्या प्रगतशील शेतकाऱ्याने ६० एकर क्षेत्रात वनराई उभारली आहे. ह्या वनराईतील केसर आंबा हां राज्यातील कानाकोपऱ्यासह दुबई व इंग्लॅण्डसारख्या देशात निर्यात होवु लागला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ह्या आंब्याला विदेशातून मागणी वाढली आहे. ह्या आमराईतील श्री राणा ह्यांनी केसर सह हापुस, तोतापुरी, राजापुरी, गावठी, लंगड़ा अश्या विविध जातीच्या आंब्याचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याने ४० लाखाला आंबे काढण्याचा ठेका घेतला आहे. श्री राणा हे आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात त्यांना २००४ ह्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते उद्यानपंडीत पुरस्काराने गौरवन्यात आले आहे. १७ वर्षापुर्वी कीर्तिकुमार राणा ह्यांचे आजोबा स्व. रघुवीरसिंग राणा यांच्या आजोबाच्या संकल्पनेतून उभी राहिलेली गोपाळपुरची आमराई पाहन्याचा मोह अनेकांना होतो. हे विशेष, तर ह्या आमराईतील आंबा हां राज्यातील नंवे तर विदेशातील लोकांचा आवडीचा होत असल्याने साहजिकच त्याची मागणी वाढली आहे.....
                                         *आमराईत भटकंती करताना, 
                                            *आमराईची पाहणी करताना,
                                              *केसर आंब्याची चव घेताना,
                                      *आंब्याचा सावलीचा गारवा अनुभवताना,
                        *चटकदार, चवदार, दर्जेदार सातपुड्यातील केसर आंबा,



                                                             *बहरलेली आंब्याची बाग़