Breking News

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

फुलांची उधळण करत पत्रकार संघाचा दीड दिवशीय गणरायाचे थाटात निरोप

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवशीय गणरायाचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.. पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे दीड दिवशीय गणरायाची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री.ची स्थापना पत्रकार संघाने केली होती. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सकाळी १० वाजता स्मारक चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. स्मारक चौक मार्गे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गो.हू. महाजन शाळेतील संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या लेझीम पथकाने आकर्षक नृत्य सादर केले. तर नेमसुशील विद्यामंदिर मधील प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नंदुरबार वाजंत्रीवर शिस्तबद्ध पद्धतीने लेघीम नृत्य सादर केले. मारुती मंदिराजवळ आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी . मुख्याध्यापक अजित टवाळे, अतुल सूर्यवंशी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, भास्कर मराठे, योगेश पाडवी, सुभाष चौधरी, सतिवान पाडवी, नितीन पाडवी, निखिल तुरखिया, भाजपा तालुका अध्यक्ष शाम राजपूत, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, पृथ्वीराज राजपूत, प्रा.विलास डामरे, विपुल कुलकर्णी, अनुप उदासी, हेमलाल मगरे, माजी उपसभापती आकाश वळवी, शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, बबलू माळी, आनंद सोनार, नंदु जोहरी, कल्पेश सूर्यवंशी, संतोष वानखेडे, जयेश सूर्यवंशी, भिका ठाकरे, रसिक वाणी आदींसह सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, जेष्ठ नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते. विसर्जन मिरवणुक यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक वाघ, उपाध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव सुधाकर मराठे, कोषाध्यक्ष सम्राट महाजन आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..















   
 










मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

सार्वजनिक दादा गणपती मंडळाचा देखावा घेतोय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव 'कचरों के खिलाडी' आरास मधून नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

तळोद्यात ७२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक दादा गणपती मंडळ नाटीकेच्या स्वरूपात सादर करीत असलेल्या 'कचरों के खिलाडी' ही आरास लक्षवेधी ठरत असून या ठिकाणी नाटीका बघण्यासासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. या देखाव्यात अस्वच्छता रूपी कचरासुरला मारण्यासाठी विविध सिने अभिनेते येतात व आपल्या शक्तीचा, बॉम्ब व बंदुकीने कचरासुरला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कचरासुर अशा नायकांच्या शक्तीने नष्ट होत नाही. तर हातात झाड़ू, नैतिक जबाबदारी व योग्य समजदारीनेच अस्वच्छता रूपी कचरासुर नष्ट होईल. हे स्वच्छतेचे व्रत जो स्विकारेल तोच खरा नायक व तोच खरा बाहुबली होय, असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे.. सार्वजनिक दादा गणपती हा तळोदा शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री दादा गणपतीवर असलेली श्रद्धा व प्रेम अवर्णनीय आहे. श्रद्धा व समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मंडळाची ओळख आहे. ७२ वर्षापासुन दरवर्षी विविध आकर्षक व समाजप्रबोधनावर आधारित देखावा सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी प्रबोधनात्मक व राष्ट्रीय मोहिम स्वच्छ भारत अभियानावर आधारातीत जीवंत देखावा 'कचरों के खिलाडी' या देखाव्याने तळोदा शहरातील व तालुक्यातील इतर खेड्यातील गणेशभक्तांची मने जिंकत आहे. यात सीनेअभिनेत्यांचा माध्यमातून स्वछतेचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान व या महानायक अमिताभ बच्चन यांना जनजागृती करण्याची वेळ येते, ही शोकांतिका आहे.या देखाव्यात अस्वच्छतारूपी कचरासुरला मारण्यासाठी केलेले विविध प्रयत्न फोल ठरत असल्याने शेवटी नागरिकांनी हातात झाड़ू घेऊन स्वत:ची नैतिक जबाबदारीची योग्यता समजूनच अस्वच्छतारूपी कचरासुर नष्ट होईल असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे. या नाटीकेची संकल्पना शिक्षक अरुण गुरव यांची असून सादरीकरण मराठा चौकातील बालक व तरुण करीत आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल धनगर, उपाध्यक्ष मयूर पाटील, खजिनदार विक्की गुरव, सचिव चेतन मराठे, सदस्य सुभाष शिंदे, रविंद्र गाढे, चंद्रकांत पाटील, चेतन गुरव, प्रशांत गवळे, योगेश पाटील, योगेश परदेशी, संदीप गुरव, गणेश कलाल, राजेंद्र जाधव व सहकारी परिश्रम घेत आहेत. त्यांना नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, न.पा. बांधकाम सभापती भास्कर मराठे, शिवसैनिक संजय पटेल, माजी नगरसेवक प्रल्हाद फोके, नवनीत शिंदे, वसंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे..





आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम तळोदा येथील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळातर्फे स्थलांतराची व्यथा या ज्वलंत विषयावर सजीव देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

 तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २3 वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्य संग्रामातील यशोगाथा, बेटी बचावाचा संदेशसह, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, देखावे सादर केले आहेत.. या वर्षी *स्थलांतराची व्यथा* या ज्वलंत विषयावर आरास तयार केली आहे. गावाकडे रोजगाराचे साधन नाहीत, शासनाचे सतत बदलणारे धोरण, आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीत होणारे आर्थिक नुकसान आदींवर मार्ग काढणे कठीण होते. शासनाच्या भरवश्यावर न राहता स्वत:च रोजगार कसा मिळेल यासाठी अनेक कुटुंबे गावोगावी भटकतात. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारखे मिळेल ते काम करून जगण्यापुरतीच मजूरी पदरात पडली तरी ते समाधानी राहतात. परंतु रोजगाराच्या या भटकंंती मुळेच आरोग्याचे गंभीर प्रश्न, तसेच वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माताचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमानात वाढ झालेली पहावयास मिळते. या ज्वलंत विषयावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे आरास स साकारण्यात आली आहे. यात एक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असल्याचे दाखवले आहे. कुटुंब प्रमुख असलेला श्यामने
कामासाठी अटीतटीचे प्रयत्न करून ही त्याच्या नशिबी निराशाच येते. कुटुंबाच्या दै. गरजा पूर्ण होत नाहीत. मुला बाळाच्या शिक्षणापेक्षा त्यांचे पोट भरणे अवघड होते. या करिता रोजगाराच्या शोधात श्याम कुटुंब घेऊन शहराकडे उदरनिर्वाहासाठी जातो. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. मात्र शहरात आल्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाल्याने मुलगा अपयशी झाल्यावर नैराश्यातून आजारी पडतो. मात्र श्यामकडे पैसे नसल्याने तो मुलाचे उपचार करु न शकल्याने मुलगा दगावतो. तर यातून श्याम पूर्णपणे खचून दारुच्या आहारी जाऊन त्याचाही व्यसनामुळे मृत्यू होतो, असे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे स्थलांतरीय कुटुंबाची व्यथा सजीव देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सर्वोदय गणेश मित्र मंडळाने केला आहे. यात पप्पू साळवे, कल्पेश चौधरी, जितेंद्र चित्ते, कुशल चौधरी, गुंजन चौधरी, शुभम ठाकरे, हर्ष किनगावकर, संदेश देवरे, जयेश चित्ते, उमेश पाटील, रोहित कलाल, समीर ठाकरे आदींनी अभिनय केला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष किरण ठाकरे, सचिव राकेश साळवे, खजिनदार दीपक पवार सदस्य दीपक चौधरी, उमेश ठाकरे, नरेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, कुणाल ठाकरे आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..

तळोद्यात भाजपाला खिंडार

 पदाधिकाऱ्यांनी नाशिक मेळाव्यात केला कॉँगेसमध्ये प्रवेश मागील काही महिन्यांपासून भाजपात नाराज असलेले जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. विलास डामरे यांनी नुकताच नाशिक येथे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.. संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विभागीय मेळावा नाशिक येथे घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे , माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवृत्त वनक्षेत्रपाल लक्ष्मण पाडवी, लक्ष्मण माळी, माधव मराठे, भिमसिंग ठाकरे, शाहीद पठाण, इस्माईल शेख, प्रविण पाडवी, माजी नगरसेवक भरतसिंग राहसे, शिक्षक आघाडीचे एस.डी.पाटील, भाजप युवा मोर्च्यांचे उपाध्यक्ष अमृत पावरा, राहुल पाडवी, जत्र्या पावरा,
अस्लम पिंजारी,सेवा निवृत्त प्राचार्य अशोक वाघ, शिक्षक आघाडीचे एस.एम. महिरे आदींनी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, बापू कलाल, तळोदा-शहादा समन्वयक योगेश मराठे, लक्ष्मण पाडवी,कुणाल चौधरी उपस्थित होते.प्रा.विलास डामरेंसह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे..

