Breking News

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*

           
१५ नोव्हेंबर २०२४
दिल्ली निजामुद्दीन स्थानकावर पहाटे ५ वाजता आम्ही वेर्णाकुलम एक्सप्रेसने सुरतसाठी प्रवासाला सुरुवात केली. वातानुकूलित डब्यात रिझर्वेशन असल्याने प्रवास आरामदायक होता. पहाटेच्या शांत वातावरणात ट्रेन सुरू झाल्यावर खिडकीतून बाहेर बघताना हिवाळ्याचा गारठा जाणवत होता. स्टेशनवरचा गोंधळ मागे पडत, शहराच्या वर्दळीपासून दूर जात प्रवासाची खास सुरुवात झाली..

*प्रवासातील पहाटेचा आनंद*

         रेल्वे जसजशी पुढे सरकत होती, तसतसे दिल्लीचा धावपळीतला परिसर मागे पडत मोकळ्या, हिरव्या मैदानांचे दर्शन होऊ लागले. पहाटेचा चहा आणि  नाश्ता घेत गप्पा सुरू झाल्या. बाहेरून येणारा वारा आणि ट्रेनच्या खडखडाटात प्रवास अधिकच रोमांचक वाटत होता.
*राजस्थानचा ओसाड पण मोहक प्रदेश*

       दुपारच्या सुमारास रेल्वेने राजस्थानच्या हद्दीत प्रवेश केला. रुक्ष माती, दूरवर दिसणारे वाळवंटाचे सपाट मैदान, आणि मध्येच दिसणारी छोटी छोटी गावे प्रवासाला वेगळा अनुभव देत होती. कधी कधी उंटगाड्या आणि रंगीत पगड्या घातलेल्या व्यक्ती दृष्टीस पडत होत्या. यावेळी खिडकीतून बाहेर बघताना त्या प्रदेशाच्या वेगळेपणाचा आनंद घेत होतो.

*गुजरातच्या दिशेने प्रवास*
       जसजसा प्रवास पुढे सरकत होता, तसतसे हवा उष्ण होऊ लागली. संध्याकाळपर्यंत गुजरातमध्ये प्रवेश करताच, हिरवीगार शेती, नारळाची झाडं, आणि शेतकरी त्यांच्या कामात मग्न असल्याचे दृश्य दिसू लागले. गुजरातच्या रेल्वे स्थानकांवर स्थानिक पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांची लगबग आणि गुजराती भाषेतला संवाद ऐकून प्रवास अधिकच रंगतदार होत गेला.

*रात्री सुरत स्थानकावर पोहोचलो*

        रात्रीच्या सुमारास सुरत स्थानकावर पोहोचलो. स्टेशनवर उतरताच सुरतच्या व्यापारमय आणि चैतन्यशील वातावरणाची झलक पाहायला मिळाली. प्रवासाचा थोडासा थकवा होता, पण एक अद्वितीय अनुभव मिळाल्याचा आनंदही तितकाच होता. दिल्लीपासून सुरतपर्यंतचा हा प्रवास निसर्ग, संस्कृती, आणि प्रदेशाच्या वैविध्याचा साक्षीदार ठरला..

'हिमाचलची जादू, पंजाबचा रंग आणि दिल्लीचा वैभव: एक अविस्मरणीय सफर"

हिमाचल प्रदेशाचा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा एक अतुलनीय अनुभव! जणू काही स्वप्नातील प्रदेशातच आपण पोहोचलो आहोत, असे वाटते. घनदाट हिरवाई, उंच बर्फाच्छादित पर्वत, थंडगार बोचरी हवा, आणि धुक्यात लपेटलेले रस्ते—सर्व काही मनाला मोहवणारे वाटते.
               शिमल्याच्या राजसी सौंदर्यापासून प्रवासाला आमची सुरुवात झाली, गाडी सुरू झाल्यापासूनच सर्व जण एकमेकांची मजा घेत, मस्करी करत, आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होते. कोणीतरी नवीन "जोशात" गाणी लावली आणि मग सगळेच आवेशात गाण्यांवर नाचायला लागले. गाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हास्याचे लहरी घुमायला लागल्या. कधी कोणी उशाशी असलेले स्नॅक्स लपवायचं, तर कोणी हसून हसून पोट दुखेपर्यंत काही तरी विनोद करायचं—हे काही थांबायचं नाव घेत नव्हतं. लहान मुलं प्रत्येक गाडीतले किचकट मार्ग आणि चढ उतार पाहून "मला भीती वाटते" असं ओरडत असत, आणि मग त्यांच्या प्रतिक्रिया पाहून सगळे खळखळून हसायचे.
             हळूहळू डोंगरांच्या उंच-उंच उतारावरून जाणारे रस्ते, त्यावरून दिसणारे आकाशाच्या जवळचे दृश्य, आणि भोवतालच्या देवदारच्या जंगलांचा शांत सुगंध मन प्रसन्न करणारे वातावरण, शिमल्यातील प्रसिद्ध मॉल रोडवर फिरताना जुन्या वास्तू, कॅफे, आणि थंडीची गार हवा एक विलक्षण अनुभव देतो.

त्यानंतर मनालीतील बर्फाने झाकलेली कडेकपारी, बीयस नदीच्या काठावरची शांतता, आणि मनालीतील अटल टनेलच्या रस्त्यांवरील साहसी सफर आपल्याला थक्क करते. बर्फाच्या खेळांचा आनंद घेताना, आपले मनही त्या शुभ्र वातावरणात विरून जाते. सोलंग व्हॅलीत बर्फावरून स्कीईंग करणे, पैराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सहभागी होणे, ही एक रोमांचकारी अनुभूती होती. धर्मशाला आणि मॅकलोडगंज येथे पोहोचल्यावर तिबेटी संस्कृतीची ओळख होते. तिबेटी मोनेस्ट्रीचे शांत वातावरण, प्रार्थनेचे ढोल, आणि सुंदर बौद्ध मूर्ती या गोष्टी मनाला शांती देतात. मॅकलोडगंजच्या रस्त्यावर फिरताना तिबेटी खाद्यपदार्थांची चव घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे.

                डलहौसीतील खाजगी, शांत परिसर, पाइन वृक्षांनी भरलेले रस्ते, आणि चंबा खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य, प्रत्येक क्षणाला नवा रंग देतात. डलहौसीची हवा, त्यातील मोकळेपणा, आणि शीतल झुळूक आपल्याला ताजेतवाने करते.
   हिमाचल प्रदेशातील प्रत्येक ठिकाण आपले स्वतःचे खास वैशिष्ट्य घेऊन आलेले असते. या अद्भुत प्रवासामध्ये मिळणारे सौंदर्य, साहस, आणि शांतता—सर्व काही मनात रुंजी घालणारे आहे.. 
           डलहौसीच्या थंड, शांत वातावरणातून बाहेर पडताना डोंगराळ रस्त्यांवरून जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. गाडी हळूहळू घाटातून उतरू लागते आणि पाहता पाहता बर्फाच्छादित डोंगर मागे राहू लागतात. डलहौसीची रमणीयता मनात साठवत आणि डोंगरांच्या वळणांवरून जाताना समोर येणारा नवा प्रदेश आपल्या मनाला उत्सुक करतो.
                    अमर शहिदांचे पवित्र स्थान असलेल्या अमृतसरकडे जाताना पंजाबची हिरवीगार शेती, लांबवर पसरलेले गहू-सरसोचे शेत, आणि गावांतील पारंपारिक रितीरिवाजांची झलक दिसते. अमृतसरमध्ये पोहोचल्यावर थोडा विसावा घेऊन, सुवर्ण मंदिराच्या दर्शनासाठी जाताना मंदिराच्या सोनेरी तेजात मन हरवून जाते. या शांत मंदिरात भक्तीचा अनुभव काही वेगळाच असतो. गुरुद्वारात भेट देऊन लंगरचा प्रसाद ग्रहण केल्यावर, परिसरातील भक्तांच्या सेवा भावना मनाला स्पर्श करते.
त्यानंतर, वाघा बॉर्डरला भेट देण्याचा अनुभव आमचा हुकला. अमृतसरहून दिल्लीकडे निघताना प्रवासात पंजाबच्या संस्कृतीची झलक दिसली. दिल्लीतील पहाट वेळेत येणाऱ्या थंडीने प्रवासात नवीन ऊर्जा भरली. पहाटे पाच वाजेची एर्नाकुलम ट्रेन असल्याने राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांची भेटी पासून आम्ही वंचित राहिलो, 
               