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

कचरा संकलनासाठी स्वखर्चातून दारोदारी फिरणार घंटागाडी

तळोद्यातील प्रभाग क्र.२ च्या नगरसेवकांचा उपक्रम अनेकवेळा फोन करूनही पालिका कर्मचारी येत नाही, कचरा साचून असतो, दुर्गंधी पसरते, रोगराई निर्माण होते, यासारख्या समस्यांवर पर्याय काढत तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक अनिता परदेशी व हितेंद्र क्षत्रिय यांच्या संकल्पनेतून स्व-खर्चाने कचरा संकलनासाठी घंटागाडी तयार करण्यात आली आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरजू महिलेकडे राहणार असून ती प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. मोबदल्यात त्या महिलेस १ रुपया द्यावा लागणार आहे. एक रुपयातूनच महिलेच्या पगाराची सोय होणार असून रोजगार प्राप्त होणार आहे.. दररोज एक रुपया देऊन परिसर होणार स्वच्छ तळोदा येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी नवनवीन उपक्रम राबवून एक वेगळी छाप निर्माण केली आहे. विविध समाजपयोगी कामांमुळे ते जिल्हाभरात परिचित आहेत. पालिकेमार्फत कचरा व्यवस्थापनाचा ठेका अनेकवेळा विविध कारणास्तव बंद पडतो. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नियमित कचरा संकलन करणे कठीण होते. परिणामी दुर्गंंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग निघावा यासाठी नागरिक पालिकेत चकरा मारतात, अनेकवेळा या कारणांमुळे वाद उफाळण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर कायमचा मार्ग काढत एक नामी शक्कल प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेवकांनी लढवली आहे. पालिकेवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे, 'हम सब का एकही नारा साफ सुधरा हो प्रभाग हमारा' हा विचार ठेवून त्यांनी स्व-खर्चाने एक कचरा संकलन वाहन तयार केले आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरीब महिलेकडे सोपविण्यात आली आहे. सदर वाहन नियमितपणे प्रभाग क्र.२ मध्ये दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. पर्यायी प्रत्येक घरातून १ रुपया या महिलेस द्यावयाचा आहे. या एक रुपयातूनच या महिलेला पगार दिला जाणार आहे. त्या माध्यमातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असून चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटणार आहे. लग्न, समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमस्थळी सदर वाहन दिवसभर उभे राहणार आहे. गणेश चतुर्थीचे औचित्य साधत रिद्धी-सिद्धी मंदिरात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, योगेश मराठे, छोटू चौधरी यांच्या उपस्थितीत या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. .




 


गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

बेटी बचावचा जागर करणाऱ्या अनिता परदेशींचे मंत्र्यांनी केले कौतूक!

बेटी बचावचा जागर करणाऱ्या अनिता परदेशींचे मंत्र्यांनी केले कौतूक! दै.'पुण्यनगरी' चे वृत्त वाचून ना.मुनगंटींवारांनी दिल्या शुभेच्छा
तळोदा येथील परदेशी दांम्पत्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आवाजावी खर्च न करता सामाजिक बांधिलकी जोपासत बेटी बचावचा संदेश देत सफाई कर्मचाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला होता. याबाबतचे सकारात्मक वृत्त दै.'पुण्यनगरी' ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक झाले. सोशल मीडियावर देखील याबाबत शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री (वित्त,नियोजन आणि वने) सुधीर मुनगंटीवार यांनी दै.'पुण्यनगरी' ने प्रसिध्द केलेली बातमीची वाचून एका पत्रान्वये नगरसेविका अनिता परदेशी यांच्या या समाजपयोगी उपक्रमाचे कौतूक केले आहे.. सध्या वाढदिवस साजरा करण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पुष्पगुच्छ, मिठाई, पार्टी यातून हजारो रुपये खर्च करीत नेते मंडळी अथवा नातेवाईक मंडळींचा वाढदिवस कसा जल्लोषात साजरा केला जाईल, यावरच भर दिला जातो. मात्र या सर्वाला अपवाद ठरत तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी आपल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी महिलांना साडी-चोळी व पुरूषांना बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ तळोदा-सुंदर तळोदा असा जनजागृती संदेश लिहलेले टी-शर्टचे वाटप केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाऊचे वाटप करुन एक सामाजिक बांधीलकी या वाढदिवशी त्यांनी जोपासली. परदेशी दाम्पत्याला दोन कन्या आहेत. वाढदिवसाला पैशांची उधळण करण्यापेक्षा स्वछता कर्मचारी व त्यांच्या मुलांसोबत लहान मुलगी चेतनाचा वाढदिवस साजरा केला. दिवसभर स्वत:चा आरोग्याची चिंता न करता पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा संकलन करणे, गटारीत उतरून मैला काढणे या सोबतच शहरात स्वछता कशी नांदेल यासाठी स्वछता कर्मचारी आपले जीवाचे रान करत कर्तव्य बजावतात. एवढे करूनही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे गलिच्छ कामे म्हणून पाहिले जाते. मात्र, तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी मुलीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले होते.. पालिका आवारात विधिवत पध्दतीने शांती पठण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ५० महिला व पुरूष स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप केले होते. याबाबतचे सकारात्मक वृत्त दै.'पुण्यनगरी' ने प्रसारित केले होते. त्यानंतर सर्वच स्तरावरून परदेशी कुटुंबियांच्या या उपक्रमाचे कौतूक झाले. सोशल मीडियावर देखील सदर वृत्त मोठ्या प्रमाणात झडकले. सदर वृत्ताची दखल महाराष्ट्र राज्याचे मंत्री (वित्त,नियोजन आणि वने) सुधीर मुनगंटीवार यांनी घेत पत्र पाठवून समाजपयोगी उपक्रमाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ हा जनजागृती संदेश समाजातील शेवटचा माणसापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज आहे. . अशातच आपण आपल्या मुलीचा वाढदिवस सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा करून या संदेशासोबतच स्वच्छतेचा संदेश देवून देशहिताचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीची दर्शन घडविले. पत्राच्या माध्यमातून समाजपयोगी उपक्रमाबाबत अभिनंदन करत चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..



शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

अटलजींचे तळोदयातील अविस्मरणीय चार तास


काँग्रेसचे तत्कालीन खा. सुरुपसिंग नाईक यांनी राजीनामा दिल्याने सन 1980 मध्ये नंदुरबार लोकसभची पोटनिवडणुक लागली होती. त्यावेळी सुरुपसिंग नाईक यांना विधानसभेवर पाठविण्यात आले होते. काँग्रेसतर्फे माजी खा.माणिकराव गावित हे उमेदवारी करीत होते. तर भाजपाच्या वतीने दिलवरसिंग दादा पाडवी यांच्या प्रचारसभा व आदिवासी मेळाव्यासाठी अटलजी धुळ्याहून चारचाकी वाहनाने नंदुरबार, शहादा, तळोदा या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या. त्यांच्यासोबत धुळ्याचे नेते लखनजी भतवालं, शिरपूरचे आ.प्रल्हाद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तळोदा शहरातील आनंद चौकात त्यांची दणदणीत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर उमेदवार कै. दिलवरसिंग पाडवी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल, त्यावेळेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. गुलाल बुलाखी माळी, अनुपचंद जैन, कै.भाई बारगळ, कै.नारायण पाटील, वसंत मराठे, कै.दौलत पाटील, भगवान चौधरी, कै.ईश्वरलाल कुंभार, कै.त्रंबक शिंपी, कै.तुकाराम जगदाळे, प्रसन्न कुमार बारगळ, मोनिका बारगळ, मांगीलाल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी अटलजींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल यांनी अटलजींना त्यांच्या उंचीचा पुष्पहार टाकून सत्कार केला. त्यावेळी अटलजींनी  विश्वनाथजी मैं. भगवान नही! मैं इन्सान हु! मुझे इन्सान रहने दो! असे म्हणत सर्व मान्यवरांचे मने जिंकली. त्यानंतर
  अटलबिहारी वाजपेयी यांच्या धाराप्रवाह हिंदी भाषेतील भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दुर्गम भागातुन आदिवासी बांधवांसह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अटलजीनी कुपोषण, वनजमीनीच्या प्रश्नावर बोलताना आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. याकरिता संसदेत आवाज उठवंत राहिल आदिवासी बांधवांना न्याय देण्याची मागणी तत्कालीन पंत प्रधानाना वेळोवेळी केली होती. सभा आटोपून त्यांनी अनुपचंद जैन यांच्या घरी कार्यकर्त्यायासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी बाजरीचा भाकर व खुळा बनविण्यास सांगितले होते. असे अविस्मरणीय  चार तास त्यांनी तळोदयात घालवले..