                 अशा प्रकारे, डलहौसीच्या निसर्गरम्य वातावरणातून अमृतसरच्या भक्तिमय भावनेतून आणि दिल्लीच्या ऐतिहासिक स्थळांना मुकताना, प्रवासाचा हा अनुभव कायमच स्मरणात राहील. हा प्रवास म्हणजे फक्त स्थळदर्शन नव्हे, तर हास्य कल्होल आणि मित्रांच्या खट्याळपणाचे जंगी साक्षात्कार होता. प्रत्येक थांब्यावर हास्याची एक नवीन कहाणी तयार होत होती, आणि त्याचे गोड आठवणींमध्ये रूपांतर होत होते.

शिमल्याचे पर्वत, हिरवीगार झाडी,
बर्फाची चादर, स्वप्नातील गाणी।
थंड वाऱ्याची झुळूक हळुवार वाजे,
मनाला सुखावते, आनंद साजे।

मनालीचे रंग, धुकेलेली सृष्टी,
गंगाच्या प्रवाहात धरण्याची शक्ती।
निसर्गाचा तो साज सुंदर असे,
आनंदाचा प्रवास मनाला फसे।

अमृतसरचे सुवर्ण मंदिर पवित्र,
भक्तिमय वातावरण, दिव्य चित्र।
लंगरमध्ये भोजन, प्रेमाचा मेळ,
मनात कायमचा राहतो त्याचा ठेळ।

धर्मशालेचे शांती, शांत पाण्याचे सरोवर,
मंदिराच्या घंटा, घुमतो दूरवर।
ध्यानधारणा येथे मनाला येती,
शांतता शोधण्यास येथे मन रमेती।

डलहौसीच्या वाटा, हिरवेगार झाड,
फुलांच्या बागा, पक्ष्यांचा थवा वाढ।
प्रवासाच्या आठवणी मनात भरती,
जीवनात आनंदाचा गोडवा साठती।

शिमला, मनाली, अमृतसर, धर्मशाला, डलहौसी,
स्मृतींमधून फिरतात आनंदाचे फुलझडी।
प्रत्येक क्षण अनमोल, प्रत्येक क्षण खास,
संगतीत मित्रांबरोबर हा आनंदाचा प्रवास।


शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे अथक प्रयत्न आणि खेळाडू दिपिका छापोला हिचे यश

१९ वर्षांखालील राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत दिपिका छापोला यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड
सुनील सूर्यवंशी हे खेळ आणि शिस्त यांच्या मिश्रणातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा एक सतत प्रयत्न करणारे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना फक्त खेळ शिकवण्याचे नव्हे, तर त्यांना जीवनातील शिस्त, कष्टाची महत्त्वता, आणि मेहनतीने मिळणाऱ्या यशाची चव चाखायला शिकवण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांचेच फळ म्हणून, शाळेतील हँडबॉल संघाने अनेक वर्ष उपविजेतेपद मिळवले आणि अखेर दिपिका छापोलाने राज्यस्तरीय संघात स्थान मिळवून सर्वांच्या मेहनतीचे चीज केले.

*नियमित सरावाचे कठोर पालन*
सूर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना नियमित सरावाचे महत्त्व पटवून दिले. मैदानावर वेळेवर पोहोचणे, शारीरिक फिटनेस राखणे, हे त्यांचा सरावाचे मुख्य घटक आहेत. सूर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करून स्वतःचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांना वाटते की नियमित सराव आणि शिस्त ही यशाच्या मार्गातील मुख्य शिडी आहे.

*खेळातील प्रामाणिकता आणि शिस्त*

      सूर्यवंशी सर विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्तीप्रमाणेच खेळातील शिस्त पाळायला शिकवतात. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य, निष्ठा, आणि इतरांवर विश्वास ठेवण्याची सवय त्यांनी रुजवली. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रामाणिकतेने खेळण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, एक प्रामाणिक खेळाडू हाच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.
*खेळात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका*

सूर्यवंशी सरांनी कधीही खेळात तडजोड स्वीकारली नाही. जेव्हा स्पर्धेत फसवणूक दिसली, तेव्हा त्यांनी संघाला माघारी घेतल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना कधीही अप्रामाणिक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता भासली नाही. असे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये खरे मूल्य आणि आदर्श संस्कार रुजले.
*फसवणुकीला विरोध आणि मेहनतीवर विश्वास*

सूर्यवंशी सर इतर काही शिक्षकांप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना स्थान मिळवून देण्यासाठी कोणताही अप्रामाणिक मार्ग अवलंबत नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली, त्यांना खूप मेहनत करायला लावली, आणि योग्य मार्गदर्शन दिले. त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्तर गाठण्याचे स्वप्न पाहिले आहे.

*यशाची पहिली पायरी*

      अखेर, बुलढाण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत दिपिका छापोला हिची निवड झाली, आणि सूर्यवंशी सरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. हा त्यांच्यासाठी केवळ एक विद्यार्थी राज्यस्तरीय स्तरावर पोहोचणे नव्हे, तर त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्तीची वेळ होती. दिपिकाचे यश हे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे. सूर्यवंशी यांचा प्रामाणिकपणा आणि कष्टामुळे त्यांच्या संघाने अनेक वर्षांपासून शाळेचे नाव उज्वल केले, तरीही राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना संधी मिळत नव्हती. मात्र, बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत दिपिकाची राज्यस्तरीय संघात निवड होऊन सूर्यवंशी सरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा

    सूर्यवंशी सरांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे शाळेचे इतर विद्यार्थीही भविष्यात यश मिळवतील अशी आशा आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सतत कष्ट करणाऱ्या सूर्यवंशी सरांना आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

*संस्थेचे अध्यक्षांनी  दिल्या शुभेच्छा*
     शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु. महाजन व शी. ल. माळी कनिष्ठ विद्यालयाच्या दिपिका धनपत छापोला हिला बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात स्थान मिळाले आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई महाजन, संचालक आ. अरुण भाऊ महाजन, शाळेचे प्राचार्य प्रा. अमरदिप महाजन, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य सौ. शीतल महाजन, उपमुख्याध्यापक एस.के. खैरनार, पर्यवेक्षक ए.एल. महाजन आणि ए.आर. सूर्यवंशी यांसह संपूर्ण शिक्षकवृंदाने तिचे अभिनंदन केले आहे. असून उज्ज्वल भविष्यासाठी आशा व्यक्त केली आहे. दिपिकाची महाराष्ट्र संघात निवड ही केवळ तिच्यासाठी नव्हे तर शाळेसाठीही अभिमानास्पद बाब आहे. सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी यापुढेही यश संपादन करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

अमित गाभा: शांत, संयमी आणि दिलदार ढाबा मालकाचा अविस्मरणीय पाहुणचार

१४ नोव्हेंबर २०२४
         हरियाणाच्या कर्णाल येथील एन.एच ४४ हायवेवर असलेल्या हॉटेल अशोका ढाब्याचे मालक अमित गाभा यांच्या ढाब्यावर आमचा थांबा झाला. अमित गाभा यांच्या स्वभावातला शांतपणा, संयम, आणि मृदू बोलणे आम्हाला विशेष भावले. मित्र बनवण्याचा त्यांचा स्वभावही सहज लक्षात आला.

       महाराष्ट्रातून आलो असल्याने त्यांनी आमच्या खाण्याच्या आवडीचा विचार करून आम्हाला पूर्ण मोकळीक दिली. त्यांनी खास आमच्या इच्छेप्रमाणे खिचडी बनवण्याची परवानगी दिली आणि संपूर्ण किचन आमच्यासाठी खुलं केलं. "लागेल तेवढे वापरा," असे त्यांनी सांगितले आणि त्यात त्यांच्या दिलदारपणाचा प्रत्यय आला.
     अमित गाभा यांचा व्यवसाय मोठा असला, तरी त्यांचे मन त्याहून मोठे वाटले. अवघ्या २७००  रुपयांमध्ये त्यांनी आमच्या ३० जणांसाठी चविष्ट आणि आवडते जेवण उपलब्ध करून दिले. दिवसभराच्या थकव्याला आराम मिळावा म्हणून त्यांनी मनसोक्त, स्वादिष्ट भोजनाची सोय केली होती, ज्यामुळे आम्ही समाधानाने आणि आनंदाने भरून गेलो.
अमित गाभा यांचा आदरातिथ्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला, आणि त्यांच्या ढाब्यावर मिळालेल्या या पाहुणचाराची आठवण कायम स्मरणात राहील.

पुरोगामी विचाराचा धैर्यवान वारसदार : विशाल सुर्यवंशी

     'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' असे एक सुभाषित आहे. त्यानुसार ज्यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यात मोठेपण आहे असा मित्र व्यक्तिगत स्वार्थ बाजुला ठेवून दुसऱ्यांसाठी त्याग करण्यासही मागेपुढे पाहत नाही, असाच एक अवलिया व्यक्तिमत्व स्वतःच्या महत्वाकांक्षेला महत्व न देता सर्वांशी समभावतेने वागणारा. माणसाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कतृत्वाची गरज भासते, कतृत्व अंगी असेल तर नेतृत्व गुणही
 आपसुकच येतो आणि सर्वसामान्यांच्या घरातूनही असे दृढ निशच्यी व मोठ्या मनाचे उभरलेले व्यक्तिमत्व विशाल सूर्यवंशी,   लहानपणापासूनच अगदी खोडकर स्वभावाचा, घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित त्यात मामाचे घरही श्रीमंत त्यामुळे अतिशय लाडात वाढलेला सर्वांचा लाडका असा विशाल सूर्यवंशी उर्फ लखन आणि आम्ही त्यास लक्की म्हणून उलेखायचो, क्रिकेट खेळण्यात खूप पारंगत नसला तरी संघटन म्हणून एकत्रित राहण्याचा त्याचा हेतूमुळे तो कधी रायझिंग स्टार या संघाचा कर्णधार बनला कळलेच नाही डावखोरा फलंदाज व क्षेत्ररक्षक अशी ओळख त्यांची संघात होती. संघावर कुठलीही अडचण अथवा संकट आले सर्वात पहिले धावून जाण्याची त्याची तयारी असायची मग ती मैदानात शर्ट काढून समोरच्या संघाशी दोन हात करणे का असेना त्यातही तो कधी मागे सरकला नाही, आणि  त्याचा या पाठीराखा स्वभावामुळे सर्वांचा मनात एक वेगळी जागा निर्माण करण्यात तो यशस्वी झाला.कुणाच्याही लग्नकार्य असले तरी लक्की हा पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी थांबत होता लग्न मंडपात लागणाऱ्या सर्व बाबींवरती त्याचे बारीक-सारीक लक्ष होते मग अगदी लग्नात येणारे पाहुण्यांना सुद्धा तो मनोरंजन करत यासोबतच रसोडे सोबत थांबून संपूर्ण व्यवस्था करण्याचे कार्य विशाल हा लहानपणापासूनच पार पडत होता. एकत्रित कुटुंबाचा सहवासात वाढल्यामुळे कुटुंबाची समूह शक्ती त्याच्या मागे होतीच यामुळे भावंड मित्र गोतावळा यात कसे वावरावे हे त्याला सुरुवातीपासूनच अवगत होते.  त्याची आई चंद्रकला सुर्यवंशी तिला हमी चंदा मावशी म्हणून संबोधत अतिशय मनमिळाऊ प्रेमळ निस्वार्थ सोज्वळ मनाची आईच जनु ती, कधीही आम्ही त्यांच्या घरी गेलो तर जेवण केल्या शिवाय तिने परत येऊ दिल्याचे आम्हाला आठवत नाही, अगदी प्रेमाने ये मनो बच्चो अशी आहिरानी भाषेत तिचे बोललेले शब्द आजही कानी घुमतात.. प्रभाकर मावसाजी ही अतिशय शांत संयमी आणि तेवढाच पाल्यांच्या भविष्याच्या विचार करणारे दृढ विचारी व्यक्तिमत्त्व,  लक्की  यास एक मोठा भाऊ कपिल

व एक मोठी बहीण पूनम ताई लक्की हा लहान असल्याकारणाने खोडकर व हट्टी होताच त्यांच्या घरी गेल्यानंतर नेहमी पूनम ताई व कपिल भाऊचे अभ्यासाबद्दल टोमणे असायचे त्यावेळेस ते टोमणे वाटत असले तरी भविष्यात त्या सर्व गोष्टींची जाणीव झालीच स्व.कपिल भाऊ हा खूप हरहुन्नरी होता, असे म्हणतात ना जेथे लाथ मारेल तेथे पाणी काढेल याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे कपिल भाऊ,  तळोदा शहरात लग्न मंडपात वाढपी साठीची संघटन तयार करणारा सर्वप्रथम कपिल भाऊ त्याच्या माध्यमातून आम्ही देखील या वाढती सहभागी झालो कपिल भाऊ अंकलेश्वर येथे नोकरी कामे असताना त्याने बहुतांश तळोद्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली मात्र काळाचा घात झाला व बसच्या समोरासमोर अपघातात अंकलेश्वर येथून परतताना त्याचे निधन झाले त्यानंतर सूर्यवंशी कुटुंब हे या दुखात गेले. 

           अवघ्या दीड वर्षाचे बाळ पत्नी व कुटुंब सोडून घरातील कर्तव्यदक्ष स्व. कपिल भाऊ गेल्यामुळे घरची आर्थिक गणिते कोलमडली. संयुक्त कुटुंब नुकतेच विभक्त झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील बऱ्यापैकी ढसाळली होती. अश्यातच तरुण वहिनी व मुलाची जबाबदारी लक्कीच्या खांद्यावर पडली कमी वयापासूनच त्यागाची भूमिका ठेवणारा कुठल्याही कामाची लाज न बाळगणारा लक्की हा सुरुवातीच्या काळात सेंटिंग काम, मजुरी यासह विविध कार्यालयांमध्ये त्याने कामे केले. काभाळ कष्ट करून त्याने कुटुंबाचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला अशातच आलेले संकटावर कशा पद्धतीने मात करावी हे त्याला उमजत नव्हते. त्याचे लग्न जमले होते साखरपुडा ठरला होता, ऐन लग्न तोंडावर आल्यानंतर भावाची दुर्दैवी घटना घडल्यामुळे काय करावे हे देखील त्याला कळत नव्हते, त्याने ते लग्न तात्काळ मोडून पाश्चिमात्य संस्कृतीला मागे टाकत आपला भावाचा संसाराची जबाबदारी घेत पुरोगामी विचारसरणी त्याने अवलंबली, भले मोठे मन करून वहिनीची जबाबदारी घेत तिच्याशीच लग्न फेऱ्या घेतल्या आणि एक उदार मन दाखवून त्याने समाजाला व तरुणाना एक वेगळी शिकवण दिली.. आश्विनी वहिनी ही तेवढीच प्रेमळ, समंजस, हुशार व विविध कला कौशल्य संपन्न असलेली आहे. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी असून सुंदर असा परिवार आहे. आयुष्याचे गाडे खूप सिताफिने सर्वांना आनंद ठेवून ते दोघे ओढत असल्याचा अभिमान वाटतो.

          आज लक्की हा एक यशस्वी व्यावसायिक असून त्याचे तळोदा शहरातील राजपत मार्गावर बिल्डिंग मटेरियल चे भले मोठे दुकान आहे. या माध्यमातून करोडोचा टन ओव्हर त्याचा आहे. आजही पुन्हा मित्रावर संकट आले की विशाल सर्वप्रथम धावून येतो दवाखाना असला तर सर्व कामे सोडून स्वतःचे असो वा दुसऱ्या कुणाचे वाहन आणून तो रुग्णास दवाखान्यात नेण्याचे कार्य सीताफिने करतो त्यासोबतच लागणारा खर्च सुद्धा पुरवण्याचे धाडस दाखवतो. अवघ्या आठ वर्षांपासून संपर्कात असलेला विशाल उर्फ लखन आजही त्याचा आणि माझा संपर्क तेवढाच विश्वासाचा व आपुलकीचा असल्यामुळे देवाने दिलेले एक सुंदर नात्यांपैकी त्याची ही मैत्री आहे आणि त्यात कुठलाही बडेजाव नाही आम्ही पहिले जसे होतो तसेच आजही गुना गोविंदाने सोबत आहोत याचा आम्हाला गर्व आहे.. विशेष म्हणजे सुरुवातीपासून सर्व मित्र परिवार एकजूट ठेवण्यात विशालचा ही खारीचा वाटा आहे......

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

हिमाचलच्या रस्त्यांवर एक निष्ठावंत सहकारी: रोहित शर्मा


१४ नोव्हेंबर २०२४
अवघ्या 23 वर्षांच्या रोहित शर्माने हिमाचल प्रदेशातील खडतर रस्त्यांवर आपली ताकद दाखवली आहे.   “मीट माय हॉलिडेज” या कंपनीसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम ड्रायव्हर म्हणून त्यांनी लहान वयातच नाव कमावले आहे.   त्यांचे उत्कृष्ट ड्रायव्हिंग कौशल्य पर्यटकांना हिमाचल प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचा सहज आणि सुरक्षित अनुभव देतात.
  रोहितच्या ड्रायव्हिंग शैलीमध्ये वेग नियंत्रण, समन्वय आणि सावधगिरीचे मिश्रण आहे.   हिमाचलच्या वळणदार आणि खडी रस्त्यावर गाडी चालवताना त्याचे ड्रायव्हिंग कौशल्य दिसून येते.   त्याच्या सौम्य आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे हसण्याची आणि प्रवाशांशी संवाद साधण्याची त्याची क्षमता विलक्षण बनते, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव आणखी खास बनतो.
  रोहित हा केवळ ड्रायव्हर नाही तर तो खरा सहकारी आणि मार्गदर्शकही आहे.   ते नेहमी त्यांच्या सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात आणि अगदी कमी अनुभवी ड्रायव्हर्सना सल्ला देतात. लहान वयात मिळालेल्या अनुभवामुळे, हिमाचलच्या पर्यटनाबद्दल त्यांना भरपूर ज्ञान आहे, जे ते प्रवाशांना सतत देत असतात.   त्यांच्या सहकार्याने पर्यटकांना हिमाचलची अविस्मरणीय सहल देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
  त्याचे सहकारी आणि प्रवासी दोघेही त्याच्या समर्पण आणि कौशल्याची प्रशंसा करतात.   कंपनीला त्याच्या कामगिरीवर विश्वास असल्याने, त्याने विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित ड्रायव्हर्सच्या "मीट माय हॉलिडेज" यादीत स्थान मिळवले आहे.   रोहित शर्माचे यश हे त्याच्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे परिणाम आहे, जे त्याच्या यशस्वी कारकिर्दीचा भक्कम पाया आहे.

जगदीश शर्मा: एक उत्कृष्ट ड्राइवर और एक विश्वसनीय मार्गदर्शक

    14 नोव्हेंबर 2024
        अनुभवी ट्रक ड्रायव्हर, जगदीश शर्मा हे ट्रॉली चालवण्यात निपुण म्हणून ओळखले जातात.   दिल्ली ते हिमाचल आणि अमृतसर या प्रवासात आम्ही त्यांचे कौशल्य अनुभवले.   त्याचे ड्रायव्हिंग कौशल्य अपवादात्मक आहे आणि त्याचे शांत वर्तन सर्वांनाच आवडते.
          जगदीश हा केवळ ड्रायव्हर नाही तर प्रवासादरम्यान कौटुंबिक नातेसंबंध बांधताना आपले विचार सहज मांडू शकणारी व्यक्ती आहे.   प्रवाशांसाठी तो फक्त ड्रायव्हर नाही तर विश्वासू साथीदार बनतो.   त्यांच्या सरळ स्वभावाने ते प्रत्येकामध्ये एक अनोखा विश्वास निर्माण करतात.
         मीट माय हॉलिडेज या टूर कंपनीमध्ये जगदीशने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.   यात त्यांचा पुतण्या रोहित शर्माचा मोठा वाटा आहे.   रोहितच्या माध्यमातून कंपनीत रुजू झालेला जगदीश आज एक कुशल ड्रायव्हर आणि पर्यटकांचा विश्वासू साथीदार बनला आहे.   ड्रायव्हिंगमध्ये तरबेज असलेला जगदीश प्रवासातील छोट्या-मोठ्या घटनांमधून आपला अनुभव जपतो.
           जगदीश शर्मा यांनी आमची सहल खरोखरच आनंददायी आणि आनंददायी केली.   त्याच्या अनुभवी ड्रायव्हिंगचा आम्हाला कुठेही त्रास झाला नाही आणि त्याने रस्त्याच्या प्रत्येक वळणावर, प्रवासातील प्रत्येक क्षण इतक्या कुशलतेने पार पाडला की आम्ही कोणतेही कष्ट न घेता गाडी चालवत राहिलो.   त्याचा शांत स्वभाव आणि प्रवाशांशी सहज संवाद साधण्याची गुणवत्ता यामुळे संपूर्ण प्रवास अधिक खास झाला.   जगदीशच्या कंपनीने आमच्या प्रवासाला एक वेगळेच समाधान दिले.

सुवर्ण मंदिर दर्शन आणि अमृतसरचा संस्मरणीय प्रवास

१४ नोव्हेंबर २०२४
आम्ही पहाटे सहा वाजता सुवर्ण मंदिराच्या दर्शनासाठी लवकर निघालो. दुसऱ्या दिवशी गुरू नानक जयंती असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात जमले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीभावाने आणि उत्साहाने भरून गेला होता. मंदिराच्या परिसरात वातावरण अतिशय प्रफुल्लित होते, आणि सर्वत्र भक्तांची भल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळीच आम्हाला मंदिराचे दर्शन घेता आले, आणि त्या पवित्र दर्शनानंतर मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान होते.

दर्शन घेतल्यावर प्रसाद स्वीकारला आणि नंतर लंगरमध्ये जाऊन उभे राहिलो. लंगरमधील अनुभव खूपच खास होता - तेथे सर्वांना समान भावाने अन्न मिळते, आणि तो क्षण खूपच भावनिक वाटला.
दर्शन आणि लंगर झाल्यावर आम्ही जालियानवाला बाग परिसरात फिरायला गेलो. त्या ठिकाणी इतिहासाची आठवण करून देणारे स्थळ पाहताना एक वेगळाच भावुक अनुभव आला. त्यानंतर, आम्ही स्थानिक मार्केटमध्ये थोडी किरकोळ खरेदीही केली, जिथे पंजाबची संस्कृती आणि परंपरा अनुभवायला मिळाली. यासोबतच प्रसिद्ध पंजाबची लस्सी पिण्याचा आनंद घेतला, ज्याने या प्रवासाचा गोडवा आणखी वाढवला. हा प्रवास अतिशय आनंददायक आणि संस्मरणीय होता.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

धर्मशाला: निसर्ग सौंदर्य आणि भाऊसाहेब यांचा कर्तव्याचा अभिमान

दि.११ नोव्हेंबर २०२४
             धर्मशाला, हिमाचल प्रदेशातील एक अद्वितीय ठिकाण, जिथे बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवेगार जंगल, आणि मंद वाऱ्यांचा अनुभव मिळतो. या प्रवासात आर्मीत कार्यरत असलेला आमचा काकाचा मुलगा भाऊसाहेब सुर्यवंशी याच्या घरी थांबणे एक भावनिक आणि विशेष अनुभव ठरला.

          भाऊसाहेब भविष्याच्या दृष्टीने भारतात होणाऱ्या आपत्कालीन बायलोजिकल, वारफेअर प्रशिक्षणासाठी पुणे येथे ट्रेनिंगला गेले होते. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, यश व वहिनी साहेब यांनी आमचे य मनःपूर्वक स्वागत केले. यासह घरातील तन्मय व कुटुंबीयांशी भेटून दिलखुलास आनंद झाला. त्या चिमुरड्यांचा उत्साह आणि खेळकरपणा घरात आनंदाचे वातावरण निर्माण करत होता. रंगलेल्या गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, ज्यात घराघरातल्या कहाण्या आणि आठवणी सामील झाल्या.

             गावाच्या साधेपणाने आणि हिरव्यागार निसर्गाने आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा अनुभव दिला. ताजेतवाने करणारी थंड हवा, शांतता, आणि आकर्षक दृश्ये मनाला एक वेगळाच आनंद देत होती. धर्मशालाच्या सौंदर्यामुळे आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो.

       रात्री, गरमागरम पनीर व खीर वर ताव मारत आम्ही एकत्रितपणे आनंद घेतला, आणि त्या खास क्षणांची गोडी घेतली. प्रत्येक चवीने आनंद वाढत गेला, आणि आमच्या गप्पांनी घरातला वातावरण आणखी जीवंत झाला.

          धर्मशालामधील शांतता, गडद निळ्या आकाशात घिरट्या घालणारे ढग, आणि पर्वतांच्या अंगणात निवांत क्षण घालवताना, आम्ही एकमेकांबरोबरचे स्नेहबंध अधिक घट्ट केले. तिथल्या शांततेने मनाला शांती दिली, आणि एकत्र बसून हसणे-खेळणे या क्षणांचे महत्त्व आमच्यात अधिक जागृत केले.

                  भाऊसाहेब सुर्यवंशी हे सुर्यवंशी परिवारातील एक महत्त्वाचा सदस्य आहेत, ज्यांचा देशाच्या सुरक्षेसाठी केलेला योगदान त्यांच्या कुटुंबाची ऊर्जा वाढवण्यात खूप महत्त्वाचा आहे. त्यांची मेहनत आणि समर्पण कुटुंबाला एकत्र आणत आहे आणि सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. त्यांच्या बद्दल एक वेगळाच आदर कुटुंबात बाळगला जातो.
            भाऊसाहेबांच्या कार्यामुळे त्यांच्या कुटुंबात देशभक्तीची भावना बळकट झाली आहे, ज्यामुळे सर्व सदस्य एकमेकांमध्ये सहकार्य आणि समर्थनाचा भाव निर्माण करतात. हे सर्व एकत्रितपणे त्यांच्या कामात आणि जीवनात सामूहिक योगदान देते, ज्यामुळे सुर्यवंशी परिवाराची ऊर्जा आणखी वाढते. भाऊसाहेब यांचा व्यक्तीमत्वामुळे परिवारातील संबंध अधिक दृढ बनत आहेत, आणि एकत्रितपणे देशासाठी योगदान देण्याचा गर्व अनुभवला जात आहे.

         भाऊसाहेबच्या पत्नीच्या साधेपणामुळे आणि बोलक्या स्वभावामुळे आम्ही खूप प्रभावित झालो. यश यांनी आम्हाला आर्मी कॅम्पस पासून ते  कॉटेज पावेतो आणले. त्यांच्या मनमिळावू स्वभाव व कमी वयात असलेले समजदारी पाहून मनाला गर्वित वाटले. त्यामुळे या भेटीत एक खासता निर्माण झाली असेल.

    त्यांना मिळालेले कॉटेज हे प्रशस्त आणि आरामदायी होतें. तसेच बाहेरच्या दृश्याने मनाला भुरळ घातली. बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि हिरवागार परिसर पाहण्याचा अनुभव अद्भुत ठरला. धर्मशालाच्या शांत वातावरणात थांबून आम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा अनुभव मिळाला, ज्यामुळे या ठिकाणाची अधिक गोडी वाढली. या शांत ठिकाणातील सौंदर्य आणि स्नेहाच्या गाठी, नेहमीच लक्षात राहील.
        भाऊसाहेब हे भारतीय आर्मीतील एक महत्वाचे स्थान मिळवलेले अधिकारी आहेत. त्यांच्या धैर्याने आणि सेवा वृत्तीमुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये आदर आणि सन्मान मिळवला आहे. त्यांनी देशसेवा करत असताना कुटुंबीयांची काळजी घेण्याची भूमिकाही अत्यंत जबाबदारीने पार पाडली आहे. भविष्याच्या दृष्टीने त्यांनी कुटुंबासाठी खास नियोजन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षितता आणि भविष्याची दिशा मिळू शकेल.

भाऊसाहेबांचे कुटुंब साधे आहे. त्यांचे जीवन सादगीपूर्ण असून, त्या साधेपणात एक वेगळेच सौंदर्य आहे. कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ते नेहमी तत्पर असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला. या विशेष अनुभवांनी आम्हाला नवा जीवनपण दिला, आणि धर्मशालाची ही भेट आमच्या मनाच्या गाभ्यात कायमची स्थान करून राहील......

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

शिमला ते मनाली: निसर्गसौंदर्य आणि साहसाने भरलेला रमणीय प्रवास


     शिमला ते मनाली प्रवास हिमाचल प्रदेशातील अत्यंत रमणीय आणि साहसी अनुभव देणारा आहे. साधारणतः २४५ किमी अंतराचे हे प्रवास, सुमारे ७-८ तासांचा असतो, त्यामुळे कंटाळा सुध्दा येतो. पण या प्रवासातील निसर्गरम्य दृश्ये मनमोहक असतात.
       प्रवासाच्या सुरूवातीस, शिमलाच्या हिरव्या टेकड्यांमधून बाहेर पडताना देवदार, ओक, आणि पाईनच्या झाडांनी सजलेली घनदाट वनराई स्वागत करते. या रस्त्यावर असलेल्या वळणांमधून प्रवास करताना उंच डोंगर, धुक्याचे दुलईसारखे थर, आणि गडद निळे आकाश यात मन गुंतून जाते.

कुल्लू भागात येताच, बियास नदी प्रवासाची साथी होते. नदीच्या काठावर छोटे छोटे गाव, रंगीबेरंगी फुलांची शेती, आणि सफरचंदांच्या बागा यांची झलक दिसते. कुल्लूमधील रिव्हर राफ्टिंग आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची संधी प्रवासात अधिक थरार आणते.
मनालीच्या जवळ येताच, डोंगराळ भागातील थंड हवा आणि दूरवर दिसणारे हिमाच्छादित पर्वत आपले लक्ष वेधून घेतात. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात सोलांग व्हॅलीची देखणी दृश्ये, बर्फाच्छादित शिखरे, आणि निसर्गाचा मनोहारी अनुभव मिळतो.

हा प्रवास केवळ डोंगर, नद्या, आणि जंगल यांचा समन्वय नसून, हिमाचल प्रदेशाच्या संस्कृती आणि जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी देतो.
     
*मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेल: आल्हाददायक सेवा आणि सुंदर निवासाचा अनुभव*

शिमला आणि मनालीच्या प्रवासात आम्हाला मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली, आणि या दोन्ही हॉटेल्सचा अनुभव अतिशय सुंदर होता.

मिरकुला कॉटेजचे वातावरण अत्यंत आल्हाददायक वाटले मात्र आम्हाला ऐनवेळी हॉटेल तारा मध्ये एक रात्र राहण्यास विनंती केली.  त्या अनुषंगाने आम्ही विनंती स्वीकारली याठीकांच्या खोल्या आरामदायी आणि सुशोभित आहेत. खोलींच्या खिडक्यांतून बाहेर दिसणारे डोंगर, हिरवी झाडी, आणि धुक्याने आच्छादलेले निसर्ग दृश्य मनाला प्रसन्नता देतात. संपूर्ण हॉटेलमध्ये स्वच्छता आणि देखभाल उत्तम असल्याने राहण्याचा अनुभव सुखकर होतो. या हॉटेलच्या खोल्याही आरामदायी, प्रशस्त, आणि आधुनिक सोयींनी युक्त आहेत. हॉटेलमधील कर्मचारी अतिशय नम्र, मदत करणारे आणि तत्पर आहेत, त्यामुळे पाहुण्यांना घरच्यासारखी अनुभूती मिळते. त्यांनी दिलेल्या तत्पर सेवेमुळे आमचा मुक्काम अधिक आनंददायी झाला.

या हॉटेल्समध्ये राहण्याचा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय ठरला, ज्यामुळे आमच्या प्रवासाची मजा अधिकच वाढली.

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

विक्की ठाकूर: दिलदार स्वभावाचा, कमी वयात मोठे यश मिळवणारा तरुण

हिमाचल प्रदेशातील पर्यटन क्षेत्रात एक नाव लौकिकास आले आहे – विक्की ठाकूर, "मीट माय हॉलिडेज" कंपनीचे मालक. कमी वयातच त्यांनी हिमाचल प्रदेशात टूर प्लॅनिंग आणि हॉटेलिंग क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. शिमला येथे राहणारे विक्की ठाकूर, अहमदाबाद आणि शिमला या दोन्ही ठिकाणी "मीट माय हॉलिडेज"चे कार्यालय चालवतात. त्यांच्या कंपनीची हॉटेल्स मनाली, शिमला तसेच इतर पर्यटन स्थळांवर आहेत, जे प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी ओळखले जातात.
विक्की ठाकूर हे एक संयमी, दिलदार आणि मन मिळावु स्वभावाचे व्यक्तिमत्त्व वाटले. कमी वयात व्यवसायाच्या शिखरावर पोहोचले असूनही, त्यांच्यात कोणताही बडेजावपणा नाही. ते सर्वांशी आपुलकीने वागत असल्याचे त्यांच्या पहिल्या भेटी दरम्यान समोर आले.

        आमच्या हिमाचल टूर दरम्यान कंपनी व आमचे काही गैरसमज झाले होते, ज्यामुळे आम्ही पूर्ण रक्कम टूरच्या पहिल्या दिवशीच भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी रक्कम घेण्यासाठी आत्थास धरला, आम्हीही रक्कम देणार नाही यावर निश्चित राहिलो. मात्र, त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वतः विक्की ठाकूर यांनी द टाऊन विला या हॉटेलला रात्री ११:१५ वाजता आमच्याशी प्रत्यक्ष भेटायला आले. त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि सर्व गोष्टींमध्ये स्पष्टता आणून समस्या सोडवली. यामुळे त्यांच्या दिलदार आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे प्रत्यंतर आले.
        विक्की ठाकूर हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक नसून एक उत्तम माणूसही आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी हिमाचल प्रदेशातील पर्यटनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. कमी वयातच इतके मोठे यश मिळवूनही त्यांची साधेपणा आणि तळमळीची वृत्ती त्यांच्या यशाचे खरे रहस्य आहे..... 
....Thnx sir.....

शिमला ते मनाली: निसर्गसौंदर्य आणि साहसाने भरलेला रमणीय प्रवास

शिमला ते मनाली प्रवास हिमाचल प्रदेशातील अत्यंत रमणीय आणि साहसी अनुभव देणारा आहे. साधारणतः २४५ किमी अंतराचे हे प्रवास, सुमारे ७-८ तासांचा असतो, त्यामुळे कंटाळा सुध्दा येतो. पण या प्रवासातील निसर्गरम्य दृश्ये मनमोहक असतात.

       प्रवासाच्या सुरूवातीस, शिमलाच्या हिरव्या टेकड्यांमधून बाहेर पडताना देवदार, ओक, आणि पाईनच्या झाडांनी सजलेली घनदाट वनराई स्वागत करते. या रस्त्यावर असलेल्या वळणांमधून प्रवास करताना उंच डोंगर, धुक्याचे दुलईसारखे थर, आणि गडद निळे आकाश यात मन गुंतून जाते.
कुल्लू भागात येताच, बियास नदी प्रवासाची साथी होते. नदीच्या काठावर छोटे छोटे गाव, रंगीबेरंगी फुलांची शेती, आणि सफरचंदांच्या बागा यांची झलक दिसते. कुल्लूमधील रिव्हर राफ्टिंग आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची संधी प्रवासात अधिक थरार आणते.

मनालीच्या जवळ येताच, डोंगराळ भागातील थंड हवा आणि दूरवर दिसणारे हिमाच्छादित पर्वत आपले लक्ष वेधून घेतात. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात सोलांग व्हॅलीची देखणी दृश्ये, बर्फाच्छादित शिखरे, आणि निसर्गाचा मनोहारी अनुभव मिळतो.
हा प्रवास केवळ डोंगर, नद्या, आणि जंगल यांचा समन्वय नसून, हिमाचल प्रदेशाच्या संस्कृती आणि जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी देतो.
     
*मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेल: आल्हाददायक सेवा आणि सुंदर निवासाचा अनुभव*

शिमला आणि मनालीच्या प्रवासात आम्हाला मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली, आणि या दोन्ही हॉटेल्सचा अनुभव अतिशय सुंदर होता.

मिरकुला कॉटेजचे वातावरण अत्यंत आल्हाददायक वाटले मात्र आम्हाला ऐनवेळी हॉटेल तारा मध्ये एक रात्र राहण्यास विनंती केली.  त्या अनुषंगाने आम्ही विनंती स्वीकारली याठीकांच्या खोल्या आरामदायी आणि सुशोभित आहेत. खोलींच्या खिडक्यांतून बाहेर दिसणारे डोंगर, हिरवी झाडी, आणि धुक्याने आच्छादलेले निसर्ग दृश्य मनाला प्रसन्नता देतात. संपूर्ण हॉटेलमध्ये स्वच्छता आणि देखभाल उत्तम असल्याने राहण्याचा अनुभव सुखकर होतो. या हॉटेलच्या खोल्याही आरामदायी, प्रशस्त, आणि आधुनिक सोयींनी युक्त आहेत. हॉटेलमधील कर्मचारी अतिशय नम्र, मदत करणारे आणि तत्पर आहेत, त्यामुळे पाहुण्यांना घरच्यासारखी अनुभूती मिळते. त्यांनी दिलेल्या तत्पर सेवेमुळे आमचा मुक्काम अधिक आनंददायी झाला.

या हॉटेल्समध्ये राहण्याचा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय ठरला, ज्यामुळे आमच्या प्रवासाची मजा अधिकच वाढली.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

दिल्ली ते शिमला: १० कुटुंबीयांसोबत थंड हवेतील प्रवास

दि.०६ नोव्हेंबर २०२४
              सकाळी 10:30 वाजेला १० मित्रांसह आम्ही दिल्लीत निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचलो. आमच्यातील काही जण दिल्लीला प्रथमच आले असल्याने शहराचे वातावरण आणि गजबज त्यांच्यासाठी विशेष अनुभव होता. रात्रीच ट्रॅव्हल प्लॅनर श्रीमती हेमांगी यांनी रात्रीच आमची शिमला येण्याची व्यवस्था केल्यामुळे स्टेशनवर आमची दोन १५ आसन असलेल्या टेम्पो ट्रॅव्हल गाड्या आमची वाट पाहत उभ्या होत्या. आम्ही प्रवास सोयीसाठी दोन गटांत विभागलो.
दिल्लीच्या धावपळीतील क्षण टिपत आणि गप्पांचा आनंद घेत आम्ही गाड्यांतून शिमलाकडे रवाना झालो. "मीट माय हॉलिडेज" या ट्रॅव्हल कंपनीने आधीच आमच्या सोयीची सर्व व्यवस्था केली होती, त्यामुळे आम्हाला प्रवासाचे टेन्शन नव्हते. दिल्ली सोडताच लवकरच रस्त्यावरील निसर्ग बदलू लागला.  पंजाब लुधियानाच्या मोकळ्या रस्त्यांवरून चालताना समोरच्या डोंगरांच्या रांगा हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. सगळे प्रवासी एका वेगळ्या आनंदात होते, प्रत्येक ठिकाणची नवी अनुभूती घेण्यासाठी उत्सुक होते.
         
     हळूहळू घाटरस्त्यांवर गाडी चढू लागली आणि थंड वाऱ्याचे झोत जाणवू लागले. खिडक्यांमधून येणारी थंडीचे स्पर्श आणि हिमालयाच्या पर्वतश्रेणीचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकणारे होते. रस्त्याच्या वळणांवरून जाताना डोंगरांवरून दिसणारी छोटी-छोटी घरं, वाहणारे नद्यांचे प्रवाह, आणि हिरवाईनं नटलेला परिसर हा निसर्गाच्या अद्भुततेचा अनुभव देत होता.

         रस्त्याच्या मार्गात चहा आणि स्नॅक्ससाठी थांबण्याच्या ठिकाणी आम्ही स्थानिक चहा आणि गरमागरम भाजीचा आनंद घेतला. त्यातली वेगळीच चव आणि ताज्या हवेचा स्पर्श मन प्रसन्न करत होता. शिमल्याच्या दिशेने जाताना, रस्त्यांवरचे शंकूच्या आकाराचे देवदाराचे झाडे आणि उंच उंच पर्वतांचे दृश्य पाहून आम्हाला खूपच आनंद झाला.

शिमल्याच्या जवळ येताना थंडी अधिकच वाढली होती, आणि हवेतला बोचरा स्पर्श आम्हाला हिमालयाच्या जवळ असल्याची जाणीव करून देत होता. शेवटी, संध्याकाळच्या सुमारास आम्ही शिमल्याला पोहोचलो. डोंगरांच्या कुशीत वसलेले, धुक्यांनी झाकलेले, आणि लाईट्सनी उजळलेले शिमला अप्रतिम दिसत होते. थंड हवेत वातावरण एकदम शांत आणि स्वप्नवत वाटत होतं.

हॉटेलवर पोहोचल्यावर थोडासा आराम केला, आणि मग सगळेजण शिमल्याच्या प्रसिद्ध मॉल रोडला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

"भुसावळ ते दिल्ली – मैत्री, गप्पा आणि आनंदमय प्रवास"

          भुसावळ स्थानकावर सर्व दहा मित्र सहकुटुंब सोबत जमा झाले. स्टेशनवर हसतमुखाने भेटीगाठी होताच प्रवासाची एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. लहानग्यांचे तर खेळण्यात आणि गप्पा गोष्टीत रंगलेले पाहून सर्वांनाच बालपणाची आठवण झाली. सुधाकर मराठे आणि त्याचे मित्र, त्यांच्या पत्नी, आणि मुलं सगळेजण अत्यंत आनंदात होते.
            मराठवाडा एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात सायंकाळी 5 वाजता ह्या सफरला सुरुवात झाली. एक सदस्य दादाभाऊ पाटील यांचा वाढदिवस याच ठिकाणी केके कापून साजरी करण्यात आला. मुलांची केक खाण्याची मज्जा पाहण्यासारखी होती. रेल्वे येताच बाळ गोपलांसह सगळ्यांनी आपली जागा घेतली. ट्रेन सुरू होताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आनंद आणि उत्साह झळकला. सहकुटुंब प्रवास असल्यामुळे गप्पांचा एकच माहोल रंगला होता. मुलं खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहण्यात मग्न झाली, तर महिला विविध विषयांवर चर्चा करत होत्या - शॉपिंग, प्रवासातील नियोजन, आणि भविष्यातील योजना.

             माझे मित्र प्रवासात विविध गमती-जमती करत होते, कोणी गाणी म्हणत होते तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देत होते. सुधाकर मराठे यांचे नियोजन, राकेशचे सर्वांना हसवण्याचे प्रयत्न, आणि प्रशांत, ज्ञानु, दादू, चेतन सागर, राहुल,  मनोज,लखन यांच्या काही खोडकर गंमती सगळ्यांनाच आनंद देत होत्या. एका वेगळ्याच भावनांच्या लाटेत प्रवास रंगला होता.
  
            सकाळी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच लहानग्यांनी परत उधळण सुरू केली. दिल्ली जवळ येताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह झळकत होता, कारण हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सुंदर व मनमोहक दृश्यांचा साक्षात्कार देणारा प्रवास समोर होता....

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

"सहकुटुंब आनंदयात्रा: मैत्रीची गोडी आणि रेल्वेचा सफर"

           माझ्यासह १० वर्गमित्र, त्यातील काही वर्ग मित्र व काही रायझिंग स्टार क्रिकेट संघाचे सदस्य आहेत, आमची मैत्री म्हणजे एक विशेष बंधन आहे. लहानपणापासूनची निखळ मैत्री, एकमेकांसोबतचे असंख्य अनुभव आणि आठवणींनी समृद्ध असलेले आम्ही मित्र दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी एकत्र प्रवास करतो. आमच्या या प्रवासात केवळ पर्यटन नसते, तर आमच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा उद्देशही असतो.
              सन २०२२ च्या पाँडिचेरी बालाजी दर्शनानंतर २०२४ साली आम्ही हिमाचल प्रदेश, दिल्ली, आणि पंजाब या उत्तरेकडील रमणीय स्थळांना भेट देण्याचे ठरवले, आणि खास गोष्ट म्हणजे यावेळी आम्ही मागच्या प्रमाणे कुटुंबीयांनाही या प्रवासात सहभागी करून घेतले. या प्रवासामुळे आम्हाला निसर्गसौंदर्य अनुभवण्याबरोबरच आपआपल्या कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची अनोखी संधी मिळाली. आमच्या या साहसी प्रवासाची ही कहाणी म्हणजे एकत्र कुटुंब, मैत्री आणि निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेले रमणीय क्षण यांचे मिश्रण आहे.

          ८ जोडपी कुटुंबीयांसह  नंदूरबार रेल्वे स्थानकावर खान्देश एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करण्यासाठी उत्साहात जमली होती. प्रवासाची तयारी, मुलांची लगबग, आणि सामानाच्या गडबडीत सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत गर्दीत आपापली स्थान मिळवली. काही बालके नवीन ठिकाणाला भेट देणार असल्यामुळे अत्यंत आनंदी होती; काही जण खेळण्यांत मग्न तर काही आईच्या कुशीत झोप घेण्याच्या तयारीत होती.
         रेल्वे स्थानकावर वातावरण हलकंफुलकं होतं, प्रत्येकाने आपले सामान व्यवस्थित ठेवलं आणि आपल्या स्थानांवर बसले. गाडी सुरू झाल्यावर, खिडकीतून बाहेर बघत मुलं निसर्गसौंदर्याचा आनंद घेत होती. पसरलेल्या शेतं, छोटी गावं, नदीचे किनारे या सर्व दृश्यांनी मुलांना भुरळ घातली होती. प्रवासात थोड्याच वेळात बिस्किटं, चिप्स आणि फळांच्या पिशव्या उघडल्या गेल्या.

        मुलांचे खेळ, त्यांचे हसणे-खिदळणे, आणि त्यांचे आई-वडिलांशी केलेले गोड संवाद, यामुळे डब्यात एक प्रसन्न वातावरण तयार झाले. काही जोडपी आपापसात गप्पा मारत होती, तर काहीजण मुलांच्या काळजीत मग्न होते. बालकांना खिडकीतून बाहेर बघण्यात विशेष आनंद मिळत होता. थंडीचा गारवा आणि प्रवासातील आल्हाददायक अनुभवामुळे प्रत्येकजण आनंदात होता. ज्ञानुचे कुटुंब ब्रहानपुर येथून निघाले. प्रशांत लोट्याचे कुटुंब एक दिवस अगोदरच जळगावात दाखल झाले होते. तर सुधाकर व राहुल यांचे कुटुंब दुपारी १२ वाजे नंतर नंदूरबार येथून भुसावळसाठी प्रवासाला बसणार होते.
          हळूहळू सर्वांनी भुसावळ जवळ आल्याची जाणीव झाली, आणि गाडी थांबल्यावर सर्वजण आपले सामान सांभाळत खाली उतरले. भुसावळ येथे मित्रपरिवाराचा पुढील प्रवासासाठी नियोजन तयार होताच, आनंदी चेहरे आणि प्रवासाची उत्सुकता यामुळे प्रत्येकजण पुढील वाटचालीसाठी सज्ज होता.

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

कृतीशील विचारांचा गतीशील संघर्षयोध्दा दादाभाई राजेंद्र पाटील

सुधाकर मराठे 
              जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही आणि असेच मिळाले तर ते कायम टिकत नाही. यासाठी सदैव प्रत्नशील असणे गरजेचे आहे. असेच सदैव प्रयत्नशील असलेले एक जिगरबाज कृतीशील विचारांचा गतीशील संघर्षयोध्दा मित्र म्हणजे दादाभाऊ राजेंद्र पाटील. 

             आई वडील कमी वयात साथ सोडून गेले. घरची हालाखीची परिस्थिती यावर मात करण्यासाठी व परिस्थितीत बदल करून दाखवण्याची जिद्द आणि लढवय्या बाणा, कोणताही बडेजाव पणा नाही, अंगी केवळ जिद्द व मेहनत करण्याची तयारी असलेल्या दादाभाऊ, शहरातील एका पाटील कुटूंबात  जन्माला आला. वडील राजेंद्र पाटील आणि विटाबाई यांचा उदरी जन्म घेतलेल्या दादाभाऊ यास ज्ञानाची शिदोरी माता- पित्यांकडूनच मिळाली. जय योगेश्वर पंथाचे अनुयायी असलेल्या या कुटुंबात सर्वच जण देव धार्मिक, आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची. परिवारात आई, वडील, एक भाऊ व एक बहिण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे तसे कठीणच. अशा परिस्थितीत वडिलांनी शेती छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे काहीसा हातभार लागला. .
        सर्व सुरळीत होत असताना नियतीच्या मनात काही वेगळंच होत. अचानक काळाने झडप घातली आणि त्यात राजेंद्र पाटील यांचे निधन झालं. धकाधकीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत दादूने महाविद्यालयीन शिक्षण (MA इंग्लिश) पूर्ण केले. वडीलांच्या निधना नंतर अवघ्या वयाचा २३ व्या वर्षी परिवाराची जबाबदारी दादुच्या खांद्यावर आली. त्यातच बहिणीची व स्वतःच्या लग्नाची जबाबदारी देखील दादाभाऊने शिताफीने पार पडली..

              रॉकेलचा व्यवसाय चालविण्यासोबत मिळेल ते काम  कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी करु लागले. यातून पैसा मिळत गेला आणि समस्या सुटत गेल्या. त्यातच दादूचा लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, अडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावाने समाज बांधवांशी त्यांची नाळ जुळली गेली. अंगात काम करण्याची धमक आणि खडक फोडून पाणी निघेपर्यंत कष्ट करण्याची ताकद असल्याने हाताला मिळेल ते काम त्यांनी सुरू केले. मोबाईल मध्ये सुरुवातीपासूनच आवड असल्याने त्याने मोबाईलचा दुकानात काम केले. हळू हळू कालांतराने स्वतःचे दुकान उभे केले. मात्र मोबाईल दुरुस्तीसाठी दुसऱ्याकडे पाठवावे लागत असल्याने व वेळेवर दुरुस्त करून परत मिळत नसल्याने नाराज होत असलेला ग्राहक पाहून दादूने मोबाईल दुरुस्ती व सॉफ्टवेअरचे काम शिकण्याचा निर्धार केला. सुरत येथे जाऊन त्याने हे काम कमी वेळेत शिकून घेतले. अन् शहरातील गजबजलेल्या स्मारक चौकात स्वतःचे दुकान टाकले. आज दादूची ओळख शहरातील एक नामांकित मोबाईल दुरुस्ती करणे व मोबाईल साहित्य विक्री करणारा अशी निर्माण झाली आहे. मोबाईल मध्ये पहिल्यापासून त्यावर असल्यास कारणाने कुणाचाही मोबाईलची काही समस्या आली तर दादूच्या शोध घेत अनेक जण त्याचा शोधात येतात.        

हालाखीची परिस्थिती वर मात करत कठोर परिश्रम जिद्दीच्या जोरावर आज दादूने स्वतःचा व्यवसाय उभा केला असून कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचा मालकीचे घर त्याने उभारले आहे. या सर्वांमध्ये त्याला त्याची पत्नी पूजा तिचे मोठे सहकार्य लाभले असून परिस्थितीशी झुंजत तिने दाद दादूची साथ देत घराला घरपण आणले आहे या घराला प्रकाशित करण्याचे कार्य वीर व मानसीच्या माध्यमातून झाले आहे. दादू तुझा कठोर परिश्रमाला व एवढे असतानाही कधीही दुःखाची व परिस्थितीबाबत बोलत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याची तुझ्यात असलेले एक वेगळेपण दर्शवते...