 *आठवण* 
अटलजींनी तळोद्यात सभा होती त्यावेळी मी दहावीत होतो. प्रतापपूरला आर.एस.एस.ची शाखा चालवीत होतो. माझ्यासह प्रत्येक तरुणाला अटलजीचा भाषणाचे आकर्षण होते. सर्व मित्रांना घेऊन सायकलीवर तळोदा येथे भाषण ऐऐकण्यास गेलो होतो. सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभा चांगलीच गाजली होती. सभा आटोपून त्याच्या ताफा विश्रामगृहाकडे वळला. अटलजीना काहीही झाले तरी भेटायचे असा दृढ निश्चय मनात ठेवून विश्रामगृहावर गेलो. शिरपूरचे आमदार प्रल्हाद तात्या पाटील यांना अटलजीना भेटण्यासाठी विनंती केली. त्यांनी माझी भेट घालून दिली. त्यांना पाहून त्याच्या पायावर डोके टेकले. व आशीर्वाद घेतला. प्रल्हाद तात्यांनी तरुणांनो संघाचे काम प्रखडपणे करत राहा असे सांगितले. *साहेब जुने ते सोने असते* असे उच्चारताच अटलजी ठा-ठा असे मनसोक्त हसले. लगेचच तात्या पाटीलानी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यानंतर विविध अधिवेशनात त्याचे भाषण ऐकण्याचा योग आला. मात्र तळोद्यातील भेट ही अविस्मरणीय अशी आहे.
     डॉ.शशिकांतजी वाणी 
भाजपा प्रदेश सदस्य महा.राज्य

 *आठवण*
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे श्रध्दास्थान
भारत रत्न माजी पंतप्रधान अटलजींचे दुःखद निधन
 मनाला चटका लावणारे आहे. 1980 च्या काळात लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान त्यांनी तळोदा येथील आनंदचौकात सभा गाजवली होती. दरम्यान रेस्ट हाऊस येथे बैठकी दरम्यान त्यांनी माझी विचारपूस केली होती. त्यांच्या निधनानंतर एक लढवय्या नेतृत्व, सोज्वळ स्वभावाचा, हिंदुत्ववादी नेता हरपल्याचे दुःख आहे...
        भगवान चौधरी भाजपा 
जेष्ठ कार्यकर्ते जुने भाजपा पदाधिकारी 

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

बेटी बचावचा संदेश देत सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला मुलीचा वाढदिवस तळोद्याच्या नगरसेविका अनिता परदेशी यांच्या उपक्रमाचे कौतूक

वाढदिवस साजरा करायचे म्हटले म्हजले डिजिटल फलक, पाट्र्या देणे आदी आवाजवी खर्च केला जातो.
यात आपण आपला, आपल्या नेत्याचा किंवा नात्यातील मुलगा असो वा वडील तो किती धुमधडाक्यात साजरा केला याचे दर्शन घडविण्यावर भर दिला जातो. मात्र या सर्वाला अपवाद ठरत तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस स्वच्छता कर्मचारी यांच्या सोबत साजरा करीत महिलांना साडी-चोळी व पुरुषांना बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ तळोदा-सुंदर तळोदा असा जनजागृती संदेश लिहलेले टी-शर्टचे वाटप करुन एक सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. परदेशी कुटुंबियांच्या या उपक्रमाचे संपूर्ण शहरातून कौतूक करण्यात येत आहे.. वाढदिवस म्हटला की आवाजाची खर्च आलाच, राजकीय पुढारी वाढदिवसाला लाखोची उधळण करताना दिसतात. मात्र, दिवसभर स्वत:चा आरोग्याची चिंता न करता, पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा संकलन करणे, गटारीत उतरून मैला काढणे या सोबतच शहरात स्वछता कशी नांदेल यासाठी स्वछता कर्मचारी आपले जीवाचे रान करत कर्तव्य बजावतात. एवढे करूनही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे गलिच्छ कामे म्हणून पाहिले जाते. मात्र, तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी मुलीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. परदेशी दाम्पत्याला दोन कन्या आहेत. वाढदिवसाला पैशांची उधळण करण्यापेक्षा स्वछता कर्मचारी व त्यांच्या मुलांसोबत लहान मुलगी चेतनाचा वाढदिवस साजरा केला. पालिका आवारात हरिशचंद्र जोशी यांनी विधिवत पद्धतीने शांती पठण केले. यावेळी ५० महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या टी-शर्टवर बेटी बचाव, बेटी पढावो... स्वच्छ तळोदा सुंदर तळोदा असे संदेश लिहले होते. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पालिका प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, काँग्रेसचे शहादा-तळोदा समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, भाऊदादा पाडवी आदी उपस्थित होते..


वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂 यशस्वी भव....🎂
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो!